वेगळी माझी खोली

काव्-काव्'s picture
काव्-काव् in जे न देखे रवी...
21 Jun 2011 - 3:41 pm

बाबंकडे हट्ट करून घेतली वेगळी माझी खोली
आतातर मी मोठा झालो, ४ वर्ष पूर्ण झाली
दंग-मस्ती करतो, ठेवतो खेळणी पसरून सारी
एकटे खोलीत राहण्याची, मजाच काही न्यारी

वेगळी माझी खोली, वेगळी माझी कॉट
माझे छोटेसे कपाट, असा माझा थाट
छोटीशी खिडकी, त्याला छोटेसे दार
थोडे दार उघडले, तर वारा येतो फार

मी माझ्या खोलीत मोठ्या ऐटीत राहतो
संध्याकाळी दुध पिताना खिडकी बाहेर पाहतो
काऊ करतो कावकाव, चिऊ गोड गाणे गाते
खारुताई मारते उडी, तेव्हा खूप मजा येते

बागेत खेळून घरी येताच मी माझ्या खोलीत येतो
रात्री जेवण होताच माझ्या कॉटवर झोपू पाहतो
मला झोपच येत नाही, रात्री थंडी पडते गार
किर्र काळोख होतो, मला भीती वाटते फार

एकटाच बडबड करता करता एकदम घाबरून जातो
मग लगेच पळत पळत, मी बाबाच्या खोलीत येतो
डोक्यावरून पांघरून घेऊन, झोपतो बाबाच्या कुशीत
चांदोमामाची गोष्ट ऐकत झोपी जातो खुशीत

बालगीत

प्रतिक्रिया

गणेशा's picture

21 Jun 2011 - 8:19 pm | गणेशा

छान कविता ... आवडली

आनंदयात्री's picture

21 Jun 2011 - 8:38 pm | आनंदयात्री

हा हा. मस्त आहे गाणे.

रामदास's picture

21 Jun 2011 - 9:11 pm | रामदास

बालगीतं वाचून बरीच वर्षे झाली होती .या गाण्याला चाल लावली असेल तर ते पण मिपावर अपलोड करावे.

मेघवेडा's picture

22 Jun 2011 - 11:20 pm | मेघवेडा

हा हा हा.. मस्त!

या गाण्याला चाल लावली असेल तर ते पण मिपावर अपलोड करावे.

खरंच करा. चालीवर ऐकायला मजा येईल! :)

विसोबा खेचर's picture

23 Jun 2011 - 11:47 am | विसोबा खेचर

मस्त..!

अवांतर - आपला आयडी मला फारच आवडून गेला..मस्तच आहे, वेगळा आहे! जियो..! :)

तात्या.