DSLR कॅमेरा वाले नवीन फोटोग्राफर

सांगलीचा भडंग's picture
सांगलीचा भडंग in काथ्याकूट
12 Jun 2011 - 9:44 am
गाभा: 

एक प्रसंग : मध्यंतरी एका शनिवार रविवारी एका प्रसिद्ध सी -वर्ल्ड आणि पार्क मध्ये फिरायला गेलो होतो. तिथे बरेच कार्यक्रम होतो आणि खरोखरच ते बेस्ट होते . डॉल्फिन , व्हेल , सी-लायन याचे एक से एक कार्यक्रम होते. तिथे बरेच प्रवासी बघितले आणि बराच लोकांकडे एकदम हाय एंड कॅमेरे होते . आणि बरेच जन कार्यक्रम बघायचा आनंद न घेता कुठे सगळा कार्यक्रम रेकॉर्ड कर किव्वा पूर्ण आर्धा तास फोटो काढत बस या मधेच वेळ घालवताना दिसले . आमच्या ग्रुप मध्ये पण एक मित्र होता ( हाय एंड कॅमेरेवाला ) त्याला विचारले अरे एव्हडे महागडे तिकीट काढून आलो आहे आणि शो पण एकदम बेस्ट आहे तर ते बघ ,फोटो काय काढत बसला आहेस ... ७-८ फोटो काढले कि झाले कि ....तर तो म्हटला अरे तुम्ही व्हा पुढे ..मी फोटो काढतो थोडे आणि जॉईन होतो नंतर तुम्हाला ...आम्ही मग दुसरा कार्यक्रम बघायला निघून गेलो .संध्या काळी भेटलो तर त्याने १-२ कार्यक्रम बघितलेच नव्हते आणि त्याचा बर्याच गोष्टी बघायच्या राहून गेल्या होत्या ....आणि आमच्या मते त्याने त्याचा पूर्ण दिवस फुकट घालवला होता फोटो काढण्या मध्ये ...
हे असेच मी माझ्या बर्याच मित्र मैत्रिणी मध्ये बघितले आहे .....म्हजे त्यांना असे काही फार पूर्वी पासून फोटो काढण्याची क्रेझ (खूळ ) नव्हती आणि कॅमेरा होते पण ७-८ झूम आणि ५-६ मेगा पिक्सेल वाले ( मला एवडेच कळते)....पण अचानक सगळ्यांनी DSLR तैप चे मोठे मोठे कॅमेरा घेतले आणि एका दिवसा मध्ये गुगल वर सर्च मारून, थोडे फार ब्लोग वाचून सगळे एकदम प्रो फोटोग्राफर झाले ..
एकदम स्पीड , लाईट ,शेडो, अपर्चर , पानोरामा असे शब्द आईकायला यायला लागले ..आणि जाईल तिथे हे लोक फोटो काढायला लागले..आणि सगळे फोटो एकदम फेसबुक वर टाकले गेले आणि प्रत्तेक फोटो खाली सगळे टेक्निकल माहिती किती कसा स्पीड , लाईट ,शेडो, अपर्चर , पानोरामा....

तर तुम्हाला काय वाटते
1. फोटो ग्राफी हि एक कला आहे असे मानतात आणि ती अचानक अशी १-२ दिवसा मध्ये येऊ शकते का ....आणि त्यासाठी DSLR कॅमेराच लागतो का शिकायला .

२. हे असे फक्त फोटो ग्राफी या कले मधेच का दिसते कारण मी असा कोणी बघितला नाही कि त्याने एक महागडी बासरी आणली आहे आणि लगेच प्रक्टिस करून तो सुंदर वाजवायला शिकला आहे ..

३.. एकदम महागडा कॅमेरा घेवून १ दिवस गुगल वर सर्च मारून ...लगेच प्रो फोटोग्राफार होतात त्यांच्या विषयी तुमचे काय मत आहे ...म्हजे कुठे मेणबत्तीचा फोटो काढ,,कुठे झुरळाचा फोटो काढ ....कुठे केक चा फोटो काढ ...सगळ्याचे क्लोज अप घे ...या ग्रुप विषयी

४. सगळ्या ग्रुप चा विचार करता अशी मंडळी ग्रुप मध्ये असतील तर त्यांचा त्रास होतो का ......म्हजे वेळ पाळताना ..बस , ट्रेन पकडताना

५. सहलीला किव्वा सहज भटकायला गेल्यावर कॅमेरा हा पाहिजेच पण तो हाताळायला सोपा आणि ठीक ठाक क़्वलिति चा असला तरी चालतो ..पण तो DSLR रच पाहिजे असे का ?

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

12 Jun 2011 - 9:49 am | नगरीनिरंजन

कलादालनातल्या दिग्गजांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.

टारझन's picture

12 Jun 2011 - 10:50 am | टारझन

येस , वी आर ..

पाषाणभेद's picture

12 Jun 2011 - 11:21 am | पाषाणभेद

कॅमेरा हे एक साधन आहे. येणारा फोटो हे कलेचे साध्य आहे. कॅमेरा महत्वाचा नसून त्यामागचा डोळा महत्वाचा असतो. मला तर फोटोशॉपने एडीट केलेलेसुद्धा फोटो आवडत नाहित. नव्हे तसले फोटो हे फोटोच नव्हे. DSLR कॅमेरे बाळगणे, टेक्नीकल चर्चा करणे हे स्टेटस सिंबल बनत चाललेय.

जोशी's picture

12 Jun 2011 - 5:28 pm | जोशी

------- मला तर फोटोशॉपने एडीट केलेलेसुद्धा फोटो आवडत नाहित. नव्हे तसले फोटो हे फोटोच नव्हे.

१००% सहमत.

पॅरीस मध्ये फिरत असताना ऐक मित्र म्हणाला - " अत्ता फोटो कढऊन घेतो, घरी जाऊन पॅरीस बघतो !!"

चर्चेतील सर्व मुद्यांशी सहमत असल्यामूळे ईछा असुनही DSLR कॅमेरा घेण्यास धजावत नहीये.

....जोशी

आत्मशून्य's picture

13 Jun 2011 - 1:45 am | आत्मशून्य

मला तर फोटोशॉपने एडीट केलेलेसुद्धा फोटो आवडत नाहित. नव्हे तसले फोटो हे फोटोच नव्हे

एकदम मस्त.. फोटोशॉप व्यावसायीक सोफ्ट्वेअर आहे... त्याने जाहीराती बनवाव्यात वा इतर मनोरंजक चमत्कार करावेत. पण सहज टीपलेले फोटोच ज्यात रंगसंगतींचा फेरफार केला गेला नाहीये तेच खरे उत्तम फोटो.. उरलेलं सगळ प्लास्टीकच......

Nile's picture

13 Jun 2011 - 1:04 pm | Nile

कॅमेरा हेच एक व्यावसायीक उपकरण आहे. तुम्ही फोटोच कशाला काढता? वेगवेगळे कॅमेरे वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून केमीकल/ फोटॉइलेक्ट्रीक वगैरे पद्धती वापरून फोटो काढतात. मग नक्की कूठली पद्धत, कॅमेरा म्हणजे खरे उत्तम फोटो?

फोटो काढणे आणि फोटोशॉप सारखे तंत्रज्ञान वापरणे ही दोन्ही तंत्रं आहेत. त्यात खरं खोटं असं काही नाही.

आत्मशून्य's picture

14 Jun 2011 - 1:19 am | आत्मशून्य

फोटो काढण्यापूर्वी वा डेव्हलप करताना पाहीजे त्या प्रोसेस वापरून अपेक्शित रीझल्ट मिळवणे म्हणजे कला, तंत्रज्ञान व कौशल्य यांचा संगम होय, स्पेशल इफेक्ट द्यायचे असतील तर डीजीटल प्रोसेसींग आवश्यकच आहे, पण उगीच साध्या साध्या कलर एन्हांसमेंटसाठी फोटोशॉप वापरले जाते तेव्हा मला ते पटत नाही आणी ते करण्यापेक्षा फोटो काढायच्या तंत्रामधेच सूधारणा करावी (वाव असताना) या मताचा मी आहे. आणी हे माझं मत दूसर्‍याला पटाव अशी माझी सक्तीही नाही :)

ह्म्म्म.. सहमत आहे.
याचवरून मला 'कॉफिचा कप' http://misalpav.com/node/3684 हा चर्चा विषय सुचला होता. :)

शैलेन्द्र's picture

12 Jun 2011 - 3:55 pm | शैलेन्द्र

"फोटो ग्राफी हि एक कला आहे असे मानतात आणि ती अचानक अशी १-२ दिवसा मध्ये येऊ शकते का ....आणि त्यासाठी DSLR कॅमेराच लागतो का शिकायला ."

ही जितकी कला आहे तितकेच तंत्र आहे.. जर कुणाला त्याचा नाद लागत असेल , आणी तो त्याच्या पैशाने कॅमेरा घेवुन फिरत असेल तर ईतरांना त्रास व्हायच कारण दिसत नाही, शेवटी कला असो वा तंत्र, कुठेतरी सुरवात करायलाच हवी ना..

आता, DSLR च लागतो का? नाही.. पण तो असेल तर कॅमेरा वापरायची खरी मजा येते.. महाग असतो कबुल आहे.. लेन्स वागवाव्या लागतात कबुल आहे.. पण आहे आम्हाला माज.. त्रास घ्यायची तयारी आहे.. काय प्रोब्लेम आहे..

"हे असे फक्त फोटो ग्राफी या कले मधेच का दिसते कारण मी असा कोणी बघितला नाही कि त्याने एक महागडी बासरी आणली आहे आणि लगेच प्रक्टिस करून तो सुंदर वाजवायला शिकला आहे .."

कारण फोटोग्राफी कला आहे तितकच तंत्र आहे.. एका दीवसात काहीच नाही जमत, पण मग सुरवातच नाही करायची हे कुणी सांगीतल?

". एकदम महागडा कॅमेरा घेवून १ दिवस गुगल वर सर्च मारून ...लगेच प्रो फोटोग्राफार होतात त्यांच्या विषयी तुमचे काय मत आहे ...म्हजे कुठे मेणबत्तीचा फोटो काढ,,कुठे झुरळाचा फोटो काढ ....कुठे केक चा फोटो काढ ...सगळ्याचे क्लोज अप घे ...या ग्रुप विषयी "

दोन तीन मत आहेत.. १) माणसाची आर्थिक ताकद आहे स्वताच्या छंदावर खर्च करायची.. २) माणसाला चांगला छंद आहे, टीकेल कि नाही ते काळ ठरवेल ३)त्याची मुल नशिबवान आहेत.. लहान्पणापासुनच आयुष्य समृध्द करणार्‍या अनेक गोष्टीपैकी एक त्यांना हाताळायला मिळेल.
बाकी ते "प्रो फोटोग्राफार" झाले अस त्यांनी तुम्हांला सांगीतल का? असेल तर वेडे समजुन सोडुन द्या..

"सहलीला किव्वा सहज भटकायला गेल्यावर कॅमेरा हा पाहिजेच पण तो हाताळायला सोपा आणि ठीक ठाक क़्वलिति चा असला तरी चालतो ..पण तो DSLR रच पाहिजे असे का ?"

पाहीजेच असे तरी का?
बाकी तुंम्हाला कठीण जात किंवा आवडत नाही म्हणुन तुंम्ही त्याच फुटपट्टीने ईतरांना का मोजता? DSLR का पाहीजे हे जाणुन घेण्यासाठी तुंम्ही कॅमेर्‍यांचा अभ्यास करावा हे उत्तम..

प्राजु's picture

12 Jun 2011 - 7:14 pm | प्राजु

+१

सांगलीचा भडंग's picture

12 Jun 2011 - 7:58 pm | सांगलीचा भडंग

फोटोग्राफी कला आहे तितकच तंत्र आहे. ......हे मात्र पटले ..... कारण थोडी फार आवड असेल तर कुठलीही कला शिकायला वेळ लागतोच ( किव्वा जन्मजात तरी कला अंगात असायला पाहिजे) ..
पण फोटोग्राफी ला एकदा तंत्र या विभाग मध्ये पण टाकले कि मग कले पेक्षा कलेचे माध्यम कोणते आहे यावर बर्याच गोष्टी अवलंबून राहतात ....आणि एकदा तंत्र म्हटले कि ' त्यावरच्या कुठल्याही चर्चे मध्ये भाग घेता येतो ( अर्थातच प्रो म्हणून )..
ज्याला जास्ती जास्त तंत्राची माहिती तो प्रो ........

आणि आधीच लिहिल्या प्रमाणे हा लेख "१-२ दिवसात स्वत प्रो फोटोग्राफार आहेत असे म्हणणार्य लोकांशी सम्भंधित असल्याने ........माणसाची आर्थिक ताकद आहे स्वताच्या छंदावर खर्च करायची..माणसाला चांगला छंद आहे, टीकेल कि नाही ते काळ ठरवेल .....त्याची मुल नशिबवान आहेत....हे सर्व मुद्दे गैरलागू ठरून त्यांना 'वेडे' म्हणायला तुमची हरकत नाही आहे बहुतेक.

"सहलीला किव्वा सहज भटकायला गेल्यावर कॅमेरा हा पाहिजेच पण तो हाताळायला सोपा आणि ठीक ठाक क़्वलिति चा असला तरी चालतो ..पण तो DSLR रच पाहिजे असे का ?"

पाहीजेच असे तरी का?....... हा मुद्दा पण ' तुम्ही ज्यांना वेडे म्हणायला सांगत आहात 'त्याच ग्रुप शी रीलेटेड आहे ..आणि जे प्रत्तेक ठिकाणी असा मोठा कॅमेरा घेवून हजार होतात आणि सगळ्या ग्रुप चे काळ ,काम वेग याचे गणित बिघडवतात ...

शैलेन्द्र's picture

13 Jun 2011 - 9:00 am | शैलेन्द्र

"पण फोटोग्राफी ला एकदा तंत्र या विभाग मध्ये पण टाकले कि मग कले पेक्षा कलेचे माध्यम कोणते आहे यावर बर्याच गोष्टी अवलंबून राहतात ....आणि एकदा तंत्र म्हटले कि ' त्यावरच्या कुठल्याही चर्चे मध्ये भाग घेता येतो ( अर्थातच प्रो म्हणून )..
ज्याला जास्ती जास्त तंत्राची माहिती तो प्रो ........"

चुक.. ज्याला फोटोग्राफी शिकायचीय त्याला, तंत्र तर माहीत हवेच पण एखादा गवयी जसा रियाज करतो तसे त्याने सतत छायांकन करत राहीले पाहीजे. वेगवेगळे एक्स्पोजर, शटर स्पीड, झूम, मीटरींग, अँगल .. सगळे वापरुन पहावे लागते. साधा हात स्थीर करायला कित्येक दिवस जातात. यामुळेच नविन फोटोग्राफर कशाचेही फोटो काढतात, कसं जमतय, काय चुकतय ते बघतात.. ज्याला जमत तो पुढे एक चांगला छायाचित्रकार होतो..

"आणि आधीच लिहिल्या प्रमाणे हा लेख "१-२ दिवसात स्वत प्रो फोटोग्राफार आहेत असे म्हणणार्य लोकांशी सम्भंधित असल्याने"

अहो " प्रो " म्हणजे काय? फोटोग्राफी हे ज्यांचे उपजिवीकेचे साधन आहे ते किंवा ज्यांनी फोटो काढावे म्हणुन लोक त्यांना पैसे द्यायला तयार आहेत ते. यात मुंजीचे फोटो काढण्यापासुन ते अंडरवॉटर फोटोग्राफीपर्यंत सगळ येतं.
पण असे नविन DSLR वाले लोक जोवर तुमच्याकडे फोटो विकायला येत नाही तोवर तुंम्ही टेन्शन का घेता?

"आणि जे प्रत्तेक ठिकाणी असा मोठा कॅमेरा घेवून हजार होतात आणि सगळ्या ग्रुप चे काळ ,काम वेग याचे गणित बिघडवतात ..."
हा सुरवातीचा उत्साह असतो, काही दिवसात ओसरतो. थोड हलक घ्या.. ग्रुप्चे काळ / काम / वेग बिघडवणारे अनेक घटक असतात .. त्यातला हा फार निरुपद्रवी आहे.. शेवटी सगळ्यांना एकत्र घेवुन जायच म्हणजे अ‍ॅडजस्ट व्हायलाच हव ना..

अग्रजा's picture

12 Jun 2011 - 8:56 pm | अग्रजा

+१०

थोडं इनो घ्या, बरं वाटेल.

रेवती's picture

12 Jun 2011 - 5:54 pm | रेवती

हम्म.....
काही मंडळी फोटू काढण्यातच वेळ घालवतात हे खरे.
मीही असेच फोटू काढत बसायचे.......नंतर काय पहायला गेले ते विसरल्यामुळे त्या ठिकाणातला इंटरेस्ट संपायचा आणि फोटूही बघावेसे वाटायचे नाहीत. हल्ली मी सुधारलेय.;) फोटू एक दोन आले तरी ठीक, जे चाल्लय ते पाहून घेते..........घरी आल्यानंतर कमी असले तरी फोटू पहायला जास्त मजा येते.
आणि महागाच्या क्यामेर्‍याची धास्तीच आहे. उगाच कुठे आपटला गेला, पडला, फुटला तर नस्ते व्याप. बर्‍याच वर्षांपूर्वी गोव्याला गेले असताना बोटीतून उतरताना एका १०-१२ वर्षाच्या मुलाच्या हातातून क्यामेरा पडला तो थेट पाण्यात. त्यांनी नवीन घेतलेला त्यावेळचा चांगला क्यामेरा डोळ्यादेखत असा गेलेला पाहून सहलीच्या पहिल्या दिवशीच त्यांचा मूड गेला.

>>म्हजे कुठे मेणबत्तीचा फोटो काढ,,कुठे झुरळाचा फोटो काढ
अगदी अगदी.
कालच एका मित्राने असाच कसला तरी भंकस फोटु काढुन चे पु वर टाकला अन कॅप्शन दिलेय "Just Zooominggggg"

>>>>>>>. आणि बरेच जन कार्यक्रम बघायचा आनंद न घेता कुठे सगळा कार्यक्रम रेकॉर्ड कर किव्वा पूर्ण आर्धा तास फोटो काढत बस या मधेच वेळ घालवताना दिसले .

खरं हाय...
पण काहि महिन्यानंतर काढलेल्या फोटो पाहण्याचा आनंद काहि वेगळाच असतो..त्यामुळे कधि कधि समजत नाहि फोटो काढवे कि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.....

ऋषिकेश's picture

13 Jun 2011 - 9:40 am | ऋषिकेश

प्रॅक्टिस मेक्स मॅन /वुमन परफेक्ट.. किंव गटण्याच्या भाषेत 'प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु असतो' ;)
तेव्हा जर इतका महागडा कॅमेरा घेतला आहे तर ती व्यक्ती तो नीट चालवता यावा यासाठी प्रयत्न करेलच असे वाटते. शिवाय DSLR मधे संपुर्ण मानवी नियंत्रण असल्याने फोटो काढताना पूर्ण स्वतःचे कसब ओतावे लागते. अगदी साध्या पॉईंट अ‍ॅन्ड शुट वर हवाला क्यामेराच्या बुद्धीवर ठेवावा लागतो. त्यामुळे अधिक मजा येत असावी.

बाकी, लेख वाचुन इनो महाग झालंय की आवडत नाही? असा प्रश्न पडला ;)

शिल्पा ब's picture

13 Jun 2011 - 9:47 am | शिल्पा ब

असले क्यामेरे किनई फार्फार महाग असतात. ओळखीच्या एकाने $ २५०० ची लेन्सच घेतलीये. अर्थात त्याचं लग्न झालं नाहीये अजुन!!
अशा लोकांना धडा शिकवायला म्हणुन तुम्हीच एक असला क्यामेरा घेउन टाका हा आमचा (नेहमीप्रमाणे) एक फुकट सल्ला.

शैलेन्द्र's picture

13 Jun 2011 - 9:51 am | शैलेन्द्र

+१

मृत्युन्जय's picture

13 Jun 2011 - 11:39 am | मृत्युन्जय

..आणि जाईल तिथे हे लोक फोटो काढायला लागले..आणि सगळे फोटो एकदम फेसबुक वर टाकले गेले आणि प्रत्तेक फोटो खाली सगळे टेक्निकल माहिती किती कसा स्पीड , लाईट ,शेडो, अपर्चर , पानोरामा....

नवीन लग्न झालेल्या मुली कश्या मंगळसुत्राशी चाळा करतात ना तसेच असते हे.

आणि हा प्रकार DSLR कॅमेरा वाले फोटोग्राफर करतात हा तुमचा गैरसमज आहे, एखाद्याने नवीन आय फोन घेतला असेल तर त्याचे आयफोन वर असलेच चाळे चालु असतात. मी नवीन नवीन मोबाइल घेतला होता तेव्हा त्याच्यावर पण किडे करायचो. एखाद्याने नवीन डीव्हीडी प्लेयर घेतला तर तो सगळे फंक्शन्स ट्राय करुन बघतो. एखाद्या गृहीणीने नवीन कुकींग रेंज घेतली की तिच्या पाकक्रिया कौशल्याला उधाण येते. सगळ्या नवीन अ गोष्टींबाबत हे होतेच. मग बिचार्‍या DSLR कॅमेरा वाल्यांवर राग का?

जर एखादा माणूस गुगलुन ही कला शिकु पाहत असेल तर ते कौतुकास्पद आहे. गॅझेट्स हाताळताना माहिती करुन घेणे कधीही चांगले.

1. फोटो ग्राफी हि एक कला आहे असे मानतात आणि ती अचानक अशी १-२ दिवसा मध्ये येऊ शकते का ....आणि त्यासाठी DSLR कॅमेराच लागतो का शिकायला .

कुठलीही कला २ दिवसात येत नाही. पण ती शिकण्यासाठी अभ्यास करावाच लागतो. गाणे शिकण्यासाठी सा रे गा मा शिकायलाच लागेल. सुरुवात त्यापासुनच करतात ना? मग एखाद्याने सारेगामा चा रियाझ केला तर तो काही लगेच भीमसेन जोशी होत नाही किंवा तसा दावाही करु शकत नाही. पण म्हणुन काय त्याने सारेगामा चा रियाझच करु नये की काय?

२. हे असे फक्त फोटो ग्राफी या कले मधेच का दिसते कारण मी असा कोणी बघितला नाही कि त्याने एक महागडी बासरी आणली आहे आणि लगेच प्रक्टिस करून तो सुंदर वाजवायला शिकला आहे ..

उत्तर वरीलप्रमाणे

३.. एकदम महागडा कॅमेरा घेवून १ दिवस गुगल वर सर्च मारून ...लगेच प्रो फोटोग्राफार होतात त्यांच्या विषयी तुमचे काय मत आहे ...म्हजे कुठे मेणबत्तीचा फोटो काढ,,कुठे झुरळाचा फोटो काढ ....कुठे केक चा फोटो काढ ...सगळ्याचे क्लोज अप घे ...या ग्रुप विषयी

फोटो ग्राफी ही अशी कला आहे की जी नवनवीन प्रयोग केल्याशिवाय उत्तम अवगत होत नाही. एखादे उत्तम छायाचित्र काढायला जमण्यापुर्वी १०० भिकार छायाचित्र काढली जातातच. कलात्मक मुल्य असलेले एखादे छायाचित्र काढण्यासाठी ती कलादृष्टी विकसित होणे गरजेचे असते. ती तशी विकसित होताना १०० भिक्कार, रद्दड, बालीश छायाचित्रे निघणारच,

४. सगळ्या ग्रुप चा विचार करता अशी मंडळी ग्रुप मध्ये असतील तर त्यांचा त्रास होतो का ......म्हजे वेळ पाळताना ..बस , ट्रेन पकडताना

नक्की काय त्रास होतो. असे लोक जर फोटो काढत बसले असतील तर आपण खुशाल पुढे निघुन जावे. त्यांचे त्यांनी बघुन घ्यावे.

बाकी हे नको तिथे आणि सगळीकडे फोटो काढणारे फक्त DSLR वालेच असतात असे नाही. फोटोग्राफीच्या वेडाने झपाटलेले सगळेचजण नवख्या दिवसात असेच काहीतरी करतात.

५. सहलीला किव्वा सहज भटकायला गेल्यावर कॅमेरा हा पाहिजेच पण तो हाताळायला सोपा आणि ठीक ठाक क़्वलिति चा असला तरी चालतो ..पण तो DSLR रच पाहिजे असे का ?

हे ज्याच्या त्याच्या आवडीवर अवलंबुन आहे. DSLR मधुन काढलेले फोटो जास्त चांगल्या क्वालिटीचे असतात यात काही वाद नाही. तुम्ही कधी क्लिक & शूट मधुन उडत्या पक्ष्यांचे फोटो काढायचे प्रयत्न केले आहेत का? अजिबात नीट येणार नाहीत. DSLR वापरुन बघा झूम लेन्सेस लावून उत्तम फोटो येइल.

तुम्हाला कधीतरी एखादा स्पॉट बघुन असे वाटले का की वा यावेळेस एकाच फोटोत खालचे तळे आणि वरचे आकाश कैद करता आले तर बहार येइल. पण ऐनवेळेस तुमच्या क्लिक & शूट ने दगा दिला असेल कारण फोकल लेन्थ अपुरी असल्यामुळे एकतर दोन्ही गोष्टी एका फोटोत बसल्या नसतील किंवा बसल्या तरी क्लॅरिटी गंडलेली असेल. DSLR वापरुन बघा पॅनोरेमिक परिणाम नेहेमीच वरचढ असेल.

तुम्हाला कधी एकापाठोपाठ सटासट फोटो काढायचे आहेत, खासकरुन ऑब्जेक्ट मूव्हिंग असेल तेव्हा किंवा तुम्ही गाडीत अथवा रेल्वेत बसलेले असताना तर तुम्हाला लक्षात येइल की क्लिक & शूट २ फोटोंच्या मध्ये किमान ६ सेकंद घेतो, कधीकधी जास्त. DSLR मध्ये तो प्रॉब्लेम येणार नाही. काही कॅमेरर्‍यांमध्ये ३ फोटो लागोपाठ घेण्याची सोय असते पण तरीही क्लॅरिटी DSLR ची येणार नाही.

मी स्वतः क्लिक & शूट वापरतो. माझ्याकडे DSLR नाही. क्लिक & शूट सुद्धा हाय एंड नाही. पण मी काही एक उत्तम फोटोग्राफर नाही किंवा इतका पॅशनेट देखील नाही. जर एखादा असेल तर तो अर्थात DSLR घेइल. ज्याची त्याची आवड. एक नक्की की DSLR ने जो परिणाम साधता येतो किंवा ज्या दर्जाचे फोटो निघतात तेवढे साध्या केमेर्‍याने निघत नाहीत.

शैलेन्द्र's picture

13 Jun 2011 - 1:08 pm | शैलेन्द्र

+१

आमच्याकडे मुलांचे शैक्षणिक वर्ष संपत आले आहे. शेवटच्या काही दिवसांमध्ये गाण्यांचे सादरीकरण, नाटुकल्यांचे सादरीकरण, आईस्क्रीम सोशल, शर्ट रंगवणे, पिझ्झा डे असे प्रकार रोज एकेक चालू आहेत. अर्थातच आईबापांना निमंत्रण असते या लीला बघायला.;) तिथे हजेरी लावणे आणि फोटू आणि क्लिपिंग्ज घेणे हे पालकांचे परमकर्तव्य आहे असे आमच्या मुलाला वाटत असल्याने निदान मला तरी जावे लागते. अनेक मातापिता हापिसातून धावपळ करत येतात कार्यक्रम संपला की पळत पुन्हा हापिस गाठतात. काल आमच्या क्यामेरा चार्ज करायला मी विसरले तरी नवर्‍याने तो करून ठेवला होता म्हणून मला 'हुश्श' झाले. मिपावरचे हौशी फोटुवाले बघुन मला मी काढलेला एकही फोटू आवडेना! झूम, अँगल अन् कायकाय अजिबात आवडत नव्हते तेंव्हा या लेखाची आठवण झाली. लांब अंतरावर बसलेल्या आईवडीलांना मुलाचा क्लोजप घेता यायलाच. निदान त्यावेळी तरी हा डी एस एल आर हवा असे वाटले आणि माझ्या आधीच्या प्रतिसादावर हा प्रतिसाद द्यावासा वाटला.
आज काही माझ्यासारखीच डोकी असा विसरभोळेपण करून आलेली दिसली आणि त्यांनी आपापले मोबाईलफोन काढून वेळ भागवली. परवाच्या नाटक समारंभाला मी क्यामेरा विसरून गेले होते आणि मोबाईलचा क्यामेर्‍याचा आधार घेतला होता. आज एका पित्याकडे (दोन्ही अर्थी) तुम्ही म्हणता तसा क्यामेरा होता आणि त्याने मुलगी काय गाते त्याकडे अजिबात बघितले नाही तर झूम झूम झूम बाबा करत बसला होता.

भडकमकर मास्तर's picture

14 Jun 2011 - 12:07 am | भडकमकर मास्तर

तुम्हीही घ्याल हो एक दिवस डीएसेलार
आणि तुम्हीही काढाल फोटो असेच
आणि सांगाल जगाला
मीच तो मीच तो
ष्लोबोदान झिवोजिनोविच
ज्याने रंगवलंय अख्खं महाभारत
विचित्र अनघड कुंचल्यानं
अन्
दुर्दैवी कल्पनाझिम्मड
रसरसती पानगळ
अन् चिवित्र
अ‍ॅपर्चर आणि शटरस्पीड
डुबुक् डुबुक्

शैलेन्द्र's picture

14 Jun 2011 - 9:51 am | शैलेन्द्र

"शरदीनीतैंच्या कवीता ऐकताना मास्तरांनी काढलेले अ‍ॅबस्ट्र्क्ट फोटु" असा तिकीट्फाडु कार्यक्रम करायचा का?

धनंजय's picture

14 Jun 2011 - 12:18 am | धनंजय

गमतीदार लेख आहे.

पण शेवटी प्रश्न अर्धवट गंभीरपणे विचारल्यासारखे भासतात. त्यामुळे तितकी गंमत वाटत नाही.

जयंत कुलकर्णी's picture

14 Jun 2011 - 4:16 pm | जयंत कुलकर्णी

जाऊदेत एक DSLR ने काढलेला एक फोटोच टाकतो. बघा आवडतोका ते !

पाषाणभेद's picture

14 Jun 2011 - 4:28 pm | पाषाणभेद

अच्छा, तर तुमच्याकडे DSLR आहे तर!
:-)

जयंत कुलकर्णी's picture

14 Jun 2011 - 4:40 pm | जयंत कुलकर्णी

दुर्दैवाने हो ! आणि एक मोठी लेन्सही आहे. म्हणजे आता मेलोच !
:-)

टारझन's picture

14 Jun 2011 - 4:53 pm | टारझन

चला रे चार जणं या ... ए तु .. तु तिरडी बांध .. ए तु मडकं घेऊन ये रे ... हा .. थोडी चंदणाच्या झाडाच्या बारक्या काड्या आण नावाला .. एकाने तुप आणा ... नको देशी नको डालडा चालेल .. चला बिगी बीगी .. :)

- जिवंत गुलकर्णी

जयंत कुलकर्णी's picture

14 Jun 2011 - 5:02 pm | जयंत कुलकर्णी

हा हा !
अहो मेलोच म्हणजे अजून मेलो नाही.

पण हरकत नाही माझी यात्रा तुम्ही एकटेच काढू शकाल. चौघांची अवश्यकता असेल असे वाटत नाही. बाकिच्यांना कशाला त्रास देताय ? जसे मुडदा बसवतात तसा तुमच्या खांद्यावर आरामात बसेन मी. झिपडांग झिपडांग .............
:-)

जंगली मसवन

टार्‍या जर चौघांपैकी एक झाला तर उतरंडीमूळे प्रेत घसरून खालीच पडेल! =)) =)) मेलेल्यांना तरी छळू नकोस रे टार्‍या! ;-)

जयंत कुलकर्णी's picture

14 Jun 2011 - 5:24 pm | जयंत कुलकर्णी

हो म्हणूनच खांद्याची कल्पना आहे ना ! आणि छळण्याविषयी म्हणाल तर आपण मेले जग मेले ! आणि प्रेताचे वजन वाढलेले असते हे माहीत नाही का आपल्याला ? म्हणजे झालाच त्रास तर कोणाला होणार ?

;-)

रेवती's picture

14 Jun 2011 - 5:22 pm | रेवती

फोटू मस्त आलाय.