भारतात अराजक माजले आहे का? / भारतात अराजक माजले आहे. का?

विसुनाना's picture
विसुनाना in काथ्याकूट
20 May 2011 - 4:02 am
गाभा: 

"आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो. " :)

अती झालं आणि हसू आलं. माझ्या वैयक्तिक अनुभवात आणि एकंदर देशातील घडामोडींत विलक्षण साम्य दिसल्याने गंमत वाटली आणि बोलावंसं वाटलं. या चर्चेत वैचारीक आणि बुद्धीवादी असं काही नाही.

प्रसंग १ -
मी साधारण जानेवारी २०१० मध्ये माझे जुने वाहन विकले आणि दुसरे घेतले. (दोन चाकी/चार चाकी ते सांगत नाही. नाहीतर लगेच तुम्ही निष्कर्ष काढाल की मी माझ्याकडे अमकी गाडी आहे हे सांगायला हा धागा काढलाय. ;))
तर सांगायची गोष्ट अशी की मार्च २०१० मध्ये आरटीए वेबसाईटवर जुन्या वाहनाच्या परवान्याचे नवीन मालकाच्या नावे झालेले नूतनीकरण पाहून संतोष पावलो.
पण दुर्दैव! फेब्रुवारी २०११ म्हणजे तब्बल एक वर्षानंतर त्या जुन्या वाहनात बसून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १००० रु. दंड केल्याचे पत्र मला माझ्या पत्त्यावर आले.
वस्तुस्थिती अशी होती की ते वाहन शहराच्या दूरच्या अन्य विभागात असल्याने त्यात बसणेच काय पण त्याचे दर्शनही मला वर्षभरात झाले नव्हते. ते पत्र (शहराच्या वहातुक नियंत्रक -ट्रॅफिक) पोलीस खात्याकडून आल्याने घरचे (आणि मीही) क्षुब्ध झाले. (पोलीस = ओलीस!!!)
(टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट-) मध्यंतरी झालेल्या आरटीएच्या डेटाबेसमधील तांत्रिक बिघाडामुळे ते वाहन पुन्हा माझ्याच नावावर नमूद झाले. नव्या मालकाने केलेल्या गुन्ह्याबद्दल मला दंडाचे पत्र आले. त्यावर मी ट्रॅफिक पोलीस अ‍ॅडिशनल कमिशनरला भेटलो तर मलाच गुरकावत तो म्हणाला की तुम्हीच ट्रान्स्फर केले नसेल, ती तुमचीच जबाबदारी आहे, जे काही असेल ते असेल पण आधी दंड भरा मग बोला... इ.इ. माझी बोलतीच बंद!
मग मीच एक रविवार फुकट घालवून शहराच्या अनोळखी भागात फिरून माझे जुने वाहन आणि नवा मालक यांचा शोध लावला, त्याच्या नावावरच्या नव्या आरसीए कार्डचे झेरॉक्स/ फोटो इ. सर्व घेतले आणि पुन्हा अ‍ॅ.कमि. ट्रॅ. पो. यांच्याकडे गेलो. ते पुरावे पाहिल्यावर मग कुठे साहेब जमिनीवर आले. त्यांनी दंड माफ केल्याचे लिहून दिले. परंतु-

ट्रॅफिक पोलिस आणि आरटीए यांच्यात काहीच समन्वय नाही. स्थानिक आरटीएशी याबाबत संपर्क साधला असता त्या वाहन परवान्याचे जेथे (शहरातील दुसर्‍या आरटीए ऑफिसखाली) नूतनीकरण झाले आहे तेथे मीच स्वतः जाऊन सर्व पुरावे सादर करावेत आणि त्या ठिकाणच्या अधिकार्‍यांकडून तसे पत्र मीच घेऊन स्थानिक आरटीएला सादर करावे, मगच योग्य ती कार्यवाही होईल असे उत्तर मिळाले. (थोडक्यात काय? तर दोन्ही ठिकाणांच्या दलालांना प्रत्येकी २००० रु. द्यावेत आणि दोन - तीन दिवस हेलपाटे मारावेत!)
सध्याची परिस्थिती अशी आहे की ते जुने वाहन स्थानिक आरटीएच्या डेटाबेसमध्ये अद्याप माझ्याच नावावर आहे.(ते वाहन चोरीला गेले आहे अशी तक्रार पोलीस ठाण्यात करावी असे बरेचदा मनात येते. :))

प्रसंग २-
सध्या भारतीय तुरुंगात असलेले / कोर्टासमोर हजर रहाणारे आरोपी अजूनही पाकिस्तानातच आहेत आणि ते भारतात 'मोस्ट वाँटेड टेररिस्ट' आहेत असे आपल्या भारत सरकारने पाकिस्तानला दिलेल्या यादीत लिहून दिले आहे.

मला वाटते पाकीस्तानने जर हे आरोपी भारतातच आहेत असे लेखी उत्तर दिले तर भारत सरकारने त्यांना तसे सिद्ध करण्याची मागणी करावी. आयएसायने आपले गुप्तहेर भारतात पाठवून त्यांना पकडावे, अधिकृतपणे भारताच्या सुपूर्त करावे आणि मगच आम्ही त्यांची नावे यादीतून काढू असे जाहीर करावे.

म्हणूनच हा चर्चाप्रस्ताव 'भारतात अराजक माजले आहे का?' असा मांडण्याऐवजी 'भारतात अराजक माजले आहे. का?' असा मांडणे योग्य वाटते. भारत हा देश अजून केवळ योगायोगाने सुरू आहे. किंवा खराच सुरू आहे का?(किंतु नको म्हणून हे स्पष्ट करतो की मी कायद्याने लागू असलेले सर्व कर भरतो. त्यामुळे देश तुम्हाला काय देतो यापेक्षा तुम्ही देशाला काय देता याचा विचार मी करतो असे वाटते...)

आपल्यालाही असा 'सर्कारी' अनुभव आला आहे का? आपले मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.

प्रतिक्रिया

नवे अनुभव रोज येतात. परंतू त्या अनुभवावरून (राजकीय अर्थाने) अराजकाच्या मुद्दयापर्यंत मी काही पोहचू शकलो नाही.

विसुनाना's picture

20 May 2011 - 4:21 am | विसुनाना

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
आपल्यासारख्या संवेदनशील लेखकाकडून काही अनुभव लिहीले गेले तर उत्तम.

अराजक नेमके कशाला म्हणावे? व्यक्तीगत प्रश्नापासून ते देशव्यापी समस्यांपर्यंत जर गव्हर्नंन्स मशिनरी मोडून पडलेली दिसत असेल (आंधळे दळतेय आणि कुत्रे पीठ खातेय / कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही) तर ते अराजक नव्हे काय? यावर तुमचे मत खरोखरच जाणून घ्यायला आवडेल.

चिरोटा's picture

20 May 2011 - 4:40 am | चिरोटा

अराजक माजले आहे असे वाटत नाही. भारताला कुणीतरी functioning anarchy म्हंटले होते ते योग्य वाटते.डेटा व्यवस्थित जपून ठेवणे, तो हवा तेव्हा उपलब्ध करुन देणे हे आपले काम नाही. ती गोर्‍या लोकांची संस्कृती आहे.

विकास's picture

20 May 2011 - 11:44 am | विकास

केनडीच्या वेळचा भारतीय राजदूत आणि नंतरचा हार्वर्डचा प्राध्यापक/अर्थतज्ञ जॉन गाल्ब्रेथ याने भारताचे वर्णन "functioning anarchy" असे केले होते. मला वाटते, मार्क टली (बीबीसी वार्ताहार) याच्या पुस्तकात देखील टलीने भारताचा असा उल्लेख करत आशावादी दृष्टीकोन दाखवला होता. (मला वाटते आता त्याने भारताचे नागरीकत्व घेतले आहे).

बाकी "अराजक" या शब्दाचा अर्थ जेंव्हा राजेशाहीत, राजशकट नीट चालत नाही अर्थात राजाचे नियंत्रण नसलेले राज्य असा जर असेल, तर लोकशाहीत त्याचा अर्थ लोकांचा सत्तेवर अंकूश नाही असा अर्थ होऊ शकतो आणि त्या अर्थाने मला भारतात "अराजक" आहे असे नक्की वाटते. कारण वर (चर्चाप्रस्तावात) दिलेली उदाहरणे ही "फळे" (outcome) आहेत "मूळ" अथवा "कारणे" नाहीत... असो.

टिम्बु's picture

20 May 2011 - 4:44 am | टिम्बु

इथे रोजच इतके अनुभव येत असताना त्या अनुभवान्ची इथे चर्चा कशाला?
प्रथम हे ठरवा कि हे अराजक आहे का ते.
मग उपाय्न्ची चर्चा करा. त्याची ज्यास्त गरज आहे.

योगी९००'s picture

20 May 2011 - 5:52 am | योगी९००

भारतात अराजक माजले आहे का? याचे उत्तर माझ्यामते तरी हो..महागाई हे मुख्य कारण..

बाकी तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद्...जर कधी वाहन विकायची वेळ आली तर आम्ही लक्षात ठेवू..

अराजक माजल आहे का? ह्यावर कधी विचार केला नाही , पण ह्याही परीस्थीत देश चालतो आहे हे पाहुन देवा वरचा विश्वास मात्र खुपच वाढला आहे.

नितिन थत्ते's picture

20 May 2011 - 6:45 am | नितिन थत्ते

वरच्या अनुभवासारखाच अनुभव खाजगी क्षेत्रातही आला आहे.

आधीच्या कंपनीत एका स्कीममध्ये (टाटा इंडिका) गाडी घेतली. तेव्हा ती कंपनीच्या नावावर होती. नंतर ती कंपनी सोडली तेव्हा रीतसर स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेतली. या गोष्टीला वर्षापेक्षा जास्त काळ लोटला. परंतु टाटा मोटर्सच्या (सीबेल) रेकॉर्डमध्ये ती अजून जुन्या कंपनीच्या नावावर आहे. डीलर आणि सर्विससेंटरमार्फत अनेक वेळा पाठपुरावा केला, कॉलसेंटरला फोन केले, कंपनीच्या सर्विस मॅनेजरसोबत बोलणे झाले सर्व कागदपत्रे दोनवेळा देऊन झाली. पण गाडी टाटामोटर्सच्या दृष्टीने अजून माझ्या जुन्या कंपनीची आहे. त्यामुळे अजून मला सर्विसिंगचे बिल जुन्या कंपनीच्याच नावे मिळते. त्याचा क्लेम मला नव्या कंपनीत देता येत नाही.

बहुधा भारताचा हा गुणधर्म असावा. सरकारी कारभाराचा नसावा.

हुप्प्या's picture

20 May 2011 - 4:15 pm | हुप्प्या

खाजगी क्षेत्रात एकाचीच मक्तेदारी सहसा नसते. टाटाने घोटाळा केला तर पुढच्या वेळेस टाटाला बाय बाय करुन मारुती वा अन्य कुठल्या कार कंपनीकडे जाता येते. किंबहुना अशा भीतीमुळेच खाजगी क्षेत्रात अशी अंदाधुंद सहसा आढळत नाही.

मात्र लायसन, पासपोर्ट, पोस्ट, जन्ममृत्यूविवाह नोंद असल्या अस्सल सरकारी विभागांना कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे तिथे असली अंदाधुंद असेल तर भिंतीवर डोके आपटून घ्यावेसे वाटते.

होय, सामान्य मा़णसाला वेळोवेळी अशा अनागोंदी कारभाराची झलक मिळते त्यावरुन असे म्हणायला हरकत नाही की भारतात अराजक आहे. सरळ मार्गाने काम करुन घेणार्‍यांना अमाप हाल सोसावे लागतात.

अमेरिका वा अन्य पाश्चिमात्य देशातही भ्रष्टाचार आहे असे म्हणतात पण तिथला अनुभव असा आहे की सामान्य माणसाला लायसन, पासपोर्ट, बँक, वीज, फोन असले व्यवहार करताना कुठेही लाच द्यावी लागत नाही. तशी कुणी अपेक्षा ठेवत नाही.
भारतात असे कधी होईल असे वाटत नाही. निदान माझ्या अस्तित्त्वात तरी नाहीच.

एक विनोद आठवला. एकदा देवाने अमेरिकेचा राष्ट्रपती, चीनचा अध्यक्ष आणि भारताचा पंतप्रधान यांना भेटायचे ठरवले. जगातील मोठ्या/शक्तीमान देशांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना वर दिला की मी तुमच्या फक्त एका प्रश्नाचे उत्तर देईन.
अमेरिकेनने विचारले, "मध्यपूर्वेत शांतता यावी आणि ती मला बघायला मिळावी असे वाटते आहे. तसे होईल का?" देव म्हणाला "होईल. पण तू अध्यक्ष असताना होणार नाही." हे ऐकून अमेरिकन थोडा हिरमुसला पण थोडी आशा आहे हे ऐकून त्याला बरेही वाटले. चीनच्या अध्यक्षाने विचारले, "अमेरिका आमचे इतके प्रचंड कर्ज कधी फेडेल का?" देव म्हटला, "हो. पण तू काय तुझ्या नंतरच्या पिढीलाही ते बघायला मिळणार नाही." हे ऐकून चीनी नेता चक्क रडू लागला. आपल्या देशाचा पैसा असा अडकून रहाणार म्हणून त्याला वाईट वाटले. मग भारतीय पंतप्रधानाची पाळी आली. तो म्हणाला, "देवा. खरेतर मी देशाचा सर्वोच्च नेता नाही. मी एक माकड आहे आणि माझा डोंबारी कोण हे तुला ठाउक आहेच. पण आता बोलावलेच आहेस तर विचारतो. आमच्या देशात अमाप भ्रष्टाचार माजला आहे. सामान्य माणसाला जिणे अवघड झाले आहे. असा हा भ्रष्टाचार कधी संपेल आणि भारताचे नंदनवन कधी बनेल?" हे ऐकल्यावर देवच ढसढसा रडू लागला. म्हणाला, "हा देश मलाही आवडतो पण तिथला भ्रष्टाचार संपलेला मला माझ्या आयुष्यातही बघायला मिळणार नाही. तुला कुठून मिळणार?".
हे ऐकताच भारतीय पंतप्रधान कमालीचा खूष झाला. "आता काही प्रॉब्लेम नाही!" आपल्या मोबाईलवरून एका विवक्षित क्रमांकाला फोन करून लाख दोन लाख कोटी रुपये स्विस बँकेत जमा करायचा हुकूम देऊन आपल्या निवासाकडे निघाला!

नितिन थत्ते's picture

21 May 2011 - 12:22 am | नितिन थत्ते

>>खाजगी क्षेत्रात एकाचीच मक्तेदारी सहसा नसते. टाटाने घोटाळा केला तर पुढच्या वेळेस टाटाला बाय बाय करुन मारुती वा अन्य कुठल्या कार कंपनीकडे जाता येते. किंबहुना अशा भीतीमुळेच खाजगी क्षेत्रात अशी अंदाधुंद सहसा आढळत नाही.

हा हा हा. काही गैरसमज जात नाहीत हे खरेच. तुम्ही म्हणता तशी कॉम्पिटिशनची भीती खाजगी क्षेत्रालाही नसते. कारण मी म्हटल्याप्रमाणे अंदाधुंद ही भारतीयांचा गुण असल्याने ती सगळ्याच कंपन्यांत असते.

तुमचं म्हणणं मला टाटा मा़झ्या नावाने बिल देत नाही म्हणून मी आता इंडिका विकून मारुती घ्यावी? म्हणजे हे मा़या प्रॉब्लेमवर फीजिबल सोल्यूशन आहे का?

खाजगी आणि सरकारी क्षेत्रातल्या सेवेत मला जाणवलेला फरक...
तुम्ही प्रॉब्लेम घेऊन सरकारी कार्यालयात गेलात तर तेथील कर्मचारी तुम्हाला इथे तिथे घुमवतो, नंतर या म्हणतो आणि हे तो तिरसटपणे करतो. तुम्ही बर्‍याच चकरा मारल्यावर कदाचित तुमचे काम होते.
तुम्ही प्रॉब्लेम घेऊन खाजगी कार्यालयात गेलात (अशी शक्यता नसते कारण हल्ली खाजगी कंपन्या फोन नंबरच देतात) तर तेथील कर्मचारी हसून स्वागत करतो, तुमच्या प्रॉब्लेम ऐकून घेतो, मग तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी म्हणतो आणि तुचे काम २४/४८ तासात होईल असे सांगतो. (इथपर्यंत तुम्ही खूष होता).
पण २४/४८ तासात तुमचे काम होत नाही. मग तुम्ही परत त्या नंबरवर फोन करता. तेथील कर्मचारी हसून स्वागत करतो, तुमच्या प्रॉब्लेम ऐकून घेतो, मग तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी म्हणतो आणि तुचे काम २४/४८ तासात होईल असे सांगतो.
पण २४/४८ तासात तुमचे काम होत नाही. मग तुम्ही परत त्या नंबरवर फोन करता. तेथील कर्मचारी हसून स्वागत करतो, तुमच्या प्रॉब्लेम ऐकून घेतो, मग तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी म्हणतो आणि तुचे काम २४/४८ तासात होईल असे सांगतो.
पण २४/४८ तासात तुमचे काम होत नाही. मग तुम्ही परत त्या नंबरवर फोन करता. तेथील कर्मचारी हसून स्वागत करतो, तुमच्या प्रॉब्लेम ऐकून घेतो, मग तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी म्हणतो आणि तुचे काम २४/४८ तासात होईल असे सांगतो.
पण २४/४८ तासात तुमचे काम होत नाही. मग तुम्ही परत त्या नंबरवर फोन करता. तेथील कर्मचारी हसून स्वागत करतो, तुमच्या प्रॉब्लेम ऐकून घेतो, मग तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी म्हणतो आणि तुचे काम २४/४८ तासात होईल असे सांगतो.
पण २४/४८ तासात तुमचे काम होत नाही. मग तुम्ही परत त्या नंबरवर फोन करता. तेथील कर्मचारी हसून स्वागत करतो, तुमच्या प्रॉब्लेम ऐकून घेतो, मग तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी म्हणतो आणि तुचे काम २४/४८ तासात होईल असे सांगतो.
पण २४/४८ तासात तुमचे काम होत नाही. मग तुम्ही परत त्या नंबरवर फोन करता. तेथील कर्मचारी हसून स्वागत करतो, तुमच्या प्रॉब्लेम ऐकून घेतो, मग तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी म्हणतो आणि तुचे काम २४/४८ तासात होईल असे सांगतो.
पण २४/४८ तासात तुमचे काम होत नाही. मग तुम्ही परत त्या नंबरवर फोन करता. तेथील कर्मचारी हसून स्वागत करतो, तुमच्या प्रॉब्लेम ऐकून घेतो, मग तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी म्हणतो आणि तुचे काम २४/४८ तासात होईल असे सांगतो.
पण २४/४८ तासात तुमचे काम होत नाही. मग तुम्ही परत त्या नंबरवर फोन करता. तेथील कर्मचारी हसून स्वागत करतो, तुमच्या प्रॉब्लेम ऐकून घेतो, मग तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी म्हणतो आणि तुचे काम २४/४८ तासात होईल असे सांगतो.
पण २४/४८ तासात तुमचे काम होत नाही. मग तुम्ही परत त्या नंबरवर फोन करता. तेथील कर्मचारी हसून स्वागत करतो, तुमच्या प्रॉब्लेम ऐकून घेतो, मग तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी म्हणतो आणि तुचे काम २४/४८ तासात होईल असे सांगतो.
पण २४/४८ तासात तुमचे काम होत नाही. मग तुम्ही परत त्या नंबरवर फोन करता. तेथील कर्मचारी हसून स्वागत करतो, तुमच्या प्रॉब्लेम ऐकून घेतो, मग तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी म्हणतो आणि तुचे काम २४/४८ तासात होईल असे सांगतो.
.
.
.
.
.
.
.
हुप्प्या यांनी दिलेल्या लॉजिकमुळे मला एक अ‍ॅनॉलॉजी आठवली.

लोकप्रतिनिधी/राजकारणी लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत आणि भ्रष्टाचार करतील असे सहसा होणार नाही. लोकशाहीत एकाचीच मक्तेदारी सहसा नसते. एकाने घोटाळा केला तर पुढच्या वेळेस त्याला बाय बाय करुन दुसर्‍या कुठल्या पक्षाकडे जाता येते. किंबहुना अशा भीतीमुळेच राजकीय क्षेत्रात असा भ्रष्टाचार आणि अनास्था सहसा आढळत नाही. :) एन्जॉय

नगरीनिरंजन's picture

20 May 2011 - 7:23 am | नगरीनिरंजन

अराजक आहे. कारण,
१. पराकोटीचा स्वार्थ आणि लोभ
२. न्यूनगंड व दुटप्पीपणा
३. भोंगळपणा, जुगाडू किंवा चलता है वृत्ती
४. व्यक्तिपूजा
५. दैववाद
६. श्रमप्रतिष्ठेचा अभाव
७. कलंकित धनाला मिळणारी प्रतिष्ठा आणि दोन इंचापुरती सीमित शुचिता
८. प्रामाणिकपणाचा अभाव
९. रुढीप्रियता
१०....
....
...
...

डिस्क्लेमरः या प्रतिसादातही वैचारीक आणि बुद्धीवादी असं काही नाही.

वाटाड्या...'s picture

20 May 2011 - 12:38 pm | वाटाड्या...

मी भारतातील व्यवस्थेला आता नावं ठेवणं कधीच सोडुन दिलय. त्यामुळे आता आपण सगळ्यांनी अगदी सुहास्य वदनाने त्यांची खुल्लेआम टवाळी उडवावी..कारण आता भारतातील कुठलीही व्यवस्था अनगोंदीच्या शेकडो मैल पुढे निघुन गेलीये. लोकप्रभामधला हा लेख काय सुचवतो?

माझाही किस्सा असाच...मी त्यांची मजा घेतलेली त्या बिचार्‍या लोकांच्या लक्षातही आली नाही इतके ते माठ असतात...वाच माझा किस्सा खाली...तो आधीच माझ्या ब्लॉग वर प्रकाशीत झाला आहे....

=====================================================================
माझा किस्साही असाच...
कोथरुड प्रभाग क्षेत्रीय कार्यालय, स्वप्नशिल्प च्या शेजारी...
अस्मादिक गेले तिथे एका दुपारी...माझ्या मुलीचं जन्म नोंदणी पुस्तक आणायला. दुपारची वेळ जरा अंमळ कार्यालयात डोळ्यावर जास्त दिसत होती.
मी: (खिडकीपाशी) : जरा जन्म नोंदणी सर्टीफिकेट हवे आहे.
ती: (खिडकीपलीकडुन) : हा फॉर्म भरा..(मी तिथेच भरतो...एक्टाच होतो लाईनमधे चक्क..)
मी: घ्या..
ती: १० कॉप्या कशाला हव्यात?
मी: पैसे किती लागतील? (मी नसत्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या भानगडीत पडत नाही)
ती: १५ रुपये प्रती ..म्हणजे १५० रु. द्या..(मी पैसे देतो)..थोडं थांबावं लागेल..
मी: किती वेळ?
ती: ५-१० मिनटं...
आतापर्यंत लाईनमधे ८ एक मंडळी जमा झालेली..माझ्यामागे....सगळीच चुळबुळ करत होती...
अर्धा तास झाला तरी ही बया काय सर्टीफिकेट देईना...मग विचारलं तर म्हणाली प्रिंटर चालत नाहीये...थांबा..
त्यांचा साहेब येतो..ते सगळे उभे वगैरे राहतात..आम्ही मख्खासारखे (त्यांच्यासारखे) चेहेरे करुन त्यांच्याकडे पहातो.
साहेबः काय झालं? इतकी गर्दी का आहे?
ती: प्रिंटर चालत नाये?
साहेबः (आम्हाला) : थांबा ..सिश्टीमला प्रॉब्लेम आहे...
माझ्याबराच मागचा (आता लाईन जवळ जवळ ४० झालेली आहे) : काय झालय हो?
मी (जोरात बोंबलुन): काँप्युटर आणि प्रिंटर तापायला ठेवले आहेत. वाईच थांबा...क्षणभर शांतता आणि सायबासकट आख्खं सरकारी पण कधी नव्हे ते धो धो हसलं...
-वा
कोण म्हणतं सरकारी नाय हसणार?
मी पुरता बदला घेणार...
सरकारी हसणार निश्चीत..

अराजक ह्या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे, एक दोन अनुभवांमुळे लगेच सगळ्या देशात अराजक आहे या अनुमानाला येण्याची गरज नाही, स्वतत्र झाल्यापासुन फक्त ६०-६५ वर्षे झाली आहेत आपल्याला, हे जे आहेत ते टिथींग इश्यु आहेत, ते असणारच. एवढी मोठी लोकशाही चालवणे एवढे सोपे नाही. इंग्लंड सारख्या छोटयाश्या देशात पण शेकडो वर्षे गेली सगळं सुरळीत चालायला. आपण तर एकत्र कुटुंब आहोते, जुने मरणार, नवे येणार, पै पाहुणे शेजारी पाजारी सगळं चालणार.

६०-६५ वर्षे म्हणजे २-३ पिढ्या झाल्या फक्त, अजुन किमान ४-५ पिढ्या तरी जाव्या लागतील. आता घर बांधकाम चालु असताना अर्धवट दिसतंय म्हणजे घर पड्लंय असं म्हणायची गरज नाही, आधी ते बांधुन होउ दे, ते टिकेल २-३ शे वर्षे मग सुरु होईल ढासळायला, आणि पुन्हा आज दिसतंय तसेच दिसायला लागेल, आणि तेंव्हा ते खरंच पडत असेल, तेंव्हा जे असेल ते अराजक, आज नाही.

भारतात अराजक माजले आहे का?

हे काय विचारायचे प्रश्न आहेत का?
उगाच फाल्तु प्रश्न विचारुन मिपाकरांचा महत्वाचा वेळ घालवता...

खरंच हा प्रश्न विचारायला अजुन काय वाईट घडायला पाहिजे?

नाना बेरके's picture

21 May 2011 - 4:12 am | नाना बेरके

कालंच मित्राकडून ऐकलेला रंजक किस्सा.
ठिकाण : जन्म-मृत्यु नोंदणी दाखला मिळण्याचे ऑफिस.
माझा मित्र त्याच्या काही कामासाठी वरील ऑफिसमध्ये गेला होता. त्या ऑफिसमधल्या सायेबाच्या समोर एक मध्यमवयीन सदगृहस्थ अत्यंत त्रासिक चेहर्‍याने बसलेले होते. त्यांच्या हातात जन्म-मृत्यु नोंदणी दाखला होता. साहेब काही फुटकळ कामात ( ? ) असल्यामुळे विषयाला सुरवात व्हायची होती. थोड्या वेळाने सायेबाने मान वर केली आणि त्या गृहस्थाकडे बघंत म्हणाला " बोला, काम बोला".
त्यावर ते गृहस्थ उसळून म्हणाले " माझ्या पोराचा नक्की बाप कोण आहे ?"
त्यावर साहेब एकदम उडालाच " ऑ ? म्हणजे ? काय झालं काय ? ते सांगा ना साहेब तुम्ही ?"
त्यावर ते गृहस्थ हातातला दाखला दाखवंत म्हणाले " अहो, तीन वेळा ह्याच्यावर बापाचं नांव बदलंल. दरवेळी तुम्ही नाव चुकवता. असं तीनदा झालं. आत्तासुध्दा परंत तेच. माझं नाव विनायक आहे. हे पहा इथे काय लिहीलं आहे.. वाचा. चक्क विनय लिहीलेलं आहे."

त्यावर साहेबानं बाहेरच्या टायपिस्टला हाक मारली " ओ रणपिसे हा दाखला नीट करून द्या".

नंतर त्या माणिकचंद गुटखा खाऊन आलेल्या रणपिसे आणि त्या सदगृहस्थाची परत थोडी शाब्दीक चकमक झाली, हा भाग वेगळा. पण ह्या घटनेला अराजक म्हणावे काय असा विचार केला तर खरोखरीच म्हणावे असे वाटते.

कारण नगरसेवकाच्या ओळखीने भरती केलेले अडाणचोट साहेब आणि ऑफिसमध्ये थुंकण्याची बंदी असूनसुध्दा माणिकचंद खाऊन काम करणारा भिकारचोट टायपिस्ट अशी अवस्था असेल तिला अराजक शिवाय वेगळे काय म्हणणार ?

तिमा's picture

21 May 2011 - 7:36 pm | तिमा

भारतातला कारभार हा भोंगळ आहे याबाबत दुमत नाही. पण तरी अराजक माजले आहे असे म्हणता येणार नाही. त्या दिशेने प्रवास चालू आहे एवढेच.

उदयन's picture

23 May 2011 - 8:31 am | उदयन

बरोबर

भारतात अजून पूर्ण राजकीय(?) अराजक माजलेले नाही पण सामाजिक अराजक(?) आहे असा एकूण सूर दिसतो. 'यथा प्रजा तथा राजा' या लोकशाहीच्या न्यायाने हे चालले आहे असे दिसते.

अविनाशकुलकर्णी's picture

23 May 2011 - 9:13 pm | अविनाशकुलकर्णी

कुणाला कशाचिच भिति वाटत नाहि हे खरे..
पैसे देवुन काहि पण काम होवु शकते...
अराजक च्या ऐवजी.. बजबज पुरी .कोम झाले आहे..
बघु .....आण्णांच्या प्रयत्नाला यश येवो...

रणजित चितळे's picture

24 May 2011 - 11:52 am | रणजित चितळे

बरे झाले आपण हा धागा काढला, मला कधी पासून वाटत होते अराजक माजले आहे म्हणून -
http://www.misalpav.com/node/16128

मला वाटते अराजक माजले आहे.

नगरीनिरंजन's picture

24 May 2011 - 12:26 pm | नगरीनिरंजन

बहुतेकांना वाटतंय अराजक आहे. पुढे काय?

शाहरुख's picture

24 May 2011 - 10:18 pm | शाहरुख

हॅ हॅ हॅ :D . तुम्हीच सांगा !

आंसमा शख्स's picture

25 May 2011 - 11:33 am | आंसमा शख्स

काही लोक हवे तेव्हा अराजक आहे असे मानून आपली कामे करून घेतात. नंतर त्यांना उपरती होते. खुदा त्यांना चांगले वागण्याची बुद्ध्ही दे.

हे असे ब्यांकेकडूनदेखील होऊ शकते
त्याचे असे झाले
मला माझ्य अब्यांक खात्यावर काही रक्कम जमा झाल्याचा मेसेज आला.
मी लॉग इन करून पाहीले तर माझ्या खात्यात सव्वातीन कोटी जमा झाले होते.
माझ्या खात्यात हे जमा करणारे कोण होते ते मलाच माहीत नव्हते.
त्या दिवशी शुक्रवार होता. त्यामुळे सोमवारी मी ब्यांकेतील क्लर्क ला ही गोष्ट संगितली.त्यानी सांगितले की ब्यांकेत कोअर ब्यांकिंग सिस्टीम असल्यामुळे शाखेतून काही करणे शक्य नाही.
मी मॅनेजर साहेबाना भेटलो. त्यानी मला दोन तीन दिवस थांबण्याचा सल्ला दिला.
त्यानंतरदेखील ते सव्वातीन कोटी माझ्या खात्यात तसेच होते. ब्या़एत कोणी तक्रारसुद्धा केली नव्हती.
ब्यांकेला मी विनन्ती करून ते सव्वातीन कोटी खात्यातुन वळते करायला सांगितले.
पण ते कोणी भरले हे समजत नसल्यामुळे ब्यांकेला त्याची काउंटर एन्ट्री मिळत नव्हती सबब ते वळते होउ शकत नव्हते.
ते सव्वातीन कोटी माझ्याच खात्यात जमा रहातील असे साम्गीतले गेले.
खात्यातील आकडेवारीमुळे रोज इन्वेस्टमेन्ट कंपन्यांचे फोन येत आहेत. त्याने मी वैतागलो आहे
आयकर खात्याला हे सव्वातीन कोटी कुठून आले ही मी सांगू शकत नाही.
याला अराजक म्हणायचे का?

( .................अवांतर :डिस्क्लेमर : हे स्वप्न असू शकते माझ्याकडे देणग्या मागू नये. ........ ;) )

>>खात्यातील आकडेवारीमुळे रोज इन्वेस्टमेन्ट कंपन्यांचे फोन येत आहेत.

खात्यातील आकडेवारी बँका इन्व्हेस्टमेंट कंपन्यांशी शेअर करतात ?

गोगोल's picture

28 May 2011 - 6:20 am | गोगोल

कशाला सव्वा तीन कोटी परत करायला बघताय?
पैसे काय वर आले आहेत काय? ;)