गाभा:
"पिंजरा कला केंद्रात" बैठकी साठी ठसके बाज लावण्या सुचवाव्यत.मला माहित असलेल्या तुरळक लावण्या......
१.पदरावरती जर .....
२.दिसलाग बाई दिसलाग.......
३.तुझ्या उसाला ......
४.छबीदार छबीदार..........
५.नका तोडू पाहून जरा ..............
(मराठी लोक कला प्रेमी)
प्रतिक्रिया
7 May 2011 - 2:16 pm | टारझन
मी दाबुण बघतोया कणसं .. पिकला है का दाणा ...
अशी कोणतीशी लावणी आठवते आहे.. बघा .. त्यात तुम्ही ६९ चे आहात :)
7 May 2011 - 2:39 pm | सुनिल६९
तश्या तर वारे माप आंबट लावण्या ह्यतसा माझ्य कडे .मापल्यला (६९) बरा ओळीखलास.....पिकल्या पानाचा :)
धन्यवाद
7 May 2011 - 6:19 pm | सूड
प्र का टा आ
7 May 2011 - 6:44 pm | अविनाशकुलकर्णी
पिकल्या पानाचा
त्या अर्थाने नसावे
अहो त्यांना बहुतेक ईग्रजि तल्या ६९ आकड्यावर ची पोज म्हणायचे असेल..
चु.भु.दे.घे.
7 May 2011 - 11:01 pm | सुनिल६९
चू .भू .दे .धे कशा साठी हक्काची माणसच काही बोलू शकतात .....
7 May 2011 - 6:54 pm | अविनाशकुलकर्णी
.
7 May 2011 - 6:58 pm | अविनाशकुलकर्णी
.
7 May 2011 - 6:53 pm | नाना बेरके
पूर्वी 'लावण्या'च्या बैठकीसाठी व्हॅट सिक्स्टिनाईन हि लई फेमस दारू होती. आता ६९च लावण्या मागताहेत.
तरीसुध्दा घ्या..
कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना
रंगला कात, केवडा, वर्खाचा विडा,
घ्या हो मनरमणा, घ्या हो मनरमणा..
7 May 2011 - 11:07 pm | सुनिल६९
नाना तुम्ही तर जेम्स बॉंड आहात कसा विसरून चालाल :)
(सौजन्य चालू आहे?)
7 May 2011 - 9:11 pm | प्रदीप
तुम्ही लिहील्या आहेत तशा ह्य लावण्या म्हटल्या जाणार असतील तर जरा कठीण वाटतंय!
१. 'पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा' असे नसून 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा' असे हवे.
२. 'दिसलाग बाई दिसलाग.......' नव्हे-- 'दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला' असे हवे
४. 'छबीदार छबीदार' -- बहुधा इथे तुम्हाला 'छबीदार छबी, मी तोर्यात उभी' हे अभिप्रेत असावे?
काही लावण्या सुचवत आहे...
१. 'लटपट लटपट तुझं चालणं'
२. 'बुगडी माझी सांडली ग'
३. 'कसं काय पाटील, बरं हाय का?'
४. 'सोळावं वरीस धोक्याचं'
५. 'मला हो म्हणतात लवंगी मिरची'
६. 'हुकुमाची राणी माझी हो'
७. अत्तराचा फाया तुम्ही आणा मला राया'
८. 'चाळ माझ्या पायात'
९. 'पाडाला पिकलाय आंबा'
१०. 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल'
११. 'कळीदार कपुरी पान'
१२. 'रेशमाच्या रेघांनी'
१३. 'नेहमीच राया तुमची घाई'
१४. 'रायाला शानपण शिकवा'
१५. 'गं साजणे'
१६. 'सख्या चला बागंमधी रंग खेळू चला'
शब्द, सूर आणि ताल संभाळून, होऊन जाउंद्या ठसक्यात!!
7 May 2011 - 11:11 pm | सुनिल६९
प्रदीप राव आपल्या नावानी बारी लावतो उडच्या वेळेस बाकी दिलेल्या लावण्यान साठी मना पासून धनयवाद .
7 May 2011 - 11:34 pm | मितभाषी
सुन्या आपले ५००१ घे आन ती प्रदीपची लावणी तोड..... क्कॉय...
8 May 2011 - 12:17 am | विचारी मना
ही घ्या आपली एक....
गेला गर्दित मारुन धक्का धक्का धक्का...द्वाड मवाली दिसतो पक्का गं बाइ द्वाड मवाली दिस्तो पक्का....
8 May 2011 - 4:59 pm | यशोधरा
म वा धोंड ह्यांच्या लावणीवरील पुस्तकांत अगदी जुन्या काळापासूनच्या अस्सल लावण्या मिळतील.
9 May 2011 - 10:31 am | विलासराव
कारभारी दमान
9 May 2011 - 10:31 am | विलासराव
कारभारी दमान
9 May 2011 - 6:06 pm | वायुपुत्र
अहो सुनील ६९,
मान्य आहे की तुम्हाला पिंजरा कला केंद्रात बैठकी साठी लावण्या पाहिजेत. पण तुमची बैठकीत बसायची सहनशक्ती किती वेळाची आहे ते कळलं असतं तर,
तुम्हाला क्रमा क्रमाने कुठल्या कुठल्या लावण्या घ्यायच्या ते सांगितलं असतं...!!!
बैठकीचा अनुभवी.
9 May 2011 - 10:54 pm | सुनिल६९
२ तास बैठकीत बसायची सहनशक्ती आहे . बाकी काही ठरल्या प्रमाणे सुचवलत तुमचा मोठे पण समजू.
9 May 2011 - 6:42 pm | सुधीर मुतालीक
१) राजसा जवळी जरा बसा - लता मन्गेशकर
२) लाल पैठ्णी, रन्ग माझ्या चोळीचा - चित्रपट विदुषक
३) वाजले की बारा - नटरन्ग
४) अप्सरा आली - नटरन्ग
५) आल्या आल्या जाउ नका - तुमच आमच जमल
9 May 2011 - 10:56 pm | सुनिल६९
धन्यवाद
10 May 2011 - 1:23 am | माझीही शॅम्पेन
"खेळताना रंग बाई होळिचा होळिचा , फाटला ग कोना माझ्या चोळीचा"
एकदम भन्नाट लावणी आहे (पण बैठकीची आहे की नाही माहीत नाही)