एक दिन का सि .एम / पि.एम.

पियुशा's picture
पियुशा in काथ्याकूट
5 May 2011 - 11:19 am
गाभा: 

नमस्कार वाचकानो,
ओसामा सारखा कट्टर अतिरेकी ज्याने जिहादच्या नावाखाली असंख्य गुन्हे केले तो शेवटी "कुत्ते कि मौत "च मारला गेला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निर्णायक कृतीचे जवळजवळ सर्व देशांनी समर्थन केले आहे
अमेरिका हे एक अतिप्रगत राष्ट्र आहे हे मान्य ,पण बराक ओबामा यांनी उचललेले पाउल हे धाडसी आहे
मला एक असा प्रश्न पडतो कि मुंबईवर २६ /११ ला झालेल्या हल्ल्यातला
एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबच्या व त्याच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधाचे ,गुन्ह्यांचे सर्व पुरावे उपलब्ध असूनही त्याला अजून फाशी का नाही दिली ?
पाकिस्तानी दहशतवादि आपल्या सीमेवर चोवीस तास छुप्या कारवाया करत असताना , आपल सरकार एखादी ठोस भूमिका का नाही घेत ?
चीनचे सैनिक इंच इंचाने भारताच्या सीमेत घुसत असूनही भारत त्याला रोखू का शकत नाही ?
याची काय कारण असावीत.
१ ) भारत पाकिस्तानला / चीनला धडा शिकवण्यात कमी पडतोय/पडणार ?
२) शस्त्रसाठा मर्यादित आहे ?
३) आपल्या नेत्यांची उदासीनता कि भित्रेपणा ?
नक्की काय कारण आहे माहित नाही
पण मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे कि तुम्हाला जर "नायक "पिक्चर मधल्या अनिल कपूरसारखी सी. एम. अथवा पी. एम. बनण्याची संधी मिळाली / दिली तर तुम्ही आपल्या भारतासाठी काय करू इच्छिता !
:)
धन्यवाद.

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

5 May 2011 - 11:28 am | नगरीनिरंजन

मॅडमना भेटून एक दिवसाचे शंभर दिवस कसे होतील ते पाहीन.

प्रश्न प्राप्त परिस्थितीत गैरलागू आहे, पियूषा...!

"तुम्हाला जर "नायक "पिक्चर मधल्या अनिल कपूरसारखी सी. एम. अथवा पी. एम. बनण्याची संधी मिळाली / दिली तर तुम्ही आपल्या भारतासाठी काय करू इच्छिता !

याच्याऐवजी...

"तुम्हाला जर "नायक "पिक्चर मधल्या अनिल कपूरसारखी सी. एम. अथवा पी. एम. बनण्याची संधी मिळाली / दिली तर तुम्ही आपल्या "स्वःतासाठी" काय करू इच्छिता !"

ही खरी गोम आहे...!!!

नरेशकुमार's picture

5 May 2011 - 11:42 am | नरेशकुमार

मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे कि तुम्हाला जर "नायक "पिक्चर मधल्या अनिल कपूरसारखी सी. एम. अथवा पी. एम. बनण्याची संधी मिळाली / दिली तर तुम्ही आपल्या भारतासाठी काय करू इच्छिता !

तुमचे पन मत द्या ना !
बरं नंतर देता म्हनता, ओके. ठिक आहे. मि सुरुवात करतो.
मला पिएम व्ह्यायला आवडेल. आनि खुप काही करायला आवडेल. बर्‍याच लोकांना रीटायर करुन ताकीन. माझ्या बॉसला पन.

पियुशा's picture

5 May 2011 - 12:21 pm | पियुशा

@ नरेश कुमार
१) कसाबला ताज समोर फाशि
२) स्विस ब्यकेन्तला काळा पैसा भारतात परत आनुन त्याचा वापर विकास कामासाठि करेन
३) भ्रश्ट,नकर्त्या नेत्यावर योग्य ति कारवाइ करेन
४)आनि हो एक राहिल आम्च्या शहरातिल रखड्लेलि ,दुर्लक्शित ,अपुर्न कामे आधि पुर्न करिन ;)
शहरे/ गावे सुधरलि तरच देश सुधरेन

यादि बरिच मोठि आहे :)

अप्पा जोगळेकर's picture

5 May 2011 - 7:53 pm | अप्पा जोगळेकर

एक लेखनिकसुद्धा ठेवा शुद्ध लिहिण्यासाठी.

नितिन थत्ते's picture

5 May 2011 - 11:43 am | नितिन थत्ते

अहो ते नेहमीचं राहिलं का लिहायचं? - मुस्लिमांच्या मतांवरचा डोळा. :)

चावून चोथा झालेला विषय आहे.

हुप्प्या's picture

5 May 2011 - 10:15 pm | हुप्प्या

नुसते हॅ हॅ हॅ केल्याने वस्तुस्थिती बदलत नाही.

विकीलीक्स या पर्दाफाश स्पेशल संस्थेने या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. माजी राष्ट्रपती कलाम व पाजी ( आय मीन आजन्म) राष्ट्रसम्राज्ञी सोनिया यांत गुरुला फाशी देण्यावरून मतभेद होते.

काँग्रेसला अफझल गुरुला माफी देणे अडचणीचे होते कारण भाजप त्या गोष्टीचे भांडवल करु शकला असता. पण फाशी दिल्याने उप्रच्या निवडणूकीत पारंपारिक मुस्लिम व्होट बँक नाराज झाली असती. त्यामुळे सम्राज्ञी आणि कलाम यांच्यात वाद झाला असे विकीलिक्सचे वृत्त आहे.
गूगलवर ह्याला दुजोरा देणार्या अनेक साईटा मिळतील. अगदी द हिंदू सारखी हिंदुत्वद्वेष्टी संस्थाही.
हा पराकोटीचा हलकटपणा आहे. मुस्लिम मतांकरता निर्ढावलेल्या, न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अतिरेक्याला शिक्षा देण्याचे घोगडे भिजत ठेवणे हे अक्षम्य आहे.

विकीलीक्स हे स्थळ काही हिंदुत्ववाद्याचे हस्तक नाही. तेव्हा कुठेतरी खरोखरच पाणी मुरते आहे हे ध्यानात घ्या.
केवळ सोनिया काँग्रेसवर जहाल भक्ती असल्यामुळे ते निष्पाप, निर्दोष आहेत असे होत नाही. खरोखरचे पुरावे काही वेगळेच सांगतात.

नितिन थत्ते's picture

5 May 2011 - 10:53 pm | नितिन थत्ते

मी कुठे काय म्हटलं? मी फक्त नेहमीचं कारण लिहायला विसरल्याची आठवण करून दिली. :)

आनंदयात्री's picture

6 May 2011 - 12:05 am | आनंदयात्री

अच्छा ठिक्के काका, तुम्ही आज काही नाही म्हटले तरी हुप्प्यादादा तर बोल्ले आहेत ना, नेहमीच्या हिरीरीने त्यांचे मत खोडुन काढा बरे.

अन्या दातार's picture

5 May 2011 - 11:45 am | अन्या दातार

मला वाटते नेत्यांची उदासीनता/भित्रेपणा हे मुख्य कारण असावे.
शस्त्रसाठा मर्यादित नसला तरी चीनला रोखण्यास असमर्थ असावा. (चीनचा संरक्षणावरचा वाढता खर्च पाहता.)
जर चीनचा पाक ला पाठिंबा नसता तर आजपर्यंत भारताने पाकला चांगला धडा शिकवला असता*

*जर इंदिराबाईंसारखे कणखर नेतृत्व असते तरच

बाकी पियुशाने असल्या विषयावर धागा काढल्याचे पाहून ड्वाळे पाणावले ;)

आत्मशून्य's picture

6 May 2011 - 12:43 am | आत्मशून्य

जर चीनचा पाक ला पाठिंबा नसता तर आजपर्यंत भारताने पाकला चांगला धडा शिकवला असता*

वा काय नशीबवान आहे पाकीस्तान एकाच वेळी जगातल्या अमेरीका आणी चीन या सर्वात बलाढ्य राश्ट्रांचा पाठींबा मीळवून आहे.. आणी भारत... ? भारत जे काही आहे जसं काही आहे ते केवळ स्वबळावरच. आता वेळ आली आहे अमेरीकेला भारतामधे तळ ऊभारू देण्याचा धोका पत्करण्याची. कारण रशीया जवळ आहे पण आता तीतका सामर्थ्यवान नाही व वीशेषतः चीनच्या वीरूध्द तर त्याने १९६५ ला सूध्दा मदत केली न्हवती. जर पाक भारताला शह द्यायला चीन व अमेरीकेला इतकं जवळ करत आहे तर आता पाक व वीषेशतः चीनला ठेचायला आता अमेरीकेला जवळ करण्याशीवाय पर्याय नाही. कारण भारत स्वबळावर इतका सामर्थ्यवान नाही. व भारताने आता आक्रमक होणे अत्यावश्यक आहे.

किसन शिंदे's picture

5 May 2011 - 12:06 pm | किसन शिंदे

तसं बघायला गेलं तर एक दिन का सी.एम किंवा एक दिन का पी.एम ह्या सगळ्या गोष्टी फ़क़्त सिनेमामद्धेच शोभून दिसतात....वास्तविक जीवनात अशी एखादी गोष्ट होणे दूरची बात पण अस स्वप्न जरी एखाद्याला पडल तरी हे स्वार्थी राजकारणी त्याचा सगळा बाजार उठवतील..आणि न्यूज च्यानेलवाले त्याच्यावर ३ तासाचा एखादा स्पेशल न्यूज रिपोर्ट बनवतील.

..."तो बतायीये हमे आपने कल ख्वाब में क्या देखा आपने?"

अवांतरः शीर्षक वाचून मला आधी वाटलं नायकचीच स्टोरी( एक दिन का सी.एम नंतर आता एक दिन का पी.एम) पियुशाने नव्याने लिहली.

गणेशा's picture

5 May 2011 - 12:14 pm | गणेशा

कारणे :

अमेरीका कितीही अतीप्रगत असली तरी तेथील लोकांच्या मतांमुळे .. परखडते मुळे राजकारणी लोक ही हलुन जातात.. त्यामुळे त्या लोकांच्या दबावामुळेच अमेरीकेला अशी पावले उचलावी लागतात.. बुश अपयशी ठरले तर जनतेने त्यांना जागा दाखवलीच ..
सरकारविरोधी ही तेथील जनता उघड डॉक्युमेंटरी काढु शकते ... त्याला बंदी ही नसते ( नाव निटसे लक्षात नाही पण " फॅरानाईट" असेन बहुतेक)

अर्थीय भरभराट वेगळी आणि व्यवाहारीक.. कर्तव्य जाणणारी ..समाजकारण माणणारी सामान्य जनता वेगळी..

भारतात .. ह्याच स्वकर्तव्य आणि व्यवाहाराचा अभाव जाणवतो आहे... सामान्य जनता पुढार्‍यांपुढे लोळन घालत आहे...
आणि आपण ज्या पुढार्यांपुढे झुकलो त्याचा विरोधी असलेला पुढार्‍यावर मग अनेक आरोप करण्यात माणुस धन्य माणतो आहे...
हे बदलले पाहिजे ...

एक दिवसाबद्द्लचे अधिकारा बाबत :

सी.एम. पी. म बनल्यावर काय काय करता येइल हे वेगळे.. ते खुप उंच प्रोफाईल आहे माझ्यासाठी तेव्हडे विचार ही नक्कीच परिपक्व नसतील...
पण साधे पोलीस कमिशनर असले तरी जनसामान्यात खुप बदल घडवुन आनता येतात असे वाटते ..
पोलीसांना ही मी कधी जवळुन जानुन घेतलेले नसले तरी कामठेंचे नाव जेथे जाईल तेथे ऐकले आहेच. अगदी सोलापुर पासुन-पुणे कोल्हापुर पर्यंत.

पण अलीकडेच नांगरे पाटील यांनी मध्ये अवैध्य वाहतुक थांबवुन आणि लोकांना दरडावुन धमकावुन आपला धंदा चालवणार्‍या आणि वाहतुक तळावर स्वताचे साम्राज्य असणार्या लोकांना चांगलेच धडे दिले होते .. (पण आता पुनह तसाच दळींद्रीपणा दिसतो आहे.. वाशी.. वाकड..पुणे .. दादर येथे उभे राहुन पहा कळेल)

ट्रांस्पोर्ट , शेती, उद्योग, शिक्षण या आणि अश्या सर्व क्षेत्रात जोपर्यंत आपण ट्रांस्परंट कारभार करु शकणार नाही तोपर्यंत एक दिवस काय २१ वर्षे पण आपण सी.एम्/पी.एम होउन काहीच खोलवर रुझणारे असे भरीव काही करु शकणार नाही...

--
अतिप्रगत अशे बिरुद मिरवणार्या अमेरीकेतच २६/११ चा हेडली लपला असेल पण त्याला मागण्याची ही ताकद आपण दाखवु शकत नाही... मग हीच का ती अमेरीका आणि असे न तसे बोलण्यापेक्षा नागरीकांनी सरकारवर दबाव दिला पाहिजे ..
कसाब सारख्या अतिरेक्याला तत्काळ फाशी देण्यात अपयश येत असेन तर तसा दबाव त्यांच्यावर आलाच पाहिजे यासाठी पावले उठवली गेलीच पाहिजेत ...
बुश गेले तसे मनमोहन पण मग गेलेच पाहिजेत ...
कीतीही स्वच्छ प्रतिमा असली तरी आक्रमक विचार असणे हे नेत्याची निशानीच हवी ...

महासत्ता बना नक्की बना.. पण सामान्यांना डावलुन नाही तर सामान्यांच्या आधारावर बना.. अमेरीका याच मुळे महासत्ता म्हणुन टिकुन आहे... राजकारण बघु नका... समाजकारण बघा ...

>>>>>>>> पाकिस्तानी दहशतवादि आपल्या सीमेवर चोवीस तास छुप्या कारवाया करत असताना , आपल सरकार एखादी ठोस भूमिका का नाही घेत ?

......... ठोस भूमिका घ्यायला तेवढे सामर्थ्य असावे लागते. आणि दोन्ही शेजारी राष्ट्रे अण्वस्त्रधारी असल्याने कारवाई / हल्ला करणे अवघड आहे. महत्त्वाचे म्हणजे सापाला अर्धवट ठेचून चालत नाही, पूर्णपणे संपवावे लागते; नाहीतर आताच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागेपुढे पाहणार नाही, यातून सर्वनाशाशिवाय काहीही साध्य होणार नाही. जर हल्ला करायचा असेल तर, भारतालाच पूर्ण सामर्थ्यानिशी अण्वस्त्रहल्ला करून पाकिस्तान संपवावे लागेल अन्यथा केवळ सैनिकी कारवाई केल्यास अण्वस्त्रयुद्धाचा धोका टाळता येणार नाही यात आपलेही फार नुकसान होईल. अन्य आंतरराष्ट्रीय राजकारण व इतर भानगडी वेगळ्याच. इतर राष्ट्रांना फाट्यावर मारण्याची ताकद असली पाहिजे आणि त्यासाठी तेवढे सामर्थ्यवान होणे, स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त राजकीय इच्छाशक्ति हवी व येथील पाकधार्जिण्या व्यक्तिंना ताब्यात ठेवता येणे आवश्यक. जाणकार अधिक माहिती पुरवतील.

......

>>>>>> चीनचे सैनिक इंच इंचाने भारताच्या सीमेत घुसत असूनही भारत त्याला रोखू का शकत नाही ?

....... भारत चीनपेक्षा सैन्य व शस्त्राबाबत खूप मागे आहे. आपल्यापेक्षा सामर्थ्यवान शत्रुवर हल्ला करणे म्हणजे ये बैला मला मार असेच आहे. चीनपेक्षा अधिक शस्त्रसाठा , अधिक सैन्यबळ व आर्थिक ताकद वाढविल्याशिवाय चीनला रोखता येणे अवघड आहे. व चीनबाबतहि आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणू शकत नाही आणि आणलाच तर चीन तो फाट्यावर मारेल यात तिळमात्र शंका नाही. आणि रशिया संपला असल्याने आता याबाबत भारताला मदत करु शकणारा अन्य मित्रदेश नाही. आपण याबाबत अमेरिकेवर विसंबून राहू शकत नाही आणि विश्वास ठेवू शकत नाही. आणि अन्य शेजारी राष्ट्रांशी असलेले आपले राजनैतिक संबंध किती मजबूत आहेत ते सर्वांनाच माहीत आहे. नेपाळ माओवाद्यांच्या ताब्यात गेले आहे व तेथे भारतविरोधी राजवट आहे. पाकिस्तान तर उघड शत्रु आहे. श्रीलंकेबाबतही फार चांगली परिस्थिती नाही (तमिळ प्रश्न). भूतान काही मदत करु शकत नाही . अमेरिकेने काही मदत केली किंवा तसा आव आणला, तर भारतात सैनिकी तळ उभारण्यास मागणी केली जाईल व अशी मागणी पूर्ण करणे सर्वथा अयोग्य आहे व त्यामुळे पुन्हा पारतंत्राचा धोका संभवतो.
अंतर्गत हेवेदावे आपल्याकडे आहेत ते वेगळेच. आणि केवळ स्वतःच्या ५-२५ पिढ्यांची सोय करत असलेले राजकारणी देश सुधारु देणार नाहीत, तसाही आता जवळ जवळ सगळा देश विकायला काढलेलाच आहे.

.................. राहिला प्रश्न एक दिवस C.M./ P.M. व्हायचा, तर असे स्वप्नरंजन करणेदेखील गुन्हा आहे, कारण अनेक इच्छुकदेखील सर्वसामान्य माणसाला अशी इच्छा केल्यास जगू देणार नाहीत. आणि जरी तसे घडले तरी एका दिवसात/ रात्रीत बदल घडविणे अशक्यच आहे. संपूर्ण समाज एका रात्रीत/ दिवसात बदलत नसतो. समाजाची देशभक्तिपूर्ण जडणघडण करणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि तसे घडत नाही/ घडू दिले जात नाही. तेव्हा स्वतःपासून बदल घडविण्याचा निश्चय करा आणि तो अंमलातदेखील आणा, तरच परिस्थिती बदलेल; नाहीतर सर्वांनाच शिवाजी जन्माला यायला पाहिजे, पण तो शेजारच्या घरात. स्वराष्ट्रावरील अढळ निष्ठा अतिशय महत्त्वाची आहे.

विनायक बेलापुरे's picture

6 May 2011 - 12:44 am | विनायक बेलापुरे

एक दिवसात काही सुद्धा करता येत नाही. हुकुमशाहीत पण अवघड असते , लोकशाहीत आणि नोकरशाहीत तर नाहीच नाही.
केबिन सापडून अंटीचेंबरमधे पहिला " चा " घेइस्तोवरच लंच टाईम होतो. ;)