गाभा:
भाजप सेनेबाबत काही निरीक्षणे नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे
भाजपमधे राष्ट्रीय स्तरावर
नवे नेतृत्व आल्यावर काही आशा निर्माण झाली आहे
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B5Rzr...
वरील डॉक्युमेंटवर नजर टाका आणि विचार करा
प्रतिक्रिया
3 May 2011 - 11:09 am | चिरोटा
ती लिंक उघडत नाही इकडून. काय आशा निर्माण झाल्या आहेत त्या ईथे कृपया लिहाव्यात.
लिंक उघडली-
लेखाचा टोन एकंदरित "बिचारा सहनशील भाजप" असा दिसतो.युती सत्ता मिळवण्यासाठीच झाली ना?युती राहिली नाही तर स्वबळावर सेना/भाजप पुढच्या ५० वर्षातही राज्यात सत्तेवर येवू शकत नाहीत.कारण सोपे आहे-काँग्रेस/राष्ट्रवादीला फक्त तोंडदेखला विरोध आणि खाजगीत साटेलोटे हे सेना-भाजपचे पूर्वीपासूनचे धोरण आहे आणि ते मतदारांना कळून चुकले आहे.
सचिनवर टिका/शहारुखला विरोध ह्यातले काय काय स्वीकारायचे हे कळत नसेल तर पक्ष नेत्यांमध्ये वैचारिक गोंधळ आहे असे म्हणावे लागेल.बाकी अनेक राज्यात भाजप स्वबळावर/युतीतून सत्तेवर आला. अनेक ठिकाणी चांगला कारभारही केला.महाराष्ट्रात हे होण्याची शक्यता कमी वाटते.
2 May 2011 - 1:23 pm | शिल्पा ब
<<<सेना भाजप युती तुटावी का ?
तुम्हाला भारी चिंता!!!
19 Sep 2014 - 6:44 pm | आशु जोग
२००९ पासून करत होतो ही चिन्ता
19 Sep 2014 - 6:47 pm | बॅटमॅन
चिन्ता करितो युतीची!
19 Sep 2014 - 8:13 pm | आशु जोग
अजून पक्की खबर नाही म्हणे तुटल्याची
2 May 2011 - 2:47 pm | धमाल मुलगा
चालेल की.
पण काही फायदा आहे का?
2 May 2011 - 6:12 pm | तिमा
दोन्ही पक्ष पूर्णपणाने उघडे(एक्सपोज) झाले आहेत. त्यांनी आता काहीही केले तरी ते परत सत्तेवर येणार नाहीत.
3 May 2011 - 5:38 am | आत्मशून्य
......
4 May 2011 - 9:01 am | नितिन थत्ते
लिंक वाचली.
परंतु भाजप मध्ये नवे नेतृत्व आल्यामुळे यात सुधारणा कशी होणार? युती तोडण्याचा कणखर निर्णय घेऊन?
युती तुटली तर भाजपला काहीच आशा उरणार नाही. (मनसेशी युती केली तर काय होईल हे माहिती नाही). कितीही गमजा केल्या तरी मास बेसमध्ये भाजप शिवसेनेच्या जवळपासही नाही. भाजपचा बेस दिवाणखाने आणि चिंतनशिबिरातला. शिवसेनेचा मतदारांमध्ये. महाराष्ट्रात भाजप जितकी उभी आहे ती शिवसेनेच्याच जिवावर.
भाजपमुळे शिवसेनेला क्रेडिबिलिटीत फायदा झाला.
27 Feb 2017 - 8:33 pm | अनुप ढेरे
मजेशीर प्रतिसाद :)
27 Feb 2017 - 8:56 pm | गॅरी ट्रुमन
प्रचंड सहमती. हहपुवा
27 Feb 2017 - 9:13 pm | श्रीगुरुजी
शिवसेना व भाजपच्या जनाधाराबद्दल किती गैरसमज पसरले होते ते या प्रतिसादातून दॄग्गोचर होते. २००९ मध्ये भाजपपेक्षा तब्बल ५० जागा जास्त लढवूनसुद्धा भाजपपेक्षा कमी जागा मिळविल्यानंतरसुद्धा असे गैरसमज का पसरले असावेत?
पुन्हा एकदा गैरसमज. वस्तुस्थिती याच्या बरोबर उलट होती आणि आहे.
फक्त क्रेडीबिलिटीत नसून मतपेटीत सुद्धा फायदा झाला. भाजपबरोबर युती केली नसती तर शिवसेना मुंबई-ठाण्याच्या आतच राहिली असती.
4 May 2011 - 3:25 pm | परिकथेतील राजकुमार
आमच्या वाटण्या न वाटण्याने काय टिंब टिंब फरक पडतो का?
आम्हाला मिपावरचे भिकार, टूकार एकोळी धागे आणि काथ्याकुट बंद व्हावे असे देखील वाटते.
काही लोकांना डायरी लिहिल्यागत रोज येऊन मिपावर काहीतरी लिखाण प्रसवायची इच्छा होते त्यांना सदबुद्धी मिळावी असे देखील वाटते.
आमच्या टार्याला मिपारत्न्स का देत नाहीत असे देखील वाटते.
वाहिदा अखंड १० ओळी मराठीत लिहिते आहे असे स्वप्न पडावेसे देखील वाटते.
आमच्या धम्यानी सिगारेट सोडली आहे आणि तो जेष्टमधाची काडी चावत हिंडत आहे असे देखील बघावेसे वाटते.
खाकी चड्डीत विजुभौंना शाखेत जाताना बघावेसे वाटते.
डान्रावांनी एखादे लेखन खरडवही बाहेर देखील करायला सुरुवात करावी असे वाटते.
अदितीने खरडव्ह्यातुन मोहिमा राबवणे थांबवावे असे पण वाटते.
कोदाने नीलकांतला एक आनावृत्त पत्र लिहावे असे वाटते.
आणि बरेच काय काय...
पण काय उपेग हाय काय ?
4 May 2011 - 6:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हीहीही !!! छान प्रतिसाद.
4 May 2011 - 4:15 pm | पिंगू
हाहाहा पराशी सहमत..
बाकी भाजपा काय आणि सेना काय. दोन्ही पक्ष चुलीत गेल्यास आम्हांस अत्यानंद होईल.
- (पक्षद्वेष्टा) पिंगू
4 May 2011 - 5:33 pm | चिरोटा
मग ते सध्या कुठे आहेत?
4 May 2011 - 5:43 pm | नरेशकुमार
बाथ घेन्यासाठी पानी तापेल का मग चुलीवर ?
पानि जास्त गरम झाले तर ईलेक्ट्रीक सिटि पन जनरेट होईल का ?
6 May 2011 - 12:47 am | हुप्प्या
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8171538.cms
असे वाटते की भाजपला काय मोठं सोनं लागून गेलं आहे?
तद्दन सवंग राजकारणी पक्ष हीच भाजपची ओळख आहे. भ्रष्टाचार, षंढपणा, बोटचेपेपणा, वशिलेबाजी, घराणेशाही ह्या बाबतीत भाजपही मागे नाही असे त्यांनी सोदाहरण दाखवले आहे.
शिवसेनेबाबत निदान एक आशा आहे की बाळासाहेबांबरोबर हा पक्षही संपेल. भाजपचे मात्र तसे नाही. त्याला घालवावाच लागेल.
मला तर महाराष्ट्रापुरता तरी मनसेच बरा वाटतो सध्या.
अण्णा हजार्यांच्या निमित्ताने काँग्रेस आणि भाजपला पुरून उरेल असा सुदृढ पर्याय निर्माण होवो अशी इच्छा.
23 Sep 2011 - 10:50 pm | आशु जोग
आता पाहूया
24 Sep 2011 - 3:16 am | शिल्पा ब
फुटकळ प्रतिसाद देउन स्वतःचा धागा वर आणायचे प्रयत्न पाहुन किव आली...
बाकी फार्फार मोठ्ठा अन विचार करायला लावणारा लेख लिहुन आपले ज्ञान दाखवलेत ... बरे झाले..
24 Sep 2011 - 12:47 pm | आशु जोग
काकू
या पुतण्यावर फार रागावता बुवा तुम्ही !
24 Sep 2011 - 3:19 pm | सोत्रि
खरच शिल्पातै!
हांना आपले म्हणा बुवा आता :)
- (आपला) सोकाजी
24 Sep 2011 - 12:17 pm | चेतन सुभाष गुगळे
लेखनातून आपला अभ्यास जाणवतो. अनेकांना असे वाटते भाजपच्या यशात मित्रपक्षाचा वाटा मोठा आणि भाजपचा कमी असतो, पण आपले निरीक्षण अचूक आहे. भाजपला अनेक ठिकाणी तडजोड करायला लावण्यात प्रादेशिक पक्ष धन्यता मानत असतात. ते जास्त जागा लढवून त्या प्रमाणात विजय मिळवू शकत नाहीत. या उलट भाजपच्या वाट्याला कमी जागा येतात.
बिहारमध्ये ही जिंकलेल्या जागा / लढवलेल्या जागा या गुणोत्तरात भाजप नितीशकुमारांच्या पक्षापेक्षा आश्चर्यकारकरीत्या बराच पुढे आहे.
<< सेना भाजप युती तुटावी का ? >>
<< नवे नेतृत्व आल्यावर काही आशा निर्माण झाली आहे >>
भीमशक्ती + शिवशक्ती, नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे दावेदार आणि राज ठाकरेंची त्यांच्याशी जवळीक या बातम्या वाचून आपण म्हणता तशी शक्यता नाकारता येत नाही.
24 Sep 2011 - 12:52 pm | आशु जोग
आज नरेंद्र मोदींचा उदो उदो करण्यात सेना पुढे असते पण
गुजरातेत त्यांच्याविरुद्ध उमेदवारही उभे करते
आज नाही म्हटलं तरी
अनेक हेवीवेट गेल्याने शिवसेना दुबळी झालेली आहे
पण तिने स्वतःला मोठे करण्याऐवजी भाजपला कुरतडण्यात धन्यता मानली आहे
19 Sep 2014 - 7:30 pm | भिंगरी
सेनेपुढे असे आत्ताच वाचले.
23 Sep 2014 - 4:17 pm | दुश्यन्त
आजच्या घडामोडी (सेना भाजप नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद) पाहता युती होणार हे नक्की. आजच जगवटप पण ठरेल. शिवसेना 150, भाजप 124, घटक पक्ष 14 (किंवा 150/126/12) असा फॉर्मुला ठरल्याचे कळतेय. सेना भाजप एकत्र लढले तर कॉंग्रेस राष्ट्रवादी (हे एकत्र लढोत की स्वतंत्र) यांचे मात्र लोकसभेसारखेच जोरदार पानिपत होणार हे निश्चित.
23 Sep 2014 - 4:59 pm | आशु जोग
पण सेना+भाजपा ही बेरीज की वजाबाकी
निवडून आल्यावरही एकमेकाच्या झिंज्या उपटणारच
27 Feb 2017 - 7:26 pm | आशु जोग
२००९ साली एक उद्गार ऐकू आले. आता मराठी माणसानेच आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि मग हे विचार माझ्या मनात आले. ते मी लिहून ठेवले. इथे धागा २०११ ला टाकला असला तरी २००९ च्या निवडणूकीनंतरचे हे चिंतन होते. २०१४ मधे युती तुटल्यावर अनेक भाजपेयींनी भेटून किंवा फोनवर या लेखाची आठवण झाल्याचे किंवा सहमत असल्याचे सांगितले.
तो लेखही इथे टाकत आहे
ही श्रींची इच्छा
अशी कल्पना करा आपलं घर चोरानं लुटुन नेलय तर आपण काय कराल. शेजार्याकडून ते नुकसान भरून घ्याल ?
आपल्या मित्राकडून नुकसान भरपाई घ्याल ? नक्कीच नाही.
शिवसेनेच्या बाबतीत असे काही प्रश्न मनात येतात.
मागील काही घटनांवर नजर टाका म्हणजे लक्षात येइल. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. ते शिवसेनेला खच्ची झाली. नारायण राणेंनी शिवसेना सोडली. ते बरोबर १० आमदार घेऊन गेले. सेना पुन्हा खच्ची झाली.
गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली. सेना आणखी खचली. अडचणीच्या काळात विखे पाटील शिवसेनेच्या आसर्याला आले, केंद्रात मंत्री झाले. सोयीची वेळ पाहून त्यांनी शिवसेनेला रामराम केला.
असेच सुरेश जैन शिवसेनेत आले. सोयीची वेळ पाहून बाहेर पडले.
विनायक मेटे यांनी शिवसेना सोडली, ते आज राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आहेत, आमदार आहेत.
छगन भुजबळ आज मंत्री आहेत. त्यांचा मुलगा आमदार आणि पुतण्या खासदार आहे.
नारायण राणे मंत्री आहेत. मुलगा खासदार आहे. त्याने सुरेश प्रभू या माजी केंद्रीय मंत्र्याला पराभूत केले.
नवी मुंबई आज गणेश नाईकांच्या ताब्यात आहे, ते आज मंत्री आहेत. त्यांचाही मुलगा खासदार आहे.
संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली, ते खासदार आहेत.
म्हणजे सेनेला खच्ची केलं राणे, भुजबळ, नाईक, संजय निरुपम, विखे पाटील, राज ठाकरे यांनी.
पण झालेल्या नुकसानीची भरपाई मात्र शिवसेना आपला मित्रपक्ष भाजप कडून करू इच्छिते.
गुहागरची जागा भाजपकडे वर्षानुवर्षे होती. परंतु नाराज रामदास कदमांसाठी भाजपची गुहागरची जागा सेनेने विनय नातूंकडून हिसकावून घेतली. कदम पडले.
परिणाम काय झाला गुहागरची जागा आज राष्ट्रवादीकडे आहे.
पुर्वी पुण्यातला शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ भाजपकडे होता, तोही स्वत:कडे ओढून घेतला.
तिथे आधी सुतार नंतर विनायक निम्हण आमदार झाले. निम्हण शिवसेना सोडून कॊंग्रेसमधे गेले.
त्यामुळे ती जागा आज कॊंग्रेसकडे आहे.
भाजपकडून सेनेने हिसकावून घेतलेल्या शिवाजीनगर आणि गुहागर या दोन्ही जागा सेनेला टिकवता आल्या नाहीत. दोष कोणाचा ?
आपलं घर लुटलं कुणी आणि आपण नुकसान भरपाई कोणाकडून घेत आहोत. आपल्याच मित्राकडून भाजपकडून.
भाजपचे नेते रामभाऊ म्हाळगी ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. ते तिथून दोनदा निवडून आले.
त्यांचे निधन झाले तेव्हा ते ठाण्याचे खासदार होते.
पुढे राम कापसे तिथून निवडून येत असत. ती जागाही सेनेनी स्वत:कडे घेतली आहे.
आणखी एक झटका-
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली.
ते केवळ काही माणसे घेउन गेले नाहीत, तर सेनेतलं सारं मराठीपण घेउन गेले.
आज राजच्या मनसेनेचे १३ आमदार आहेत.
राज यांच्या मनसेनेनी युतीला जवळपास ४० ते ४५ विधानसभा मतदारसंघात झटका दिलाय.
म्हणजे यांच्या घरचं भांडण, त्रास मात्र भाजपला.
यांना आपल्या जागा टिकवता येत नाहीत, माणसं सोडून जातात. चूक कोणाची ?
राहता राहीले यांचे मराठीप्रेम. शिवसेनेच्या खासदारांवर एक नजर टाका.
प्रितीश नंदी, चंद्रीका केनिया, संजय निरुपम.
राज्यसभेसाठी शिवसेनेला एकही मराठी खासदार मिळू नये ?
बरं मनसेनेला विरोध म्हणून हे छटपूजाही करणार. याच्या मराठीपणावर भरवसा तरी कसा ठेवायचा ?
यांच्याबरोबर राहून फायदा काय, १७१ : ११७ चे सूत्र म्हणजे विधानसभेला १७१ जागा हे लढवणार आणि भाजपला मात्र ११७.
त्या जागाही शिवाजीनगर, गुहागर, ठाणे अशा फायद्याच्या. याचा आता विचार व्हायला हवा.
भाजपने मशागत केलेल्या जागा हे पळवणार. हे कुठवर चालणार.
मतदार भाजपचा उमेदवार मात्र सेनेचा. याचाही आता विचार व्हायला हवा.
राष्ट्रपतिपदासाठी भाजपचा प्रतिभाताईंना विरोध पण सेनेचा मात्र पाठिंबा.
पंतप्रधानपदासाठी भाजपचा पवार यांच्या नावाला विरोध, तर सेनेचा पवारांना पाठिंबा.
पुणे महानगरपलिकेमधे राष्ट्रवादीबरोबर सत्तेत भागीदारी.
हा केवढा मोठा अंतर्विरोध ! केवढी ही विसंगती !!
आधी औस्ट्रेलियन क्रिकेटर्सना हिंदुस्थानात पाय ठेवू देणार नाही अशी घोषणा केली.
पण पवार साहेबांच्या भेटीनंतर भाषा बदलली. औस्ट्रेलियन क्रिकेटर्सना असलेला विरोध मावळला.
रोज काहीतरी नवीन मुद्दा. कधी शाहरुकखानला विरोध, कधी राहुल गांधीला विरोध तर कधी सचिन तेंडूलकरवर टीका. यातले काय काय स्वीकरायचे.
२००९च्या विधानसभा निवडणुकीमधे मोठा पराभव झाला तेव्हा तर कहरच झाला. म्हणे मराठी माणसानेच आमच्या पाठीत खंजीर खुपसला.
बस्स झालं, आता नाही हे सहन होत. किती वागवायचं हे ओझं !
ही युती तुटावी ही श्रींची इच्छा.
आपला,
आशु जोग
27 Feb 2017 - 9:17 pm | गॅरी ट्रुमन
खरं तर राष्ट्रपतीपदाच्या २००२ च्या निवडणुकांमध्ये भाजपने कलामसाहेबांसारखा 'विरोध न करता येण्याजोगा उमेदवार' आणला (तरीही कम्युनिस्टांनी विरोध करायचा तो केलाच. शेवटी कम्युनिस्टच ते) त्यावेळी फक्त शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने मत दिले होते.
१९९२ मध्ये काँग्रेसने शंकरदयाळ शर्मांना उमेदवारी दिली होती तर सगळ्या विरोधी पक्षांनी मेघालयमधले नेते जी.जी.स्वेल यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी शिवसेनेने सतीश प्रधान यांना राज्यसभेत निवडून जाण्यासाठी काँग्रेसकडून पाठिंबा घ्यायच्या बदल्यात शंकरदयाळ शर्मांना पाठिंबा दिला होता.
१९९७ मध्ये शिवसेना हा एकच पक्ष वगळता इतर सर्व पक्षांनी के.आर.नारायणन यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी शिवसेनेने तिरीमिरीत माजी निवडणुक आयुक्त टी.एन.शेषन यांना उमेदवारी दिली होती. शेषन निवडून यायची सुतराम शक्यता नाही हे माहित असूनही.
२००७ मध्ये मराठीपणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने कॉंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला.
२०१२ मध्ये पण शिवसेनेने काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला होता.
वा रे मित्रपक्ष
27 Feb 2017 - 7:31 pm | आशु जोग
आणखीही काही विचारांची भर यामधे घालावी लागेल. इतके सगळे आमच्यासारख्या सामान्य मतदारांना कळते तर ते स्वतः भाजपा मधल्या धुरीणांना कळत नसेल काय !
मुंडे महाजन यांचीच युतीमधे महत्त्वाची भूमिका असे. ११७-१७१ सकट अनेक अन्यायकारक गोष्टी ते खपवून घेत. पण पक्षाला कमीपणा घ्यायला लावणारे हे नेते स्वतः काही त्याग करत असत का ?
याचा अर्थ पक्ष छोटा ठेवून हे दोघे स्वतः मात्र मोठे होत. असं दिसतं.
आता मात्र पक्ष एकदम जोमात वाढताना दिसतो आहे !
27 Feb 2017 - 11:20 pm | संजय पाटिल
मुंढे-महाजन= झारीतले शुक्राचार्य होते ??
28 Feb 2017 - 12:31 am | आशु जोग
छान प्रश्न
27 Feb 2017 - 9:16 pm | तिमा
अशी तुटावी की परत ते कधीच एकत्र येणार नाहीत, त्यांतच महाराष्ट्राचे भले आहे.
27 Feb 2017 - 9:20 pm | श्रीगुरुजी
युती तुटलेलीच आहे. आता फक्त राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेणे शिल्लक आहे. जितक्या लवकर शिवसेना पाठिंबा काढून घेईल तितके ते भाजपसाठी चांगलेच ठरेल.
27 Feb 2017 - 11:14 pm | आशु जोग
भाजपाचे मतदार किंवा सहानुभूतीदार असतात
सेनेच्या बाबतीत मात्र प्रत्येक जण सैनिक किंवा पक्षाचा कार्यकर्ता असतो. अधे मधे काही नाही परिणामी अभिनिवेश जास्त असतो. सैनिकांची पक्षनिष्ठा पक्षावरच्या प्रेमातून दिसत नाही तर कुणाला भक्त म्हण, कमळी, कमळाबाई असे उल्लेख कर यातून दिसते. १९८९ मधे विद्याधर गोखले यांच्यासारखे शिवसेनेचे खासदार कोणत्या चिन्हावर निवडून आले होते असे विचारले की शिवसेनावल्यांना मिरच्या का झोंबतात !