दुपारचे दीड वाजले .
उन मी म्हणत होते.
ही काय फोटो काढायची वेळ आहे का ? असं मनाशी म्हणत मी गाडीला स्टार्टर मारला. रस्ता वळणा वळणाचा होता. शेवटच्या वळणावर पोहोचल्यावर मात्र सगळे विसरून मी पहातच राहिलो. आकाशातून पडणारा तीव्र प्रकाश पिवळ्या फुलातून खाली पडे पर्यंत कोवळा होऊन जात होता. झाडाखालची जमीन तर पिवळी धम्मक झाली होती.
गोडसर असा वास अवती भोवती भरलेला, आणि फुलांवर जणू दृष्ट लागू नये म्हणून भुंगे पिंगा घालत होते.
मनोमन परमश्वराचे आभर मानून मी कॅमेरा ट्रायपॉड्वर चढवला आणि कामाला लागलो......
हा बघा त्याचा फोटो.
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
24 Apr 2011 - 10:34 am | गणपा
आणि एकच फोटो काढलात? की बाकीचे ब्लॉग्वर जाउन पहायचे.
24 Apr 2011 - 5:08 pm | श्रावण मोडक
हेच म्हणतो.
24 Apr 2011 - 10:45 am | सूर्य
फोटो छान आहे पण लोकेशन काय आहे ते सुद्धा सांगा.
- सूर्य.
24 Apr 2011 - 11:42 am | टारझन
तिसरा फोटु आउट ऑफ द बॉक्स .. तोडंच नाही !! पाचव्या फोटुत अॅपार्चर आणि शटर स्पीड काय होता ?
24 Apr 2011 - 4:39 pm | जयंत कुलकर्णी
24 Apr 2011 - 5:40 pm | निवेदिता-ताई
अतिशय सुंदर..
25 Apr 2011 - 10:12 am | आचारी
फोटु लै भारी
25 Apr 2011 - 5:49 pm | गणेशा
फोटो दिसले नाहित म्हणुन निराशा झाली..
अवांतर :
आता माझ्या आवडत्या कलादालन या विभागासाठी घरीचे नेट घ्यावे लागेल बहुतेक .. ऑफिसातुन ब्लॉक असतात साईटी
25 Apr 2011 - 7:13 pm | प्राजक्ता पवार
सुरेख !