तरी का ?

उगा काहितरीच's picture
उगा काहितरीच in काथ्याकूट
20 Apr 2011 - 11:13 am
गाभा: 

राम राम मंडळी !
वरीष्ठ मिपाकरांची आज्ञा /ईच्छा मानुन बर्‍याच दिवसानंतर येतोय . आशा करतो कि विसरले नसनार ( तशी मराठी मानसाची स्मरणशक्ती दांडगी हो!:) )
मागच्या काही दिवसापासुन आमच्याकडे माझी आजी आलेली आहे. आणि तिला टि.व्ही. वरच्या सगळ्या मालिका जाम प्रिय (star plus च्या हो !) तिच्यामुळे मलाही IPL च्या ब्रेकमध्ये का होईना पण पाहाव्या लागतात :( मला कळत नाही की लोकांना या प्रकारच्या मालिका पाहवतात तरी कशा ? त्यामध्ये ना कथा चांगली ना पटकथा , वेशभुषा एकदम भडक , सतत सोज्वळ स्त्रीवर होनारा अन्याय , ढीन sss ढीनsss ढूस्स ss म्युसीक , चित्रविचीत्र क्यामेरा कोन (camera angle) , सतत कसले तरी कट , logic चा तर कुठे दुरान्वयेही संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. (अधीक माहितीसाठी रवीवारचा लोकमत वाचावा .) तरी पण लोकांना विशेषतः महिला वर्गाला या प्रकारच्या मालीका का आवडतात ?
बरं केवळ निरक्षर किंवा अल्पशिक्षीतच नव्हे तर चक्क सुशीक्षीत महिलापण अशा मालीका पाहतात .
तुम्हि जर अशा प्रकारच्या मालीका पहात असताल तर त्यातिल वाङमयीन सौंदर्याची थोडीफार तरी उकल करुन सांगा किंवा घरच्यांना अशा मालिका पाहन्यापासुन पराव्रुत्त कशे करावे ते तरी सांगा .

प्रतिक्रिया

रामदास's picture

20 Apr 2011 - 11:25 am | रामदास

हा प्रश्न मला मिपावरचे बरेच धागे वाचूनही पडतो पण काय करू ? सहन करतो.

प्यारे१'s picture

20 Apr 2011 - 11:35 am | प्यारे१

रामदास काका खडक्स...!!!

वरीष्ठ मिपाकरांची आज्ञा /ईच्छा मानुन बर्‍याच दिवसानंतर येतोय .

सांगा .. नावं सांगा जरा ह्या वरिष्ठ मिपाकरांची .. !! म्हणजे तरतुद करता येईल !

- उभा कधीतरीच

चिरोटा's picture

20 Apr 2011 - 11:30 am | चिरोटा

तिच्यामुळे मलाही IPL च्या ब्रेकमध्ये का होईना पण पाहाव्या लागतात

बर्‍याच लोकांना लोक आय पी एल पाहतात तरी कसे असाही प्रश्न पडतो.

छोटा डॉन's picture

20 Apr 2011 - 11:39 am | छोटा डॉन

>>बर्‍याच लोकांना लोक आय पी एल पाहतात तरी कसे असाही प्रश्न पडतो.
+१, सहमत आहे.
इनफॅक्ट मी ह्याच्याही पुढे जाऊन असे म्हणेन की 'लोक क्रिकेट पाहतात तरी कसे' हा प्रश्न मला पडतो :)

- छोटा डॉन

मराठी_माणूस's picture

20 Apr 2011 - 12:13 pm | मराठी_माणूस

इनफॅक्ट मी ह्याच्याही पुढे जाऊन असे म्हणेन की 'लोक क्रिकेट पाहतात तरी कसे' हा प्रश्न मला पडतो
सहमत

डोण रावांच्या दोन पावले पुढे जाऊन मी तर म्हणतो .. " लोक खेळ ( फुटबॉल असो वा अजुन काही ) पहातात तरी कसे" असा प्रश्न पडतो .
एक वेळ मुंबै , पुणे , पंजाब , दिल्ली इत्यादी आयपीएल संघ किमान भारतीय आहेत , त्यात प्लेयर भारतिय आहेत .. पण काही लोकं युरोपियन संघांना चियर अप करताना चक्क भांडताना दिसतात :)

चावटमेला's picture

20 Apr 2011 - 4:19 pm | चावटमेला

+१००

निनाद's picture

20 Apr 2011 - 11:37 am | निनाद

मला वाटले तर्री का? म्हणजे काही तरी मिसळी संदर्भातला प्रश्न असेल. पण हे तर भलतेच.

जोशी's picture

20 Apr 2011 - 12:19 pm | जोशी

आपण आपल्या आजीला पोथी, पुस्तक, कादंबरी, एत्यादी वाचून दाखवा. अनेक गोष्टी करता येतील.

तीलाही मालीका आवडत नसाव्यात, ती काय करणार बिचारी. प्रयोग करुन बघा !!

जोशी

आज्जीला मिपावर खातं उघडून द्या. :)
आणि तुम्ही पण त्या इडियट बॉक्स चा नाद सोडुन इथेच या वास्तव्याला.
पर असले धागे काढु नका बॉ. बाकी टार्‍याशी शमत आहे. ;)

मराठमोळा's picture

20 Apr 2011 - 12:28 pm | मराठमोळा

लेख (लेख म्हणावे का? असा प्रश्न पडलाय.)मालकाच्या आयडी प्रमाणेच लेख..

तुमचा हा तरी का विचारण्याचा तरीका काय वर्णावा !! फार काय बोलणार पु ले शु.