रामदेव बाबा आयुर्वेदाचे व्यायवसायिकीकरण करत आहेत का ?

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in काथ्याकूट
18 Apr 2011 - 10:16 pm
गाभा: 

अखिल भारतीय आखाडा परिषदेने योग गुरु रामदेव बाबा आयुर्वेदाचे व्यायवसायिकीकरण करीत असून पारंपरिक औषधे अधिक किमतीत विकत असल्याची टीका केली आहे.रामदेव बाबा स्वदेशीच्या मुद्‌द्‌यावरही दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप परिषदेचे प्रवक्ते बाबा हठयोगी यांनी केला आहे. आपल्याला या विषयी काय वाटते ?

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

18 Apr 2011 - 10:24 pm | नितिन थत्ते

व्यावसायिकीकरण करण्यात आक्षेपार्ह काहीही नाही.

अधिक किंमतीचे म्हणाल तर ते ब्रॅण्डिंग मुळे होते. रामदेवबाबाची ब्रॅण्डव्हॅल्यू वैद्यनाथ/धूतपापेश्वरपेक्षा टीव्ही पब्लिसिटीमुळे जास्त आहे.

याहून काही जास्त लिहीत नाही नाहीतर काही पक्क्या आणि काही इडियट लोकांच्या कुठली तरी आग कुठेतरी जाईल.

अन्या दातार's picture

18 Apr 2011 - 10:44 pm | अन्या दातार

स्वदेशीच्या आक्षेपाबाबत काही माहिती नाही.
बाकी व्यावसायिकीकरण हा आक्षेपार्ह काही नाही

शिल्पा ब's picture

18 Apr 2011 - 11:27 pm | शिल्पा ब

बरं मग?

व्यावसायीकीकरणाबद्दल काही वाटले नाही.
पारंपारीक औषधांचा कच्चा माल मिळवण्यासाठी आता जास्त दाम मोजावे लागतात असे ऐकले आहे.

डावखुरा's picture

19 Apr 2011 - 11:16 am | डावखुरा

काही त्रास आहे का आपल्याला....?

विजुभाऊ's picture

19 Apr 2011 - 12:12 pm | विजुभाऊ

यात काही चूक आह एअसे वातत नाही. आयुर्वेद सर्वांपर्यन्त पोहोचवणे हे महत्वाचे

मराठमोळा's picture

19 Apr 2011 - 12:17 pm | मराठमोळा

तुम्हाला काय वाटतं ते पण लिव्हा की पावणं.
बाकी रामदेवा बाबा जे काही करत आहेत त्याने कुणालाही नुकसान नाहीच उलट भारतीयांना फायदाच आहे.
उसामधे पण बाबांच्या ट्रस्टने जागा घेतली आहे म्हणे १०० एकर.. :)

सूर्यपुत्र's picture

19 Apr 2011 - 12:47 pm | सूर्यपुत्र

नवीनच कन्शेप्ट दिसतीये....

-सूर्यपुत्र.

व्यावसायिकीकरण झालंय असं वाटलं नाही, झाल्यास काही गैर देखिल नाही. तिथे काम करनार्यंचे पोट कसे चालणार? कि त्यांनि पन संन्यास घ्यायचा?

ज्यांना वाटतंय की कीमती जास्त आहेत त्यांनी १०० ग्राम मुरुडशेंग मला आनुन दाखवावी कुठे मिळते का ते म्हणजे त्यांना कच्च्या मालाचा भाव समजेल. रामदेव बाबांची औषधे मला तांबे पेक्शा बरिच स्वस्त वाटली. स्वानुभव तरी हेच सांग्तो. बाकी काय असेल ते असेल...

सन्जयखान्डेकर's picture

20 Apr 2011 - 2:21 pm | सन्जयखान्डेकर

मी बाप्पानशी पुर्णपणे सहमत आहे, आज कोण कोणत्या गोष्टीचा व्यवसाय करत नाही? ईथे किमान देशाचा पैसा देशात व देशासाठी वापरला जातो आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Apr 2011 - 6:06 pm | परिकथेतील राजकुमार

घ्या इनो घ्या आणि थोडे हठयोगींना पण द्या.

साला पारंपारीक दारु लोक जास्ती किंमतीत विकतात त्यावर कोण बोंब का मारत नाही ?

वपाडाव's picture

19 Apr 2011 - 6:32 pm | वपाडाव

आपण काय ही हवा "पेटंट" करुन घेतली आहे का? का तितला ऑक्सिजन ?
मग काय बापाचं जातंय का आपल्या?
होउ द्या की प्रसार त्यांचा...
जळलं मेलं लक्षण ते... कुणाचं काही चांगलं झालेलं बघवतच नै...

रणजित चितळे's picture

20 Apr 2011 - 9:17 am | रणजित चितळे

जर कोणी प्रभावी औषधे १० रु (स्वस्त) विकायला लागली तर लोकांचा विश्वास बसणार नाही. पुर्वी एमबीबीएस डॉ पुरायचा पडसे खोकल्याला. तो एक लाल औषध व पांढ-या गोळ्या द्यायचा त्याने बरा व्हायचा. आता त्याच खोकल्या साठी एमडी लागतो. ते सुद्धा खुप वेगवगळे पॅथोलॉजी परिक्षण करुन.

मला सगळ्यात महत्वाचे वाटते ते की रामदेव ह्यांच्या प्रतिभेने आज प्राणायम आदी लोकांना घराघरातून माहित पडला आहे. कळू लागले आहे, वळायला वेळ लागेल.

अविनाशकुलकर्णी's picture

20 Apr 2011 - 12:19 pm | अविनाशकुलकर्णी

राम देव बाबा अण्णांच्या आंदोलनातले आहे म्ह्णुन हा मुद्दा ऐरणी वर आला.

AniruddhaJoshi's picture

20 Apr 2011 - 2:29 pm | AniruddhaJoshi

जोपरयन्त रामदेवबाबा फुकतात प्रानायाम लोकान्पर्यन्त पोचवत आहेत तोपर्यन्त कोनी काहिहि बोला.

मालोजीराव's picture

20 Apr 2011 - 3:00 pm | मालोजीराव

रामदेव बाबांनी खुश्शाल आयुर्वेदिक औषधे विकावीत, चांगल्या औषधी मिळवायला रानावनात भटकाव लागतच परत त्यांची गुणवत्ता टिकवावी लागते...मग अधिक किमतीला विकली म्हणून काय झालं, तरीही या किमती "हिमालया" पेक्षा कमीच आहेत.
पण बाबांनी गरीब आणि गरजूनसाठी पण मोफत किंवा अल्पदरात उपचार केंद्रे चालवावीत

योगप्रभू's picture

20 Apr 2011 - 3:57 pm | योगप्रभू

आयुर्वेदिक औषध उद्योगात एवढे प्रचंड सुप्त सामर्थ्य आहे, की एकटे बाबा रामदेवसुद्धा पुरे पडणार नाहीत. थायलंडमध्ये हा व्यवसाय (हर्बल प्रॉडक्ट्स) चांगलाच भरभराटीला आला आहे. तेथे जागतिक आयुर्वेदिक परिषद भरते. पाच सात वर्षांपूर्वी भारतातील आयुर्वेदिक उत्पादनांचे भविष्यचित्र या विषयावर एक आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. त्यात अंदाज व्यक्त केला होता, की या उद्योगाची जागतिक उलाढाल २०२० पर्यंत ५०००० कोटी रुपयांपर्यंत जाईल. भारताचा सध्याचा वाटा मात्र ५००० कोटी रुपयेही नाही. यात नवनवे शोध लावायला आणि गुणकारी औषधे बनवायला मोठा वाव आहे.

मात्र भारतीय लोक या संधीचा पुरेसा फायदा घेत नाहीत. चीनने आपल्या थेरपीतील औषधी वनस्पतींचे डॉक्युमेंटेशन आणि प्रक्रियांचे प्रमाणीकरण केले आहे. अमेरिकेने भारतीय आयुर्वेदिक औषधांवर त्यात शिसे या घातक द्रव्याचे प्रमाण अधिक असल्याचे सांगून बंदी घातली आहे. भारतीयांनी त्यावर लक्ष द्यावे. कच्चा माल असलेल्या शुद्ध औषधी वनस्पती मिळणे अवघड झाले आहे कारण अशा वनस्पतींच्या लागवडीकडे आपण काळजीपूर्वक लक्ष देत नाही. अजुनही दुर्मीळ वनस्पतींच्या पुरवठ्यासाठी जंगले व आदिवासींवर अवलंबून राहावे लागते. भाव तर कमालीचे भडकले आहेत. च्यवनप्राशसाठीचे चांगले आवळे मध्य प्रदेशातून मागवावे लागतात. साधे शतावरीचे (अ‍ॅस्परॅगस) उदाहरण घ्या. पाचपट पैसे मोजूनही हव्या त्या दर्जाची मुळे मिळतीलच याची खात्री नाही. या पुरवठ्यात रिलायन्ससारखी कंपनी उतरली आहे. त्यांच्याकडून मिळणारा कच्चा माल उत्तम दर्जाचा असतो, पण भलताच महाग. मग का नाही औषधांच्या किंमती महागणार?

आखाडा परिषदेने नुसती टीका करण्यापेक्षा रामबाण औषधे विकसित करुन दाखवावीत. तुम्हाला पैसा मिळवण्यापासून कुणी रोखले आहे? अर्थात धर्माच्या नावावर सर्वसामान्यांना उल्लू बनवणार्‍या भंगड, गांजेकस बैराग्यांकडून काय वेगळी अपेक्षा करणार?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Apr 2011 - 2:29 am | निनाद मुक्काम प...

@आखाडा परिषदेने नुसती टीका करण्यापेक्षा रामबाण औषधे विकसित करुन दाखवावीत. तुम्हाला पैसा मिळवण्यापासून कुणी रोखले आहे? अर्थात धर्माच्या नावावर सर्वसामान्यांना उल्लू बनवणार्‍या भंगड, गांजेकस बैराग्यांकडून काय वेगळी अपेक्षा करणार?
खलास
तुम्ही असे काही लिहिल्यावर आम्ही दीर्ध प्रतिसाद द्यायचा तरी कश्यावर ?

वपाडाव's picture

25 Apr 2011 - 6:31 pm | वपाडाव

असंच काही बाही लिहित रहा पाटकर साहेब...
जेणे करुन दीर्घ प्रतिसाद येणार नाहीत अन मग आमची सुटका...
आपण मिपाकरांसमोर एक उदाहरण ठेवले आहे...
आणी सर्व जण ह्यावर लक्ष देतील असे म्हणायला हरकत नाही....