प्रत्येक फोटोबद्दल काही वर्णन, रसग्रहण आले असते तर फोटोचा लुत्फ लुटता आला असता. कृपया सायकलच्या चित्रातल्या वापराबद्दल काहीतरी सांगा.
तोवर ह्या निमित्ताने अमेरिकन फोटोग्राफर 'राल्फ गिब्सन'चे नाव घेतो. त्यांचा एक फोटो इथे दिल्यावाचुन रहावत नाही.
अर्धवट सूर्यप्रकाश पडलेल्या जिन्याचा फोटो आहे, पण मला यात 'थडगे व वर जाणे' काय मस्त चित्रीत झालेले वाटते. नेहमीच्या वस्तुंमधुन अशी कला बाहेर आणणे लाजबाव!
राल्फ गिब्सन यांच्या संकेतस्थळावर गॅलरी तसेच आर्काइव्ह १ मधे ब्लॅक सिरीजमधे फार सुंदर कृष्णधवल फोटो आहेत.
परांजपेसाहेब अजुन फोटो येउ द्या व आम्हाला जरा त्यांचा अर्थ देखील खुलवून सांगा.
प्रतिक्रिया
17 Apr 2011 - 2:28 pm | रामदास
मिपावर स्वागत. सुंदर फोटो .आवडले.
17 Apr 2011 - 2:59 pm | नरेशकुमार
आज रविवार, मस्त दुपार, त्यात हे फोटोज्
पाहुन मस्त पडुन द्यावेसे वाटले.
छान आहेत फोटो.
18 Apr 2011 - 4:02 pm | sagarparadkar
एका जुन्या कवितेच्या ओळी आठवल्या (चूक भूल देणे घेणे) :
उंच पाटी पालथी उशाखाली,
हात दोन्ही ते आडवे कपाळी,
फरसबंदीची शेज गार गार,
शांत घोरत पहुडला वर मजूर
कवि कोण हे आता लक्षात नाही :(
17 Apr 2011 - 2:57 pm | लवंगी
श्वेत-धवल फोटो छान आहेत
17 Apr 2011 - 3:13 pm | प्रास
>>>श्वेत-धवल????<<<
अच्छा अच्छा, "कृष्ण-धवल" म्हणायचंय तुम्हाला.....
आधी माझे डोळेच दिपले एकदम.......
:-)
अवांतर - बाकी फोटो भारीयेत हं......
:-)
17 Apr 2011 - 3:20 pm | लवंगी
रविवार दुपारच जेवण अमळ जास्त झालय...
17 Apr 2011 - 4:35 pm | ५० फक्त
फोटो अतिशय सुंदर आले आहेत, एक विचारतो,
फोटो कॅमेरातच असे काढलेत की नंतर फोटोशॉप मध्ये केलं आहे, पण जे काही असो, फोटो, विषय अगदि मस्त.
17 Apr 2011 - 4:45 pm | श्रावण मोडक
कृष्ण-धवलची मजा बऱ्याच काळाने अनुभवता आली.
17 Apr 2011 - 5:04 pm | गणपा
कृष्ण-धवल असल्याने फोटोंतल सौंदर्य जास्तच खुलुन दिसतय.
17 Apr 2011 - 6:13 pm | सूर्य
सुंदर फोटो आणि विषय. अजुन येउद्यात.
- सूर्य.
18 Apr 2011 - 1:46 pm | सहज
प्रत्येक फोटोबद्दल काही वर्णन, रसग्रहण आले असते तर फोटोचा लुत्फ लुटता आला असता. कृपया सायकलच्या चित्रातल्या वापराबद्दल काहीतरी सांगा.
तोवर ह्या निमित्ताने अमेरिकन फोटोग्राफर 'राल्फ गिब्सन'चे नाव घेतो. त्यांचा एक फोटो इथे दिल्यावाचुन रहावत नाही.
अर्धवट सूर्यप्रकाश पडलेल्या जिन्याचा फोटो आहे, पण मला यात 'थडगे व वर जाणे' काय मस्त चित्रीत झालेले वाटते. नेहमीच्या वस्तुंमधुन अशी कला बाहेर आणणे लाजबाव!
राल्फ गिब्सन यांच्या संकेतस्थळावर गॅलरी तसेच आर्काइव्ह १ मधे ब्लॅक सिरीजमधे फार सुंदर कृष्णधवल फोटो आहेत.
परांजपेसाहेब अजुन फोटो येउ द्या व आम्हाला जरा त्यांचा अर्थ देखील खुलवून सांगा.
18 Apr 2011 - 11:37 am | प्यारे१
ढासु फटु...!!!
मनात आलेला प्रश्न :मधुबाला कृष्ण धवल प्रकाशचित्रांमुळे जास्त सुंदर दिसत असेल का?
हम आपके है कौन मध्ये शीर्षक गीतामध्ये माधुरी सुद्धा अम्मळ सुंदर दिसत होती.
18 Apr 2011 - 11:40 am | मराठमोळा
मस्तच.... :)
18 Apr 2011 - 2:02 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या फोटोंबद्दल काही समजले नाही. माफी असावी.
18 Apr 2011 - 2:56 pm | गणेशा
४था फोटोच आवडला .. सायकलचा ..