तुम्ही गप्प (शांत) रहायचे कधी ठरवता. ?

नरेशकुमार's picture
नरेशकुमार in काथ्याकूट
15 Apr 2011 - 10:54 am
गाभा: 

आपल्या सगळ्याना आयुश्यात कधितरी गप्प राहूशी वाटते.
लहान पनि आईचा मार खाल्यावर, मोठेपन कमी मार्क मिळाल्यावर, जॉबमध्ये बॉसने रागवल्यावर, बिजनेस लॉस झाल्यावर, लग्न झाल्यावर बायकोशी भांडन झाल्यावर, पोरे मनाविरुद्ध वागायला लागल्यावर. आजुबाजुला मनाविरुद्ध काही होत आहे असे वाटु लागले तर
अश्या वेगवेगळ्या विचित्र परिस्थितित मनुक्ष्य गप्प (म्हनजे शांत) रहाने पसंत करतो.

माझे उदाहरन देतो,
लग्ना अगोदरचे काही विशेश आठवत नाही,
लग्न झाल्यावर एकदा बायकोसाठि काही गिफ्ट घेन्यासाठि माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते.
तेव्हा मला खुप वाईट वाटले होते, म्हनुन मि ३-४ दिवस गप्प होतो. कामवर पन जास्त कोनाशी बोललो पन नव्हतो. खाने पन थोडे कमी झाले होते.
सुदैवाने माझे अप्रॅझल झाले आनि मला चांगला ईन्सेन्टिव्ह मिळाला. आनि माझे स्व्प्न पुरे झाले.
आनि मि पुन्हा मनमोकळे पनाने बोलु लागलो.

बायकोने एखादी भेट घेन्याचे ठरविल्यानंतर जर ति घेता येत नसेल मला खुप वाईट वाटते. मग मि काही काळासाठि गप्प (शांत) बसतो.

तर मिपाकर मायबाप तुमि कोनकोनत्या परिस्थितित गप्प राहन्याचा ऑप्शन निवडता.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अत्यंत खेळिमेळित चौकशि करन्यासाठि हि पोस्ट काढलेली आहे.
कोन्त्याही मायबाप मिपाकराची चेष्टा करन्याचा विचार नाही.
तरी पन संपादकांना काही चुकिचे वाटत असेल तर मोठे मन करुन ही पोस्ट उडवुन टाकवी.

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

15 Apr 2011 - 11:08 am | कानडाऊ योगेशु

गप्प राहायचे ठरवले आहे.

तिमा's picture

15 Apr 2011 - 7:49 pm | तिमा

वाईट शुद्धलेखन बघितले की मी गप्प रहातो.

रामपुरी's picture

16 Apr 2011 - 5:12 am | रामपुरी

:) "वाईट शुद्धलेखन " म्हणण्यापेक्षा "अशुद्धलेखन" का म्हणत नाही? हे म्हणजे "Today Night" सारखं वाटतय. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Apr 2011 - 9:18 am | विश्वनाथ मेहेंदळे

याला "विषाला विषाचा उतारा" म्हणतात.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

15 Apr 2011 - 10:38 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

जेव्हा समोरच्या व्यक्तिची आपलं बोलणं समजण्याची मानसिक किंवा बौद्धिक किंवा भावनिक capacity च नसते तेव्ह मी गप्प बसते.
मानसिक दृष्ट्या अक्षम समोरचा : डोक्याचा भागच नाही...ज्यांची विचारशक्तिच काम करत नाही...किंबहुना ती नसतेच.
बौद्धिक दृष्ट्या अक्षम समोरचा : बुद्धीकडुन अधु..
भावनिक दृष्ट्या अक्षम समोरचा : धाय मोकलुन रडणार्‍या... त्रागा करणार्‍या..अकारण मस्तकात राख घालुन घेणार्‍या किंवा दुसर्‍याला घालायला लावणार्‍या व्यक्ती. थोडक्यात ईमोशनल अत्याचार करणार्‍या व्यक्ति.
यांच्या बाबतीत कशाला उगाच वार्‍याशी भांडत बसायचं?

अजुन एका बाबतीम मी गप्प बसते.
जेव्हा समोरचा अतिशय ज्ञानी आहे... एखाद्या विषयाचं जबरदस्त knowledge आहे त्या व्यक्तीजवळ्..आणि आपल्याला त्यातलं फारसं काहि कळत नाही... हे लक्षात आलं ...कि हुज्जत / वाद / युक्तिवाद हे सगळं (आणि मुग) गिळुन गप्प रहाते.
ऐकोनी ज्ञान वृद्धिंगत करावे!

आपली चुक आहे आणि आपण "गावलोय" म्हणजे आपली चुक लक्षात आलिये आणि ती स्विकारण्या वाचुन पर्याय नाही. अनुषंगानं येणारे जोडे / टोमणे घेणे क्रमप्राप्त आहे. अशा वेळेस have to face it या धोरणाने गप्प बसते.
:)

म्हणजे तु बोलतच नाहीस म्हण की ;)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

17 Apr 2011 - 5:54 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मौनम सर्वार्थ साध.... अस काहितरी म्हणतात ना! :)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

15 Apr 2011 - 10:42 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

आणखी एक.... जेव्हा समोरच्याच्या कानाखाली काढावी वाटते.... आणि ते शक्य नसतं तेव्हा कमालीची शांत होते...आणि 'गप्पता" स्विकारते.

माझ्याकडे पुरेसे पैसे असतात तेंव्हा मी कोणतेही गिफ्ट (दुसर्‍यांसाठी) खरेदी करू शकते याची खात्री दुसर्‍यास असते तेंव्हा मी गप्प राहणे पसंत करते.;)
मुले मैदानावर खेळत असताना सगळ्या आया (आईचे अनेकवचन) गप्पा मारत उभ्या असतात. त्यातली एक बुवीण ही काहीही सांगितले असता सातमजली हसते. उदा. आज आमचा मुलगा असे विनोदी बोलला याला जसे आपण हसू तसेच, आमची मुलगी मागच्या अठवड्यात तापाने आजारी होती यावर ती खदाखदा हसते. आजकाल मुलांना होमवर्क कमी/जास्त येतय. ही हा हा हा.... असे दोन चारदा झाले की हळूहळू गप्प होणारी एकेक आई काढता पाय घेते.

आत्मशून्य's picture

15 Apr 2011 - 11:54 pm | आत्मशून्य

:)

अनेक प्रसंगी शब्द गिळून मुकाट बसले असते तर ..... :(
हा "तर" खूप सतावतो.
आताशा गप्प गप्प च असते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Apr 2011 - 4:18 pm | निनाद मुक्काम प...

बायको रागावली की

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2011 - 10:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

*मनाविरुद्ध गोष्ट घडल्यावर आपलं कोणतंही स्पष्टीकरण पुरेसे ठरणार नाही असे जेव्हा वाटते, तेव्हा मी गप्प बसतो.

*माझा एखादा विचार कोणाला मान्य नसतो, पण जेव्हा माझ्या मुद्याशी येऊन कोणाला थांबावे लागते तेव्हा मी गप्प बसतो.

*मनात विचारांचे खूपच काहूर माजते तेव्हा मी गप्प बसतो.

*विनाकारण कोणी एखाद्या विचाराला 'आक्षेपार्ह' 'हास्यास्पद' असे म्हटले की, मी गप्प बसतो.

* आयपीएल मधे तरी 'सच्याला' थेट जवळून पाहू असं जेव्हा पोरगं म्हणतं तेव्हा मी जायला जमत नाही, म्हणून मी गप्प बसतो.

* पुस्तक वाचत असतांना, कामात असतांना, किंवा माझा अजिबात काहीच ऐकायचा मूड नसतांना बायको उगाच माहेरच्या मोठेपणाच्या गोष्टी काढून बोलत असते तेव्हा मी गप्प बसतो.

-दिलीप बिरुटे

नरेशकुमार's picture

17 Apr 2011 - 1:30 pm | नरेशकुमार

प्रतिसाद देनार्‍या सगळ्यांना हार्दिक आभार.

अपमान झाल्यावर

अपमान झाल्यावर