पत्रमैत्री

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
11 Apr 2011 - 9:15 pm
गाभा: 

आजच्या बर्‍याच तरुणाना पत्रे (पोस्टकार्ड, पाकिटे, पत्रिका, मनी आर्डरी) काय असतात, ती कशी असतात्, ती पत्रे कोण लिहित आणि त्याच बरोबर त्या पत्रांचा आणि ती पत्रे आणणार्‍या डाकमित्राची वाट कशी पाहिली जात याची कल्पना ही आजकाळच्या बर्‍याच लोकाना नसेल.

कोणे एके काळी नातेवाईक, मित्र आणि आतेष्टांसाठी पत्र आणि त्याचे आदानप्रदान कराणारा पोस्ट्मन ( डाकमित्र) याचे स्थान अबाधित असे होते.

काळाच्या महिमा असा की पत्राची जागा संगणकीय पत्रांनी, मोबाईलच्या लघुसंदेशा नी पटकावली.

तरी कधीतरी एखादे पत्र यावे, आपल्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली कळवावी, वाट पहावी असे कोणाला कदाचित वाटतही असेल.

यासर्व लोकासाठी http://www.postcrossing.com/ असे संकेतस्थळ माझ्या नजरेत आले आहे.

यामध्ये आपण सभासदत्व घ्यावे, त्यानंतर आपणास एक पत्ता मिळेल. त्या पत्यावर आपण पत्र पाठवावे, अजून कोणाला आपला पत्ता मिळेल त्या व्यक्तिकडुन आपणास पत्र मिळेल अशा प्रकारची व्यवस्था येथे अभिप्रेत आहे.

मला ही कल्पना आवडली.

असो आपणासही ही कल्पना आवडली तर आपण अवश्य या पत्रमैत्री उपक्रमात सहभागी व्हा.

जाता जाता एक सूचवावेसे वाटते, या उन्हाळी सुट्टीत नक्कीच आपल्या पुतण्यांना, भाच्यांना, आपल्या जुन्या मित्रांना पत्र पाठवा.

आपल्या जुन्या ऋणानुबंधाला आणि नवीन उपक्रमासाठी यापेक्षा चांगला मार्ग कोणता तो असेल?

प्रतिक्रिया

ज्ञानेश...'s picture

11 Apr 2011 - 9:30 pm | ज्ञानेश...

तुम्ही 'लोकसत्ता' हे वॄत्तपत्र (त्यातल्या 'वेबजगत' या सदरासह) वाचता हे कळले. ;)
तरीही माहितीबद्दल आभार !

(पत्री सरकार)
-ज्ञानेश.

कलंत्री's picture

11 Apr 2011 - 9:35 pm | कलंत्री

या लेखातील जी काही उणीव राहीलेली होती ती तुमच्या उल्लेखाने भरुन निघाली. धन्यवाद.

चिरोटा's picture

12 Apr 2011 - 4:58 pm | चिरोटा

छान प्रकल्प.१५ पैशाचे पोस्टकार्ड,३५ पैशाचे आंतर्देशीय लिहून वर्षे लोटली.पूर्वी पेन फ्रेन्ड्स प्रकार असायचा.हा तसाच प्रकार वाटतोय.

अविनाशकुलकर्णी's picture

12 Apr 2011 - 8:25 pm | अविनाशकुलकर्णी

पेन फ्रेन्ड्स.... अडल्ट पेन फ्रेन्ड्स प्रकार पण आता मावळला..आता फ्रेंड फाईडर प्रकार आला नेट वर