सावरकरांचे , हिंदु पदपादशाही आणि इतर

मन१'s picture
मन१ in काथ्याकूट
3 Apr 2011 - 1:58 pm
गाभा: 

नमस्कार.
नुकतच स्वातंत्र्यवीरांचं "सहा सोनेरी पाने" जालावरुन उतरवुन घेउन वाचलं.
हे "सहा सोनेरी पाने" म्हणजे म्हणजे भारताचा इतिहास नव्हे तर इतिहासाची समिक्षा आहे. इतिहासाबद्दलची सावरकरांची कमेंट्री आहे.(जसं Discovery Of India नेहरुंच्या दृष्टिकोनातल्या प्राचीन ते अर्वाचीन भारतीय घटना आणि समाज मानसाबद्दलच मत -संग्रह होय.)
इतिहासाबद्दल भाष्य करताना ह्या पुस्तकात त्यांनी बर्‍याचदा " हिंदु पदपादशाही" ह्या त्यांच्याच पुस्तकाचा उल्लेख केलाय. पण हे पुस्तक काही मला जालावर सापडलं नाही. अगदि savarkar.org वर सुद्धा नाही.
कुणी अजुन एखादं जालिय ठिकाण सुचवु शकेल काय ह्या पुस्तकासाठी ?
किंवा कुणाकडे विद्युत आवृत्ती (soft copy) असेल तर पुरवु शकेल काय?
आजन्म आभारी राहिन.

--मनोबा.

प्रतिक्रिया

पंगा's picture

3 Apr 2011 - 2:06 pm | पंगा

हे "सहा सोनेरी पाने" म्हणजे म्हणजे भारताचा इतिहास नव्हे तर इतिहासाची समिक्षा आहे. इतिहासाबद्दलची सावरकरांची कमेंट्री आहे.

इतिहासाबद्दलचे कोणतेही लेखन ही लेखकाने स्वतःच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची समीक्षाच नसते काय?

चिंतामणी's picture

3 Apr 2011 - 3:08 pm | चिंतामणी

http://www.savarkarsmarak.com/download.php

अकांउट उघडा येथे. आणि " हिंदु पदपादशाही" भाग १ व २ डाउनलोड करून घ्या.

या साइटवर स्वा. सावरकरांची अनेक पुस्तके डाउनलोडींग साठी उपलब्ध आहेत.

दिलेला दुवा अतिशय उत्तम आणि माहितीपुर्ण आहे. दुव्यावर रजिस्टर केलं आहे. माहिती डालो करतोय.

पुन्हा एकदा धन्यवाद.

- पिंगू

मन१'s picture

3 Apr 2011 - 4:08 pm | मन१

भन्नाट दुवा आहे. बरच काही उतरवुन घेतलय. मनः पूर्वक आभार.
Thank you so much चिंतामणी.
जोसेफ मॅझिनीचं चरित्रही मिळालं.

@पंगा:- तुमचं म्हणणं रास्त आहे. सध्या उतरवुन घेतलेलं वाचण्यात व्यस्त आहे.

संपादक-- माझं काम झालय. हा धागा तात्कालिक वाटल्यास उडवला तरी आता हरकत नाही.

---मनोबा.

अविनाशकुलकर्णी's picture

3 Apr 2011 - 4:36 pm | अविनाशकुलकर्णी

धन्यवाद चिंतामणी

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Apr 2011 - 5:02 pm | निनाद मुक्काम प...

हा धागा उडवण्याची गरज मला वाटत नाही .
कारण चिंतामणी ह्यांनी दिलेलं दुवे भन्नाट आहेत .व माझ्या सारख्या अनेक मिपाकरांना ह्या निमित्ताने ही माहिती वाचायला मिळेल .
मन व चिंतामणी ह्यांचे विशेष आभार
ह्यांच्या प्रश्न व उत्तरामुळे हा खजिना गवसला .

गणपा's picture

4 Apr 2011 - 7:21 pm | गणपा

सहमत

धन्यु.

हा खजीना मुक्त हस्ताने सर्वांनी लूटावा हिच इच्छा आहे.

मेघवेडा's picture

4 Apr 2011 - 7:16 pm | मेघवेडा

जबरदस्त दुवा!

पिलीयन रायडर's picture

5 Apr 2011 - 12:44 pm | पिलीयन रायडर

हाच दुवा द्यायला आले होते.. आणि इतरांनी चिंतामणी ह्यांना दिलेल्या दुवा पाहिल्या.... :)
सावरकरांशी संबन्धित सर्व दुवे इथे एकत्र करता येतील काय??

मन१'s picture

20 Nov 2011 - 10:54 am | मन१

अधिकाधिक सदस्यांना पुन्हापुन्हा हा धागा दिसावा हा उद्देश आहे.