मोहाली उपान्त्य सामना आणि मनमोहन सरकारची लाचारी..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
29 Mar 2011 - 11:49 am
गाभा: 

चेंडुफळीच्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक हा सामना उद्या मोहालीत होणार आहे त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. दोन्हीही संघ आयसीसीचे सभासद असल्यामुळे व हा सामना विश्वचषकातीलच एक असल्यामुळे त्याला आमचा विरोध नाही व तो करण्याचे काही कारणही नाही. आमचा मुद्दा वेगळाच आहे.

भारतासारख्या सार्वभौम देशाच्या पंतप्रधानांनी पाकच्या राष्ट्रप्रमुखांना हा सामना पाहण्याकरता मोहालीत येण्याचे जे प्रेमाने आणि उमाळ्याने आमंत्रण दिले आहे त्याबद्दल आम्ही अतीतीव्र शब्दात आमचा निषेध नोंदवतो. आमच्या मते भारतीय पंतप्रधानांचे हे अत्यंत लाचारीचे वर्तन आहे.

भारताच्या या निमंत्रणावर पाकने म्हणे अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारताची हद्द ओलांडून चुकून पाकिस्तानात घुसलेल्या गोपालदास नामक (चूभूदेघे) एक इसमाला पाकने त्यांच्या कैदेतून तात्काळ मुक्त केले आहे...!

यावर आम्ही भोळसट भारतीयांनी खुश व्हावे आणि मनमोहन सरकारची पाठ थोपटावी अशी सरकारची अपेक्षा आहे काय..?

सकारात्मकच जर प्रतिसाद द्यायचा असेल तर मग पाकने कसाबबद्दलची सगळी माहिती तात्काळ का नाही उपलब्ध करून दिली..? खंडणीची दहशत, गँगवॉर या सारखी कारस्थाने करून गेली अनेक वर्षे डोकेदुखी ठरलेल्या व सध्या पाकिस्तानात लपलेल्या दाऊद इब्राहिमला रातोरात भारताच्या हवाली का नाही केले..?

आम्ही असा अजून किती काळ लाचारीच्या मित्रत्वाचा हात पाकपुढे पसरणार आहोत? आणि का? कशासाठी..?

पाकच्या पंतप्रधानांना मोहालीत मारे प्रेमाचे आणि मैत्रीचे आमंत्रण देणारे पंतप्रधान मनमोहनसिंग मुंबै हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या संदीप उन्नीकृष्णनच्या घरी सांत्वनासाठी कधी गेले होते का हो..?

मुंबै सी एस टी स्थानकात, गेटवेला रक्ताची होळी खेळणार्‍या पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांपुढे ही लाचारी का..?

परंतु ज्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती एका इटालीयन मूळ असलेल्या स्त्रीकडून लीलया ठरवले जातात, स्थापित केले जातात त्या देशाला स्वाभिमान तरी का असावा..?

असो..

-- तात्या अभ्यंकर.

--
आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे
रिपुदमनाचा आईभवानी आम्हाला वर दे..!
(चित्रपट २२ जून १८९७)

प्रतिक्रिया

नन्दादीप's picture

29 Mar 2011 - 12:03 pm | नन्दादीप

सहमत...

नेत्रेश's picture

29 Mar 2011 - 12:05 pm | नेत्रेश

तात्यांच्या भावनांशी सहमत.

पण त्या ईटालियन स्त्रिला इतके ताकदवान कुणी बनविले? जगातिल सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रमुख ठरवण्याचे / होण्याचे अधीकार कुणी दिले? त्या देशातील लोकांनिच ना? आपणच ना?

पाकिस्तान बरोबर सगळेच संबंध संपऊन कोणते प्रश्ण सुटणार आहेत. कधीतरी बोलणी कराविच लागतील. ती लाचारी नाही, राजकारण आहे. चला, या निमित्ताने तीथल्या तुरुंगात सडणारा एक भारतीय तरी सुटला.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Mar 2011 - 12:10 pm | llपुण्याचे पेशवेll

तात्याशी सहमत आहे. यालाच शुद्ध लाळघोटेपणा म्हणतात. अर्थात त्याचेही समर्थन करणारे भेटतील मिपावर.

सहमत आहे .. म्हणुनंच म्हणतो ..

एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव !!!

प्रीत-मोहर's picture

29 Mar 2011 - 6:07 pm | प्रीत-मोहर

+१
पुपे व टारझन शी सहमत

नन्दादीप's picture

29 Mar 2011 - 12:10 pm | नन्दादीप

संबंध सुधारण्यासाठी सामना बरोबरीत नाही सोडवला म्हणजे मिळवली...!!!

एक वडा दोन पाव ... पाकिस्तान .......................!!!

एक वडा दोन पाव ... पाकिस्तान .......................!!!

एक वडा दोन पाव ... पाकिस्तान .......................!!!

(कशाला उगाच आपली जीभ विटाळून घ्यायची........)........ :wink:

......सूज्ञास अधिक सांगणे नलगे.................

एक वडा दोन पाव लालालाला .. भाडखाव् ..

हे कसं वाटतं .. भाडखाव बरंय उच्चारायला , त्या लालालाला पेक्षा :) शिवाय लालालाला .. टाकल्यामुळे ह्या स्लोगन ला एक टेंपो प्राप्त होतो.आधिक प्रकाश जाणकार टाकतील

- इस्तेमाल-बुल-सक

सुहास..'s picture

29 Mar 2011 - 12:31 pm | सुहास..

यावर मला आमच्या देवाने सेन्टेस फार आवडले

" त्या कसाब ला पण पास द्या "

__/\__

नतमस्तक !!

सुधीर१३७'s picture

29 Mar 2011 - 12:51 pm | सुधीर१३७

..... आमचे तर म्हणणे आहे, त्याला यानिमित्ताने सोडूनच द्या......

....म्हणजे निदान त्याच्या सुरक्षेचा खर्च तरी वाचेल आणि बिच्चारा परत आप्ल्या भाऊबंदात जाऊन पुढचे उद्योग करायला मोकळा होईल,

उगा २६/११ मध्ये मेलेल्यांच्या नावाने का गळे काढताय? ...... :cry:

पुढचा २६/११ कधी घडेल याची वाट पहात रहा, म्ह्न्जे परत मेणबत्त्या लावायला मोकळे........... :wink: :tongue:

मन१'s picture

29 Mar 2011 - 12:49 pm | मन१

उन्नी कृष्णन वगैरे तर थोर आहेतच हो. माझ्यासारख्या सामान्यांसाठी त्यांनी जीव दिलाय हेही खरच.
पण आपल्या शेजारच्यांचा नीचपणाचा कळस, किळसवाणा प्रकार आठवत नाहिये का?
कारगिल युद्धात "सौरभ कालिया" ह्या भारतीय सैनिकाला पकडल्यावर, त्यांनी अटक केली नाही. थेट ठारही मारलं नाही.
मग काय केलं?
--त्यांनी त्याचं गुप्तांग वगैरे कापुन ,हाल्हाल करुन जीव घेतला. अगदि छत्रपती संभाजींचे दाखवलं गेलं तसं क्रौर्य!
कातडी सोल्वटाणे, डोळे फोडणे , जीभ हासडणे वगैरे.

आणि तेही कधी? "आमचा कारगिल मधील घटनांशी संबंध नाही" असं चढ्या आवाजात पाक सरकार बोंबलत असताना.
आपण त्यांच्या कुठल्याही सैनिकाला कधीच असं वागवलं नाहिये. शत्रु म्हणुन समोर आला तर थेट त्याचा जीव लढाइत्,चक्मकित गेलाही असेल, पण असला विकृत प्रकार आम्ही कधीही केलेला नाही.

इतकच नाही, आपण त्यांचे अनेकानेक युद्धकैदी १९७१च्या युद्धानंतर सोडलेत, पण आपले शेकडो सैनिक त्यांच्यकडे तब्बल चळिस वर्षाहुनही अधिक काळ खितपत पडलेत. त्यांच्या "शरीरा"सोबत काय काय होतय हे ईश्वरच जाणो.
कल्पना करा, ४० वर्ष, जगापासुन तोडुन तुम्हाला असं एकटं ,एकाकी कोंदुन ठेवलं तर??
तुमचे स्वतःचे जवळ्चे नातलग असेच ४०एक वर्ष, तुम्हाला सोडुन हलाखित गेले तर?
घस तरी जाइल काय घशाखाली?

माफ करा संपादक, फारसं प्रक्षोभक लिहिणं टाळायचं ठरवलं होतं. पण मी काही कुठल्याच घटनांची आतिशयोक्त वर्णनं केलेली नाहित. सरकारी /सरकारमान्य माध्यमातुन आलेली माहिती जशी च्या तशी ठेवतोय.

ह्यावर उत्तर म्हणुन काही समन्वयवादी भारतही कसं (शक्य तेवढं) चोख प्रत्त्युत्तर देतोय हे सांगतात. किंवा मागे एका लेखात मिपावरतीच धनंजय की थत्ते ह्यांनी भारतही योग्य पावले उचलतोय (राष्ट्रिय स्वार्थासाठी)पण सत्विकपणाचा आव आणतोय(जो आणायलाच पाहिजे) असं एका लेखात सूचित केलं होतं. (आणि आपल्या बौद्धिक आणि वैचारिक कक्षेबाहेरही जग असु शकतं असं वाटायला लागलं होतं.)
हे खरच असेल तर मला बरं वाटेल , नक्कीच. पण मग युद्ध जिंकुनही आमच्या सैनिकांना सोडवण्यात आम्ही का अपयशी ठरतोय हे कुणी सांगेल का? मुद्दे खूप आहेत पण सध्या इतक्यावरच थांबतो.
शक्य तितकं ह्यावर गप्प बसणच पसंत करेन. भावनिक मुद्द्यावर फार जास्त तर्कट चर्चा झेलायच्या स्थितीत मी नाही.

तुमच्या भावनांशी सहमत.
(पाकचं हे एवढसं Goddwill gesture पुरेसं नाही. )

अवंतरः- "अमन की आशा " वाले बिन्डोक आहेत की लाचार की स्वार्थांध धंदेवाले आहेत की खरोखर दीर्घ मुदतीचा उपाय योजणारे (मैत्री करणारे) बुद्धिमंत आहेत हे मला कळत नाही.

--मनोबा

सुधीर१३७'s picture

29 Mar 2011 - 12:53 pm | सुधीर१३७

+१

नितिन थत्ते's picture

29 Mar 2011 - 2:06 pm | नितिन थत्ते

>>ह्यावर उत्तर म्हणुन काही समन्वयवादी भारतही कसं (शक्य तेवढं) चोख प्रत्त्युत्तर देतोय हे सांगतात. किंवा मागे एका लेखात मिपावरतीच धनंजय की थत्ते ह्यांनी भारतही योग्य पावले उचलतोय (राष्ट्रिय स्वार्थासाठी)पण सत्विकपणाचा आव आणतोय(जो आणायलाच पाहिजे) असं एका लेखात सूचित केलं होतं.

धनंजय यांनी येथे अशी माहिती दिली होती.

मनीषा's picture

29 Mar 2011 - 2:23 pm | मनीषा

******

मुसलमानी विचारसरणीच क्रूरपणे वागण्याची आणि वर थयथयाट करण्याची होती, आहे आणि राहील...आपल्या "सरकारला" आपल्याच जवानाची चिंता नाही आणि फक्त राजकारणातच रस आहे त्यामळे त्यांचे अतिरेकी सोडून देऊ आणि आपले युद्धबंदी, सामान्य नागरिक वगैरे तिथेच सडत ठेऊ असा विचार आहे एकंदरीत.

तरी इथेही लोकांना पाकड्यांचा प्रचंड उमाळा आलेला पहिला आहेत....अर्थात त्यात नवल ते काय म्हणा!!

खरं तर मुसलमानी विचारसरणी अशी आहे कि नाही हे माहित नाही.....नसावी.
आपल्याकडेही बरेच देशबांधव मुसलमान आहेत आणि कट्टर देशभक्तही आहेत.
पाकिस्तानचे सरकार मात्र्..........जाऊ दे! माझ्यालेखी तो देश अस्तित्वात नाही.;)

मन१'s picture

30 Mar 2011 - 10:16 am | मन१

"I don't hate in the plural." --P.G. Wodehouse इतकच लक्षात असु द्या. कुणाचा द्वेष करताना सार्वत्रीकरण करणं शहाणपणाचं ठरणर नाही.
माझी तक्रर ही मुख्यतः मवाळ/बोटचेप्या भारत सरकारच्या भूमिकेवर आहे. पाकच्या जेवघेण्ञ अजुन काही किस्से म्हणजे :-
३०डिसेम्बर १९९९ एक विमान अपहरण ङ्हडातं आणि मौलाना मसुद अझर नावाचा मनुष्य मुक्त होतो. हा कोण ठावुक आहे?
भारतीय रस्त्यांवर शेकडो सैनिक व नागरिकांचे बळी घेत असताना ह्याला अटक झाली. ह्याला अटक भारतात झाली. आज हा पाकिस्तानात राहतोय्.जन्म, पालनपोषण वगैरे तिकडेच होतं ह्याचं. आणि तरीही, धडाधडित सगळ्या जगासमोर हे विमान घेउन जातानाही पाक सरकार म्हणतं "आमचा संबंध नाही". आमचा माणुस दहशतवादी/घुसखोर नाही वगैरे.
हा घुसखोर नाही , तर मग काय आमच्या लष्करानं ह्याला इस्लामाबद किंवा कराचिच्या रस्त्यावरुन उचलुन आणला काय . सरळ सरळ आमच्या भागात घुसुन आमच्या सैन्यावर आणी नागरिकांवर हल्ले करतोय तो.
हा सतत पी टीव्हीवर दिसतो. ह्यानच तिकडं जाउन लष्कर ए तोयबा, जैश च्या मुहम्मदच्या घातक कारवायांना पाठबळ दिलं. ह्यांनीच भारतात शेकडो स्फोट केलेत, त्यात कित्येक भारतीय मुस्लिमही मारले गेले, हल्ल्याचे बळी म्हणुन किंवा हल्लेखोरांशी लढताना(गुजरात्,अक्षरधाम मंदिर,२००२)
पुढील वर्षात कुठे आणि किती हल्ले व्हायच्या मार्गावर आहेत हे आमच्या पंतप्रधानांना ठाउक नाही. हल्ले होणारच नाहित असं ते ठामपणं म्हणत नाहित.सततच्या स्फोटांमुळ इथं कानठळ्या बसुन सगळे बहिरे झाले असावेत.

बाकी विचारवंत निवांत आहेत, हॅ हॅ हॅ करताहेत, कारण धोका तर आम्हा सामान्य भारतीयांच्या जीवाला आहे.

--मनोबा.

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 11:49 am | वपाडाव

बाकी विचारवंत निवांत आहेत, हॅ हॅ हॅ करताहेत, कारण धोका तर आम्हा सामान्य भारतीयांच्या जीवाला आहे.

ह्या वरुन बुधवार (A Wednesday) चित्रपतातील एक ताकदीचा संवाद आठवला...

नितिन थत्ते's picture

30 Mar 2011 - 11:54 am | नितिन थत्ते

>>बाकी विचारवंत निवांत आहेत, हॅ हॅ हॅ करताहेत, कारण धोका तर आम्हा सामान्य भारतीयांच्या जीवाला आहे.

पुन्हा एकदा हॅ हॅ हॅ*. तुमच्या जीवाला आमच्या जीवापेक्षा जास्त पेश्शल धोका आहे हे वाचून ड्वाले पाणाव्ले.

*या धाग्यावरील प्रतिसादात मीच फक्त हॅ हॅ हॅ असा प्रतिसाद दिला असल्याने वरील वाक्य मला उद्देशून आहे असे समजून हा प्रतिसाद दिला आहे.

असताना मला हॅ हॅ हॅ करता येत नाही. कुणाच्या जीवाला कुणा एकापेक्षा जास्त धोका आहे, असं मी कुठही म्हटलेलं नाही.
हॅ हॅ हॅ करत डोळे कसे पाणावत असतील बुवा?

राहता राहिलं मुद्द्यांचं:-
ह्याच धाग्यात खाली नगरीनिरंजन आणि गगनविहारी ह्यांच्य चर्चेत मला जे मुद्दे मांडायचे होते(आणि मांडायला जमले नसावेत) ते आलेले आहेतच. एकदा अवश्य घाला नजरेखालुन.

--मनोबा.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Mar 2011 - 12:18 pm | llपुण्याचे पेशवेll

मुसलमानी विचारसरणीच क्रूरपणे वागण्याची आणि वर थयथयाट करण्याची होती, आहे आणि राहील
सहमत आहे ...

पैसा's picture

29 Mar 2011 - 12:58 pm | पैसा

विसोबा, सुहास आणि मन१ यांच्याशी सहमत.

मराठी_माणूस's picture

29 Mar 2011 - 1:02 pm | मराठी_माणूस

आजच्याच पेपर मधे अणा हजारेनीं पीएम च्या बाबतीत रीमोट चा उल्लेख करुन , बोलवता धनी दुसराच असल्याचे सुचीत केले आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7812899.cms

या हल्कट राजकारण्यांना क्रिकेट पासुन लांब ठेवावं अशी इच्छा आहे.
यांच्या संरक्षणासाठी संपुर्ण यंत्रणेवर ताण पडणार तो वेगळाच. जरा कुठे प्रसिद्धी मिळत असलीकी चालले सगळे लाळघोटे.
आधीच सामन्याचं खेळाडुंना का कमी ताण असेल, त्यात हे सगळे **खाउ तेल ओतायला निघालेत.
या सगळ्या राजकारण्यांचा तिव्र निषेध ! निषेध !! निषेध !!!

वेताळ's picture

29 Mar 2011 - 1:22 pm | वेताळ

वरील लेख मला सामना पेपर वाचल्यासारखा वाटला.

स्मिता.'s picture

29 Mar 2011 - 1:41 pm | स्मिता.

तात्यांशी पूर्णपणे सहमत आहे.

भारत-पाक सामना होतोय याला हरकत नाही. या सामन्यात अगदी भारताला हार पत्करायला लागली (तसे होऊच नये पण...) तरी चालतेच, शेवटी तो खेळ आहे(?) आणि त्यात हार-जीत होणारच.
पण या खेळाचा आनंद उपभोगायला त्या पाकप्रमुखाला भारतात बोलावण्याची काय गरज???? वरून मोठ्या तोंडाने बातम्या झोडत आहेत की २६/११ नंतर तिकडून प्रथमच कोणाला बोलावलं जात आहे. बातमी ऐकून डोक्यात तिडीक गेली.

खरं तर आपले सरकार जगासमोर हेच दाखवतोय की आम्ही किती स्वाभिमानशून्य राष्ट्र आहोत.
आणि आपण सामन्य जनता मात्र "निषेध" नोंदवण्याशिवाय आणखी काहिही करू शकत नाही याची कायम खंत वाटते.

नगरीनिरंजन's picture

29 Mar 2011 - 1:53 pm | नगरीनिरंजन

शत्रूवरही प्रेम करा!

महात्मा गांधी की जय!

नितिन थत्ते's picture

29 Mar 2011 - 1:59 pm | नितिन थत्ते

हॅ हॅ हॅ...
चालू द्या !!!!!

मॅचची सुरक्षितता या विषयासाठी समजा दहा पंधरा वेगवेगळ्या पातळीवरच्या उपाययोजना करण्यात येत असतील,

उदा. बाँबशोधक कुत्रे. कमांडो पथक. मेटल डिटेक्टर. इ इ इ.

तर त्यातलीच एक अ‍ॅडिशनल स्टेप म्हणजे पाकच्या राष्ट्रप्रमुखांना जातीने तिथे हजर ठेवणे.

तेवढाच हल्ल्याचा धोका कमी.

इन्शुरन्स आहे तो.

उपरोक्त प्रतिसाद उपरोधक आहे.

वास्तविक पाकराष्ट्रप्रमुखांना खतम करण्यासाठीही मॅचमधे घातपात होऊ शकतोच अशी एक शक्यता राहतेच.

बाय द वे.

यात कोणाही हुतात्म्याचा अवमान करण्याचा हेतू असावा का ? नाही वाटत. कोण पंतप्रधान /नेता उघडपणे असं करेल ?

अशा गोष्टी या आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणाच्या असाव्यात. त्यात खास पाकप्रेम असण्याची शक्यता कमी आहे.

आम्ही आमच्या बाजूने कुठे काही कमी ठेवलं नाही असं आंतरराष्ट्रीय मत बनवण्याचा भाग म्हणून ही गिमिक्स असणार.

युद्ध झालंच तर ते दीर्घकाळ स्वबळावर लढता येत नाही. इतर देशांची प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत कधीना कधी घ्यावी लागतेच. आजपर्यंतची युद्धे साक्षी आहेत.

त्यामुळे काही "दाखवण्याचे" दात चमकते ठेवावे लागत असणार. आपण भारताच्या पंतप्रधानपदी असल्याशिवाय प्रत्यक्ष तो "नजरिया" कळणं कठीण आहे.

मी माझ्या बॉसचा एक विचार कसा चुकीचा आणि इम्प्रॅक्टिकल आहे हे पोटतिडकीने मांडल्यावर माझ्या बॉसने मला सांगितलं होतं :

तू एक ऑफिसर आहेस. तू विचार करताना तुझ्या (उदा) क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटच्या व्ह्यूने बोलतोस.
मी विचार करताना आपल्या बँकेच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड , एटीएम या तिन्ही व्हर्टिकल्सचा विचार करतो.
आपले बॉस बँकेच्या सर्व क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड , एटीएम आणि शिवाय ब्रांचेस, असेट्स, लायेबिलिटीज प्रॉफिट लॉस यांचा विचार करतात.
आपले डायरेक्टर विचार करताना आपली बँकच नव्हे, तर एकूण देशातल्या आणि जगातल्या बँकिंग इन्डस्ट्रीचा विचार करतात.

तेव्हा कदाचित जितके वर जाऊ तितका आपल्याला दिसणारा "व्ह्यू" विस्तारत जात असेल. आपली विचारपद्धती बदलत (बदलावी लागत) असेल.

त्यामुळे या जगापुढे उघड दिसणार्‍या (आणि त्यामुळे कोणाचंही मत "या देशाला स्वाभिमान नाही" असं उघड उघड होऊ शकत असतानाही, ती शक्यता गृहित धरुनही दिल्या गेलेल्या) या निमंत्रण प्रक्रियेत काही खास विचार आहे का याचा विचार व्हायला हवा.

रमताराम's picture

29 Mar 2011 - 4:55 pm | रमताराम

यवडा इचार कशापायी कराचा म्हंतो मी. चार श्यानीसुरती मानसं म्हंत्यात न्ह्वं 'एक वडा दोन पाव... पाकिस्तान भाडखाव'. आपुनबी म्हनावं न् मोकलं व्हावं. म.म. कणेकरबाबा म्हनून ग्येलाय... अर्रर्र त्यो हाय नाय का... म्हनलाय ना का या म्हान देशात दोन इषयातलं आगदी शेंबड्या पोरास्नीबी सम्दं कळतं. पैलं म्हजी किरकेट नि दुसरं राजकारन. त म्हून आपुन कोनीबी काय बी म्हन्लं का 'व्हयं म्हाराजा' म्हन्तो न् गपचीप बस्तो जाह्लं. उगा डोक्याला तरास कशापायं करून घ्याचा वं.

चिगो's picture

30 Mar 2011 - 11:46 am | चिगो

साला सोलिड शॉट आहे हा, गविदा. त्या इन्शुरन्स पॉलिसी बद्दल म्हणतोय मी...

उन्नीकृष्णन चा निरागस चेहरा बघून फार गलबलून येत !!
उन्नीकृष्णन अमर रहे !! जय हिंद !!

मृत्युन्जय's picture

29 Mar 2011 - 2:45 pm | मृत्युन्जय

नाही पण मी काय म्हणतो स्वतः मालकच येणार म्हटल्यावर अतिरेकी कारवायांची शक्यता कमी होते ना? सुरक्षाव्यवस्थेवरचा ताण कमी होइल तेवढाच. गेला बाजार कयानीला पण एक आमंत्रण देउन टाकायचे मग आख्ख्या पोलिसखात्याला सुट्टी जाहीर केली असती तरी चालले असते,

मुस्तफा's picture

29 Mar 2011 - 3:03 pm | मुस्तफा

इस मुल्क मधे अमन आणि शांती असावी यहीच दुवा आहे

वपाडाव's picture

29 Mar 2011 - 6:17 pm | वपाडाव

दुवा किधर है? किधर है दुवा?
मिपाकरांची दिशाभुल करणार्या सदस्याला कोपर्‍यात घेण्यात यावे ही संमंना विनंती...
सगळ्यांनी (संमंसहित) फुल्ल ह. घ्या....
मुस्तफा यांनी मनावर घ्यावे....

नगरीनिरंजन's picture

29 Mar 2011 - 3:18 pm | नगरीनिरंजन

जेव्हा जेव्हा भारताने मैत्रीचा हात पुढे केला आहे किंवा तसा देखावा केला आहे तेव्हा तेव्हा पाकिस्तानने धोकाच दिला आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने काहीही केले नाही. त्यांना काय पडलंय? अमेरिकासुद्धा तोंडदेखला दम भरत असते पाकिस्तानला पण त्यांचेही हात दगडाखाली अडकलेत.
आणि इतराना दाखवायला म्हणून फक्त हे असेल आणि गुपचूप आपण जे करायला पाहिजे ते करत असू तर हे हल्ले आणि स्फोट होतातच कसे? बाकीच्या देशांना बरी गरज पडत नाही असं दाखवत बसायची?
काल बस डिप्लोमसी झाली, आज क्रिकेट डिप्लोमसी आणि उद्या आणखी काही येईल. पुढे काय?
पाकिस्तानकडे अण्वस्त्रे यायच्या आधीच कृती करायला हवी होती. आता त्यांना आंजारत-गोंजारत बसण्याशिवाय पर्याय आहे काय?
भारताने थोडासा रुद्रावतार धारण केला तर धावत येणार्‍या या आंतरराष्ट्रीय समुदायाला इस्त्राईल किंवा रशिया दिसत नाहीत का?

जेव्हा जेव्हा भारताने मैत्रीचा हात पुढे केला आहे किंवा तसा देखावा केला आहे तेव्हा तेव्हा पाकिस्तानने धोकाच दिला आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने काहीही केले नाही.

आणि इतराना दाखवायला म्हणून फक्त हे असेल आणि गुपचूप आपण जे करायला पाहिजे ते करत असू तर हे हल्ले आणि स्फोट होतातच कसे? बाकीच्या देशांना बरी गरज पडत नाही असं दाखवत बसायची?

काल बस डिप्लोमसी झाली, आज क्रिकेट डिप्लोमसी आणि उद्या आणखी काही येईल. पुढे काय?

पाकिस्तानकडे अण्वस्त्रे यायच्या आधीच कृती करायला हवी होती. आता त्यांना आंजारत-गोंजारत बसण्याशिवाय पर्याय आहे काय?

सर्व पार्श्वभूमी पटली. पण शत्रुत्व उघडपणे सतत दर्शवत राहून काय साध्य होणार?
त्यांना सामन्याला न बोलावणे या कृतीतून (किंवा कृतीच्या अभावातून) काय असे अधिकचे फायदे मिळणार आहेत एकूण संबंधांच्या आणि संभाव्य युद्धाच्या/अण्वस्त्रांच्या संदर्भात ?

अण्वस्त्रे यायच्या आत काय कृती करायला "हवी होती"? (पुन्हा इतर राष्ट्रांच्या मदतीने दबावच की आणि काही?)

आता आज रोजी अन्य काय कृती करायला हवी ?

चर्चा पुढे नेण्यासाठी बोलतोय. वादासाठी वाद नव्हे.

नगरीनिरंजन's picture

29 Mar 2011 - 3:41 pm | नगरीनिरंजन

कृती करायला पुष्कळ गोष्टी आहेत.
पोलिस आणि गुप्तचर खात्यात चांगली शस्त्रे, चांगले लोक आणणे.
सैन्यातल्या १०-१२ हजार अधिकार्‍यांच्या रिकाम्या जागा भरणे वगैरे बरीच कामे आहेत जी वर्षानुवर्षे पडून आहेत. या असल्या गिमिक्स करून 'गुड बॉय' म्हणवून घेण्यापेक्षा पावसाळ्याआधी घर शाकारणे चांगले. काहीही गरज नाहीय आंतरराष्ट्रीय गुडविलची. जेवढं आहे ते पुष्कळ आहे आणि जास्तीचं मिळवायला आपली मिडलक्लास बाजारपेठ समर्थ आहे.
पाकिस्तानला अण्वस्त्रे मिळायच्या आधीच इतराना कल्पना होती ना? तेव्हा ही 'गुड बॉय' इमेज वापरता आली का त्यांना थांबवायला? तेव्हाच धाडस करून तो प्रकल्प सबोटॅज केला असता तर काही वर्षांचे आर्थिक निर्बंध सोडता काही फार नुकसान नसते झाले.
पण आपले हे बोटचेपे धोरण. चीनला सुरक्षा समितीचे सदस्यत्व द्या, पाकिस्तानशी चर्चा करा वगैरे.
असो. इथे किंवा कुठेही आपण चर्चा करून *ट काही होत नाही त्यामुळे भावना आवरतो.

पोलिस आणि गुप्तचर खात्यात चांगली शस्त्रे, चांगले लोक आणणे.

शस्त्रांचा मुद्दा एकदम मान्य.

चांगली माणसे म्हणजे एकदमच सब्जेक्टिव्ह झाले.

कुठून आणणार ती? इथे जनतेत आहेत त्यातलेच सैन्यात / पोलीसात भरले जातात. त्यात लाखोंच्या संख्येने भरती होऊनही चांगली माणसे अद्याप का येऊ नयेत?

सैन्यातल्या १०-१२ हजार अधिकार्‍यांच्या रिकाम्या जागा भरणे

उपरोक्त दोन्ही उपाय करणे हे अत्यावश्यक आहे. पण ती "मिनिमम नेसेसिटी" आहे. उपाय नव्हे.

हे सर्व असणे ही योग्य अशी पूर्वतयारी झाली. पण हा काही फायनल उपाय नव्हे. कुठेतरी युद्ध टाळण्याकडे शक्य तेवढ्या मार्गांनी वाटचाल हाच मार्ग उपयोगी पडणार.

उदा. यातले सर्व असूनही अमेरिकेच्या मुख्य न्यूयॉर्क शहरात ट्विन टॉवर भुईसपाट झाले.

नगरीनिरंजन's picture

29 Mar 2011 - 3:59 pm | नगरीनिरंजन

>>यातले सर्व असूनही अमेरिकेच्या मुख्य न्यूयॉर्क शहरात ट्विन टॉवर भुईसपाट झाले
ते एकदाच झालं. आणि अमेरिकेची दादागिरी किती आणि आपली किती? अमेरिकेला आपल्यापेक्षा नक्कीच जास्त शत्रू असले पाहिजेत.
अतिरेक्यांच्या नाड्या अमेरिकेने अशा आवळल्या की परत त्यांना हल्ला करणं शक्य झालं नाही. ते आपल्याला करता आलंय?
मग उगाच संदिग्धपणे ही डिप्लोमसी फक्त दुनियेला दाखवायला किंवा युद्ध टाळायला आहे असे म्हणण्यात काय हशील? छुपं युद्ध तर चालूच आहे ना?
युद्ध टाळायला गंभीरपणे स्वतंत्र चर्चा होऊ द्या. मॅच पाहायला काय बोलावताय? एकदा मैत्री झाली की बोलवू मॅच पाहायला. तो पर्यंत दारात उभं करून बोला.
२६/११ नंतर खरं म्हणजे ताणलेले संबंध नीट होण्यासाठी पाकिस्तानकडून पुढाकार अपेक्षित होता, पण पुन्हा आपणच त्यांना बोलवायचं हे खुपतंच.

गवि's picture

29 Mar 2011 - 4:02 pm | गवि

हं. तथ्य दिसतंय. पटलं.

आत्मशून्य's picture

29 Mar 2011 - 11:11 pm | आत्मशून्य

२६/११ नंतर खरं म्हणजे ताणलेले संबंध नीट होण्यासाठी पाकिस्तानकडून पुढाकार अपेक्षित होता, पण पुन्हा आपणच त्यांना बोलवायचं हे खुपतंच.

एकदम मनातलं बोललात साहेब. पाकचा अध्यक्ष हजर राहणार असेल तर सर्व प्रेक्षकांनी सामन्यावर बहीश्कार टाकावा ....

चिंतामणी's picture

29 Mar 2011 - 11:44 pm | चिंतामणी

२६/११ नंतर खरं म्हणजे ताणलेले संबंध नीट होण्यासाठी पाकिस्तानकडून पुढाकार अपेक्षित होता, पण पुन्हा आपणच त्यांना बोलवायचं हे खुपतंच.

१०० % सहमत.

चिगो's picture

30 Mar 2011 - 11:58 am | चिगो

२६/११ नंतर खरं म्हणजे ताणलेले संबंध नीट होण्यासाठी पाकिस्तानकडून पुढाकार अपेक्षित होता, पण पुन्हा आपणच त्यांना बोलवायचं हे खुपतंच.<<

हे मात्र पटलंय.. काय फायदा आहे आपल्या मैत्रीचा हात पुढे करण्यात? कारगिल, २६/११ झालं तेव्हा मैत्रीखात्यातच (?) होतो ना आपण? स्पष्ट शत्रूत्व असेल तर गाफील तरी नाही राहणार संबंधित.. च्यायला, हात पुढे करुन अवलक्षण..

सुधीर१३७'s picture

30 Mar 2011 - 12:54 pm | सुधीर१३७

>>>>>>>>>>>इथे किंवा कुठेही आपण चर्चा करून *ट काही होत नाही त्यामुळे भावना आवरतो >>>>>>>>

+१ सहमत

गगनविहारी आणि गणपाशी शब्दश: सहमत.
नगरी निरंजनाशीही सहमत. अगोदर प्रतिसाद लिहिला मग वाचले म्हणून पुन्हा संपादित केलेय.

राजकारणी विरहित देश स्थापन करायच्या विचारात असणारा (छत्रसाल)

पाकिस्तानी सरकार जे हल्ले कधीतरी करते तेच काम आपले सरकार रोज करत असते. त्यांनी आपल्यावर रोज केलेले हल्ले कोण बघणार? एवढे रोज चाललेच आहे त्यात अजून एक.
आपल्या शहरांची अवस्था बघुनच सगळे कळते. नेत्यांचे राजवाडे बांधून होतात तर सामान्य जनता दोन खोल्या विकत घेण्यासाठी आयुष्य खर्ची घालते. उन्हातान्हात बसची वाट पहात असलेले लोक आणि त्यांच्यासमोरूनच आपल्या आलिशान मोटारी (एकापेक्षा जास्त संख्येने असलेल्या) फिरवणारे नेत्यांचे नातेवाईक. टोलनाक्यावर यांच्याकडून टोल वसूल केल्यास लगेच हल्ले होतात. ते आधी थांबायला हवेत. पाकिस्तानी माणसे म्याच खेळतील आणि निघून जातील. पंतप्रधान येतील मेजवानी झोडतील, म्याच बघतील आणि जातील्........त्यांची जेवणारी पन्नास ताटं आपल्याला अजून तरी महाग नाहीत. भ्रष्टाचारी नेत्यांच्या सुरक्षेवर नको इतका खर्च होतोच ना! दोन चार दिवस यांच्यासाठीही होइल्.......त्यात काय एवढं?

चिरोटा's picture

29 Mar 2011 - 6:08 pm | चिरोटा

आम्ही असा अजून किती काळ लाचारीच्या मित्रत्वाचा हात पाकपुढे पसरणार आहोत? आणि का? कशासाठी..?

ही जर लाचारी आहे(मलाही असेच वाटते), हे आपणा सर्वांना कळते तर मनमोहन सिंग ह्यांना कळत नसेल असे म्हणता येईल का? झरदारी/गिलानीला आमंत्रण दिल्यावर काय प्रतिक्रिया जनतेत उमटेल हे न कळण्याएवढे मनमोहन खुळे नाहीत.
भारत्-पाकिस्तान संबंध हे बर्‍याच वेळा कोड्यात टाकणारे असतात असे मला वाटते. खरी कारणे जनतेसमोर येत नसावीत.

गवि's picture

29 Mar 2011 - 6:20 pm | गवि

हेच वरील प्रतिसादांत म्हणत होतो. (प्रयत्न केला.)

रेवती's picture

29 Mar 2011 - 6:30 pm | रेवती

सहमत.

नगरीनिरंजन's picture

29 Mar 2011 - 6:49 pm | नगरीनिरंजन

ठीक आहे. काही तरी विशेष कारण असेल आणि त्यातून चांगले काही निष्पन्न होईल अशी आशा करू या.

आपला देश गुपचुपपणे काय करतोय त्याची उघड-उघड माहिती सर्वांना,अगदी शेंबड्या पोरालादेखील असेल अशी शक्यता मानावी काय? बाकी फारसं काही माहीत नाही पण पाकिस्तानात रोजच्या रोज आत्मघाती हल्ले होत असतात,शेकडो लोक मरत असतात,अशा बातम्या नेहमी वाचायला मिळतात. आता त्यांचेच लोक त्यांनाच मारत असतील तर तिथे भारताची लुडबूड हवी कशाला?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Mar 2011 - 7:24 pm | निनाद मुक्काम प...

ह्या सामन्यात पाकिस्तान हरणार हे नक्की
तेव्हा आपल्या प्रसारमाध्यमांनी एक आवई उठवून द्यावी .
ह्यांनी कराची स्थित भारतीयाकडून पैसे खाऊन सामना गमावला .

आणी हाच संदेश घेऊन भरजरी वस्त्रे घालून ह्याचे प्रमुख मिस्टर १० येथे आले .
मग ह्यांच्ये प्रमुख आणी त्यांचे क्रिकेट वीर ह्यांचे त्यांच्या देशात भव्य दिव्य स्वागत होईन .
मिस्तर भरजरी उर्फ मिस्टर १० (प्रत्येक सरकारी कामात १० % ह्यांचा ) म्हणून ह्यांच्या प्रसारमाध्यमे व चाहत्यांनी ह्यांचे नामकरण केले आहे .
आग्रही मागणी
त्यांना आपला मायदेशी लौकिक वाढवावा म्हणजे मिस्टर २० % हे बिरूद मिळवावे ह्यासाठी त्यांना खास ट्रेनिग माननीय ( तेलगी व त्यांचे समविचारी घोटाळा वीर ह्यांच्याकडून मिळावे )
हा सामना हरल्यावर पाकिस्तानी खेळाडूंना स्वताच्या देशात जायची इच्छा नसेन तर आपल्या देशातील विविध रियालती शोज मध्ये स्पर्धक किंवा जज म्हणून आमंत्रित करावे .
असे माझे मत आहे .किंबहुना ही योजना आगाऊ जाहीर करावी .

वीणा मलिक , शोहेब मलिक ह्या मलिक भावडांना न बोलावल्याचा जाहीर निषेध ( सानिया ने तिच्या गावातील खासदार साहेबांकडे ह्याबत नाराजी व्यक्त केल्याची वंदता आहे .)
अवांतर -- ह्या सामन्यात युसुफ पठाण ह्याला खेळायची संधी मिळावी असे फार वाटते .
कारण शाहीद आफ्रिदी त्यांच्या धाकट्या भावाला स्लेजिंग करतांना नेहमी म्हणतो '' तू काहे का हे पठाण ? तुम्हे तो पश्तून भी नाही आती .
युसुफ / झहीर त्याला दाखवून देतील उद्या
असली कौन और , नकली कौन

5000 पाकड्यांना व्हिसा मिळतोच कसा एकावेळी?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Mar 2011 - 7:43 pm | निनाद मुक्काम प...

हे आपल्या देशात बेकायदेशीर राहणाऱ्या दीड कोटीहून जास्त बांगला देशीना विचारूया .

चिंतामणी's picture

29 Mar 2011 - 11:48 pm | चिंतामणी

फार फार तर येथे आल्यावर कायमचे कसे रहायचे याचे मार्गदर्शन करतील.

विकास's picture

30 Mar 2011 - 12:24 am | विकास

जो पर्यंत उद्या पाक पंतप्रधानांना, "मनमोहना बडे झूठे, हार के हार नही माने" असे म्हणायची संधी मिळत नाही (अर्थात आपण हारत नाही), तो पर्यंत सगळे ठीक आहे... :-)

रमताराम's picture

30 Mar 2011 - 10:48 am | रमताराम

विकासरावांच्या या प्रतिसादाबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.

(रमाळ)

एकंदरीत भारत-पाक सामन्याचा अतीच गाजावाजा चाललाय. भारत-पाक युद्धच जणू, इतकं सर्वत्र “आणिबाणी”चं वातावरण तापवलं जातय. यात अनेक आपली पोळी भाजून घेतायत व राजकारण साधून घेतायत. पण खरं तर असं वातावरण तापवण्यात या सामन्यावर ५००० कोटी रुपये लावणारे बुकी, आयसीसी व भारतातील प्रसारमाध्यमं यांचं धंद्याचं गणित आहे त्यासाठी हे कारस्थान चालू असावं असं वाटतं.त्यामुळेच या सामन्यात फिक्सिंगही होणार याची चर्चा जोरात आहे.
भारत-पाकीस्तान कबड्डी सामनेही होतात तेव्हा असं वातावरण का नसतं?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Mar 2011 - 12:39 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अहो, कब्बड्डीची प्रेक्षक संख्या / उलाढाल किती? क्रिकेटची किती? आणि ही तुलना करण्याची ही जागा आहे का?
कै च्या कै राव तुमचे......

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 1:41 pm | वपाडाव

जुना 'नसीब' चित्रपट बघुन त्यावरुन काही बोध घ्यायला हवेत सर्कारने...
आम्ही बघितला त्यावेळी झीट सुट्टीवर होते म्हणुन आले नाहीत ;)
त्यात जो कबड्डी सामना घडवुन आणला होता तसा झाला तर यापेक्षाही (क्रिकेट) अधिक पब्लिक तिक्डे वर्णी लावायचं...
नसीब चित्रपटात रिशी कपूर अन रीना रॉय (सोनाक्षीची आई : सासुबै) यांचं गाणं

अडगळ's picture

30 Mar 2011 - 1:46 am | अडगळ

ते कोण ते पंतप्रधान येणार आहेत त्यांना जरा येताना कांदे आणा म्हणाव.
गेल्या २-३ महिन्यात तिकडला कांदा यालाय म्हणे.
कुणाची ओळख असल्यास पंतप्रधानांना निरोप देणे . पैसे रोख दिले जातील.

बाकी ,म्याच बघून कुणाचं पोट भरतंय ?

कांद्यासाठी लाचार (अडगळ)

इनोबा म्हणे's picture

30 Mar 2011 - 2:25 am | इनोबा म्हणे

बाकी ,म्याच बघून कुणाचं पोट भरतंय ?
हा प्रश्न महत्वाचा. ज्याला दोन टाईम खायला मिळत नाही, त्याच्यासाठी तरी स्वाभिमान, देशाभिमान वगैरे पोकळ गप्पा आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Mar 2011 - 2:50 am | निनाद मुक्काम प...

आमच्या कामावरील पाकिस्तानी बुद्धीजीवी लोकांचे मत

''हे आमंत्रण देणे व स्वीकारणे हे सर्व काही शांती दूत ओबामा ह्यांच्या अमेरिकन सरकारच्या मर्जीने होत आहे'' .
उवाच ( कामावरील पाकिस्तानी बुद्धीजीवी )
ह्यांना आता १)अमेरिका २) ,तालिबान ,३) भारत असे त्यांचे शत्रू वाटतात .
ह्या सामन्याच्या मुळे भारताला क्रमांक ३ वरून नंबर १ वर आणण्याचा प्रयत्न चालला आहे .( ह्या बुद्धी जीवी माणसांचे एक मला आवडते .ह्यांना ह्यांचे सर्व राजकीय नेते नाकर्ते वाटतात .व लष्कर प्रमुख तो लष्कर प्रमुख आहे तो पर्यत आवडतो .तो एकदा का राष्ट्रप्रमुख झाला की त्याचा एकतर हक सारखा मृत्यू किंवा मूष सारखा विजनवास नक्की .
अवांतर - बेटिंग पाकिस्तानी रक्तात मुरली असून ह्यावेळी त्यानेच आम्ही हरणार असा सोयीस्कर युक्तिवाद सुद्धा तयार आहे .
ह्यांच्या मंत्री मलिक ह्यांनी जाहीर रीत्या पाकिस्तानी संघाला आव्हान केले आहे .'' बेटिंग करू नका ,तुमच्यावर लक्ष आहे ''
ह्यावर इमरान खान ने राजकीय पोळी भाजण्यासाठी सरकारवर खरपूस टीका केली आहे .
ह्यामुळे ह्या बुद्धीजीवी लोकांना दुबई तून आलेले परप्रांतीय देशाबाहेर जावेत असे मनापासून वाटते .
पण काय करणार ह्या परप्रांतीया चा पैसा ह्यांचा सरकार .आय एस आय च्या रक्तात मुरला आहे .

रणजित चितळे's picture

30 Mar 2011 - 12:15 pm | रणजित चितळे

१०० टक्के सहमत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Apr 2011 - 3:19 am | निनाद मुक्काम प...

@ह्या सामन्यात पाकिस्तान हरणार हे नक्की
तेव्हा आपल्या प्रसारमाध्यमांनी एक आवई उठवून द्यावी .
ह्यांनी कराची स्थित भारतीयाकडून पैसे खाऊन सामना गमावला .

आणी हाच संदेश घेऊन भरजरी वस्त्रे घालून ह्याचे प्रमुख मिस्टर १० येथे आले .
मग ह्यांच्ये प्रमुख आणी त्यांचे क्रिकेट वीर ह्यांचे त्यांच्या देशात भव्य दिव्य स्वागत होईन .

माझ्या ह्या सूचनेची गंभीर दखल बहुदा पाक प्रसार माध्यमांनी घेतली .म्हणूनच .....

या सामन्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी, कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांच्यात दूरध्वनीवरून काय चर्चा झाली, याची माहिती घेण्यासाठी दूरध्वनी रेकॉर्डिंग तपासण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिकाही एका संतप्त चाहत्याने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.(सकाळ )
त्या चाहत्याचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा आहे हे वेगळे सांगायला नकोच

अवांतर - अजून हे क्रिकेटर मायदेशी पोहचले नाही .खरे तर १ तासाचा विमान प्रवास आहेत .( बहुदा दुबईला लपले असावेत .त्यामुळे आता बेटिंग च्या महाराजाने त्यांना पाहुणचाराला थांबवले. असा तर्क करून प्रसार माध्यमे व जनता ह्यांच्या बेटिंग च्या दाव्याला अजून हवा मिळणार . अजून राडा होणार )
शोहेब अख्तर म्हणत असेन '' सुटलो एकदाचे ह्या जाचातून ''
बिचाऱ्याला कोणी सेंड ऑफ पण दिला नाही .आता तो त्याच्या आवडत्या किशोरदा चे गाणे गात असेल

नरेशकुमार's picture

1 Apr 2011 - 5:11 am | नरेशकुमार

ह्म्म् !