भारत वि. पाकीस्तान सेमीफायनल प्रिव्हीव

Primary tabs

नि३'s picture
नि३ in क्रिडा जगत
28 Mar 2011 - 3:21 pm

भारत विरुद्ध पाकीस्तान क्रिकेट विश्वचषकातील सेमीफायनल आणी तेही भारतात मोहालीमधे मधे..यापेक्षा अधीक तरी एखाद्या क्रिकेट वेड्याला काय पाहीजे

वातावरण खुपच तापत चाललय बाहेर गर्मीने आणी करोडो क्रिकेट प्रेमींच्या शरीराच्या आत..ह्या सामन्यामुळे...जसाजसा क्षण जवळ येतोय तशी नुसती जिवाची तगमग वाढत चाललीय...

हे आस्ट्रेलीया आणि ईंग्लंड वाले ऊगाचच ashes ला most celebrated rivalry in international cricket म्हणतात ..अरे त्यांना म्हणाव तुमच्या दोन देशांमधे एक तरी युद्ध झाले आहे का?? अरे ईथे ३-३ (की ४??) युद्धाची पार्श्वभुमी आहे

भारत पाकीस्तान मधील ऐतीहासीक पार्श्वभुमी लक्षात घेता ह्या सामन्याला एका युद्धाचे स्वरुपच आले आहे.

ऐकीकडे प्लानींग ,स्ट्रटर्जी,टिम ईक्वेशन ,माईंड गेम ..हे तर चालु झालेच आहे पण या बरोबरच ईतर अनेक गोष्टींमुळे ह्या सामन्याभोवती हाईप वाढत चालली आहे.न्युज चॅनेल्स वाल्यांसाठी तर दुग्ध्शर्करा योगच म्हणावे लागेल्.जे चॅनेल लावा त्यावर हे कुठले न कुठले क्रिकेट एक्सपर्ट चे पॅनेल घेउन बसलेले असतात. न्युजपेपर चे रकाने चे रकाने भरुन येत आहे.
आभासी जगतात (ईंटरनेट वर ) ब्लॉग ,फोरम्,फेसबुक ,ट्वीटर वर ऊत्साही लोकांच्या चर्चा ,प्रतीचर्चा,कमेंट्स ना ऊत आलाय.फोनवर एक से एक एसएमएस फॉरवर्ड होत आहे.ह्या सामन्यासाठी ईसपीएन ने प्रती १० सेकंद जाहीरातीचा दर ४ लाखांवरुन १८ लाख केला आहे.स्टेडीयम ला एखाद्या छावणीचे रुप आले आहे.सामन्याच्या दिवशी ४००० सैनीक दलाचे कडे स्टेडीयम ला असणार आहे.२८००० प्रेक्षकांची क्षमता असलेले मोहाली चे स्टेडीयम कीतीतरी आधीपासुन सोल्ड आउट झालेले आहे. आता तर २५० चे टीकीट ब्लॅक मधे २५००० रुपयाला विकले जात आहे (होय २५००० च ,ही अतीशोयक्ती नाही )सामना बघण्यासाठी भारताचे आणी पाकीस्तान चे पंतप्रधान येणार आहेत्,त्याचबरोबर ईतर केंद्रीय मंत्री,बॉलीवुड नट्-नटी तर आहेच.अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी आधीच जाहीर सुटी किंवा हाफ डे घोषीत केला आहे किंवा कीमान एखाद्या टीव्ही ची व्यवस्था तर करुन ठेवलेली असेलच.

हे सर्व तर आहेच पण प्रत्यक्ष सामना खेळणारे जे २२ खेळाडु आहे त्यांच्यावर काय कमालीचे दडपण असणार आहे याची कल्पना न केलेलीच बरी.

जाता जाता हे काही कोट्स देत आहे..

* "Well, Facebook & Twitter better brace themselves with powerful servers on whats to come on the 30th!!"
* Bharat Band on 30th March... ;)
* "GADAR" on top of my fav movie list till 30th march.
* WORLD WAR-III ON 30th March?
* Declare 30th March as national holiday. HAMARI MANGEIN POORI KARO

मग काय म्हणता ह्या विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्यासाठी तुम्ही तयार आहात का??

गणपा सामन्याच्या पुर्वतयारी साठी एखादी फक्कड पाकक्रुती येऊ दे की गड्या..
नाट्क्या तुझ्या सम्रुद्ध कॉकटेल खजान्यातुन एखादे झ्यंट्यामॅटीक कॉकटेल येऊ दे..

अ‍ॅन्ड लेट द गेम बिगिन..

क्रिकेट

प्रतिक्रिया

नन्दादीप's picture

28 Mar 2011 - 3:30 pm | नन्दादीप

खरय नि३ भाऊ तुमच. मी तर आधीच बोलून ठेवलय बॉसला की माझी (स्व.) पणजी सिरीयस आहे. कधीही काहीही होवू शकत. आता नेमक ३० तारखेलाच काहितरी होईल. बघूया.

बाकी "नाट्क्या"भौ एक दोन झक्कास कॉकटेल टाका. मजा येईल.

डावखुरा's picture

28 Mar 2011 - 6:33 pm | डावखुरा

नि३'s picture

28 Mar 2011 - 6:39 pm | नि३

हा हा हा...जबरदस्त..