डॉक्टर

अवलिया's picture
अवलिया in जे न देखे रवी...
11 Mar 2011 - 3:14 pm

"सोडव रे आता या दुखण्यातुन.."
म्हणणार्‍या रुग्णांना डॉक्टर
दिलासा देत होता
आणि
'बरं वाटेल हं लवकर ' असा धीर देत
उपचार करत होता

त्याला पाहून मला "तो" आठवला.

फरक असलाच तर एवढाच ...
तो व्यथित झालेल्यांचा
आधार बनत होता
आणि
थकलेल्या मनांना
'तो आहे, सगळे ठीक होईल..'
अशी जगण्याची उभारी देत होता

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Mar 2011 - 3:17 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

देव असाच माणसांमध्येच सापडतो....
मस्त.....

स्वानन्द's picture

11 Mar 2011 - 3:17 pm | स्वानन्द

हूं...

श्रावण मोडक's picture

11 Mar 2011 - 3:31 pm | श्रावण मोडक

हं... आता ही मालिका निघणार की काय? :)

श्रावण मोडक's picture

11 Mar 2011 - 3:32 pm | श्रावण मोडक

हं... आता ही मालिका निघणार की काय? :)

पंगा's picture

12 Mar 2011 - 10:11 am | पंगा

...तेहतीस कोटी आयटरेशने???

मुलूखावेगळी's picture

11 Mar 2011 - 4:14 pm | मुलूखावेगळी

वा!!!!
आता पुढच्या भागात मेंढपाळावर कविता का ;)

sneharani's picture

11 Mar 2011 - 4:33 pm | sneharani

मस्त!!

धमाल मुलगा's picture

11 Mar 2011 - 4:51 pm | धमाल मुलगा

बाप्पाची कविता आहे होय?
शिर्षक वाचून मला वाटलं डॉक्टर डॉक्टर बद्दल कविता आहे की काय.

प्राजक्ता पवार's picture

11 Mar 2011 - 5:23 pm | प्राजक्ता पवार

मस्तं !

परिकथेतील राजकुमार's picture

11 Mar 2011 - 5:56 pm | परिकथेतील राजकुमार

वा वा आता पुढली कविता 'प्राध्यापक' का ? ;)

पर्नल नेने मराठे's picture

11 Mar 2011 - 6:17 pm | पर्नल नेने मराठे

खाटिक झाल आता दो़क्तर .... पुढे शिन्गरु येणार का नाना ?

छोटा डॉन's picture

11 Mar 2011 - 6:52 pm | छोटा डॉन

छान काव्य.
आवडले.

- छोटा डॉन

गणपा's picture

11 Mar 2011 - 7:20 pm | गणपा

लाईक इट.

गणपा, काय लाईक इट?
आँ? बघ कि, मागची आणि ही कविता सारखे वाटतिये कि नै ते.

म्हणुनच प्रतिसाद पण सारखाच दिलाय की नै. पहा बर ती कविता उघडून ;)

एकसारख्या वाटणार्‍या कविता का लिहिताय नाना?;)

नगरीनिरंजन's picture

11 Mar 2011 - 9:53 pm | नगरीनिरंजन

काय झालं नाना? डोक्यात प्रकाश पडला काय तुमच्या? कविता छान पण पहिल्या कवितेसारखी चमत्कृती नसल्याने जरा बाळबोध झाल्या गेली आहे.

लवंगी's picture

12 Mar 2011 - 10:30 am | लवंगी

दोन्ही रुप आवडली... त्सुनामीच्या कहरामुळे आता तर खाटीकच जास्त आठवतोय.. :(

पंगा's picture

12 Mar 2011 - 9:34 pm | पंगा

'त्सुनामी आणि बाप्पा'च्या निमित्ताने आमच्याही शिळ्या कढीला ऊत. (संदर्भ मागच्या त्सुनामीचा आहे.)

(स्वप्रमोशनाचा मोह कोणाला चुकलाय? शिवाय, रीसायक्लिंग हे पृथ्वीसाठी चांगले असते, म्हणतात.)

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2011 - 10:37 am | पिवळा डांबिस

मला वाटलं की फक्त विजुभाऊनांच डायरिया झाला होता....
पण त्या डायरियाचाही संसर्ग झालेला दिसतोय!!!!
नाना, काय हे?
:(