बऱ्याचदा बातमी ऐकतो नाही का की सायंकाळी रेल्वे ने घरी परत येणाऱ्या प्रवाश्यांवर दगड बसून गंभीर जखमी झाले,दवाखान्यात वेळीच न पोचल्यामुळे मृत्यू वा दवाखान्याचा हलगर्जीपणा,डॉक्टर ची दिरंगाई , कर्मचाऱ्यांची टंचाई इत्यादी मुद्दे त्याला जळूसारखे चिकटून येतात आपण ते निर्विकार चेहऱ्याने वाचतो ,चहा संपला की पेपर भिरकावून "कामाला जायला पाहिजे बाबा,टाईम काढून चालणार नाय " असं म्हणत इयरफोन्स कानात कोंबून निघून जातो..एवढा कोडगेपणा का अंगी रुतला ?हे रोजच झालं म्हणून?
बहुदा प्रत्येक मुंबईकर ही बातमी न बघता लिहून काढू शकतो ,फक्त जखमी व्यक्तीच नावं बदलेल ,आम्ही म्हणू "आयला हे सरकार आणि रेल्वे पोलीस चुतीया आहे ,आपण काय बोलणार भाई!!! ",बर तुमचं जाऊदेत ,हे जे चुतीया लोक वाचत असतीलच ना वृत्तपत्र ,त्यांच्या हातात असतो ना कायदा,मग ते कोणाची वाट पाहत आहेत???"बरोबर त्यांना काय घेण आहे ,त्यांचे पै पाहुणे थोडीच ट्रेन मधून भिरभिरतायेत ,मग आपल्याला काय करायचाय ,लोक मरेनात असे विचार करतात का हे?
त्या ट्रेन च्या खिडकीजवळ वा दारात कोणी स्त्री उभी असेल जिला आज घरी आई बाबा येणार आहेत त्यांच्यासाठी जेवण करायचय,एखाद्या स्त्रीला प्रथमच मूल झालं असेल आणि आज maternity leave संपून ऑफिस चा पहिलाच दिवस आणि तो कधी एकदा संपून घरी आपल्या बाळाकडे जायचय,कुणाला फोन आला असेल की आई आज मला बक्षीस मिळालं तू लवकर ये ना घरी ,कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल तर कोणाचा गृहप्रवेश,कोणी नुकतंच मुंबापुरीत आपली गगनभरारी घेण्यासाठी आलं असेल,तर आज कुठला मुलगा त्याला हव्या त्या ठिकाणी प्रवेश मिळाला म्हणून लवकर घरी जात असेल की त्याची आई काहीतरी गोडधोड करून वाट बघतेय,तर कुण्या बाप्याला आपल्याला मिअलेल्या प्रमोशन ची आणि बॉस ने केलेल्या कौतुकाची बातमी कधी एकदा घरी जाऊन देतो असं झालं असेल तर कुठली मुलगी तिला कॉलेज मध्ये मिळालेल्या नृत्य स्पर्धेतलं बक्षीस बाबांना दाखवते असं झालं असेल ,कुणाला मुलाखत यशस्वी रित्या पार पडून नोकरी मिळाली असेल आणि आता आपल्या घरातल्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार अशी नाना प्रकारची उदाहरणे असतील त्या एका खिडकी पाशी,एका दरवाज्यापाशी.त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य इतक्या क्रूरतेने उध्वस्त करून टाकतो तो एक दगड.रेल्वे रुळावर निपचित पडलेला आणि अंधत्व ,पंगुत्व ,परावलंबित्व ही सत्व एकवटलेला दगड कोणाच्या भाळी रेखाटलेला असतो देव जाणे !
ही दगडफेकी जमात म्हणजे झोपड पट्टी तली गुंडागर्दी असून दिवसभर नको ते उद्योग करणे,मुलींची छेड काढणे,पेपर विकणे,मावा गुटखा खाणे,लोकल मध्ये दादागिरी करणे,रात्री हातभट्टीची मारणे,नशा पाणी करणे आणि मग एक "थ्रिल" म्हणून किंवा एक गम्मत म्हणून ट्रेन च्या डब्यांकडे दगड भिरकावणे,त्यांच्या थ्रिल ची फार मोठी किंमत चुकवावी लागते प्रवाश्यांना .हे कधी कळणार ह्या माकडीच्याना(चिक्कार शिव्या अभिप्रेत,भगिनी वर्गामुळे एवढ्यावरच निभावले)..
हे जखमी प्रवाशी जेव्हा वार जिव्हारी लागून वेगात जात असलेल्या ट्रेन मधून खाली कोसळतात तेव्हा त्यांची अवस्था काय होत असेल याचा विचार केलाय ?
हे सगळ झाल्यावर सुद्धा रेल्वे पोलीस तातडीने जबाबदारी घेतील तर ते नाही,बर आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी करत एखाद्या हॉस्पिटल ला गेलेच तर तिथे डॉक्टर सुट्टीवर असतो किंवा जेवायला गेलेला असतो किंवा राउंड वर असतो,तो जागेवर असायला गुरुपुष्यामृत ,मणिकांचन हे सगळे योग एकत्र यावे लागतात ,नर्सेस ,कंपाउंडर ह्यांची मनमानी ,हजार प्रश्न ,काहीवेळा इंजेक्शन घ्यायचं असत पण पुरेश्या खोल्या उपलब्ध नसतात अश्या वेळी काहीतरी सोय करता येते तरीपण बाहेर चव्हाट्यावर हे उपचार उरकले जातात , आणि अश्यावेळी ती जखमी व्यक्ती स्त्री असेल तर सगळ्यांच्या नजर तिच्यावर असतात ,त्या बिचारीची काय अवस्था होत असेल ह्याची कोणी कल्पना केलीये ,बर ही पोलीस केस होत असल्यामुळे कायद्याच्या औपचारिकते पुढे माणुसकी आणि त्यापेक्षाही योग्य आणि त्वरित उपचार हे गौण ठरतात नाही का ? ,अश्या जखमी व्यक्तीला त्वरित उपचार देण्याऐवजी त्या व्यक्तीबरोबर आलेल्यांशी हुज्जत घालत बसणे आणि तोकडे उपचार करणे हे रुग्णालयीन कार्यक्षमतेवर(अ) प्रकाश टाकतंय.
hospital मध्ये hospitality च राहिली नाय दादा .....
इतकी संवेदनशीलता हरवत चालली आहे का त्यांची की समोर एक रक्ताळलेला आत्मा जगण्यासाठी केविलवाणी धडपड करतोय ,ह्यांच्या समोर हात जोडतोय तरी का नाही ह्याचं काळीज गलबलून उठत,का नाही लगेच आणि योग्य उपचार दिले जात ..सरकारी यंत्रणा एवढ्या हलगर्जी कश्या की ज्या जिवाशी खेळू शकतात ,खर तर ह्या गंभीर परिस्थिती वेळी रुग्णाला आणि त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांना धीर देण्याच सोडून त्यांच्याशीच हुज्जत घालत बसतात तेव्हा ह्या लोकांच मानसिक खच्चीकरण होत!
हे कर्मचारी पगार घेतात एवढा मग ज्या कामा साठी एवढा पगार घेतात ते काम निष्ठेने का नाही करत?
रेल्वे पोलिसांना अजून काम काय असतात ?का नाही ते बंद करू शकत हे ...
सध्या मुंबईतली एकूण एक स्टेशन्स लोकांनी गजबजलेली आणि सुविधांनी परिपूर्ण नसलेली अशी आहेत.
मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाणारे आणि "साला,८.३५ ची लोकल काय पण करून पकडला पाहिजे,ह्याला मरायला आमचीच ट्रेन भेटते का" असं करून तुडवत जाणारे एकाच लोककल्याण पंथातले असतात. रेल्वेचे एवढ बजेट असत ते जात कुठे ?
एवढं औद्यसिन्य ??
लोकल ,दगड,आणि एक जीव
गाभा:
प्रतिक्रिया
1 Mar 2011 - 11:41 am | माझीही शॅम्पेन
हा लेख पुढील संकेत स्थळावर वाचलेला आहे , हा तुम्ही लिहिलेला आहे काय ?
www.marathiadda.com/xn/detail/2437740:BlogPost:309147
jaymaharashtrablog.blogspot.com/2011_01_01_archive.html
1 Mar 2011 - 11:49 am | स्वैर परी
सहमत अगदी १००%
काही वर्षांपुर्वी मी कॉलेजमधुन घरी परत जात होते. एकच स्टेशन अंतर असल्यामुळे दारापासुन थोडी आतल्या बाजुला उभी होते. दुपारची वेळ असल्याने गर्दी नव्हती आणि छान गार वारा देखील येत होता, म्हणुन मी डोळे बंद करुन त्याचा आनंद लुटत होते. तोच मी ज्या हाताने मागच्या दांडाला पकडले होते, त्या हातावर जोरदार काहीतरी येउन आपटले. हात पुर्णपणे सुन्न झाला होता. पहिली २ मिनिटे कळलेच नाही की नक्कि झाले काय. पण नंतर शेजारी पडलेला एक दगड दिसला. तेव्हा सगळा प्रकार कळुन चुकला. आता याबाबत तक्रार तरी कुणाकडे करणार, आणि केली तरी ती ऐकुन कोण घेणार होते! म्हणुन मग तसाच सुजलेला हात घेउन घरी आले. :(
1 Mar 2011 - 12:16 pm | शिल्पा ब
:(
1 Mar 2011 - 12:16 pm | गवि
घाण पाण्याने भरलेल्या प्लॅस्टिक पिशवीचा मार ट्रेनमधे खाल्ला आहे. अपेक्षेपेक्षा बरेच जोरात लागते. डोळा थोडक्यात वाचला. दगड असता तर मात्र जीवच गेला असता.
माझ्यासोबत लहानपणी ट्रेक्स/कँप्स मधे येणारा तन्वीर लागू हा मुलगा खूप वर्षांपूर्वी ट्रेनवर कोणीतरी गंमत म्हणून फेकलेल्या दगडाचा बळी ठरला. किती तरुण वयातच हकनाक गेला तो. त्याची आठवण झाली की या अघोरी दगडफेकीबद्दल घृणा वाटते आणि असहाय्यही.
1 Mar 2011 - 1:32 pm | कुंदन
+१
माझाही डोळा थोडक्यात वाचला. कुर्ला पश्चिमेला बस मधुन प्रवास करताना.
1 Mar 2011 - 2:57 pm | योगी९००
तन्वीर लागू हा डॉ.श्रीराम लागू यांचा मुलगा काय? कारण माझ्या ऐकीवातल्या बातमीनुसार डॉ.श्रीराम लागू यांचा तरूण मुलगा असाच ट्रेनवर केलेल्या दगडफेकीमुळे गेला होता.
http://www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19980420/11051004.html येथे हेच म्हणले आहे.
शेवटचा पॅरा वाचा.
1 Mar 2011 - 2:59 pm | गवि
तोच. खूप पूर्वीची गोष्ट आहे.
1 Mar 2011 - 12:26 pm | शिल्पा ब
शिक्षण नाही त्यामुळे करायला काहीच नाही...कशाबद्दलही सहानुभूती वगैरे नाही....स्त्रियांबद्दल तर नाहीच ...वर त्यांच्या आयाच अशी शिकवणूक देतात (देताना पाहिलेले आहे म्हणून म्हणते) ....
विकृत्या कोणत्या न कोणत्या प्रकारे बाहेर पडून इतरांचे नुकसानच करतात...
यांना कशाला सहानुभुती दाखवायची हाच प्रश्न पडतो...पण तसं बोलायचं नाही.
1 Mar 2011 - 12:48 pm | अँग्री बर्ड
माझीही शॅम्पेन
>>> होय ..मीच लिहिलंय
1 Mar 2011 - 2:13 pm | माझीही शॅम्पेन
मला वाटत संपादाकानी त्वरित लक्ष द्यावे ! मराठी आड्डा वर "अमित परते" नावाच्या ब्लॉगरनी १७-जानेवारी ला हा लेख लिहिला असा तिथे उल्लेख आहे , तसाच त्या ब्लॉग मधे पुढच वाक्य अधिक आहे जे इथे नाही !
लिन्क - http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:309147
मग ह्यावर उपाय काय?खिडकी बंद करा,दारात राहू नका?तुम्ही देखील दगड घेऊन तयारीत रहा?कोणी दिसला तर मारत सुटा!
असं करायचं का..हे असं का चालू राहणार आपल्या भारतात ?
चु.भु.दे.घे. !
1 Mar 2011 - 1:09 pm | टारझन
:(
1 Mar 2011 - 2:19 pm | अँग्री बर्ड
शाम्पेन भाऊ ...
मी त्याच्याशी तेव्हाच बोललो होतो ...त्या मराठी ब्लॉगर्स ने माझे काही लेख उचलले होते ..
तेव्हा त्यांच्याशी झालेली चर्चा माझ्याकडे मेल मध्ये अजून आहे.
हे लेख माझ्या फेसबुक प्रोफाईल मध्ये लिहिले होते ...
1 Mar 2011 - 2:32 pm | गवि
आपले लेख कोणी उचलले की आपले महान(!!) साहित्य चोरीला गेले असा (गैर)समज होऊन दु:ख वाटते असे नाही. ते परवडले..
पण
कोणीतरी उद्या आधी चोराच्या ब्लॉगवर तो लेख वाचेल आणि मग आपल्याकडे येऊन पुन्हा वाचेल. अतएव क्रॉनॉलॉजी न बघता तो आपल्याच लेखाबद्दल आपल्यालाच चोर ठरवेल (बोलून दाखवेल किंवा मनात ठेवेल..) ... हे फार वेदनादायक असू शकेल.. ही नसती पीडा उद्भवू शकते तांत्रिक या भीतीने मी आपले लेख कुठे चोरले जात नाहीत ना हे चेक करत असतो.
पूर्वी मी लेख उचलणार्यांकडे दुर्लक्ष करायचो पण आता आवर्जून हाणून पाडतो कारण हेच.
1 Mar 2011 - 2:37 pm | अँग्री बर्ड
अगदी बरोबर आहे ..पण त्यांनी तेव्हा सपाटाच लावला होता लेख चोरायचा ..
मी तरी काय करू ?बर त्यांना सोर्स विचारला तर मलाच माझ्या प्रोफाईल ची लिंक दिली ..मग विचारले त्यांना की ज्याच्या प्रोफाईल वरून घेतलात त्याचे नाव टाकले असते तर तुमचे पितर अतृप्त राहणार होते काय ?
तर ते काही बोलले नाहीत.
असो आय थिंक मिसळपाव वर पहिल्याच दिवशी मला असा सामना करावा लागेल असं अपेक्षित नव्हते.
I am damn nervous now ...परत भेटू कधीतरी
1 Mar 2011 - 2:49 pm | गवि
मनावर घेऊ नये ही विनंती कारण मनावर घेण्यासारखं खरंच नाहीये यात.
उलट इथे सदस्य व्हिजिलंट आहेत. कोणी इतरांचे लिखाण उचलून टाकत नाहीत ना याबाबत इथे सर्वजण जागरुक आहेत. संपादकांचे तर ते कर्तव्यच आहे. मलाही याच उद्देशातून पहिल्या दोन लेखांनंतर विचारणा झाली होती. पण यामागचा उद्देश चांगलाच होता. तुम्ही लेखाचे मूळ जनक आहात हे काळक्रमाने सिद्ध झाले की बाकी काहीच हरकत कोणाला नाही, उलट लिखाण आवडतेच आहे.
प्रतिक्रियाकर्त्याची इतकी दक्षताही मूळ लिखाण आवडल्यामुळेच आहे हे तुमच्या लक्षात आले नाही का?
तेव्हा हलके घेणे.. :) तुमचे स्वागतच आहे.
उपरोल्लेखित मराठीअड्डा ही वेबसाईट लेख उचलून आपल्या नावाने पब्लिश करण्यासाठीच (कु)प्रसिद्ध आहे. हे सर्वांना माहीत आहे. ज्यांना नाही त्यांना ते लेख गूगलमधे कीवर्ड सर्चने शोधता येतील आणि कळेल की ते सर्वच प्रसिद्ध / नॉट सो फेमस अशा वेगवेगळ्या ब्लॉग्जमधलेच आहेत.
इथे मिपावरही या विषयावर इश्यू झालेला होता.
1 Mar 2011 - 3:26 pm | माझीही शॅम्पेन
तुम्ही निराश होवू नका , आम्हाला हा सर्व तपशील माहित नव्हता ! गवि म्हणतात ते शब्दशः खर आहे.
पुढिल लेखनसाठी आल दि बेस्ट ! लेख अतिशय छान आहे !!!
1 Mar 2011 - 3:30 pm | टारझन
ठिकाय तुम्ही म्हणाल ती पूर्व :B
- दरीत पडे
1 Mar 2011 - 3:40 pm | गवि
टारुभाऊ यांच्या अशा प्रतिसादांवर जाऊ नका. आणखी नर्व्हस व्हाल.
चांगले आहेत हो आमचे टारझन मनातून.. ;)
1 Mar 2011 - 3:44 pm | परिकथेतील राजकुमार
टार्या गप की मेल्या =))
ह्यासाठीच आम्ही जे काय खरडतो ते आधी मिपावर टाकतो आणि मग स्वतःच्या ब्लॉगवर.
बाकी तुम्ही नविन असल्याने सध्या जुनाच माल सप्लाय करत असावात. काही दिवस छान विचार करा आणि ताजे लेखन मिपावर टाका म्हणजे निराशा येणार नाही शर्टात.
1 Mar 2011 - 3:54 pm | गवि
उचलणारे इथूनच (किंवा इथूनही) उचलतात. उदा मितान यांचा काही काळापूर्वीचा धागा आणि इतर असंख्य.
मी स्वतः एका ब्लॉगवर मिसळपावचे अनेक लेख (तात्यांचे गाण्याविषयी) उचलून चिकटवलेले पाहिले.
उलट आपल्या ब्लॉगवर काही तास तरी आगोदर टाकले तर निदान कालक्रमानुरुप तरी आपले पहिल्यांदा लिहीणे स्पष्ट होते.
तस्मात, नवे ताजे लिखाण इथे यावे हे योग्य. पण या कारणासाठी तसे केल्यास तो काही योग्य उपाय नव्हे.
1 Mar 2011 - 2:50 pm | RUPALI POYEKAR
खर आहे तुमचे, माझीही मैत्रिण असाच ए़का दगडाचा वार झेलून रक्तबंबाळ झाली होती, सुदैवाने डोळा वाचला.
1 Mar 2011 - 2:55 pm | गवि
http://www.misalpav.com/node/16586
इथे बरोब्बर याच प्रकारचा इश्यू याच साईटबाबत आहे.
महेंद्र कुलकर्णी हे मराठी पायोनियर ब्लॉगर्सपैकी एक आहेत. त्यांचेही लेख त्या मराठीअड्डावर मी पाहिले आणि त्यांच्या लक्षात आणून दिले.
2 Mar 2011 - 11:50 am | अविनाशकुलकर्णी
आपली काळजी आपणच जमेल तशी व जमेल तितकी घ्यायची....
जे भोग प्रक्तनात लिहिले आहेत .ते भोगुनच संपतात..
इतक्या लोका मधुन तुम्हालाच दगड लागतो याला काहि कारण असते का?
तुम्हालाच का?.
3 Mar 2011 - 10:40 am | शिल्पा ब
मुर्खपणाचा विचार.
3 Mar 2011 - 12:18 pm | ज्ञानेश...
अत्यंत.
3 Mar 2011 - 3:23 pm | रंगोजी
काहीही काय बोलताय? मारणार्याला चार दणके द्यायच्या गोष्टी सोडून कुठे भोग आणि प्राक्तनात जाताय?
अशानं उद्या रेल्वेत हेल्मेटसक्ती आणावी लागेल.