मामा च्या गावाला जाऊ या....

चिप्लुन्कर's picture
चिप्लुन्कर in काथ्याकूट
25 Feb 2011 - 3:20 pm
गाभा: 

मामा च्या गावाला जाऊ या....

नमस्कार मंडळी ,
या मे महिन्यात मी व माझा मित्र दि. १० मे २०११ ते १५ मे २०११ या दरम्यान कोकणात संगमेश्वर नजीक लोवले या गावात " मामाच्या गावाला जाऊया " अश्या एका ट्रीप चे आयोजन करत आहोत. या ट्रीप मध्ये कोकणातील एका छोट्याश्या गावात घरच्या खेळीमेळीच्या वातावरणात राहायला तसेच मनसोक्त आंबे , फणस आणि इतर रानमेवा चाखायला मिळणार आहेत. तसेच घराजवळील रानात हुंदडायला आणि नदीतील डबक्यात डुंबायला मिळणार आहे. कोकणातील आढळणारे पक्षी , फुलपाखरे आणि साप यांच्याविषयी माहिती शिबीर तसेच जवळील काही पर्यटन स्थळे पाहणे असे आयोजन आम्ही करत आहोत. तरी जर काही मिसळ पाव प्रेमी या मे महिन्यात कोकणात सुट्टी घालवण्यास इच्छुक असतील तर त्यांनी खालील इ मेल वर संपर्क साधावा अथवा ९८३३९७३३२५ या भ्रमण ध्वनीवर संपर्क करावा.

आपलाच चिपळूणकर
९८३३९७३३२५
takaleprashant@gmail.com

टीप: मुंबई हून या ट्रीपची सुरवात होणार आहे. ( मुंबई - लोवले- मुंबई)
जर काही अधिक माहिती अथवा शंका असतील तर कृपया फोन किंवा इ पत्र करणे.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

25 Feb 2011 - 4:02 pm | नितिन थत्ते

चांगली आयड्या.

किती जणांची सोय होऊ शकणार आहे?

अवांतर: मनसोक्त आंबे खायला मिळणार म्हणताय म्हणजे तुम्ही कोकणातले दिसत नाही. ;)
कोकणातला माणूस दरवर्षी "यंदा आंबा नाय" असेच म्हणतो. :D

चिरोटा's picture

25 Feb 2011 - 4:33 pm | चिरोटा

आंबे कुठल्या प्रकारचे ते चिपळूणकरांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.मनसोक्त म्हणता आहेत म्हणजे रायवळच असणार! .किंवा हापूसच्या नावाखाली मुंबईत खपवले जाणारे पायरी.!!
"यंदा आंबा नाय" मधे आंबा म्हणजे हापूस आंबा असे गृहित धरलेले असते.

प्रदीप's picture

26 Feb 2011 - 8:01 am | प्रदीप

कोकणातला माणूस दरवर्षी "यंदा आंबा नाय" असेच म्हणतो

१०० % सहमत.

कधीही गोव्याला गेल्यावर 'यंदा आंबो नाय, हों', 'यंदा कोकमां नाय हों', 'यंदा xxxx नाय हों' हेच सातत्याने ऐकायला मिळते, असा अनुभव आहे. आता आमच्या घरी हा एक जोकच होऊन बसलाय!

गवि's picture

25 Feb 2011 - 5:20 pm | गवि

आंबे कुठले?
तुम्ही कुठले?

चिपळूणकर,झाल्या सुरु मिपाकरांच्या चवकशा.

:-)

नाहीतर रानमेव्याच्या नावावर काहीतरी खपवाल.

नरेशकुमार's picture

25 Feb 2011 - 7:03 pm | नरेशकुमार

मज्जा येईल.

इंटरनेटस्नेही's picture

26 Feb 2011 - 12:15 am | इंटरनेटस्नेही

मनसोक्त आंबे खायला मिळणार आहेत..!

चान चान.. आम्हाला मोसंबी, संत्रे पण चालतात.. अधुन मधुन पपया देखील खातो आम्ही.. आणि कोवळ्या लिंबांची चव तर क्या कहने!

बायदवे काजु आणि कणीसे तसेच केळी अव्हेलेबल आहेत की नाही?

-
(कोवळ्या फळांचा चाहता) इंट्या केळकर.

दोनेक आंबे घरपोच मिळतील काय ? वस्तुविनीमय पद्धत आम्हाला आवडते , त्याबदल्यात पाहिजे तर माझा मामा जळगाव वरुन केळी आणणार आहे , त्यातली घेउन जाऊ शकता :)

म्हणजे आम के आम आणि केळी खाल्ली सोलुन , होक्कीनै ?

अरे वा! मनसोक्त आंबे मिळणार आहेच तर आमच्या वाटेचे थत्ते काकांना द्या (ते येणारच असे त्यांनी वर सुचित केलेच आहे). थत्तेकाका तुम्ही एनीवे जाता आहातच (तसे परत यालच) तेव्हा तेव्हढे घेउन या हो आमच्या वाटचे आणि पुण्यात ते घेण्याची सोय आम्ही करु की! वा, असे सगळे झाले तर काय सुंदर उपक्रम* आहे अशी प्रतिक्रीया देउच.

*तो नव्हे हो सहजकाका! ;-)

फुकटात आंबा मिळत असेल तर मी पण येणार,
पाहिजेतर तुमच्या येण्या जाण्याचे पैसे आम्ही देऊ.

जास्त जणांना गोळा करू नये , ही विनंती. (आंबे वाटवे लागतील न)

पण खरच हापूस आंबा मिळेल का हो ?

(हावारट) हितू

मनसोक्त आंबे , फणस आणि इतर रानमेवा चाखायला मिळणार आहेत.

चाखायला मिळून काय उपयोग? आम्हाला हा रानमेवा मनसोक्त चापायला मिळणार असेल तर काही अर्थ आहे, अन्यथा....... ;)

गुड्डु's picture

28 Feb 2011 - 2:12 pm | गुड्डु

मनसोक्त आंबे , फणस आणि इतर रानमेवा चाखायला मिळणार आहेत.

पण विकत कि फुकट ते सांगा ना

चिप्लुन्कर's picture

28 Feb 2011 - 3:58 pm | चिप्लुन्कर

नमस्कार मंडळी,

काही महत्वाच्या गोष्टी :
१) सहलीच्या तारखा बदलल्या असून त्या ११ मे २०११ ते १५ मे २०११ अश्या आहेत
२) या सहलीला प्रवेश फी रु. २७५०/- इतकी आहे.
३) या रकमे मध्ये राहणे , २ वेळ जेवण (शाकाहारी) , सकाळी आणि सायंकाळी चहापाणी तसेच प्रवास ( मुंबई- लोवले - मुंबई) खर्च धरलेला आहे.( प्रवास शक्यतो खासगी साध्या गाडीने राहणार आहे.)
४) आंबे , फणस हे फक्त तिथेच बसून (फुकट) खाण्यास मिळणार आहेत .( पिशवीत भरून आपापल्या घरी घेऊन जाण्यासाठी नाहीत ).
५) आंबे हे सर्व प्रकारचे ( हापूस, रायवळ , पायरी ) खायला देण्याचा तसेच फणस पण कापा, बरका दोन्ही कण्यास उपलब्ध करून देण्याच पूर्ण प्रयत्न राहील.( जर काही नैसर्गिक आपत्ती आली नाही तर)
----------------------------------------
आपला चिपळूणकर

चिप्लुन्कर's picture

28 Feb 2011 - 3:59 pm | चिप्लुन्कर

नमस्कार मंडळी,

काही महत्वाच्या गोष्टी :
१) सहलीच्या तारखा बदलल्या असून त्या ११ मे २०११ ते १५ मे २०११ अश्या आहेत
२) या सहलीला प्रवेश फी रु. २७५०/- इतकी आहे.
३) या रकमे मध्ये राहणे , २ वेळ जेवण (शाकाहारी) , सकाळी आणि सायंकाळी चहापाणी तसेच प्रवास ( मुंबई- लोवले - मुंबई) खर्च धरलेला आहे.( प्रवास शक्यतो खासगी साध्या बसने राहणार आहे.)
४) आंबे , फणस हे फक्त तिथेच बसून (फुकट) खाण्यास मिळणार आहेत .( पिशवीत भरून आपापल्या घरी घेऊन जाण्यासाठी नाहीत ).
५) आंबे हे सर्व प्रकारचे ( हापूस, रायवळ , पायरी ) खायला देण्याचा तसेच फणस पण कापा, बरका दोन्ही खाण्यास उपलब्ध करून देण्याच पूर्ण प्रयत्न राहील.( जर काही नैसर्गिक आपत्ती आली नाही तर)
----------------------------------------
आपला चिपळूणकर