इनो संपल्या नन्तर .....

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
25 Feb 2011 - 12:10 pm

हे काय नशीबी आले...हे भाग्य हे असले कसले
बघ निघुन गेले सारे साथी...माझे मनोगतही फ़सले

मी डोळे उघडुन बघतो..तेंव्हा माझे मला कळते
घ्यायला घास मोठा गेलो ...तेंव्हा दंताडच हरवुनी बसले

बहर माझा लिहिता लिहिता केंव्हाच सुकोनी गेला
फ़ुका कौतुक होत होते...तेही आता अंतरले

उरल्या कथा ;जेवण यादी .प्रतिसाद नाही मिपावरती
विखार माझा फ़ुसका ठरला...अन विचार वैभव हरले

आता शिव्या उरल्या ओठी...... पोटी परी जळजळणे
ईनो घेउन.जिवंत रहाणे हेच नशिबी केवळ उरले

उपक्रम एकटाच राबवीत बसलो ऐसा
मीच मला म्हणूवूनी थोर.. काळीज तरी ना निवले

सोबत होते, तेही गेले निघून दुसऱ्या वाटे
वर्जेश गर्जेश आता कसला ...वाटे.पिसाळले श्वानच डसले

लुब्र्या सारखा तसाच राहिलो.... भुंकत मिपा वरती
काय लिहितो मी; फिकीर कोणा, कोणी वाचले वा ना वाचले

हे काय नशीबी आले...हे भाग्य हे असले कसले
बघ निघुन गेले सारे साथी...माझे मनोगतही फ़सले

प्रेरणा: अं जालावरील "ते" व्यक्तीमत्व

भयानककरुणशांतरसऔषधोपचार

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

25 Feb 2011 - 12:14 pm | प्रकाश१११

विजू भाऊ -
बहर माझा लिहिता लिहिता केंव्हाच सुकोनी गेला
फ़ुका कौतुक होत होते...तेही आता अंतरले
उरल्या कथा ;जेवण यादी .प्रतिसाद नाही मिपावरती
विखार माझा फ़ुसका ठरला...अन विचार वैभव हरले

मस्तच लिहिलेत. सुंदर.आवडेछे ..!!

टारझन's picture

25 Feb 2011 - 12:25 pm | टारझन

जगदंब जगदंब .. सॉरी .. राव दंब राव दंब :)

काही फॅक्ट्स : इनो हा इण्स्टंट अ‍ॅसिड ण्युट्रिलायझर आहे , त्यामुळे इणो घेतल्यावर तत्काळ बरे वाटत असले तरी पुन्हा अ‍ॅसिडिटी बाऊन्स बॅक होते आणि तिची तिव्रता अधिक असते.

- टिनो मोरिया

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Feb 2011 - 12:53 pm | llपुण्याचे पेशवेll

आत्मवृत्त आवडले. :)
आणि त्यांच्यावरचा वारही.

अवलिया's picture

25 Feb 2011 - 3:13 pm | अवलिया

आत्मकथन आवडले.

jaydip.kulkarni's picture

25 Feb 2011 - 9:16 pm | jaydip.kulkarni

आत्मकथन आवडले.