चरित्र-मंथन चरित्र-मंथन
लग्नाचे ते अरुंद भोजन
भेसळ सगळे ते रक्तचंदन
डालडा तुपात तुपकट निरांजन
चरित्र-मंथन||
विरुद्ध दिशेला क्रोधीत जीवन
विचित्र संध्या प्रेमळ अंजन
व्यर्थ सारे मृत्तिका पूजन
घनांच्या कडेला शेणसारवण
निषेध सारा प्रति-वाक्ताडन
जगण्याचे ते सहा सोपान
प्रबोधनाचे मौलिक प्रकटन
क्रियाहीन तो भेकड सैतान
निरुंद पत्तन सुख-संमार्जन
कुचेष्ट निद्रा मधु-संगोपन
समबुद्धी सुरा-प्राशन
निर्वात घरटे दीन भजन
तुडुंब अश्रू प्रचंड विघटन
क्रंदन नव्हे गुटिका मंजन
लोभस टेंभा निखील वर्तन
अचाट मेंदू निकृष्ट संजीवन
निर्जीव प्रक्रिया पालनपोषण
दु:सह जीवन उघडे दुकान
फेकाड तंतू अरि-वृंदावन
विदीर्ण रेशीम सुधीर भलामण
विलापशोचन हे कीटक-रोदन
प्रसिद्ध-सुमंत असत्य निरुपण
नको सांद्र महतीचे गोडवे गायन
प्रतिभा-गुंफन हे नवयुग गर्जन
विचारमंथन चरित्रमंथन........
-अन्यत्र पूर्वप्रकाशित
प्रतिक्रिया
25 Feb 2011 - 9:17 am | स्पंदना
मला वाटतय शरदिनी ताईंच्या नावाचा उतारा टाकायला हवा. काल एका ला झपाटल आज दुसर्याला.
बाकि कविता वाचायला जमली हो दैत्य.
दैत्यांना पण झपाटतय?
25 Feb 2011 - 9:45 am | प्रकाश१११
दैत्या -अरे कमाल बाप. ..!
मस्त...!! छान ....!!!
25 Feb 2011 - 11:02 am | कच्ची कैरी
आधी थोडी घाईत कविता वाचली म्हणुन डोक्यावरुन गेली पण जरा शांत चित्ताने वाचली तेव्हा थोडी डोक्यात घुसली .
25 Feb 2011 - 4:23 pm | असुर
शरदिनीतैंचा शिष्य म्हणावा, की त्यांनी झपाटलेलं झाड??
कविता विशेष!! शरदिनीवृत्तात जमून आलीये! व्वा व्वा!!
पण प्रयत्न केल्यावर अर्थ समजतो आहे, त्याकडे लक्ष दिल्यास पुढल्या वेळी अगम्य असे काहीतरी लिहीता येईल हे नक्की!! ;-)
--असुर
25 Feb 2011 - 11:20 pm | निनाव
खूपच सुरेख लिहिले आहे! आवडले.