डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग १०

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
23 Feb 2011 - 6:09 pm

मागील भाग - http://misalpav.com/node/16919

***

कोनी एका ओळिचं धागं काडाया कायबी जुळिवतंय
आनी पब्लिक त्येच्यावर येड्यावानी परतिक्रिया देतंय
आमानी नाय कवा परतिसाद देयाचं वाटनांर
तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!

लोकं लावत्यात कौल अन गाव म्हनतंय भारी
आमी मात्र मनात हानतुय दगुड, फोड कौलं तिच्यामारी
लावली तुमी कौलं सोन्याची तरी आमी फाट्याव मारनार
तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!

अधिक वाचा - http://misalpav.com/node/8989

***

खोकत खोकत
पहाता पहाता
उठते जेव्हा
एक कळ
मन माझे
म्हणते तेव्हा
म्हातार चळ म्हातार चळ

एरंडाचं पान माझ्या
टाळू वरुन ढळलं नाही
काशाची ती वाटी गं
उष्मा अंगचा सरला नाही
खिडकीमधे आज पुन्हा
दिसलं आहे 'मृगजळ'
मन माझे म्हणते तेव्हा
म्हातार चळ म्हातार चळ

अधिक वाचा - http://misalpav.com/node/3387
***

असो, तर आज मिठाईची आठवण होण्याचे कारण परवा इथे आमच्या गुजराती शेजार्‍यांकडून समजले की जवळच एक मंदीर आहे आणि त्यात गुजराती समाजाचे हलवाई मिठाई बनवून देतात!
ही बातमी ऐकून बरं वाटलं आणि माझं मन मला झटक्यात माझ्या गावात, अहमदनगरला, घेऊन गेलं. नगर जिल्ह्याची एक गंमत आहे, तसा पूर्वीपासूनच दुष्काळी जिल्हा असला आणि त्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा सतत प्रश्न असला तरी कसा कोण जाणे इथे अतिशय उत्तम प्रतीचा खवा फार पूर्वीपासून मिळतो. पारनेर, पाथर्डी अशा तालुक्याच्या ठिकाणी दुधाचा खवा करुन तो नगरला आणून विकणे हा परंपरागत व्यवसायच आहे. तुम्ही जर सकाळी सकाळी ६.३०-७ वाजता नगरच्या एस.टी.स्टँडवर गेलात तर भाजीच्या मोठ्या टोपल्या असतात तसल्या टोपल्यात झाकून आणलेले खव्याचे गोळे गाड्यांच्या टपावरुन उतरवून घेणारे गवळी दिसतील. किंवा खुद्द नगरपासून साधारण ८-१० मैलाच्या परिसरातून रोज सकाळी सायकलवरुन, मोटरसायकलवरुन दुधाचे मोठे कॅन आणि खव्याच्या टोपल्या, डबे आणणारे गवळी दिसतील. ह्यांचा वेषही अगदी ठराविक असतो. पायजमा, पांढरा शर्ट, गांधीटोपी किंवा धोतर, पांढरा शर्ट आणि रंगीत पागोटे - ह्या पागोटं वाल्यांना भरघोस मिशाही असतात! माझ्या बाबांना सकाळीच साधारण ४-५ मैलाची रपेट करायची सवय गेली कित्येक वर्षे आहे. मी दहा -बारा वर्षाचा असल्यापासून बर्‍याचवेळा त्यांच्याबरोबर फिरायला जायचो. त्यावेळी जाता येता हे गवळी लोक दिसायचे.

तर असे हे गवळी थेट हलवायांच्या दुकानात खवा आणि दूध घेऊन जायचे. तिथे दुधाचे कॅन रिकामे करायचे आणि खवा द्यायचे. भल्या पहाटेला गायी-म्हशींच्या धारा करुन, ८-१० मैलाची रपेट करुन आलेले हे गवळी भुकेजलेले असत. हलवायाकडेच ठाण मांडून
साजूक तुपातली, पिवळीधमक्-सोनेरी, गरमागरम जिलबी आणि ताजी भजी असा भरपेट नाष्टा झाला की चंची सोडून निवांत पान-तंबाखू लावून, जरा शिळोप्याच्या गप्पा करुन हे परतीच्या प्रवासाला सायकलवर टांग टाकून निघायचे. हे दृश्य मी अनेकवेळा बघितले आहे.
'बंबईवाला हलवाई' हे दुकान कापडबाजाराच्या एका बाजूच्या अगदी तोंडावर आहे. त्याचा मालक झालानी, हा माझ्या वडिलांचा शाळेतला विद्यार्थी. त्यामुळे त्याच्या दुकानावरुन जाताना तो 'नमस्ते सर' म्हणून बाबांना हटकून नमस्कार करायचा. एकदा बाबांच्या मागे लागून मी त्याच्या मुदपाकखान्यात प्रवेश मिळवला. एवढ्या कॅन दुधाचे हे लोक करतात तरी काय असा प्रश्न मला पडलेला. मी आत गेलो. रसरसलेल्या चुलाणावर भल्यामोठ्या काहिलीत दूध उकळत होतं आणि अंगात फक्त बनियन आणि अर्धी चड्डी घातलेला, कानात रंगीत डूल घातलेला एक तरतरीत, पोरसवदा राजस्थानी तरुण, लांब दांड्याच्या लोखंडी झार्‍यानं ते दूध ढवळत होता. ते दृश्य मी अवाक होऊन बघत होतो. ते बासुंदीसाठी दूध आटवणे सुरु होते. काहिलीतली साय ढवळून, खरवडून पुन्हा त्या दुधातच ढवळणे सुरु होते. दुसर्‍या कढईत आटलेल्या दुधात बदाबदा साखर घालून पुन्हा ढवळून आटवायला सुरुवात झाली. असं ते दृश्य डोळेभरुन पाहून मी बाहेर आलो. झालानीनं मला एका द्रोणातून गरमागरम बासुंदी दिलीन. बाबांकडे मी प्रश्नार्थक नजरेनच बघितलं ते घे म्हणाले. मी ती प्यायलो. त्या ताज्या बासुंदीची खरपूस चव न्यारीच. त्यानंतर त्यापेक्षा उच्च बासुंदी मी फक्त नरसोबाच्या वाडीला पुजार्‍यांकडे प्रसादाचे जेवण जेवताना खाल्ली आहे. कुरुंदवाड, दत्तवाड, दानवाड, नरसोबाची वाडी ह्या सगळ्या कॄष्णाकाठची बासुंदी म्हणजे अतिशय दाट, गंधासारखी घोटीव आणि अतिशय उत्कृष्ट चवीची असते. ह्या ठिकाणाव्यतिरिक्त तशी बासुंदी मला कुठेही खायला मिळाली नाही! असो. कुठून कुठे भटकून आलो बघा एका क्षणात!

अधिक वाचा - http://misalpav.com/node/8017

***

मंडळी वरती जे तीन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखकाची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी तो लेखक केवळ एवढेच लिहु शकतो असे नाही. त्याचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/344 इथे वाचता येईल.

बरोबर आहे मंडळी, हा लेखक आहे चतुरंग :)

ह्याच्या बद्दल काय बोलायचे? एकापेक्षा एक सरस विडंबन, ललित लेखन करणारा चतुरंग मिपाचा विश्वनाथ आनंद आहे. विडंबनकारांची क्रमवारी लावल्यास पहिल्या नंबरसाठी जे काही सदस्य नंबर लावतील त्यात एक चतुरंग असेल हे नक्की. बुद्धीबळाची माहिती, वेगवेगळ्या लढतींचे बारकावे उलगडून सांगत आमच्यासारख्या बुद्धीत बळ नसलेल्यांना मार्गदर्शन करणारा चतुरंग शेरोशायरीमधे सुद्धा तितकीच रुची घेतो.

चतुरंग आमच्या या आठवड्याचा "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे त्याचा लेख, कथा वाचुन युगे लोटली आहेत. आम्ही चौकशी केली तेव्हा त्याचे पेन हरवले आहे असे कळाले. हरकत नाही आम्ही त्याला पेन भेट देत आहोत. त्याच बरोबर शाल श्रीफळ पण देत आहोत त्याचा त्याने स्विकार करावा आणि लवकरात लवकर सुरेख लेख लिहावा अशी आमची इच्छा ! बाकी तो ठरवेल ते मान्य. कसे?

श्रीफळ

शाल

पेन


दुकानांचे पत्ते

श्रीफळ - http://www.freakingnews.com/images/app_images/coconut.jpg
शाल - http://www.traderscity.com/board/userpix13/5365-nepal-spun-gold-eight-tr...
पेन - http://images.shopping.indiatimes.com/images/product/101748_Waterman%20C...

क्रमशः

(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)

औषधोपचारशुभेच्छा

प्रतिक्रिया

रंगाशेठ तर हल्ली प्रतिसादालाही महाग झालेत. :(
रागावलेत की काय?

श्रावण मोडक's picture

23 Feb 2011 - 6:18 pm | श्रावण मोडक

एकाच दिवशी दोन-दोन संपादकांचा सत्कार करणाऱ्या नानाचे अभिनंदन.

धमाल मुलगा's picture

23 Feb 2011 - 6:32 pm | धमाल मुलगा

ला हौल विलाकुवत!

नानुस, रंगाशेठवर हा अन्याव है! त्यांचा बुध्दीबळाच्या लेखांपैकी एकाचाही परिच्छेद दिला नाहीस!
आणि रंगाशेठला शाल कशाला? त्यापेक्षा झक्कास एखादा स्वरोव्स्की क्रिस्टल बुध्दीबळाचा पट दे. लै खुश होईल आपला माणुस! :)

पंत,
हा बुद्धीबळाचा संच*, स्वारोव्स्की यांजकडून सत्कारार्थ -

अर्थात, सत्कारसंघाच्या अध्यक्षपदी नानासाहेब आहेत, निर्णय त्यांचे हाती!!! :-)

* प्रकाशचित्र: आंतरजालावरुन साभार

--असुर

स्वाती दिनेश's picture

23 Feb 2011 - 7:41 pm | स्वाती दिनेश

रंगाशेठ प्रतिसादालाही महाग झालेत हल्ली.. विडंबन, लेख तर दूरच..
लवकरच एखाद्या फर्मास लेखाची/विडंबनाची वाट पाहत आहे.
स्वाती

प्रमाणाच्या बाहेर काहीच्या काही अवांतर... ;)

हल्ली श्री.नाना यांच्या स्वप्नामंदी पाटेकरांचा नाना सारखा सारखा येत असावा... नाही कारण हल्ली सारखी सारखी तिडीक भरतेय ना !!! ;)
असो...
आता अवांतर केलेच आहे तर त्यात अजुन थोडी भर टाकतो...
कैसे में बताऊ....

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Feb 2011 - 10:21 pm | बिपिन कार्यकर्ते

जालावर झालेल्या माझ्या फायद्यांपैकी हा चतुरंग नावाचा एक फायदा. उत्तम लेखन. चौफेर. यथोचित सत्कार.

पर्नल नेने मराठे's picture

24 Feb 2011 - 2:33 pm | पर्नल नेने मराठे

आम्च्यात शेन्दी नसलेला नारळ देत नाहित.
चतुरंग बरेच दिवसात दिसले नाहीत हे मात्र खरे !!!

रामदास's picture

26 Feb 2011 - 8:56 pm | रामदास

नारळ काय शेंडी पण देत नाहीत म्हणे.

नितीन बोरगे's picture

26 Feb 2011 - 4:09 am | नितीन बोरगे

चतुरंग ह्यांच्या लेखनाची लिंक जी तुम्ही दिली आहे, ती चुकीची आहे बहुतेक.
http://misalpav.com/newtracker/344
पान सापडत नाही अशी एरर येत आहे..