विश्वचषकाचे दावेदार : भारत

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in क्रिडा जगत
19 Feb 2011 - 2:06 am

दर चार वर्षानी भरणार्‍या क्रिकेटच्या कुंभमेळ्याची सुरवात आज पासुन होतेय. यावेळी साथीला गतवेळच्या श्रीलंके बरोबरच बांगलादेशही आहे.
१९८३ नंतर क्रिकेट वेड्या भारतात हा खेळ केवळ खेळ उरलेला नाही. तो धर्म झालाय आणि त्यातल दैवत आपल्या बाजुन खेळत याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे. करोडो क्रिकेट वेड्यांच एकच स्वप्न आहे ते म्हणजे कसोटीत अव्वल असणार्‍य भारताच्या मस्तकावर एकदिवसीय खेळाला तो मुकुट परत एकदा विराजावा.
१९८३ च्या चमत्कारा नंतर आपल्या आपल्या संघाकडुन अपेक्षा एका दिवसात वाढल्या. आणि आजतागायत त्या दिवसा गणिक वाढतच आहेत. त्यामुळे जिंकल्यावर जितका जल्लोष असतो त्याच्या कैक पटींनी मग एखादा चषक हरल्यावर राग निघतो. लोकांनी डोक्यावर घेतलेले हेच खेळाडु क्षणात भुईसपाट केले जातात. पण हा राग क्षणीक असतो, परत नवीन स्पर्धा चालु झाल्या की आपण परत नव्या उत्साहाने आपल्या संघाच्या पाठीशी उभे रहातो.

गेल्या विश्वचषकाच्या आठवणी आपल्यासाठी खुप कटु आहेत. पण तरी ते सर्व विसरुन टिम इंडियाचे मेन इन ब्लु या वेळी सर्व सज्ज झालेत. कारण क्रिकेटचा सामना हा जुन्या आकडेवारींवर कधीच जिंकला जात नाही आणि तिथं शेवटच्या चेंडु पर्यंत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे निश्चित नसत. भारताच्या नुकत्याच संपलेल्या दौर्‍यातला दुसरा आणि तिसरा सामना याचीच साक्ष देतात नाही का?

सध्याचा टिम इंडियाचा फॉर्म पहाता ते यंदाचे विश्वचषकाचे प्रबळ दावेदार आहे. इंग्लंड आणि श्रीलंकेच ही नाव स्पर्धेत आहे. टि-२० चा विश्वचषक जिंकल्या पासुन हे क्रिकेटचे जन्मदाते कंबर कसुन तयारीला लागलेत. त्यातच अ‍ॅशेस् जिंकल्या पासुन त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. काल पाकिस्तानला हरवुन त्यांनी चुणुक दाखवलीच आहे. पण तुर्तात सध्या फक्त भारता बद्द्ल बोलु.
सध्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. २७ वर्षां पुर्वीचा ईतिहास परत लिहिला जाईल?

महेन्द्रसिंह धोनी उर्फ मि. कुल :


सध्या टिम इंडियाच्या नावेच सुकाणु या कुशल कप्तानाकडं आहे. अटीतटीच्या वेळी अचुक निर्णय घेण्यात पठ्याचा हात धरणारा विरळाच. वेळ पडल्यास थोडीशी जोखिम उचलण्यासही कचरत नाही. तरुण आणि वरिष्ठ खेळाडुं मधील दुव्याच काम उत्तमपणे करतोय. सध्या अ‍ॅड मध्ये दाखवत असलेला 'हेलिकॉप्टर शॉट' जरी म्यान केलेला असला तरी ती तलवार वेळ प्रसंगी तळपल्या शिवाय रहाणार नाही याचा भरवसा आहे. (न्युझीलंड बरोबरच्या परवाच्या सामन्यात याची झलक दिसलीच.)

सव्वाशे करोड लोकांच्या अपेक्षांच ओझं वाहाण हे येराबगाळ्याचं काम नोहे. हे ओझं मि. कुल कस सांभाळतो ते दिसेलच. टॉसचं दान सध्या याला वाकुल्या दाखवतय. दैव त्याला साथ दोवो. हल्लीचा त्याचा स्वतःचा फलंदाजीचा फॉर्म थोडा त्रास दायक होता पण त्यातुन तो मार्ग काढतोय आणि त्यासाठी त्याला शुभेच्छा....

वीरेंद्र सहवाग उर्फ सुलतान उर्फ नबाव :


हा आपला उप-कर्णधार. सचिनच आरष्यातलं रुप. बॅट ही जणु तलवारच आहे आणि समोर येणारा प्रत्येक गोलंदाज हा गनीम. एकदा का याचा झंझावात चालु झाला की मग त्यात कोण कोण पिसले जातील याचा नेम नाही. या धनाजीची धसकी भल्या भल्या गोलंदाजांची रात्रीची झोप उडवते. समोरच्या संघाच मनोबल खच्ची करण्याच जबर्दस्त सामर्थ्य या पठ्याकडे आहे. सामन्याच भवितव्य बरचस यानं करुन दिलेल्या सुरवातीवर अवलंबुन असत. जर याची बॅट तळपली तर यंदाच विश्वचषक आपलाच.

सध्या फॉर्म शी झुंजतोय त्यात दुखापतींनी ग्रस्त आहे. सुरवात अडखळत होते, आणि जम बसतोय रे बसतोय म्हणे पर्यंत साहेब पॅव्हेलियनचा रस्ता धरतात.

गौतम गंभीर उर्फ दुसरी चालती-बोलती भींत :


टीम इंडिया याच्याकडे भावी कप्तान म्हणुन पहातेय. आईपीएल 4 च्या या सगळ्यात महागड्या खेळाडुन आधी लगीन विश्वचषकाच म्हणत स्वतःच लगीन पुढ ढकललय. कोणताही देश असो खेळपट्टि कसली ही असो, पठ्या ठाण मांडु शकतो. नुसतं ठाणच मांडत नाही तर धावफलक हलता राहिल या कडेही लक्ष असत. आक्रमक आणि बचावात्मक खेळाच विलक्षण नजाकत भर मिश्रण म्हणजे गंभीर.

सध्याच टेंशन एकच. साहेब दुखापतीने ग्रस्त आहेत. लवकरात लवकर तंदुरुस्त होवोत ह्या शुभेच्छा.

सुरेश रैना :


एक आक्रमक फलंदाज. मॅच विनर ठरु शकतो. कप्तानाचा याच्या वर भरवसा आहे आणि तो त्याने वेळो वेळी सार्थ ही केलाय. एकदा चार्ज झाला की मग चौकार षटकारांचा पाऊस पाडु शकतो. मधल्या फळीचा तो कणा आहे. तो धावपट्टीवर असे पर्यंत धावगतीची काळजी नसते. वेळ पडल्यास कामचलाउ गोलंदाजी ही करतो.

सध्या त्याचा आत्मविश्वास कमी आहे आणि ते नुकत्याच झलेल्या द.आफ्रिका दौर्‍यात प्रकर्षाने जाणवल. पण एक चांगली खेळी गेलेला विश्वास मिळवण्यास पुरेशी आहे. त्यासाठी खेळपट्टीवर जम बसवण गरजेच आहे जे सध्या याला जमत नाहिये.

युवराज सिंह:


नावाला जागणारा आणि आपल्याच मस्तीत वावरणारा टीम इंडियाचा जाँटी र्‍हॉडस् . भारतीय क्षेत्ररक्षणाला याने एक नवी दिशा देली. हातात बॅट आली आणि मुड असला तर दिसेल त्याची चामडी लोळवाण्याची हौस आहे. या हौसे खातर एका षटकात ६ षटकार ठोकुन झालेत. उभ्या उभ्या जागे वरुन चेंडु जास्तीत जास्त लांब टोलवण्याची स्वतःशीच स्पर्धा लागलेली असते. अडचणीच्या वेळी माहीने हक्काने दिलेला चेंडु हाती घेउन जमलेली जोडी फोडण्यात तरबेज.

जी आक्रमकता याची ताकत आहे तिच त्याच दुबळे पण ही ठरु शकते. त्यामुळेच अत्यंत बेभरवश्याचा. फॉर्मशी झुंजतोय.

विराट कोहली:


थोड्याच कालावधीत जम बसवलेल्या विराट ने १९ वर्षांखालील भारतीय संघाच नेतृत्व करुन तो विश्वचषक जिंकुन आणला होता. नावाला साजेश्या खेळ्या करुन आजवरच्या छोटयाश्या कारकिर्दित बरेच सामने गाजवलेत. आपलं क्ष्रेत्ररक्षण नेहमीच वादाचा विषय राहिलाय त्या पार्श्वभुमीवर हा चपळ क्षेत्ररक्षक भविष्य उज्ज्वल असल्याची साक्ष देणारा आहे. या युवा खेळाडू कडुन बर्‍याच अपेक्षा आहेत.

हा ही भज्जी सारखा थोडा रागीट आहे आणि सातत्याचा अभाव हीच याची डोकेदुखी आहे.

युसूफ पठान :


हा आयपीएल च फाइंड आहे. आत्तापर्यंत केवळ आयपीएल मधुनच चमकणारा संताजी एकहाती सामना फिरवु शकतो हे परवा आपण पाहिलच. येत्या मोसमात विरुद्ध टिमचे घोडे या संताजीला बिचकुन न राहिले तरच नवल. गोलंदाजांवर तुटुन पडणे करणे आणि त्यांचा धीर खच्ची करणे हे याच काम.
त्याची फिरकी गोलंदाजी हा अजुन विकल्प धोनीला मिळालाय. गरज पडल्यास वापरता येईल.

धोक्याची घंटा म्हणजे स्वतःहुन विकेट फेकणे. जरा जम बसला की स्वतःहुनच बाहेर जातय येडं.

जहीर खान:


मेन ईन ब्लु ब्रिहेड मधल हे अग्नी क्षेपणास्त्र. म्हणुनच गोलंदाजीच सुकाणु याच्या हाती दिलय . याच्या कडुन चांगल्या सुरवातीची अपेक्षा सगळ्यांनाच आहे. केवळ फिरकी गोलंदाजांसाठी असणार्‍या भारतातील खेळ पट्यांवर याने तिव्रगोलंदाजीची कमान एक हाती तोलुन धरली आहे. आणी सध्या या कमानीला खांब जोडण्याच कामही हा अनुभवी गोलंदाज करतोय, इतरांना मार्गदर्षन करुन .
स्विंग, वेग, आखुड टप्याचे बाउंसर, यॉर्कर असे एक से एक बाण याच्या भात्यात आहेत. जमलेली जोडी फोडण्याच कसब ही जमेची बाजु.

शेवटच्या शटकांत धावा वाटण्याची खोड आणि दुखापत सोडल तर एक गुणी खेळाडु आहे.

श्रीशांत:


प्रविणकुमारच्या दुखापतीमुळे या केरळा एक्स्प्रेसची विश्वचषकाच्या रुळावरुन घसरलेली गाडी परत एकदा रुळावर आली आहे. Smile जरी सुरवातीला संघातुन वगळा गेला होता तरी त्याचा आत्मविश्वास जबरदस्त होता.
याच्या कडे वेग आहे. दृतगती गोलंदाजाकडे आवश्यक असलेली एक प्रकारची खुन्नस ठासुन भरली आहे. पण गोलंदाजी करताना नुसती आग ओकुन चालत नाही हे लक्षात ठेवायला हवं.
फलंदाजी करताना गरज पडल्यास तळाला येउन मान कापलेल्या कोंबडी सारखा हात पाय झाडु शकतो.

अनुभवाची कमी आणि सातत्याचा अभाव. मैदानावरच्या कामगीरी पेक्षा त्याच्या आत-बाहेरच्या वाद-विवादा मूळेच जास्त प्रकाश रहातो.

हरभजन सिंह उर्फ टर्बनेटर:


अनिलकुंबळे नंतर फिरकी गोलंदाजीच धुरा या सरदाराने आपल्या खांद्यावर घेतली आहे. आजवर केवळ चेंडु हातात घेउन गोलंदाजांना नाचवणारा भज्जी सध्या बॅट हातात घेउन बल्ले बल्ले करतोय. जगातल्या कुठल्याही खेळपट्टी वर आपल्या फिरत्या चेंडुंनी गोलंदाजाना नाचवणारा हरभजन भारतियउपखंडातल्या खेळपट्ट्यांवर नक्कीच भांगडा करायला लावेल. सध्या फॉर्मही बरा आहे.
एके काळी पहिले ५-६ फलंदाज माघारी परतले की आपला डाव आटोपायचा. पण सध्या आपल्या शेपटाने वळवळायची सवय घालुन घेतली आहे. एके काळी गांडुळाच भासणार शेपुट सध्या शेषनागाच झालय यात भज्जीचा सिंहाचा वाटा आहे.

थोड्या गरम डोक्याचा आहे पण त्याचा योग्य तो उपयोग करण्यात कॅ. कुल तरबेज आहे.

आशीष नेहरा:


हा मला व्यक्तीशः फारसा कधी आवडला नाही एक खेळी वगळता. तो २००३ विश्वषकाचा इंग्लंड विरुद्धचा सामना. केवळ २३ धावांत इंग्रजांचा निम्म्याहुन अधीक संघ (६ फलंदाज) याने एकट्याने माघारी धाडला होता. तेव्हापासुन याच्या कडुन खुप अपेक्षा लागुन राहिल्या होत्या. पण नंतरच्या हरवलेल्या फॉर्म आणि फिटनेस ने नेहमीच आत बाहेर होत राहीला. शेवटच्या शटकात फलंदाजांना फटकेबाजीच आमिष देत त्यांना अलगद जाळ्यात ओढण्यात पटाईत.

पटकन खांदे पाडतो आणि मग सपाटुन मार खातो. अगदी पहिल्या षटकापासुनच थकलेला दिसतो. तुमची आक्रमक देहबोली समोरच्या फलंदाजावर वचक ठेउ शकते हा धडा त्याने परिक्षेत नक्कीच ऑप्शनला टाकला असणार.

मुनाफ पटेल:


मध्यम वर्गीय (लग्न झालेल्या) पुरुषाप्रमाणे नाकासमोर चालणारा, आपल्या लाईन आणि लेंथ शी इमान राखणारा गुणी गोलंदाज. फलंदाजांना बेजार करुन चुका करण्यास प्रवृत्त करणारा.
स्विंग च हत्यार व्यवस्थीत हाताळू शकतो. जरी गडी बाद करता आले नाही तरी खिरापत वाटत सुटत नाही.

सातत्याचा अभाव, वेगही पुर्वी सारखा राहिला नाही.

आर. अश्विन:


याला आयपीएल मध्ये धोनी बरोबर खेळताना पाहिल होतं. लंकेच्या मेंडिसने शोधलेल कॅरमबॉल अस्त्र जाणरारा मेंडिस नंतरचा एक मेव गोलंदाज. प्रतिस्पर्ध्यांच्या धावगतीला बुच मारण्याची क्षमता आहे.
अनुभवाची कमी आहे. पण खेळला तरच अनुभव वाढेल ना?

हरभजनच्या उपस्थितीत याचा नंबर लागण थोडं कठिणच आहे. तो ही मनात म्हणत असावा "मौका सभी को मिलता है."

पीयूष चावला:


याची निवड झाल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगरकर नंतरचा अत्यंत भाग्यवान खेळाडु. ;) कुंबळे नंतरचा सध्याचा लेगस्पिनर. धोनीने त्याचावर ठेवलेल्या भरवश्याला तो दोन्ही सराव सामन्यात जागलाय. महागडा आहे पण जिद्दीही तितकाच.

दिड वर्षाहुन अधिक काळ आंतरराष्ट्रीय खेळा पासुन दुर आहे. निवडसमितीने खेळलेला जुगार कितपत यशश्वी होणार ते येणारा काळच ठरवेल.

सचिन तेंडुलकर: बास नाम ही काफी है| या एका नामा पुढे सगळी विषेशणं थोटी आहेत.

याच्या बद्दल लिहिण्याची माझी लायकी नाही. मी क्रिकेट खेळतो आणि पहातो ते फक्त याच्यासाठीच. मी लहान असताना गावस्कर नावाच्या सुर्याला क्रिर्केटच्या मैदानावरुन अस्तला जाताना पाहिल. त्याच्या नंतर कोण? हा प्रश्नच कधी सचिनने पडु दिलानाही.

२० वर्षांपासुन भारतीय फलंदाजीचा तो कणा आहे. फलंदाजीतले सगळे रेकॉर्ड याच्या घरी पाणी भरतात. एकदिवसीय सामन्यांत २०० धावा करणं आणि तेही द. आफ्रिकेसारख्या बलवान संघाविरुद्ध हे तो सचिनच करु जाणे. फक्त एकच तुरा शिरपेचात खोवायचा बाकी आहे. आणि त्यासाठी लागेल ते करायची जिद्द बाळगुन आहे.

आजवर विश्वचषकाने त्याला ५ वेळा हुलकावणी दिली आहे. ही त्याची कदाचीत शेवटची विश्वचषक स्पर्धा असणारे. जास्त ताण पडु नये म्हणुन एकदिवसिय सामन्यांतुन पुरेशी रजाही घेतली. तो प्रचंड मेहनत करतोय हे त्याचा गेल्या वर्षातल्या कामगीरीवर नजर टाकताच कळतय. मालकं ऐन भरात आसतानाच माशी शिंकली आणि स्नायुंच्या दुखण्याने सध्या बेजार आहेत. पण असली दु:ख उगाळत बसणार्‍यांतला सचिन नव्हे. येत्या १९ तारखे पर्यंत तो ठण ठणीत बरा झाला असणार. अब्जावधी लोकांच्या प्रार्थनेला त्या आकाशातल्या देवाला न्याय द्यावाच लागेल.

साहेबाची विकेट हे प्रत्येक गोलंदाजाला पडणार गोडं स्वप्न असत. आणि ते स्वप्न साकार करण्याची क्षमता एकट्या आणि एकट्या सचिन मध्येच आहे. जर त्याने मनात आणल तर तो आजही ५० षटकं धावपट्टीवर तळ ठोकुन बसु शकतो.
ऐन एप्रिलच्या कडक उन्हात नोव्हेंबरची दिवाळीचा खेचुन आणण्याची क्षमता केवळ याच्यातच.

एकंदर कागदावरचा हा वाघ असलेला संघ आपली नखं कितपत दाखवतो ते येणारा काळ लवकरच दाखवेल.

तुर्तास तमाम चाहत्यांकडुन विजयश्रीची माळ भारताच्या गळ्यात पडो ह्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!

क्रिकेट

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

19 Feb 2011 - 2:23 am | मृत्युन्जय

मस्त लिहिले आहे रे. सचिनचे नाव दिसले नाही म्हणौन थोडासा आश्चर्यचकित होतो आणि थोडा अस्वस्थ सुद्धा. त्याचे नाव शेवटी बघुन डोक्यात प्रकाश पडला. ते नाव तिथेच असणे योग्य होते. त्याच्या नावाने समारोप केला तेच बरे झाले. ओळख सुंदरच जमली आहे

निखिल देशपांडे's picture

19 Feb 2011 - 6:11 pm | निखिल देशपांडे

सचिनचे नाव दिसले नाही म्हणौन थोडासा आश्चर्यचकित होतो आणि थोडा अस्वस्थ सुद्धा.

असेच म्हणतो...
वाचत राहिल्या वर लक्षात आल की समारोप सचिनने असणार..
खरोखर लेख मस्त झाला आहे.

टारझन's picture

19 Feb 2011 - 3:01 am | टारझन

गहिवरलो !!!

आय अ‍ॅम टोटली एक्सायटेड :) आता आयेषा टाकिया ने जरी डेट वर बोलावलं तरी हलणार नाहीये :)

प्राजु's picture

19 Feb 2011 - 3:37 am | प्राजु

तुफ्फान लिहिलं आहे...
एकदम भरून आलं...

भारतीय क्रिकेट संघाला खंडीभर शुभेच्छा!! लढो.. हम आपके साथ है!! धो डालो.... बस्स! :)

बेसनलाडू's picture

19 Feb 2011 - 3:49 am | बेसनलाडू

छान लिहिले आहे. खेळाडूंनी स्वतःसुद्धा वाचावे आणि स्वतःतल्या गुणावगुणांची जाणीव करून घ्यावी असे ;)
(समीक्षक)बेसनलाडू

फारएन्ड's picture

19 Feb 2011 - 5:02 am | फारएन्ड

सचिनचे नाव पाहिले दिसले नाही तेव्हाच शेवटी असणार हे लक्षात आले :)

असुर's picture

19 Feb 2011 - 5:08 am | असुर

क आणि ड आणि क!!! काय लिवलंय, काय लिवलंय!!! प्रत्येक खेळाडूचे गुणदोष असे दाखवून दिले आहेत की क्या बात, क्या बात, क्या बात!!! :D

भारताच्या विश्वकरंडक संघाबद्दल काहीही लिहायचं म्हणजे या क्रिकेटवेड्यांच्या देशात शिवधनुष्य उचलण्याजोगंच आहे! पण अ‍ॅज युजुअल गणपा इज ऑन फायर.

अजून ४-५ संघांची ओळख करुन देतोस का रे?? ;-)

--असुर

मुलूखावेगळी's picture

19 Feb 2011 - 10:43 am | मुलूखावेगळी

आपुन भी इसी टीम के साथ है.
आधी ४-५ प्प्लेयर्स चे वाचले सचिन नाही दिसला. मग स्क्रोल करुन पहिले तर खाली फोतो दिसल मगच पुन्हा जिथे होते तिथुन वाचले.

याच्या बद्दल लिहिण्याची माझी लायकी नाही. मी क्रिकेट खेळतो आणि पहातो ते फक्त याच्यासाठीच.
फलंदाजीतले सगळे रेकॉर्ड याच्या घरी पाणी भरतात

+१००००
फक्त आता विश्वचषक जिंकावा बस्स्स.

गणपा, आपने अपने फेव टीएम के लिये लिखा है. तेव्हा भारत जिंकला तर तुम्हांला माझ्याकडुन जोरदार पार्टी ;)

अमोल केळकर's picture

19 Feb 2011 - 10:56 am | अमोल केळकर

ऐन एप्रिलच्या कडक उन्हात नोव्हेंबरची दिवाळीचा खेचुन आणण्याची क्षमता केवळ याच्यातच

क्या बात है. - भारतीय टिमला अनेक शुभेच्छा !!!

अमोल केळकर

वपाडाव's picture

21 Feb 2011 - 3:16 pm | वपाडाव

ऐन एप्रिलच्या कडक उन्हात नोव्हेंबरची दिवाळीचा खेचुन आणण्याची क्षमता केवळ याच्यातच.

+९९.९९
हेच म्हणायला आलो होतो..
उरलेला ००.०१ टक्का दैवावर सोडावा.

इन्द्र्राज पवार's picture

19 Feb 2011 - 10:57 am | इन्द्र्राज पवार

वाचायला सुरुवात केला अन् कप्तानानंतर आमचा "लाडला" दिसेना म्हणून चमकलो आणि वाटले की लेखकराव 'तंदुरी चिकन' च्या नादात त्याला विसरले की काय ! पण नाही, असे होणे शक्य नव्हते...आणि पूर्ण लेखातील तोच भाग हृदयी ठेवला आहे.....कारण? कारण स्वयंस्पष्ट आहे....सारी टीम एकीकडे आणि आमचा सचिन दुसरीकडे असणे आम्हाला फार भावते.

वर्ल्ड कपचे काय व्हायचे ते होऊ दे.....आमच्यासाठी हा शेवटचा कप....एवढ्यासाठी की पुढील कुंभमेळ्यात 'सचिन तेंडुलकर' हे वादळ घोंघावणार नाही.

प्रार्थना एवढ्यासाठीच करेन की, सचिनने क्रिकेटला 'अलविदा' करावे ते २ एप्रिल २०११ रोजी त्याच्या लाडक्या 'वानखेडे स्टेडियम' मधून....अन् तेही वरील फोटोतील पोझनेच !!!

इन्द्रा

हरिप्रिया_'s picture

21 Feb 2011 - 2:22 pm | हरिप्रिया_

+1
सचिन साठी तरी आपण हा वर्ल्ड कप जिंकावाच जिंकावा...

आनंदयात्री's picture

20 Feb 2011 - 8:21 am | आनंदयात्री

मस्त !! लेख आवडला.

गणेशा's picture

21 Feb 2011 - 5:00 pm | गणेशा

लेख आवडला .. अप्रतिम ..