माननीय थत्ते काकांनी लिहिलेल्या "भाषेवरील लेखाच्या" विडंबनाचा प्रयत्न.

गांधीवादी's picture
गांधीवादी in काथ्याकूट
18 Feb 2011 - 7:54 pm
गाभा: 

माननीय नितीन काकांनी नुकताच भाषेवर एक लेख लिहून बरीच करमणूक केली. हसून हसून पोट दुखले. त्या लेखाच्या विडंबनाचा प्रयत्न करत आहे.
तसे आम्ही जात्याच नुर्बुद्ध. तरीसुद्धा हे विडंबन गोड मानून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे.

भारतातल्या राजकीय क्षेत्राचा आता (फ़ार चांगला) काल आला आहे. या पुढच्या काही महिन्यात अनेक पक्षांकडून तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येतील.

त्यावेळी तुमची आणि तुमच्या कौशल्यांची माहिती सीव्ही मधून विचारली जाईल आणि नोंदवली जाईल.
माहिती भरतांना तुमची बोलण्याची भाषा जी काही असेल ती तुम्ही लिहालच पण "अवगत
असलेल्या भाषा" मध्ये 'त त प प' भाषा न विसरता लिहा.

पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा कधीकधी वापरतो. व्यवहारात वापरली जाणारी हि भाषा 'त' व 'प' दोन चिह्नांनी बनलेली असते तसेच भारतातील मोठे मोठे पदावरील व्यक्ती सुद्धा या भाषेचा उपयोग करताना दिसतात.

हि 'त त प प' ची भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. एका जाहीर सभेत जुनी जाणकार मंडळी वगळता कोणीही 'त त प प' भाषा शिकण्याच्या मानसिकतेत नाही आणि त्यामुळे या भाषेला आउटडेटेड (कालबाह्य) समजले जावू शकते.

भारतातील सर्वात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या भाषेत दिली जाऊ शकतात. (किंबहुना दिली गेलेली आहेत.) तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो.

भारतासारख्या महान देशात उच्च पद मिळविण्यासाठी हि भाषा किती लाख मोलाची ठरू शकते हे तुम्हाला खाली दिलेले दोन व्हिडियो बघूनच समजून येईल. या व्हिडियो मध्ये सुप्रसिद्ध वक्त्याने 'त त प प' भाषेचा वापर करून आपल्या दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर प्रत्येक प्रश्नाचे ठोस उत्तर दिले आहे.

व्हिडियो क्र. १ ) http://www.youtube.com/watch?v=nXdBPPHZXh0
व्हिडियो क्र. २ ) http://www.youtube.com/watch?v=ZDJFBFYr720 (पहिले ३० सेकंद प्रत्येक भारतीयाने पाहीलेच पाहीजे)

व्हिडियो खूप मोठे आहेत, पण अगदीच वेळ नसेल तर दुसर्या क्र. चा व्हिडियो फक्त पहिले ३० सेकंद नक्की चालवून पहावा, आणि त्यात वक्त्याने 'त त प प' च्या भाषेत दिलेले उत्तर पाहून अगदी कोणीही हरखून जाऊन याच्या प्रेमात पडेल. मी देखील असाच या भाषेच्या प्रेमात पडलेलो आहे. आणि आजपासून मी माझ्या resume मध्ये ह्या भाषेचा उल्लेख करण्यास सुरुवात केलेली आहे.

ज ज जर त त तुम्हाला हा विचार प प पटत असेल त त तर जरूर अ अ आपल्या मित्रांना सुद्धा स स सांगा.

ध ध धन्यवाद.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

18 Feb 2011 - 8:54 pm | नितिन थत्ते

हॅ हॅ हॅ. (हे अ‍ॅक्च्युअली तीन वेळा हॅ केले आहे. त त प प ची भाषा नाही ;) ).

प प पण ती उ उ उदाहरणं तितकीशी च च चपखल नाहीत.

व्हिडिओतील वक्ते त्या भ भ भ भाषेत बोलताना दिसले ना ना ना ना नाहीत. :(

प्रचेतस's picture

18 Feb 2011 - 9:19 pm | प्रचेतस

अवलियांच्या डोक्यांत तिडीक आणणार्‍या मिपाकरांत पुढील भागात नंबर लागण्याची शक्यता असल्याने बरेच दिवसांनी गांधीवादींनी हा धागा काढला असेल.

विकास's picture

18 Feb 2011 - 11:34 pm | विकास

अहो पण गांधीवादींनी लिहीले की पण डोक्यात तिडीक आली असे म्हणणारे आहेत त्याचे काय! ;) (ह.घ्या.!)

गांधीवादी-जी,
मला फक्त "I think" किती वेळा ते म्हणाले ते एकदा मोजायचे आहे. पण जमत नाहीं. ज्याबद्दल १०० टक्के खात्री आहे अशी विधानेसुद्धा त्यांनी I think या शब्दांनी सुरू केलेली आहे. म्हणून आपल्याला ते ततपप वाटले असेल.
पण मला वाटते एक समर्थ सनदी नोकर असलेले आपले पंतप्रधान अशा Live कार्यक्रमात गडबडत असावेत. कारण त्यांची अमेरिकेतील अण्वस्त्र कराराबद्दलची आधीपासून तयार केलेली भाषणे अतीशय चांगली आणि मुद्देसूद होती आणि त्यात त्यांनी असे I think म्हटल्याचेही आठवत नाहीं. (म्हणाले असते तर लक्षात आले असते.)
असेही वाटले कीं 'श्रेष्ठीं'नी ही पत्रकार परिषद त्यांना त्यांच्या मर्जीविरुद्ध घ्यायला लावली होती. कारण त्यांच्या बोलण्यात अजीबात उत्साह दिसला नाहीं. एरवी ते बरेच उत्साहात बोलतात. पण हा माझा गैरसमजही असेल.
"ज्याने साधी म्युनिसिपल निवडणूकही कधी जिंकली नाहीं त्यांनी मला सल्ला देऊ नये" हे काँग्रेसच्याच नटवरसिंग यांचे भाष्य आठवले.
एक व्यक्ती म्हणून मनमोहन सिंग यांच्याबद्दल खूप आदर आहे. ते अतीशय सज्जन आणि प्रामाणिक गृहस्थ आहेत. म्हणूनच त्यांना राजकारणात अस्वस्थ वाटत असावे. तो त्यांचा पिंडच नाहीं.
त्यांच्याकडे पाहिले कीं मला नेहमीच Accidental hero या चित्रपटाची आठवण होते.