गाभा:
नुकतीच एक बातमी वाचली. http://www.dailymail.co.uk/news/article-1357886/Taxi-driver-slammed-judg...
त्याबातमीतले रोचक वाक्य -
'These are serious matters and custody appears to be appropriate in this case,' said the judge.
'Also what troubles me, although it's not something that bears on sentence, [is that] he has been her for nigh on 20 years and he requires an interpreter.
'I suspect he lives within his own community and has never bothered to learn English.
'It is highly desirable that those who come to this country from abroad integrate, rather than live isolated within their own community.'
मिपाकरांचे मत जाणुन घेण्यासाठी काथ्याकुट.
म्हणूनच कालपासुन मिपावर आंग्ल शब्द दिसत आहेत का? ;)
प्रतिक्रिया
18 Feb 2011 - 3:19 pm | मनराव
ह्यो प्रश्न काल पासुन पड्ला होता....त्याच अत्ता उत्तर मिळालं......
18 Feb 2011 - 3:26 pm | llपुण्याचे पेशवेll
मिपा काळाबरोबर राहण्याचा प्रयत्न करत आहे बहुतेक . ;)
काही तांत्रिक कारणामुळे आणि काही मुद्दामहून. :)
18 Feb 2011 - 3:54 pm | आजानुकर्ण
अशुद्धलेखनामुळे मराठीवर होणारे अत्याचार टाळण्यासाठी उचललेले हे योग्य पाऊल आहे. पुर्वदृश्य वगैरे अशुद्ध शब्द गेल्यामुळे बरे वाटले.
18 Feb 2011 - 4:05 pm | अवलिया
अच्छा ! म्हणजे ही तांत्रिक समस्या नाहीतर !
मिसळपावच्या तांत्रिक समितीची शुद्ध (!) मराठीच्या रक्षणासाठी स्वतःला कटिबद्ध करवुन घेत प्रगल्भतेकडे जोमाने वाटचाल चालु असलेली पाहून डॉळे प्वाणावले.
18 Feb 2011 - 4:34 pm | नीलकांत
ज्यांना शुध्दलेखनाबद्दल अतीउमाळे आहेत त्यांना तात्यांनी याआधीच सडेतोड उत्तर दिले आहे. जुण्या जाणत्या सदस्यांना ह्याबद्दल अज्ञान असेल असे वाटत नाही. तरी सुध्दा त्यांना शोध घेता येईल. मिपाचा शोध चालला नाही तरी गुगलबाबाने मिपाची आवृत्ती ठेवलेली असेलच.
सबब मिपावर यापुढे शुध्दलेखनाच्या नावाने गळे काढू नये आणि मिपाची काळजी घेण्यासाठी संपादन आणि व्यवस्थापन मंड़ळ सक्षम आहे. याची खात्री बाळगा व असे धागे सुध्दा काढू नका.
- नीलकांत
18 Feb 2011 - 5:05 pm | गणपा
जेब्बात.
केवळ या मुळेच शुद्ध लेखनाची बोंबाबोंब असुनही आम्ही अजुन येथे टिकुन आहोत. :)
19 Feb 2011 - 10:01 pm | पंगा
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा.
20 Feb 2011 - 6:10 am | आनंदयात्री
जुना सल अजुन खुपतोय ?
20 Feb 2011 - 8:56 pm | पंगा
आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आणि प्रगल्भतेचा आदर आहे.
18 Feb 2011 - 4:39 pm | विजुभाऊ
अवांतरः मिपावरच्या मुखपृष्ठावरच्या भिमण्णाम्च्या चित्राखाली ते चित्र कोठून आले आहे याचा उल्लेख कुणीच का करत नाही
18 Feb 2011 - 5:23 pm | आजानुकर्ण
त्या चित्रावर उजवी टिचकी मारून, व्ह्यू इमेज असे केले की ते चित्र योग्य जागी उघडते. तिथे ते चित्र कोठून आले आहे हे कळेल.
18 Feb 2011 - 5:11 pm | नीलकांत
मिसळपावच्या व्यवस्थापनाबाबत काही अडचण असेल तर वैयक्तीक विचारणा करावी.
अडचण विचारणारे सदस्य जुणे व जाणते असल्यामुळे कुठे आणि कुणाला याची सविस्तर माहिती येथे देत नाही.
- नीलकांत
18 Feb 2011 - 6:29 pm | अवलिया
वरती धाग्यात दोन विषय अंतर्भुत आहेत.
वरती दिलेला परिच्छेद ज्या घटनेविषयी आहे त्या घटने बद्दल मिपाकरांचे मत काय आहे हा प्रमुख विषय जो
या वाक्याने दर्शवला आहे.
चर्चा केवळ जड शब्दांनी एकसुरी आणि अति गंभीर होऊ नये ह्या साठी किंचित नर्म विनोदी
हे वाक्य.
अशा प्रकारे एकात एक दोन चर्चा व्हाव्यात असा प्रयत्न होता. बहुदा एकंदरीत आमची प्रगल्भता थोडी कमी पडली असावी असे वाटते. असो.
18 Feb 2011 - 6:35 pm | सविता
मपले पन ह्येच वाटत होत्...का मल्लच सगलं विंग्रजी दिसून राह्यलंय की काय....
18 Feb 2011 - 9:19 pm | नगरीनिरंजन
मिपावरच लै घसरू राह्यले लोकं.
गदारोळात मूळ मुद्दा राह्यला की बाजूला राव! खरं म्हणजे दोन मुद्दे.
१) या जज्जवाणीच राज ठाकरे म्हणतात भैय्यांनी मराठी शिकलं पाहिजे तर त्यात काय चुकलं?
२) बघा हे लोकं. साह्यबाच्या देशात राहूनपण त्यांच्या भाषेला तोंड नाय लावलं. नाय तं आपले, निघाले लगी लोटा घीऊन वाघिणीचं दूध प्यायला अन आता आपल्याच गावात आगंतुकांसाठी हिंदी बोलायला.
20 Feb 2011 - 11:23 am | अवलिया
धागा फक्त तुम्हालाच समजला !
21 Feb 2011 - 7:09 am | स्पंदना
व्वा ह ननी!! सह्ही बोललात!