प्रेमकथा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
17 Feb 2011 - 10:46 am
गाभा: 

प्रेम कथा म्हणजे नक्की काय?
खरी प्रेमकथा नक्की कशी असते.
इथे प्यासा चित्रपटाच्या चर्चेवर कोणीतरी प्यासा ही प्रेमकथा आहे किंवा नाही असा आक्षेप घेतला आहे.
काहीजण "रजनीगंधा ,अ‍ॅपॉकॅलेप्टो ,आंधी , सुजाता इत्यादींचा उल्लेख केला आहे.
एकाने तर " पिंजरा" हा प्रेमकथा असलेला चित्रपट आहे असे देखील सांगितले आहे.
हिंदी मराठी भारतीय चित्रपटात नायकाला नायीका असणे हा एक आवश्यक घटक मानलेला आहे.
नायक नायीकेचे प्रेम हाच एक निकष लावायचा ठरला तर महल , चलती का नम गाडी ,पाकीझा , रझीया सुलतान , ( चोरी चोरी ( मूळ चित्रपट रोमन हॉलिडे ),हाथी मेरे साथी ,क्रान्ती , देस परदेस ( मूळ चित्रपट :माय फेअर लेडी) , पासून , अंधा कानुन , अंदाज अपना अपना ,शोले, शान पासून ते लगान,जाने भी दो यारो ,कथा ,जब वी मेट , चिनी कम ,
३ इडिअट्स ,सिवाजी द बॉस , रोबोट पर्यन्त सर्वच चित्रपट प्रेमकथा मानावे लागतील.
संपूर्ण रामायण ही तर अभिजात प्रेमकथा मानावी लागेल.
माझ्या मते प्रेम कथा म्हणजे चित्रपटात नायक नायीकांमधील फुलत जाणारे प्रेम हा मुख्य विषय असावा. प्रेम प्राप्त करण्यासाथी नायक नायीकांच्या स्वभावात/ वागण्यात बदल होतो. नायकाला नायीका ऑर व्हाईस व्हर्सा स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत करते स्वाभीमान देते . पण जे काही घडते ते प्रेमासाठीच.
सूड / पैसे मिळवणे / खानदान का बदला वगैरे मुख्य मुद्दे दाखवून यातून प्रेम वगैरे चटणी प्रमाणे वापरलेली कथा ही प्रेमकथा होणार नाही.
राजेश खन्नाचा "आनन्द" ही कथा चांगली आहे पण प्रेमकथा होत नाही. ३ इडिअट्स ही देखील प्रेम कथा नाही , बातोबातो मे , छोटीसी बात चलती का नाम गाडी , या प्रेमकथा नाहीत.
रजनीगंधा ही एका तरुणीच्या मनातील हिंदोळ्यांची कथा होते , त्यातील नायक अथवा नायीका प्रेमासाठी काहीच करत नाहीत. ( अमोल पालेकर निशीगंधाची फुले आणतो इतकेच)
आंधी मध्यमवयीन जोडप्याची ही प्रेमकथा होते.
अमिताभ बच्चन च्या चित्रपटात प्रेमकथा असावा असा एकमेव चित्रपट "चिनी कम"
जब वी मेट हे थोडी वेगळ्या धर्तीची कथा आहे. नायीकेचे प्रेम नसतानादेखील नायकात झालेला बदल नन्तर नायकाने नायीकेला तिचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी केली मदत हे त्या कथेला वेगळ्या धर्तीची प्रेमकथा बनवतात.
" दिल , मैने प्यार किया , ( आणि राहुल रॉय, अनु अग्रवाल चा तो कोणता चित्रपट नाव आठवत नाही)
एक दुजे के लिये हा चित्रपट मला अस्सल प्रेमकथा वाटतो.
मैने प्यार किया हा चित्रपट प्रेमकथा आहे.
मराठीत या बाबतीत तशी बोंबच आहे.
असे काही चित्रपट मग ते विनोदी असोत की गंभीर काही अस्सल प्रेम कथा तुम्हाला आठवताहेत?

प्रतिक्रिया

अलिकडेच पाहिलेला सिणेमा "येह साली झिंदगी " ही खरी प्रेमकथा आहे असे वाटते हो विजुभाऊ.

तसेच टर्मिणेटर, रॉकी , आणि "कांती शाह के अंगुर " ह्या तिनही प्रेमकथा देखील अजरामर आहे .

- अलिफ लैला मजनु

गवि's picture

17 Feb 2011 - 11:14 am | गवि

"येह साली झिंदगी "

टारबा +१००

कांती शाह के अंगुर

???

बाकि काही वर्षापूर्वी आलेला "रेश्मा कि जवानी" हा सुद्धा गाजलेला प्रेमपट होता

विजुभाऊ's picture

17 Feb 2011 - 11:20 am | विजुभाऊ

श्री श्री श्री टारझन यानी सुचवलेले तिनही चित्रपटांतील प्रेमकथा मिपाकरांच्या समोर मांडाव्यात.
स्पा यानीदेखील त्याना आवडलेल्या चित्रपटाची कथा इथे लिहावी. होतकरूना मार्गदर्शन होइल

आहो विजुभाऊ .. .त्या गुंडोपंतां कडे पाहुन काहीतरी आचरणात बदल करा :)
त्यांनी गोळ्या-बिस्किटांचे ऑप्शन्स उपलब्ध असताना आपला देठ पिवळ्या कलर णे रंगवुन आपण बाद असल्याचे घोषित करुन आमच्या सारख्या गरम रक्ताला पूढे चाल दिली आहे :) आमच्या करोडो शुभेच्छा गुंडोपंताना आहेत आता :)
तुम्हाला णकोत का आमच्या शुभेच्छा ? की शिव्याशाप हवेत ? :)

आम्ही कै लिहिणार नै हं :) मचाक वर भरपुर लिहीलंय आम्ही ;)

प्यारे१'s picture

17 Feb 2011 - 1:57 pm | प्यारे१

मचाक म्ह्न्जे काय रे भौ???

बा**** भां** हे टार्‍या म्हंजे पक्का येड** आहे.

समजतात काही लोक स्वतःला सदाबहार पान मसाला उदा. देव आनंद. काय करणार कोणी???

सुहास..'s picture

17 Feb 2011 - 11:22 am | सुहास..

विजुभाऊंना नको त्या वयात नको ते प्रश्न पडायला लागले आहेत ;) ..असो !!

' शेक्सपियर ईन लव्ह ' ही सत्य प्रेमकथा आहे.

वपाडाव's picture

17 Feb 2011 - 2:31 pm | वपाडाव

कोणी ऐक्लय की नाही ते माहीत नाही.
पण तुझे मेरी कसम नावाचा सिनेमा आम्हाला लैच आवडतो.
ही १ अस्सल प्रेमकथा आहे, विजुभौ.
२५ वेळा थेटरात पाह्यलाय.
सध्या लक्ष्मीनारायण स्वारगेटला सुरु आहे.
RHTDM या जन्मात तरी विसरणे शक्य नाही.

मुलूखावेगळी's picture

17 Feb 2011 - 2:35 pm | मुलूखावेगळी

तुझे मेरी कसम

+१००

स्पा's picture

17 Feb 2011 - 2:43 pm | स्पा

"साथिया" विसरलात?

सुधीर's picture

17 Feb 2011 - 10:43 pm | सुधीर

"वीर झारा" हा मला आवडलेला सर्वात उत्कृष्ठ हिंदी चित्रपट. (नाही मी शाहरुख चा फॅन मुळीच नाही.)

बराच वर्षांनी, २ आठवड्यापूर्वी "ये साली जिंदगी" पाहिला, उत्तम प्रेमकथा नक्कीच म्हणता येईल. इंग्रजी मधे "फोरेस्ट गंप" आणि "कासाब्लांका", ह्याहूनही दर्जेदार काही असू शकेल असं वाटत नाही.

टारझन's picture

17 Feb 2011 - 11:13 pm | टारझन

विर झारा सारखा बावळट आणि मुर्ख पिक्चर कुठे णाही .. =)) स्टोरी ऐकुन च हसायला येतं ,.

काय तर म्हणे वाजपेयी काका प्रिटि झिंटाला बदणाम करतील म्हणुन शाहरुख जेल मधे सडतो =)) गिव्ह मी अ ब्रेक .. ती त्याची बायको होणार असते ... =)) =)) ती पण आर्गय सटुरी लग्न तर करत नाही वाजपेयी शी .. तशीच म्हातारी होते ..

शेवटी दोघांचं पेट्रोल संपतं तेंव्हा राणी काकु मधे येतात आणि यांना धक्का स्टार्ट करतात .. :)

बिण्डोक प्रेमी बघायचे असतील तर विर झारा ला पर्याय नाही ...

:) अगदी असंच वाटलेलं ४ वर्षापूर्वी मला! ("वीर झारा" आणि "कासाब्लांका" विषयी), पण नि:स्वार्थी प्रेमाचा अर्थ कळला आणि ती कथा/सादरीकरण्/संवाद उत्कृष्ठ वाटले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Feb 2011 - 1:45 am | निनाद मुक्काम प...

@आणि राहुल रॉय, अनु अग्रवाल चा तो कोणता चित्रपट नाव आठवत नाही)
आशिकी
केवळ गाण्यावर चालला हा प्रेमपट
कॉलेज जीवनात मधुशालेत हि गाणी कानावर पडत असताना आयुष्यातील कितीतरी तास खर्ची झाले आहेत .
कधी एखादा दिलजले किंवा द्राक्ष न मिळालेला कोल्हा ''अब तेरे बिन वर सूर धरायचा
तर प्रेमात आणि येथे मद्यात आकंठ बुडालेला अभागी जीव तू मेरी जिंदगी हे ... तुही चाहत तुही राहत तुही आशिकी हे .
माझे ऑल तैम फेवरेट
'' बस एक सनम चाहिये आशिकी के लिये
कारण
जसे सासोकी जरुरत हे जिने के लिये''
कॉलेज जीवनातला तकिया कलम होता तो बर्याच जणांचा
फक्त गाण्यासाठी महेश भट्ट ह्यांचे सिनेमे पाहायला आवडायचे .
बाकी लेखातील मुद्दे पटले .

भडकमकर मास्तर's picture

18 Feb 2011 - 2:00 am | भडकमकर मास्तर

लव्ह स्टोरी ही एक प्रेमकथा असू शकेल, अशी शन्का कुमार गौरव की कोण तो याने त्याच्या बाबांकडे व्यक्त केली होती

विकास's picture

18 Feb 2011 - 2:08 am | विकास

माझ्या मते प्रेम कथा म्हणजे चित्रपटात नायक नायीकांमधील फुलत जाणारे प्रेम हा मुख्य विषय असावा.

यश चोप्रांच्या/यशराज बॅनरच्या बर्‍याच चित्रपटांना प्रेमकथा म्हणावे लागेल: उदाहरणार्थ, डाग, कभीकभी, सिलसीला, चांदनी, लमहे, डर, दिल तो पागल है, हमतुम, बंटी और बबली, वगैरे सर्वच आले.

कंक (KANK) मात्र स्वैरप्रेमकथा आहे असे वाटले.. असो!

नायीकेचे प्रेम नसतानादेखील नायकात झालेला बदल नन्तर नायकाने नायीकेला तिचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी केली मदत हे त्या कथेला वेगळ्या धर्तीची प्रेमकथा बनवतात.

अशाच पद्धतीने इतर अनेक चित्रपट हे प्रेमकथा ठरत जातात. बघताक्षणी (फर्स्ट साईट) पेक्षा अनुभव/सहवासातून तयार होणारे प्रेम हे बर्‍याचदा चित्रपटाचा गाभा होत जाते आणि प्रेमकथा होऊ शकते असे वाटते.

चित्रा's picture

18 Feb 2011 - 2:34 am | चित्रा

चित्रपटात नायक नायीकांमधील फुलत जाणारे प्रेम हा मुख्य विषय असावा. प्रेम प्राप्त करण्यासाथी .. स्वभावात/ वागण्यात बदल होतो. नायकाला नायीका ऑर व्हाईस व्हर्सा स्वतःच्या पायावर.. उभे रहायला मदत करते स्वाभीमान देते . पण जे काही घडते ते प्रेमासाठीच.

रजनीगंधा ही एका तरुणीच्या मनातील हिंदोळ्यांची कथा होते , त्यातील नायक अथवा नायीका प्रेमासाठी काहीच करत नाहीत. ( अमोल पालेकर निशीगंधाची फुले आणतो इतकेच)
प्रेमासाठी काहीच करत नाहीत?
रजनीगंधा एका आधुनिक सुशिक्षित तरूणीच्या मनातली हिंदोळ्यांची कथा आहे हे खरे आहे. पण हिंदोळे हे जॉब मिळावा, घर मिळावे, केवळ अशासाठी नाहीत तर मन भरून टाकेल असा प्रियकर हवा आहे म्हणून आहेत. प्रेम कळायला काही लोकांना वेळ लागतो. जमल्यास नंतर परीक्षण टाकेन, नाहीतर कोणीतरी टाका, मी भर घालीन. :-)

टारझन's picture

18 Feb 2011 - 11:43 am | टारझन

लागा चुनरी मे दांग :)

नगरीनिरंजन's picture

18 Feb 2011 - 11:50 am | नगरीनिरंजन

देव डी?

वपाडाव's picture

21 Feb 2011 - 11:57 am | वपाडाव

LSD नको का?

नितिन थत्ते's picture

18 Feb 2011 - 1:13 pm | नितिन थत्ते

मला सत्या (चक्रवर्ती, उर्मिला मातोंडकर) हा प्रेमकथापट आवडला होता.

५० फक्त's picture

18 Feb 2011 - 2:39 pm | ५० फक्त

ओंकारा व मकबुल मधली प्रेमप्रकरणं काय वाईट आहेत, इथं तर आख्खे पिक्चरच एक -दोन प्रेमप्रकरणाभोवती फिरतात. बाकी मारामारी, गुंडागर्दी सगळी तोंडीलावणं वाटतात.

नायक आणि नायिकेच्या दोन जोड्या, त्यातिल एक नायक कधीच दिसत नाही आणि दुसरा फक्त फोटोत आणि तरी सुद्धा प्रचंड सुंदर रंगवलेल्या कथेमुळं आवडलेला पिक्चर म्हणजे --- डोर, कथेमुळं, गुल पनाग, आयिषा ताकिया, श्रेयस तळपदे आणि मागे उभे राहायला नागेश कुकनुर व गिरिश कर्नाड. असो, सगळं इथंच लिहित नाही, आता पुन्हा एकदा पाहुन लिहितो यावर.

आणि विर्झारा म्हणजे बिन्डोक मनुष्याच्या प्रेतात्म्याच्या तिस-या पिढिच्या सहाव्या मुलीच्या नवव्या नातिच्या दुस-या मुलाला डोकेदुखी करवु शकेल असा चित्रपट. एका मित्रानं आग्रह करुन तिकिटं काढुन पाहायला नेला होता, १५ मिनिटांत तिकिटाचे पैसे व वर सव्वा रुपाया त्याच्या हातात ठेवुन बाहेर पडलो होतो.

हर्ष.

वपाडाव's picture

21 Feb 2011 - 12:09 pm | वपाडाव

आडवले...
एकदम...
ऑफबीट चित्रपटांची आपल्याला आवड आहे हे समजल्याने आणंद जाहला...
ओमकारा मधील एक डायलॉग
"हमारे दोनो की किस्मत गधे .........."

५० फक्त's picture

25 Feb 2011 - 1:11 pm | ५० फक्त

राईट हो मला आवडलेला एकदम वास्तवदर्शी डायलॉक म्हणजे

कोसे टु कक - क्या बना रहि हो ?
कक - जी उनके लिये हलवा.
कोसे - बडे प्यार से पका रही हो, क्यो?
कक - हां, मैने सुना है, मर्द के दिलतक जानेका रस्ता उसके पेटसे जाता है? -( इथं कक वासुदेव अर्जुनाला गीता सांगत असल्याच आव आणते)

आणि यानंतर - कोसे - हां, नही मालुम था, हमनें तो सुना था थोडा निचेसे जाता है.

असंच काही जबरद्स्त डायलॉक व सिन मकबुल मध्ये आहेत.

असुर's picture

18 Feb 2011 - 10:29 pm | असुर

अमोल पालेकर आणि विद्या सिन्हाचा 'छोटी सी बात'! हळूवार फुलत जाणारी प्रेमकथा असलेला हा चित्रपट मला स्वत:ला प्रचंड आवडतो.

--असुर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Feb 2011 - 10:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमोल पालेकर आणि विद्या सिन्हाचा 'छोटी सी बात'! हळूवार फुलत जाणारी प्रेमकथा असलेला हा चित्रपट मला स्वत:ला प्रचंड आवडतो.

मलाही 'छोटी सी बात' आवडतो.

-दिलीप बिरुटे

छोटा डॉन's picture

21 Feb 2011 - 2:17 pm | छोटा डॉन

'छोटी सी बात' ही खरोखर उत्तम लव्हस्टुरी आहे, जास्त गजबजाट नसलेल्या मला हा जास्त आवडतो

- छोटा डॉन

प्राजु's picture

26 Feb 2011 - 12:05 am | प्राजु

खूप खूप आवडतो हा चित्रपट. अगदी मनापासून .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Feb 2011 - 10:58 pm | निनाद मुक्काम प...

भावनेपेक्षा कर्तव्य थोर असते असा सारांश असलेला प्रणय पट म्हणंजे कासाब्लांका
१९४० च्या दशकात जगाचा भूगोल बदलला गेला .तेव्हा राष्ट्रीय अस्मिता व ज्वाज्वल्य देशाभिमान हे जगातील दुसर्या महायुध्धाशी संबंधित राष्ट्र व त्यांच्या कॉलनी येथे सर्रास आढळत .
ह्याच पार्श्वभूमीवर घडलेले कथानक म्हणजे कासाब्लांका
पल्लेदार संवाद व उत्कृष्ट क्यायमेक्स ब सहज सुंदर नैसर्गिक अभिनय हे ह्या सिनेमाचे बलस्थान

नोट बुक हि एक अशीच नितांत सुंदर कथा
ह्याच्यात प्रेम आणि त्यांनतर विवाह व शेवटच्या क्षणा पर्यत साथ देण्याची प्रेमी जीवाची प्रवृत्ती हा अगदी हिंदी शिनेमा सारखी वाटणारी कथा हि सर्वच बाबतीत उजवी आहे .

बाकी बॉलीवूड मध्ये हम दिल दे चुके सनम / मला खूप आवडतो .

तर एकतर्फी प्रेमाचा कभी हा कभी ना पण चाबूक (ह्यात नायकाचे एकतर्फी प्रेम ) कुंदन शाह ची अप्रतिम कथा

दुसरा आम्हा दांपत्यांचा आवडता प्रणय पट म्हणजे डर्टी डान्सिंग
आपल्यासारखी गाण्याची रेलचेल व दोन प्रेमिजीवांच्या मध्ये सामाजिक विषमता त्यात गैरसमज व शेवटचा जगप्रसिध्ध गाणे तैम ऑफ माय लाइफ (हा सिनेमा अमेरिकन सिनेमात क्लासिक मध्ये गणला जातो .
पेट्रिक स्वेसी हा तारा उदयास आला . एरोटिक पदलालित्य असणारा नृत्य प्रकार खूपच लोकप्रिय झाला .जगात ह्या गाण्यांवर विशेष थीम पार्टीज सुरु झाल्या .
असाच नाचायागाण्याने क्लासिक मध्ये गणला जाणारा जॉन त्रोवेल्ता चा ग्रीस पण कॉलेज जीवनातील धमाल सिनेमा (ह्यातील गाणी कमालीची लोकप्रिय )

हिरवनीच्या आई बरोबर अफेअर असणारा पण कालांतराने तिच्या मुलीच्या खर्या प्रेमात पडणारा अमेरिकन सिनेमा ग्रेजुएत हा सिनेमा सुद्धा क्लासिक मध्ये गणला जातो .
ह्या सिनेमात हिरवनीची आई नुकत्याच ग्रदुएत झालेल्या हॉफमन ला ( जी त्याच्या वडिलांच्या खास मित्राची बायको असते व होरोला लहानपणापासून ओळखत असते ) जेव्हा जाळ्यात ओढते तो जगप्रसिध्ध प्रसंग
येथे
अजून काही सिनेमे आहेत ते परत कधीतरी

परिकथेतील राजकुमार's picture

25 Feb 2011 - 1:46 pm | परिकथेतील राजकुमार

कर्तव्यापेक्षा भावना थोर असते असा सारांश असलेला प्रणय पट म्हणंजे अनुभव
१९८० च्या दशकात सिनेमाचा इतिहास बदलला गेला . तेव्हा हिरोची शिग्रेट व हिरवणीचे देहप्रदर्शन हे जगातील पहिल्या काही करमणुकप्रधान प्रेमकथेत सर्रास आढळत .
ह्याच पार्श्वभूमीवर घडलेले कथानक म्हणजे अनुभव
वळणदार शरिर व उत्कृष्ट क्यामेरावर्क व रंगीबेरंगी प्रसंग हे ह्या सिनेमाचे बलस्थान.

ह्या चित्रपटातले सगळेच प्रसंग जगप्रसिद्ध आहेत पण मिपा प्रगल्भ आहे की अप्रगल्भ ते ठरले की त्यांची लिंक देण्याचा विचार आहे.

विजुभाऊ's picture

25 Feb 2011 - 3:12 pm | विजुभाऊ

"अनुभव" म्हणजे तोच ना
शेखरसुमन पद्मिनी कोल्हापुरे रीचा शर्मा वगैरे वगैरे
परा..... धन्य धन्य ती प्रदक्षणा सद्गुरु पराची

परिकथेतील राजकुमार's picture

25 Feb 2011 - 5:59 pm | परिकथेतील राजकुमार

तोच तोच हो.
पण त्यात पद्मा खन्ना होती हो ;) रीचा नाही.