चिकन मोमो

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
12 Feb 2011 - 4:11 am

मोमो, एक खास तिबेटीयन पाकृ आहे. तिबेटसह हा खाद्यप्रकार संपुर्ण ईशान्य भारत, नेपाळ व हल्ली मुंबई, पुण्यासारख्या शहरात देखील झपाट्याने प्रसिद्ध होत आहे.
मी ह्या पाकृ मधे चिकन वापरले असले तरी तुम्ही त्या जागी पोर्क, बीफ, मटण किंवा हे पुर्णपणे शाकाहारी देखील बनवु शकता.

साहित्यः

चिकन खिमा - ५०० ग्रॅम
मैदा - २ वाटी
कांदा - १ वाटी बारीक चिरलेला
कोबी - १/२ वाटी
कांद्याची पात - १/२ वाटी
ढोबळी मिरची - १/४ वाटी
आले, लसुण - २ चमचे बारीक चिरुन
काळी मिरी पावडर - १ चमचा
सोया सॉस - १/२ चमचा
व्हिनेगर- १/२ चमचा
मिठ चवीनुसार

कृति :

१. मैदा थोडे मिठ टाकुन पोळीच्या कणिक प्रमाणे मळुन घ्यावा.
२. चिकन खिमा स्वच्छ धुवुन १५-२० मिनिटे निथळत ठेवावा.
३. कांदा, कांद्याची पात, कोबी, ढोबळी मिरची, आले, लसुण हे सर्व बारीक चिरुन घ्यावे.
४. कढईत तेल गरम झाल्यावर आले, लसुण टाकुन परतुन घ्यावे.
५. आले, लसुण परतल्यावर कांदा टाकुन परतावा.
६. त्या मधे कोबी, ढोबळी मिरची टाकुन परतावे.
७. थोडा वेळ परतल्यावर त्यात चिकन खिमा टाकुन चांगले परतुन घ्यावे.
८. खिमा थोडा शिजल्यावर व चिकनला सुटलेले पाणी पुर्णपणे आटल्यावर त्यात सोया सॉस, व्हिनेगर व काळी मिरी पावडर टाकुन मिक्स करावे.
९. चवीप्रमाणे मिठ व चिरलेली कांद्याची पात टाकुन निट हलवावे. हे तयार झालेले सारण ताटली मधे काढुन थोडा वेळ थंड होउ द्यावे.
१०. मैदाच्या बनवलेल्या कणके मधुन एक छोटा गोळा घेउन त्याची छोटी पुरी लाटुन घ्यावी.
११. करंजीला सारण भरतो, त्या प्रमाणे वरील गार झालेले चिकनचे सारण भरावे.
१२. फोटो मधे दाखवल्याप्रमाणे जर चुन्या घालता येत असतील तर त्या घालाव्यात किंवा त्याला तुम्ही मोदकां सारखा आकार देउ शकता. तेही न जमल्यास करंजी सारखा आकार द्यावा.
१३. हे मोमो तुम्ही deep fry किंवा मोदकां प्रमाणे उकडुन घेउ शकता.
१४. हे मोमो शेजवॉन सॉस सोबत गरम serve करावे.

टिप:

१. मोमो करताना तुम्ही मैद्या एवजी गव्हाचे पीठ वापरु शकता. खाली दिलेल्या फोटो मधे मी गव्हाचे पीठ वापरल्यामुळे त्याचा रंग brown आला आहे.
२. शाकाहारींसाठी ह्या सारणा मधे चिकनच्या जागी मश्रुम, sweet corn वापरु शकतील.

momos

प्रतिक्रिया

लवंगी's picture

12 Feb 2011 - 4:39 am | लवंगी

थोडासा डंपलिंगसारखा दिसतोय ना..

योगेश गाडगीळ's picture

13 Feb 2011 - 5:55 pm | योगेश गाडगीळ

डंपलिंगमधे आणि मोमो मधे फार फरक नाही. मोमोला तिबेटी डंपलिंग म्हणता येइल.

गोगोल's picture

12 Feb 2011 - 4:39 am | गोगोल

तोंडाला पाणि सुट्ले.
डंपलिंग्ज सारखे दिस्तेय.

Mrunalini's picture

12 Feb 2011 - 4:53 am | Mrunalini

हो, बरोबर आहे. dumplings चाच प्रकार आहे. फक्त dumplings मधे Italian stuffnig असते.

Mrunalini's picture

12 Feb 2011 - 5:51 pm | Mrunalini

sorry. मी इथे चुकुन dumplings मधे Italian stuffnig असते असे लिहले आहे.
italian stuffing हे ravioli मधे असते आणि dumplings मधे साधारण वरील चिकनच्या सारणा प्रमाणेच असते.

सहज's picture

12 Feb 2011 - 6:08 am | सहज

पुन्हा एकदा फोटोही मस्त.

चित्रा's picture

12 Feb 2011 - 8:01 am | चित्रा

असेच म्हणते. आकर्षक मांडणी.

मीली's picture

12 Feb 2011 - 8:51 am | मीली

मस्त दिसत आहेत मोमो..!
एखादा कट करून दाखवला असता तर खिम्याचे पण दर्शन झाले असते.
करून बघायला हवेत..

यशोधरा's picture

12 Feb 2011 - 9:01 am | यशोधरा

काय सुरेख दिसत आहेत मोमो! मस्त आहे पाककृती :)

ताटात कुंकवाचा ठिपका ठेवल्या सारखा दिसतोय :) मोमो कसे लागतील ह्या कल्पनेने तोंड मात्र लाळावले :)

- कामापुरता चिकन मोमो

शिल्पा ब's picture

12 Feb 2011 - 9:55 am | शिल्पा ब

इतका कुटाना करण्यापेक्षा हाटेलात खाल्लेले बरे..दिसताहेत छान.

मोमो बनवायला खूपच सोपे आहेत.. आणि शाकाहारी पर्याय दिल्याबद्दल धन्यवाद मृणालिनीताय...

- पिंगू

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2011 - 12:25 pm | पिवळा डांबिस

शाकाहारी बनवायचे झाल्यास चिकन, पोर्क, बीफ च्या ऐवजी काय वापरायचं?
कलेसाठी कला म्हणून....

तुम्ही त्यात चिकन ऐवजी मश्रुम, sweet corn, कोबी, ढोबळी मिरची, कांदा, कांद्याची पात हे वापरु शकता.

सही रे सई's picture

3 Aug 2016 - 12:54 am | सही रे सई

पनीरचा खिमा पण वापरता येईल.

कच्ची कैरी's picture

12 Feb 2011 - 1:55 pm | कच्ची कैरी

मस्त दिसताय मोमोज !करुन बघावे लागतील.

स्वाती२'s picture

12 Feb 2011 - 4:07 pm | स्वाती२

छान दिसतायत.

छान दिसतायत. अगदी निगुतीने चुण्या घातल्यात आणि मांडणीही छान.
मी फक्त एकदा व्हेज मोमोज् खाल्लेत. त्यात हिरवे मूग आणि कांद्याची पात होती हे आठवते आहे.

डम्प्लिंग हे चायनिज असतात माझ्या मते.. :) आणि बहुधा ते राईस फ्लोर मध्येच असते. (चु.भु.द्या.घ्या.)
वरील प्रकार ही चांगला वाटतो आहे.
मी उकडीच्या मोदकाचा फोटो ऑर्कुट वर टाकलावर माझ्या एका पंजाबी मैत्रीणीने फोन वर "वोह क्या ड्म्प्लिंग्ज बनाये है??" असं विचारलं होतं.. :(

"वोह क्या ड्म्प्लिंग्ज बनाये है??"
खीखीखी

नाटक्या's picture

13 Feb 2011 - 12:37 am | नाटक्या

यांनाच चिकन (किंवा पोर्क, बिफ, व्हेजी) पॉट्स्टीकर असेही म्हणतात. तसेच चायनिज लोक यांना ग्योझा असे म्हणतात. पाकृ सारखीच आहे.

http://frolickingfoodie.blogspot.com/2008/03/gyoza-chicken-and-ginger.html

http://healthy-eating-plans.com/snack-recipes-chicken-vegetable-dumpling...

आणि हे काही जालावरचे फोटो.

http://healthy-eating-plans.com/wp-content/gallery/snack-recipes-kids/ch...

आणि हे अमेरिकेत तयार मिळतातः http://heateatreview.com/2006/12/02/trader-joes-chicken-gyoza-potstickers/

एकदा एका हाटेलातील वेटरने 'खाऊनच बघा' असा आग्रह केल्याने उकडलेले शाकाहारी मोमो खाल्ले होते..पदार्थ आवडला नसल्याचे त्याला त्वरीत सांगितले होते..आठवण झाली प्रसंगाची :)

गुंडोपंत's picture

14 Feb 2011 - 9:27 am | गुंडोपंत

उकडीचे कोंबडीचे मोदक म्हणा की सरळ!
बरंय म्हणा मोमो म्हंटलं की अगदी सात्विक असं वाटत नाही. मग समीष खायला मोकळे!
हे नाव पूर्वी मुमो म्हणजे मुर्गी के मोदक असे होते काहो? ;)

असो,
छान आहे.

बेसनलाडू's picture

15 Feb 2011 - 2:51 am | बेसनलाडू

याला मी चायनीज मोदक म्हणतो. गणपतीबाप्पाचे डोळे लहानच असल्याने चीनशीही त्याचे काही नाते असावे आणि त्याला हे मोदक चालत असावेत, असेही मला कधीकधी वाटते.
(गणेशभक्त)बेसनलाडू

गुंडोपंत's picture

15 Feb 2011 - 8:03 am | गुंडोपंत

मजेदार उत्तर - आवडले!

चीनमध्ये अनेक मंदिरे आहेत म्हणे. एका प्रांतात तर अननसदेवीचे मंदिर आहे असे ऐकून आहोत.
गणपतीचीही मंदिरे तेथे असावीत. पण कम्युनिस्ट कालौघात...

पिलीयन रायडर's picture

2 Aug 2016 - 7:53 am | पिलीयन रायडर

आज कणकेचे मोमोज / डंपलिंग्स करुन पाहिले. तसे लागतात चांगले पण "आडजीभ खाय आणि पडजीभ बोंबलत जाय" प्रकार आहे. भरपुर वेळ असताना आणि अजिबात भुक नसताना करुन पहाण्याचा पदार्थ!

momo

हाहाहाहा.. अगं जास्त करायचे ना.. मी करते तेव्हा जेवायलाच करते. मोमो करुन ठेवायचे आणि आयत्यावेळी सगळे एकत्र उकडुन घ्यायचे.

त्या चुण्या कशा घालायच्या हे कोणी शिकवू शकेल का?

मला "खोट्या चुण्या" घालता येतात. म्हणजे करंजी साध्या पद्धतीने बंद करायची आणि मग 'शिवणी'वर फोर्कची मागची बाजू दाबून नक्षी काढायची. दिसतं छान, पण चुण्यांचं मूळ कार्य (तळताना उकलू नये) पूर्ण होतंच असं नाही.

पिलीयन रायडर's picture

2 Aug 2016 - 10:26 pm | पिलीयन रायडर

मलाही सांगा. ते दिसतं फार सुंदर पण अजिबात जमत नाही. माबोवर दिनेशदांनी नुकतीच जी मोमोज ची पाकृ टाकली आहे, त्यातही फार सुंदर दिसत आहेत ते मोमोज..

पावसात गरम गरम वाफाळलेले मोमोज...वाह!
बाकी तंदूर मोमोज अजून जास्त भारी लागत असावेत.