गोंधळ ...
धर्म. क्रिकेटचा धर्म. राजधर्म. लोकधर्म. भारताचा धर्म! जिन्कण्याचा धर्म! उर्मीचा धर्म!
धर्मकार्याची सुरुवात गोंधळाने करण्याची परंपरा...!
या २०११ विश्वमोहिमेची सुरुवात आई भवानीला साकडं घालून करूयात...!
गोंधळ मांडीला..आज या गोंधळाला यावे.....
गणराज गणपती लवकर यावे...
अंबाई..शिवाई लवकर यावे...
लवकर यावे...लवकर यावे...
भाळी विजयाचे दान द्यावे...
पराक्रमाचे अतुल दान द्यावे..!
भवानी आई लवकर यावे...आता लवकर यावे...!
गोंधळाला ये आई आता गोंधळाला ये.....
सचिनला विजयी स्फुर्ती दे...!
गोंधळाला ये भवानी आता गोंधळाला ये.....
धोनीच्या बाहूत गजबळ दे..!
गोंधळाला ये तुळाई आता गोंधळाला ये.....
वीरुला शत अश्वबळ दे...!
गोंधळाला ये शिवाई आता गोंधळाला ये.....
गंभीरला लक्ष आशीर्वाद दे..!
गोंधळाला ये जनाई आता गोंधळाला ये.....
सुरेशला चित्ता चपळाई दे..!
गोंधळाला ये भिवाई आता गोंधळाला ये.....
युवीला अंगी एकाग्राई दे..!
गोंधळाला ये सर्वाई आता गोंधळाला ये.....
युसुफला रक्षण अखंडायी दे..!
गोंधळाला ये पद्माई आता गोंधळाला ये...
भजनला फिरत चौखंडी दे..!
गोंधळाला ये प्रभाई आता गोंधळाला ये.....
झहीरला अंगार विलक्षण दे..!
सहस्त्रासूर मर्दीनी.., शन्खचक्रधारीणी
अग्निरूपस्वरूपचन्डिका...धावून येई...!
अंगात भिनू दे शौर्य..अपरंपार..
रक्षण कर, देई धैर्य..सदैव..
विजय पताका तुज कमानी...
फडकावीन दिन २ एप्रिल रविवारी...!
|| आईचा उदो....उदो....||
प्रतिक्रिया
10 Feb 2011 - 1:18 pm | अवलिया
छान !
10 Feb 2011 - 1:42 pm | छोटा डॉन
धन्यवाद विकालशेठ,
ह्या सदराची सुरवात आपल्या 'गोंधळा'ने झाली ही भाग्याची गोष्ट आहे.
आभारी आहे.
- छोटा डॉन
10 Feb 2011 - 6:02 pm | निखिल देशपांडे
असेच म्हणतो...
10 Feb 2011 - 6:13 pm | गणपा
चांगभलं :)
10 Feb 2011 - 6:05 pm | गणेशा
एकदम झकास
10 Feb 2011 - 6:25 pm | विकाल
आभारी आहे.