'मिपा-क्रिकेट विश्वचषक २०११' सदराचा शुभारंभ ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in क्रिडा जगत
10 Feb 2011 - 9:45 am

नमस्कार मंडळी,

आजपासुन आपण इथे मिसळपाव.कॉम च्या 'मिपा-क्रिकेट विश्वचषक २०११' ह्या सदराची सुरवात करत आहोत. ह्यासाठीच आपण खास 'क्रिकेट' नावाचा लेखनप्रकार चालु केला आहे. तुम्हाला 'लेखन करा' ह्या पर्यायामधुन आता 'क्रिकेट' नावाचा पर्यायही दिसेल जो आपल्याला खास ह्या विश्वचषक स्पर्धेनिमित्त बहाल केला आहे.

तुम्हाला विश्वचषक स्पर्धेच्या तयारीबद्दल लिहायचे आहे, तुम्हाला एखाद्या संघाबद्दल लिहायचे आहे, एखाद्या खेळाडुबद्दल लिहायचे आहे, एखाद्या प्रत्यक्ष पाहणार असलेल्या सामन्याबद्दल लिहायचे आहे आणि तो अनुभव इथल्या लोकांसमवेत शेअर करायचा आहे तर हात मोकळे सोडुन मुक्तपणे ...मिपा-क्रिकेटमध्ये लिहा !
तुम्हाला जुन्या आठवणी जागवायच्या आहेत, तुम्हाला तुमचे लहानपणीचे क्रिकेट-जीवन पुन्हा जगायचे आहे, तुम्हाला क्रिकेट आणि तुमचे आयुष्य ह्यांच्यातके ऋणानुबंध कागदावर उतरवायचे आहेत, तर मग बिनधास्त लिहा ... मिपा-क्रिकेटमध्ये !
तुम्हाला एखाद्या सामन्याआधी, सामना चालु असताना, सामना संपल्यावर गरमागरम चर्चा करायची आहे, वाद घालयचा आहे, मते मांडायची आहेत, अहो मग लिहा ना .... मिपा-क्रिकेटमध्ये !
तुम्हाला क्रिकेटची सांख्यिकी, आकडेवारी, जुने रेकॉर्ड्स ह्यासंबंधी लिहायचे आहे ... मिपा-क्रिकेट आहे ना मालक !
क्रिकेटवर कविता लिहली आहे, चुटके / विनोद आठवत आहेत, एखादा किस्सा सांगु वाटतो ... मिपा-क्रिकेट आहेच !

मिपा-क्रिकेट तुमच्यासाठी आहे कारण मिपा आणि क्रिकेट हे दोन्हीही तुमचेच आहे !
लुटा मग ह्या विश्वचषकाचा आनंद मिपा-क्रिकेट समवेत ...

ह्यासोबत आम्ही तुम्हाला देऊ ...

१. विश्वचषकसंबंधीत प्रत्येक दिवसाच्या महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी
२. संघ, खेळाडु, सामने ह्यांची शक्य तितकी सविस्तर माहिती
३. जोरदार रंगलेल्या आणि अटतटीच्या सामन्यांचा आँखोदेखाँ हाल आणि परिक्षणे
४. मजेदार कौल आणि स्पर्धा
५. सामन्यांचे फोटोफिनिश .. अर्थात फोटो परिक्षण
६. सर्व सर्व आकडेवारी, गुणतक्ता, स्पर्धेची वाटचाल आणि आगामी शक्यतांची माहिती
७. समृद्ध व्हिडिओ-गॅलरी

काय मग आहात ना तयार ?
आहात ना आमच्यासोबत ?

चला, ह्या क्रिकेट-विश्वचषक : २०११ चे रंग पाहुयात आणि ह्या रंगात बेहोश होऊन रंगुयात ... मिपा-क्रिकेटसंगे.

टीप :
खास विश्वचषक-२०११ ह्या स्पर्धेला समर्पित असलेले खास 'मुखपृष्ठ' लवरकच तयार करुन ते सर्वांसाठी खुले करण्यात येईल.
तुर्तास उपलब्ध लेखनप्रकारात 'क्रिकेट' नावाच्या नव्या खास तयार केलेल्या लेखनप्रकाराचा समावेश करुन तो सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे, आपापले क्रिकेटसंबंध लेख टाकण्यासाठी ह्याचा वापर करावा ही विनंती.

- मिपा : क्रिकेट विश्वचषक २०११ चमु

ता.क. :
ह्या लेखातली आणि इथुन पुढे येणारी सर्व छायाचित्रे ही आंतरजालावरुन साभार आहेत / असतील. त्यांची श्रेयनोंद इथे केली आहे.

क्रिकेट

प्रतिक्रिया

इन्द्र्राज पवार's picture

10 Feb 2011 - 9:55 am | इन्द्र्राज पवार

आनंदसागरात डुबकी मारण्यास एकदम तयार आहे. तुमच्या लिखाणाच्या धाटणीवरून खुद्द तुम्ही या विषयाबाबत मोहून गेला आहात हे स्पष्टच आहे, त्यामुळेही १९ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०११ या कालावधीत मिपावर "धूम मचाये...|" होत राहणार हे नि:संशय.

आत्ताच पेपरमधून 'जाहिरात' युद्धाच्या बातम्या वाचत होतो. तिकडे लक्ष गेलेच....आत्ता त्या 'कट टु थ्रोट' स्पर्धेमुळे एक 'ओव्हर' संपल्यानंतर जाहिरातींचा जो महापूर पडद्यावर आदळणार आहे, तो दुसर्‍या ओव्हरमधील पहिला चेंडू टाकून झाल्यानंतरही थांबणार नाही याची सार्थ भीती वाटत आहे. शिवाय 'स्लो मोशन'चीही वाट लागणार आहे.,......फलंदाज बाद झालेल्या क्षणीच जाहिरात येणार ! रेडिओचीही तिच गत होणार आहे....तेथील धावते वर्णन तर 'चौकार' "षटकार" झाला तरी थांबते हल्ली....म्हणजे एक चौकार लगावला तेंडुलकरने....की, झटकन....'या बाऊंडरीचे प्रायोजक होते...." सुरू.

पण चालायचेच....आनंद त्यातूनही घेणारच....शिवाय येथील हा नवीन विभाग ~ "क्रिकेट...."

इन्द्रा

वा.. सुरुवात झाली तर

या क्षणी भारतीय संघाला बसलेला धक्का म्हणजे " प्रवीण कुमार ची विश्व चषकातून एक्झिट"
हा खरच मोठा धक्का आहे.
एकतर आधीच भारतीय संघात चांगल्या गोलंदाजांची वानवा, त्यात प्रवीण बाहेर.
श्रीसंथ ला घेतलाय खरा पण तो कितपत यशस्वी होईल देव जाणे, कारण भारतीय पीच वर, वेगा पेक्षा अचूक गोलंदाज जास्त यशस्वी होतात
झहीर वरचा भार परत एकदा वाढलाय :(

तुम्हाला काय वाटत ?
प्रवीण ची (भप्कर नव्हे) एक्झिट भारताला महाग पडेल?

श्रीसंथ ला घेतलाय खरा

तो संथ नाय रे शिंच्या तो फास्ट बोलर आहे. कुठुन येतात राव हे?

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Feb 2011 - 10:33 am | ब्रिटिश टिंग्या

डानराव!

टारझन's picture

10 Feb 2011 - 10:41 am | टारझन

या धिंगाणाका तिंगाणाका .. धत्ताड तत्ताड .. धताड तत्ताड ...

णाईण डेज टु गो :)

९ डेज अहो मि. टारझण सराव सामने परवापसुनच चालु होतायत.. आहात कुठे? ;)
पण यांच प्रक्षेपण कदाचीत दुरदर्षन वरुन नसावं :(
एकंदर मज्जा येणार पण.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Feb 2011 - 11:40 am | बिपिन कार्यकर्ते

ह्यॅ: ... बोलायचं काम न्हायी!

असं करु नका, बोला जरुर बोला (खवंत नाय बोल्ला तरी चालेल एकवेळ पण इथे बोला). बाकी आम्ही बोलुच. ;-)

नंदन's picture

10 Feb 2011 - 11:44 am | नंदन

उत्तम उपक्रम!

अवलिया's picture

10 Feb 2011 - 1:03 pm | अवलिया

क्या बात है ! बढिया !!

उ त्त म!! सक्रीय सहभाग असेलच!

धमाल मुलगा's picture

10 Feb 2011 - 3:26 pm | धमाल मुलगा

हौन जावद्या आता धुमडी तिच्यामाऽरी!
आम्ही बसल्यालोच हौत पिटात तोंडं तिरंगी रंगवून. :)

अंय.दोस्ताहोऽ..ढोलताशे न बिगुलं तयार ठेवा रे..म्याच म्याचला निस्ता गल्का उडाला पायजे. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Feb 2011 - 12:13 pm | निनाद मुक्काम प...

प्रवीण कुमार किंवा श्रीशांत काय फरक पडतो ?
पाटा खेळपट्टीवर दोन जलद दोन फिरकी आणि उरलेली १० ओवर कामचलाऊ फिरकी बहाद्दर म्हणजे रैना /पठाण / सेहेवाग/ युवराज

स्वाती दिनेश's picture

11 Feb 2011 - 12:46 pm | स्वाती दिनेश

हे दालन बघून पुढच्या माहौलाची कल्पना करु लागले आहे,
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2011 - 11:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वोक्के बॉस....! क्रिकेटचा आनंद मिपावरही घ्यायचं ठरलंच आहे.

काय मग आहात ना तयार ?
आहात ना आमच्यासोबत ?

आरं हैना भो आम्ही तुमच्या सोबत.
डॉन आजच्या दै.लोकमत मधे आलेल्या या ललनेचा केशसंभार लैच आवडला राव आपल्याला. :)
वॊव.

-दिलीप बिरुटे