मराठी अभ्यास परिषद संकेतस्थळ

आजानुकर्ण's picture
आजानुकर्ण in काथ्याकूट
2 May 2008 - 9:18 am
गाभा: 
  • मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे.
  • लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.
  • ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
  • मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे

या उद्दिष्टांसाठी काम करीत असलेल्या 'मराठी अभ्यास परिषदेच्या' संकेतस्थळाचे काल मंगल महाराष्ट्रदिनी उद्घाटन झाले. सन्माननीय मिसळपाव सदस्य श्री. चित्तर यांनी या संकेतस्थळाची रचना केलेली आहे.

संकेतस्थळाचा दुवा: http://www.marathiabhyasparishad.com/

आंतरजालावर मराठी भाषेच्या प्रचाराच्या व प्रसाराच्या दृष्टीने हे आणखी एक नवे पाऊल ठरावे असे वाटते!

परिषदेतर्फे 'मराठी अभ्यास परिषद पत्रिका : भाषा आणि जीवन' त्रैमासिक १९८३ पासून नियमितपणे प्रकाशित होते.
ह्या नियतकालिकाला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (१९९५) प्राप्त झाला आहे. मराठी ज्ञानक्षेत्रात प्रतिष्ठा लाभलेल्या हे त्रैमासिक भाषेला वाहिलेले एकमेव नियतकालिक आहे.
भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा, भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य यासोबतच अनेक चुरचुरीत सदरे मासिकात वाचायला मिळतात.

संकेतस्थळाच्या माध्यमातून मासिकात पूर्वप्रसिद्धी मिळालेले काही निवडक लेख पुनर्प्रकाशित करण्यात येतील.

या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी. आपल्या मित्रमंडळींनाही अवश्य सांगावे.
काही सूचना, प्रतिक्रिया, अभिप्राय असल्यास अवश्य कळवावेत. ही विनंती.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

2 May 2008 - 9:30 am | विसोबा खेचर

भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श,

बापरे! भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श?? बोंबला तिच्यायला! हे भारीभक्कम शब्द वाचूनच आमच्यासारख्या अडाणी माणसाला फीट यायची वेळ आली! :))

असो,

सदर संस्थळाला माझ्या वैयक्तिक व मिसळपाव परिवाराच्या अनेक शुभेछा व सर्व संबंधितांचे अभिनंदन...

तात्या.

गणा मास्तर's picture

3 Jun 2008 - 6:34 am | गणा मास्तर

चांगला उपक्रम वाटला.
मागे यांनी अनिल अवचट आणि अतुल गोडबोले यांचे "मराठी माध्यमातुन शिक्षणाचे फायदे" या विषयावर भाषण आयोजित केले होते.
सकाळमध्ये बातमी वाचल्याचे आठवते.