[ज्योतिष] आयुष्यातील उत्कर्ष आणि मध्यबिंदू ज्योतिष

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
31 Jan 2011 - 12:31 pm

भारतीय ज्योतिषात योग ही एक गुंतागुंतीची कल्पना आहे. त्यात राजयोगाला विशेष स्थान आहे. राजयोगाची फले अनेक असू शकतात पण सहसा एका सामाजिक स्तरातून दूसर्‍या वरच्या सामाजिक स्तरात जाणा-या प्रयत्नवादी, धडपडणा-या व्यक्तींच्या पत्रिकेत राजयोग किंवा इतर शुभ योग कार्यरत असल्याचे मानाले जाते. पण इथे एक गोची आहे, ती अशी की भारतीय ज्योतिषात शुभ योग सतराशे साठ आहेत, शिवाय ते बाबा आदम च्या काळातले आहेत. राजयोगाना निष्फ़ल करणारे योग सतराशे साठ गुणिले दोन (कदाचित जास्तच) आहेत. त्यामुळे भारतीय ज्योतिष वस्तुनिष्टपणे अभ्यासणा-यांची भंबेरी उडते.

पाश्चात्य जोतिषात इतकी गुंतागुंत दिसून येत नाही. एक नियम आणि त्याला भरमसाठ अपवाद असा प्रकार त्यात नाही. उत्कर्ष आणि अपकर्ष सांगणारे नियम तूलनेने कमी. त्यामूळे एक प्रकारचा सुटसुटीतपणा आधुनिक पाश्चात्य ज्योतिषात आहे. याला अपवाद फक्त अर्वाचीन पाश्चात्य ज्योतिषाचा. तिथे भारतीय ज्योतिषासारखाच अंदाधुंद कारभार आहे. पण तरीही भारतीय ज्योतिष गोंधळाच्या बाबतीत एकमेवाद्वितीय आहे (पुण्या-मुंबईकडचे बरेच ज्योतिषी मात्र याला अपवाद आहेत).

मध्यबिंदू ज्योतिषात आधारभूत कल्पना सुटसुटित असल्याने नियमांची उतरंड हाताळायला जास्त सोपी. उत्कर्ष मध्यबिंदू ज्योतिषात कसा बघायचा हे एकदा मी माझी अमेरीकन गुरु मॅरी डाऊनिंग हिला विचारला होता. तिने मला उत्तर दिले पण त्या अगोदर लांबलचक इमेल लिहून उत्कर्ष कसा बघायचा नाही हे सांगितले. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसाधारणपणे उत्कर्ष झालेल्या व्यक्तींच्या कुंडल्या अभ्यासून नियम बनवले जातात. केवळ तसे न करता उत्कर्ष साधण्यासाठी अनेक पूरक घटकांची आवश्यकता असते. संधी (रवी-गुरु), स्वयं-तेज (रवी-मंगळ किंवा रवी प्लुटो) इत्यादि... पत्रिकेतील मंगळाचा (धडपड, प्रयत्न) आणि शनीचा (चिकाटी, अडथळे) दर्जा इत्यादि गोष्टींचा प्रथम विचार करून त्यासाठी पूरक ग्रह रचना आहेत की नाहीत हे मध्यबिंदू ज्योतिष वापरून ठरवावे असे मॅरीने मला सांगितले. मध्यबिंदू ज्योतिषातील गुरु-प्लुटो हा मध्यबिंदू "अमाप यशाचा" कारक सांगितलेला आहे. या बिंदूशी रवी जर युती, प्रतियुती किंवा केंद्र योग करत असेल तर त्या व्यक्तींचा आयुष्यात कधीना कधी उत्कर्ष होतेच. पुढे परिशिष्टामध्ये १९३५-८५ मध्ये जन्मलेल्या ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरु-प्लुटो हा
मध्यबिंदू रवीशी युती करते, त्यांच्या तारखा दिल्या आहेत.

अधिक वाचण्यासाठी इथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/

ज्योतिष

प्रतिक्रिया

अवलिया's picture

31 Jan 2011 - 12:40 pm | अवलिया

>>>>त्यामूळे एक प्रकारचा सुटसुटीतपणा आधुनिक पाश्चात्य ज्योतिषात आहे. याला अपवाद फक्त अर्वाचीन पाश्चात्य ज्योतिषाचा.

अर्थ कळला नाही.

अर्थ समजुन घेण्यास वेगळा आकार पडेल :)

- निराकार

युयुत्सु's picture

31 Jan 2011 - 1:04 pm | युयुत्सु

अर्थ कळला नाही

लिली, केपलर, टॉलेमी इत्यादि आणि त्यापूर्वीच्या मंडळीनी सांगितलेले नियम गुंतागुंतीचे आहेत.

हम्म. म्हणजे तुम्हाला प्राचीन म्हणायचे आहे का? कारण आधुनिक आणि अर्वाचीन समान अर्थाचे शब्द वाटतात. जास्त प्रकाश जाणकार टाकतील.

कारण आधुनिक आणि अर्वाचीन समान अर्थाचे शब्द वाटतात

तुम्ही म्हणता ते बरोबरं आहे. माझ्या डोक्यात चूकीचा शब्द रजिस्टर कसा झाला कोण जाणे ...

विनायक प्रभू's picture

31 Jan 2011 - 12:47 pm | विनायक प्रभू

त्याशिवाय कार मेंटेन करता येत नाही.
अवलियाला सर्व काही फुअट हवे असते.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2011 - 12:54 pm | llपुण्याचे पेशवेll

तुमचा अभ्यास उल्लेखनीय आहे पण अमेरीकन लोक देखील (पर्यायाने पाश्चात्य देखील ) आपल्याप्रमाणेच ग्रहांचे भ्रमण व त्यांच्या युत्या, प्रतियुत्या,नक्षत्रप्रवेश याचा अभ्यास करतात हे मला ठाऊक नव्हते.

त्यांचा अभ्यास आपल्यापेक्षा जास्त शास्त्रशुध्द असतो

शास्त्रशुद्ध म्हणजे काय फरक असतो नक्की?

कच्ची कैरी's picture

31 Jan 2011 - 1:20 pm | कच्ची कैरी

ज्योतीषशास्त्राविषयी इतके तपशीलवार माहित नव्हते ,तुमच्यामुळे कळले धन्यवाद !

धन्यवाद ,
पण आपण जे लिंक मधेय देता ते येथे पण देत चला अशी विनंती.
साईट्स ब्लॉक आहेत सगळ्या बाकीच्या.

प्रकाश घाटपांडे's picture

31 Jan 2011 - 7:02 pm | प्रकाश घाटपांडे

पण इथे एक गोची आहे, ती अशी की भारतीय ज्योतिषात शुभ योग सतराशे साठ आहेत, शिवाय ते बाबा आदम च्या काळातले आहेत. राजयोगाना निष्फ़ल करणारे योग सतराशे साठ गुणिले दोन (कदाचित जास्तच) आहेत. त्यामुळे भारतीय ज्योतिष वस्तुनिष्टपणे अभ्यासणा-यांची भंबेरी उडते.

अगदी हेच मत डॉ बी एन पुरंदरे यांनी पुण्याच्या वसंत व्याखानमालेत मांडलेले मी ऐकले आहे.