लोकशाही कडून राजेशाही
उत्तर प्रदेशात मायावती, मुलायम, बिहार मध्ये लालू, रबडी, गुजराथ मध्ये मोदी, आंध्र प्रदेशात नायडू, रेड्डी, कर्नाटकात येदुइरपपा, तमिलनाडूत करुणानिधी, जयललिता आणि महाराष्ट्रात 'जाणता राजा' आणि इतर.
गेल्या काही वर्षात या मंडळींचं त्या त्या राज्यात वर्चस्व आहे. त्यांनी (काही अपवाद सोडून) जणू काही राजेशाहीच चालवली आहे असे दिसते. लोकशाही पासून आपण दूर जात आहोत का?
यातील कित्येकांनी आपल्या "मनगटाच्या" जोरावर आपआपला प्रांत आपलाच (आपल्याच बापाच राज्य) असल्यासारखा चालवलेला दिसतो. सत्ता राबवण्यासाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता. असं भयानक चित्र आपल्याला दिसतं. आपली सत्ता पुढच्या पिढीच्या हाती देण्याचाही प्रयत्न कसोशीने केलेला दिसतो. म्हणजेच घराणेशाही आणि राजेशाही दोन्ही चालू राहील व त्या दृष्टीने पुढील पावलं ही मंडळी टाकताना दिसतात. मग त्यांच्या पुढे कोणीही आला तर "सरळ कापून काढू" असं जाणवतं.
नुसतं महाराष्ट्रा बद्दल बोलायचं झालं तर कोकणचा राजा राणे, मराठवाड्यात देशमुख, पश्चिम महाराष्ट्रात पवार, मुंबईत ठाकरे ही आपापली छोटी सत्ता (आपलं वर्चस्व) कायम ठेवताना दिसतात.
या सर्व राजांना अमाप पैसा लागतो, आणि त्यासाठी आत्ता भूखंड, उद्या कदाचित पाणी किंवा काही वर्षात पैशासाठी आणि सत्तेसाठी हे राजे आप आपलं सैन्य तयार करतील व दुसर्याच्या राज्यावर आपलं सैन्य घेवून हल्ला करतील. आपआपसात लढायाही होतील.
याचाच अर्थ आपण ब्रिटीश पूर्वकाळात हळू हळू जात आहोत का? लोकशाही पासून दूर जावून लोक आपला अधिकार गमावतील आणि जुलमी राजा खाली बिचारी प्रजा असं होईल का?
भूषण
प्रतिक्रिया
30 Jan 2011 - 6:43 am | अर्धवटराव
सर्वप्रथम, तुम्ही ज्या लोकशाहीच्या मृत्युविषयी साशंक आहात, ती प्रगल्भ लोकशाही आपल्याकडे अजुन रुजायची आहे. आपली लोकशाही अजुनही बाल्यावस्थेत आहे. पण या लोकशाहीचा राजेशाहीत अंत होणार नाहि. हि लोकशाही तारुण्यावस्थेत पोहोचेल, आणि लोकमानासच देशाचा कारभार चालवेल. थोडा वेळ लागेल, पण असं होण्याची शक्यता जास्त आहे, कारण आपल्याकडे प्रचंड लोकसंख्या आहे आणि हळुहळु सुशिक्षीतपणा देखील वाढतो आहे. इतक्या प्रचंड लोकदबावाला कोणि एक परिवार कंट्रोल करु शकणार नहि.
अर्धवटराव
30 Jan 2011 - 10:24 am | चिरोटा
सहमत आहे. लोकशाहीच्या काही संकल्पना भारतात नक्कीच रुजल्या पण आपले राजकारण लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अजुनही बाल्यावस्थेत आहे. अजूनही अनेकांना फक्त एक माणूस देश बदलू शकतो असे वाटते.सगळ्या राजकरण्यांना 'उडवले' की देशाचे चित्र पालटेल असे अनेकांना वाटते. ही मानसिकता बदलायला थोडा वेळ लागेल.
30 Jan 2011 - 6:54 pm | आत्मशून्य
हेच या पूढील नीवड्णूकींचे नीकश ठरऊ लागतील. म्हणून अजूनही आशा वाटते. विशेषतः जेव्हां पूण्यातील सामान्य जनतेने मध्यंतरी घातल्या गेलेल्या राजकीय-जातीय धूमाकूळाला ज्या पध्दतीने नाकारले, ते बघून नीश्चीतच आशा वाटते.
31 Jan 2011 - 1:20 pm | Bhushan11
आपला आशावाद प्रत्यक्षात येवो अशी परमेश्वराला प्रार्थना.
१९७६ मध्ये कॉंग्रेसचा पराभव करून जनता पक्ष प्रचंड बहुसंख्येने निवडून आला. त्यानंतर परत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस निवडून आली.
त्या वेळी आणि त्यानंतर काही काळ लोकशाही नांदत होती असं मला वाटतं.
पण आता काळ बदलला आणि पुढार्यांना लोकांचा विसर पडत चाललेला दिसतो. निवडणुकान्साठी प्रचंड पैसा उभा केला जात आहे.
मिडीयालां उघडपणे विकत घेतला जात आहे. सामान्य माणसाला निवडणूकीत उभं राहणं केवळ अशक्य. सरते शेवटी याच मोजक्या राजांपैकी कोणीतरी निवडून येतो.
4 Feb 2011 - 7:18 pm | वडिल
ओबामा ला पाकिस्तान बद्द्ल पत्र लिहिणारी लोकं भारतात जास्त आहेत. असली लोकं स्वत: च्या स्वार्था साठि कोणालाहि विकतील.
युवकांनी पुढाकार घेवुन जर क्रांती घडवुन आणली नाहि तर, पुढच्या पिढिला परत गुलाम म्हणुन जगावे लागेल.
राजे महाराजे होते तसे प्रत्येक जाती/प्रांताचे मुखवटे घातलेले नेते, त्यांच्या मागे कॉर्पोरेट लॉबी असेल. बाबुगीरी (मॅनेजरस)साठि एम बी ए फॅक्टरी तुन तयार झालेले निवडक "उच्चशिक्षित" आणि व्यसनाधिन तरुण दर महिन्या च्या इ एम आय भरण्या पोटि अनेक गुलामां कडुन काम करुन घेण्यात गर्क... हि स्थिती खरं तर आज हि थोड्या प्रमाणात आहे. ती मोठ्या प्रमाणात वाढेल.
भारताची वाढ हि स्टॉक इन्डेक्स नी न मोजता.. सामान्य माणसाच्या जिवनमाना शी / शिक्षणा शी / रस्ते -पाणि -वीज - स्वच्छता- आरोग्य- आरोग्यविषयी सुविधा ह्यावर आधारीत असावे. जास्त टिव्हि चॅनल, पाश्वात्त रहाणिमान म्हणजे प्रगती नव्हे.