राष्ट्रभाषा??

स्पा's picture
स्पा in काथ्याकूट
25 Jan 2011 - 11:59 am
गाभा: 

काल हापिसात आमच्या ग्रुप मध्ये आपली राष्ट्रभाषा कुठली यावरून वाद चालला होता
लहानपणापासून शाळेत आपल्याला हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे असे बिंबवले गेले होते
आत्ता पर्यंत पण माझे हेच मत होते, पण जेव्हा गुगलून पहिले तेव्हा धक्कादायक माहिती बघण्यात आली

भारतीय कायदा आणि घटनेत कुठेही हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे असे म्हटलेले नाही

कायद्यात अशी नोंद मात्र आढळली
( Article 354 specifies that the legislature of a State may by law adopt any one or more of the languages in use in the State or Hindi as the Language or Languages to be used for all or any of the official purposes of that State.[3] Section 8 of The Official Languages Act of 1963 (as amended in 1967) empowers the Union Government to make rules regarding the languages which may be used for the official purposes of the Union, for transaction of business in Parliament, and for communication between the Union Government and the states.[4] Section 3 of G.S.R. 1053, titled "Rules, 1976 (As Amended, 1987)" specifies that communications from a Central (Union) Government office to a State or a Union Territory in shall, save in exceptional cases (Region "A") or shall ordinarily (Region "B"), be in Hindi, and if any communication is issued to any of them in English it shall be accompanied by a Hindi translation thereof.)

हि लिंक सुद्धा बघा

http://en.wikipedia.org/wiki/Languages_with_official_status_in_India

जर असे असेल तर आपण हिंदी ला एवढे महत्व का देतो?
बहुतांश दक्षिण भारतात या भाषेचा गंध हि नाही , मग तिकडचे सरकारी कागदपत्र कुठल्या भाषेत असतात?
गुजरात सरकारने तर हे अधिकृतरीत्या जाहीर केलेलं आहे कि हिंदी हि राष्ट्रभाषा नाही (http://timesofindia.indiatimes.com/india/Theres-no-national-language-in-... ) मग प्रत्येक राज्य असं जाहीर करू शकतं का?
त्यामुळे आता भारत सरकारने हिंदी हि राष्ट्रभाषा अधिकृत रित्या जाहीर करावी का? (किंवा ती केली आहे का ? )

प्रतिक्रिया

सहज's picture

25 Jan 2011 - 12:08 pm | सहज

सहज राव.. दुव्याबद्दल धन्स :)

चिरोटा's picture

25 Jan 2011 - 12:13 pm | चिरोटा

घटनेनुसार हिंदी/इंग्रजी 'Official language of correspondence' आहे.

जर असे असेल तर आपण हिंदी ला एवढे महत्व का देतो?

बॉलिवूडचा महाराष्ट्रावर असलेला प्रचंड प्रभाव आणि हिंदी/मराठीत आढळणारे बरेच साम्य् . ह्यामुळे अनेकांना हिंदी बोलण्यास अडचण येत नाही.

बहुतांश दक्षिण भारतात या भाषेचा गंध हि नाही , मग तिकडचे सरकारी कागदपत्र कुठल्या भाषेत असतात?

आंध्रप्रदेशात हिंदी तेलंगण परिसरातल्या अनेकांना येते.कोचीन वगैरे भागात असंख्य दुकानदारांना हिंदी येते.उत्तर कर्नाटकात्/बेंगळूर परिसरात अनेकांना हिंदी येते.
कुठल्याही राज्यात सरकारी पातळीवरची कागदपत्रे इंग्रजी/त्या त्या राज्यभाषेतली असतात.

विसोबा खेचर's picture

25 Jan 2011 - 12:21 pm | विसोबा खेचर

जर असे असेल तर आपण हिंदी ला एवढे महत्व का देतो?

कल्पना नाही..

तसेच हिंदी ही राष्ट्रभाषा आहे अथवा नाही या वादातदेखील मला पडायचे नाही..

परंतु मला मात्र व्यक्तिगतरित्या ती भाषा अतिशय आवडते व माझे त्या भाषेवर नितांत प्रेम आहे..

हिंदी है हम, वतन है, हिंदोस्ता हमारा..

तात्या.

गवि's picture

25 Jan 2011 - 12:29 pm | गवि

हिंदी ही भाषा नक्कीच कोणत्याही एका सिंगल प्रादेशिक भाषेपेक्षा जास्त प्रसारित झाली आहे. दक्षिणेकडची पाच राज्ये (चार राज्ये+ पॉन्डीचेरी प्रदेश) सोडली तर बाकीच्यांशी लिपीत साधर्म्य असल्याने ती जास्तीत जास्त राज्यांमधे शिकायला सोपी आहे.

दक्षिणेतली राज्येही काही लहान नाहीत, आणि त्यांना वेगळे पाडून चालणार नाही. पण एक कोणतीतरी कॉमन भाषा ठेवायचीच असेल तर नेमके किती लोक हिंदी कामापुरती तरी जाणतात याची ढोबळ आकडेवारी काढून ती कोणत्याही एका इतर भारतीय भाषेपेक्षा निर्विवाद जास्त आहे असं दिसलं (जे लॉजिकली दिसतंच आहे) तर कायद्यात न जाता एक कन्व्हेन्शन म्हणून ती सर्वांनी व्यवहारापुरती स्वीकारायला हरकत नाही असं वाटतं.

विजुभाऊ's picture

25 Jan 2011 - 1:06 pm | विजुभाऊ

हिन्दी ही भाषा राष्ट्रभाषा नाही. त्याभाषेला राष्ट्रभाषा म्हणण्यास कोणी सुरवात केली ठौक नाही. पण टिळक महाराष्ट्रा विद्यापीठ राष्ट्रभाषा परीक्षा घेते.
आज जी भाषा हिन्दी म्हणून मानण्यात येते ती अगोदर खडी बोली या नावाने ओळखली जायची.
उर्दू , अवधी , माळवी , व्रज बोली , मारवाडी ,हरयाणवी , भोजपुरी , अंगिका या भाषा स्वतन्त्र पण खडी बोलीच्या जवळपास जाणार्‍या होत्या. हैद्राबादेत बोलली जाणारी दक्कनी उर्दु ही व्याकरण्याच्या दृष्टीने मराठीच्या जवळची आहे.
या सर्व भाषा भारताला जोडून शकतात हे म.गांधीनी ओळखले होते
गांधीनी या सर्वभाषाना मिळून घेईल अशी एक भाषा जिचे नाव हिन्दुस्थानी किम्वा हिन्दी असेल अशा भाषेत व्यवहार करायला सुरुवात केली. त्यानी त्या भाषेत वर्तमान पत्र काढले.
"भारताची राष्ट्रभाषा हिन्दी आहे" हा समज हिन्दी भाषीक राज्यानी पद्धतशीरपणे पसरवला.
त्रिभाषा सूत्रानुसार प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये स्थानीक + इम्ग्रजी + ( स्थानीक हिन्दी नसल्यास कोणतीही एक दक्षीणी ( द्रविडी )शिकवावी हे अपेक्षीत होते.
हिन्दी भाषीक राज्यानी या धोरणास कधीच तिलान्जली दिली.
कर्नाटकात महाराष्ट्र गुजरात बंगाल वगैरे राज्यात स्थानीक भाषांसोबत हिन्दी शाळेत शिकवली जाते.
हिन्दी भाषीक लोकाना इतर प्रान्तातील भाषा शिकणे थोडे अवघड जाते. हे लपवण्यासाठी ते हिन्दी ही राष्ट्रभाषा आहे या खोट्याचा आधार घेतात. मराठी बोलणार्‍या गृप मध्ये एखादा जण जरी हिन्दी भाषीक आला तरी तो हिन्दीत बोलण्याचा आग्रह धरतो. अर्थात त्यासाठी हिन्दी ही राष्ट्रभाषा आहे या त्याला बाळकडू पाजण्यात आलेल्या असत्याचा आधार घेतो.
हिन्दी ही एक भारतीय भाषा आहे. भारतात हिन्दी भाषीक प्रदेशातील खासदार जास्त आहेत. इतकेच.
स्पा साहेब तुम्ही बिनधात मराठीच बोला. एखादा भय्या हिन्दी बोलायचा आग्रह धरत असेल तर त्याला सांगा इथली भाषा शिक. तुला बोलायचे असेल हिन्दी तर बोल आम्ही मराठीच बोलु.
गुजरात मध्ये हिन्दीला विरोध नाही. पण इथले लोक ज्या प्रकारे हिन्दी बोलतात ती भाषा खरेतर ७५% गुजराथीच असते. अधेमधे मै... हुं वगैरे शब्द पेरत असतात.
गुजराथमध्ये आलेले भय्ये इकडे गुजराथीत बोलतात. दुकानांच्या पाट्या , हॉटेलांतील मेन्यु कार्ड सुद्धा गुजराथीत्च असतात

अहो ते सर्व खरे पण काही ठिकाणी व्यवहारार्थ सर्वांना समजणारी भाषा वापरण्याची वेळ येते, तेव्हा आपापल्या प्रदेशातली (घरची) भाषा सोडून एका कॉमन प्लॅटफॉर्मवर यायचे झाल्यास (उदा. केन्द्रीय / राष्ट्रीय पातळीवरचे खटले, निर्णय, कामकाज्..जिथे सर्व राज्यांचे लोक असतात..) तिथे कोणती भाषा वापरावी असा प्रश्न आहे हो. (श्रेष्ठ, कनिष्ठ असा प्रश्न नाही..) की प्रत्येकाने आपापली वेगळी भाषा वापरावी आणि सगळा वेळ भाषांतरात आणि इन्टरप्रीटर ठेवण्यात घालवावा. (शिवाय शब्दार्थ आणि संदर्भांचे भाषेगणिक होणारे घोळ सुधारत बसावेत..?

उदा:पूर्वी एका हपीसात ऐकलेला संवाद.

हिन्दीभाषिक बॉस : आप लोग इस बात के लिये इतने लाचार क्यों हो रहे हो.

मराठीभाषिक सबॉर्डिनेटः हम लोग लाचार नही है सर.. हमारी मान हमेशा अभिमान से ऊंची रेहती है..
)

एरव्ही आपल्या घरी / गावी / राज्यात बोलताना मराठी माणसाने अर्थातच मराठी वापरावी. हे ठीकच.

मराठी माणूस's picture

25 Jan 2011 - 2:40 pm | मराठी माणूस

मराठी लोकांना कामचलाऊ हिंदी विनासायास येते आणि ती त्यांच्या इंग्लिश न येण्याची कमतरता काही प्रमाणात भरून काढते. केवळ यामुळेच मराठी लोक हिंदी वापरत राहतात. हिंदी राष्ट्रभाषा असण्याशी त्याचा काही संबंध नाही. इंग्लिश नाकारण्यासाठी मराठी लोकांना राष्ट्रभाषेच्या मुद्याचा उपयोग होतो. ही आत्मवंचना आहे. हे दुर्दैवी सत्य आहे.
मराठी लोकांनी मराठी अथवा इंग्लिशमध्येच व्यवहार करायचे कटाक्षाने पाळले तर मराठी भाषेचा खूप फायदा होईलच पण मराठी लोकांचाही फायदा होईल. पटतंय का?

मी मराठी

हो.. इंग्लिश तर इंग्लिश. हिंदीचा आग्रह अस्मिता वगैरे मुळीच नाही.

काहीतरी कॉमन लँग्वेज बरी पडते सर्वांनीच आपापली बोलत राहण्यापेक्षा.. इतकाच आणि इतकाच निव्वळ व्यावहारिक भाग आहे त्यात.

नन्दादीप's picture

26 Jan 2011 - 11:27 am | नन्दादीप

>>मराठी लोकांना कामचलाऊ हिंदी विनासायास येते.
स्वानुभव:
गावी एक हॉटेलवाली : एक बार मच्छी आमटी ली ना, तो फिर मै परत कैसे लू???
एक बार वाटी लिया तो ५ रूपया लागू हुआ, मै वो परत नही ले सकती.
एक गावकरी : वो साप वहा गडगे मे गया....(गडगा : चिरेबंदी कुंपण)

मराठी माणूस's picture

26 Jan 2011 - 7:23 pm | मराठी माणूस

तुमच्या उदाहरणातून हेच दिसते की हॉटेलवालीला संभाषण होऊ शकले होते. या इतपत हिंदीनेच मुंबईत उत्तर भारतीय स्थिरावू शकले आणि आता इतर ठिकाणी पसरत आहेत. हे सर्वगुणसंपन्न उत्तर भारतीय लोक मद्रास अथवा बेंगलोरला हिंदी राष्ट्रभाषा असल्याचे पटवू शकले नाहीत. इतपत मराठी इथे येऊन पिढ्यान पिढ्या राहिलेल्या हिंदी लोकांना आले व ते जर नेहमी इतकेही मराठी बोलू लागले तरी खूप झाले. जशी मराठीला हिंदी जवळ आहे तशीच हिंदीलाही मराठी जवळ आहेच ना?

तुम्ही दक्षिणेला बिलकुल गेलेले दिसत नाही. या इतपत हिंदी तिथे लोक बोलू लागले तर भारतात आता हिंदीला विरोध नाही हे पटू शकेल. तोपर्यंत आपल्याच लोकांच्या परभाषा (हिंदी) कौशल्याची टर उडवत राहण्याने मराठीचे काही भले होणार नाही.

मी मराठी

स्पा's picture

25 Jan 2011 - 1:52 pm | स्पा

अगदी विजुभाऊ ...

मराठी बोलणार्‍या गृप मध्ये एखादा जण जरी हिन्दी भाषीक आला तरी तो हिन्दीत बोलण्याचा आग्रह धरतो. अर्थात त्यासाठी हिन्दी ही राष्ट्रभाषा आहे या त्याला बाळकडू पाजण्यात आलेल्या असत्याचा आधार घेतो.

याच विषयावरून वादास तोंड फुटले होते.
मला हे सुद्धा कळत नाही, भारताला त्याची स्वतःची अशी राष्ट्रभाषा अजून सुद्धा नाही?
आपल्या चलनाच चिन्ह सुद्धा आता कुठे येतंय, ते सुद्धा इतकी वर्ष नव्हतं
भारताला अजूनही , इंडिया, हिंदुस्तान, आणि भारत या नावाने ओळखतात, एक काय ते नाव का नाही ठरवू शकत

सगळाच गोंधळ आहे

चिरोटा's picture

25 Jan 2011 - 2:26 pm | चिरोटा

गुजरात मध्ये हिन्दीला विरोध नाही. पण इथले लोक ज्या प्रकारे हिन्दी बोलतात ती भाषा खरेतर ७५% गुजराथीच असते

अच्छा मुद्दे मांडे है विजुभाउ.महाराष्ट्रातही तसा विरोध कधी नव्हता.तामिळनाडुचा अपवाद केला तर भारतभर तसा हिंदीला विरोध अजुनही नाही.महाराष्ट्रात असलेले बेरोजगारीचे प्रमाण्,लोकसंख्या ह्यामुळे असल्या विषयांना राजकारणी महत्व देवून आपले करीयर बनवतात.

मराठी माणूस's picture

25 Jan 2011 - 5:12 pm | मराठी माणूस

आपण भारतात कुठे कुठे जाऊन आलात? सर्व पूर्वोत्तर राज्ये, चारही दक्षिणी राज्ये (हैद्राबाद व तेलंगाणातले महाराष्ट्रालगतचे जिल्हयांशिवाय असणारा आंध्र विचारात घ्या), ओरिसा यात किती प्रमाणात हिंदी बोलली जाते? पुण्यात कित्येक ठिकाणी फक्त इंग्लिश व हिंदीत पाट्या आहेत. मैसूर अथवा त्रिवेंद्रम अथवा विजयवाडा इथे हे शक्य आहे? फक्त महाराष्ट्रातच हिंदीला स्थानिक भाषेपेक्षा वरचढ स्थान दिले जाते. महाराष्ट्रात हिंदीला विरोध नाही हीच तर वाईट गोष्ट आहे. हिंदीला विरोध नसल्याने इथे येणार्‍याला मराठी शिकायची गरज पडत नाही, पिढ्यान् पिढ्यांच्या वास्तव्यानंतरही. नुकसान मराठीचे होते.

मी मराठी

चिरोटा's picture

25 Jan 2011 - 5:44 pm | चिरोटा

ओरिसा/पूर्वेतर सोडून बाकी ठिकाणी जावून आलोय.
ईतर ठिकाणी हिंदी पाट्या लावत नाहीत म्हणून तिकडे हिंदीला विरोध असावा हा निष्कर्ष चुकीचा आहे.उरिया आणि हिंदीतही साम्य आहे.माझ्या ओळखीचे जेवढे ओरिसावाले/बंगाली आहेत त्या सर्वांना हिंदी येते.

पुण्यात कित्येक ठिकाणी फक्त इंग्लिश व हिंदीत पाट्या आहेत. मैसूर अथवा त्रिवेंद्रम अथवा विजयवाडा इथे हे शक्य आहे?

म्हणजे देवनागरीत पाटी आहे ना? मग काय? हिंदी/मराठीत साम्य आहेच शिवाय लिपीही समान आहे म्हणूनच हिंदीत पाट्या लिहिण्याला महाराष्ट्रात विरोध होण्याची शक्यता कमी.उत्तर भारतात्/महाराष्ट्रात जेवढे सांस्कृतिक साम्य आहे तेवढे उत्तर भारतात व दक्षिणी राज्यांत नाही. म्हणून विजयवाड्यात हिंदी पाट्या लावल्या तरी विशेष उपयोग होणार नाही.
'शर्मा भेलपुरीवाला' म्हणजे काय असावे हे हिंदी न शिकलेल्या मराठी माणसाला सहज कळेल पण तिरुवनंतपूरमच्या माणसाला कदाचित कळणार नाही.

हुप्प्या's picture

25 Jan 2011 - 9:18 pm | हुप्प्या

सक्तीने मराठी पाट्या लावायच्या ठरवल्या आणि भेळपुरीवाला असा फलक असेल तर हिंदी भाषिकांना ते कळायला अवघड जाईल का?
लोणावळाची पाटी लोनावला, नेरळची नेरल अशी विपर्यस्त करुन लिहिणे आणि ती मराठी लोकांना कळतेच असे म्हणणे हे उफराटे धोरण कशाला?

अमुक एक भाषिकांना हिंदी कळते म्हणून ते हिंदी बोलतीलच असे नाही. प. बंगालमधे अनेकदा लोक हिंदीत बोलल्यास उत्तर देत नाहीत (येत असूनही)..

मराठी लोक गेले पन्नास वर्षे हिंदीपुढे लाचार आहेत. आपली भाषा दुय्यम ठरवली गेली तरी चालेल असे मऊ मेणाहुनी धोरण अनेक वर्षे चालले आहे. ते बदललेच पाहिजे.

अवांतरः सिनेमातली हिंदी ही हिंदुस्तानी वा उर्दू प्रकारची आहे. शाळेत शिकवली जाणारी हिंदी ही पुस्तकी आणि व्यवहारात जवळपास निरुपयोगी आहे. रस्त्यावर बोलली जाणारी हिंदी ही कुठल्या रस्त्यावर आहे यावर बदलते. मुंबईची वेगळी, हैद्राबादची वेगळी, दिल्लीची वेगळी आणि लखनौचीही वेगळी.
अर्थव्यवहार, अन्य सरकारी कामे ही इंग्रजीत बिनबोभाट होत असल्यामुळे तिथे हिंदीची गरज नाही.
त्यामुळे हिंदी ही असलीच तर नॅशनल स्ट्रीट लँग्वेज आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jan 2011 - 8:28 pm | llपुण्याचे पेशवेll

अर्थव्यवहार, अन्य सरकारी कामे ही इंग्रजीत बिनबोभाट होत असल्यामुळे तिथे हिंदीची गरज नाही.
त्यामुळे हिंदी ही असलीच तर नॅशनल स्ट्रीट लँग्वेज आहे


+१
हिंदी किंवा उर्दू या तशाही खडी बोली नावाच्या प्रकारातूनच तयार झाली आहे. :) तेव्हाच्या तुरुक, दुरानी सरदार सैनिकांना स्थानिक भाषा कळत नसल्या फारसी अरेबिक मिश्र अशी भाषा तयार केली गेली जी पहारेकरी , राखणदार बोलत ती खडी बोली असे वाचल्याचे स्मरते.

मराठी माणूस's picture

26 Jan 2011 - 7:34 pm | मराठी माणूस

देवनागरीत बाए दाए लिहिले तर ते मराठी होते का हो? आणि आईसारखी दिसते म्हणून मावशीला घरी आणून आईला हकलतात का?
गुजराथी इतकी हिंदीला जवळची तर मुंबईच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये गुजराथीत पाट्या का?

आणि, 'विरोध आहे' हा मुद्द होता जो तुम्हाला मान्य आहे असे दिसते. विरोधाचे कारण पटण्यासारखे आहेच. हिंदी ही इतर अनेक भाषांप्रमाणे एक भाषा आहे. तिला मराठीपेक्षा मोठे स्थान देणे सर्वस्वी चुकीचे आहे. दक्षिणेच्या लोकांकडून हे तरी मराठी लोकांनी शिकावे.

मी मराठी

स्पा's picture

26 Jan 2011 - 7:38 pm | स्पा

प्रचंड अनुमोदन

ashvinibapat's picture

26 Jan 2011 - 7:30 pm | ashvinibapat