थत्त्यांचा प्रहार

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
25 Jan 2011 - 8:56 am
गाभा: 

आमचे परम मित्र नितीन थत्ते हे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतात त्याचबरोबर आपली मते निर्भीडपणे मांडत असतात. त्यांचा आम्हाला आवडणारा गुण म्हणजे जे बरोबर असेल त्याला सहमती देतांना ते मागेपुढे पहात नाहीत.

त्यांच्या मतांचा उल्लेख करत प्रजासत्ताक दिना संबंधी मागील वर्षी काय चर्चा ब्लॉगधारकांमधे झाली होती याचा गोषवारा दैनिक प्रहारने दिला आहे. यात मिसळपावचा उल्लेख आहेच

बघा काय म्हटले आहे

मिसळपाव’ हा काही रूढार्थाने ‘अनुदिनी’सारखा ब्लॉग (एकेकटय़ाचा असतो तसा) नव्हे. तो चर्चा-कट्टा आहे. त्या ‘चर्चा’मध्ये भाग घेणं आणि चर्चा सुरू करणं, ही दोन्ही कामं जो करतो, तो केवळ ब्लॉगलेखक या अर्थानं ब्लॉगर नसतो तर संघटितपणावर विश्वास असणारा तो ‘नेटवर्क-ब्लॉगर’ असतो. नितीन थत्ते हे असे एक नेटवर्क ब्लॉगर आहेत. इतरांनी सुरू केलेल्या अनेक चर्चा पुढे नेण्यासाठी त्यांनी मांडलेले अनेक मुद्दे महत्त्वाचे ठरले, असं त्या-त्या चर्चातल्या पुढल्या प्रतिक्रिया सांगतात! तर, नितीन थत्ते यांनी 2009च्या 25 जानेवारीला एक चर्चा सुरूच करून दिली. ‘प्रजासत्ताक दिन’. बुद्धिप्रामाण्यवादी आणि लोकशाहीवादी थत्ते यांचे शब्द असे :

..कैक वेळा माणूस चांगला आहे म्हणून आपण आपल्याला धोरणे मान्य नसलेल्या पक्षाला मत देतो. कधी धोरण चांगले म्हणून वाईट माणूस निवडतो. कधी माणूस चांगला म्हणून वाईट पक्ष निवडतो. जे काही करतो ते आपणच करतो. हीच तर लोकशाही. (येथे कोणी गठ्ठय़ाने मतदान करतात म्हणून शोक करायचे कारण नाही. ठाण्याच्या मतमोजणीत डोंबिवलीची मते मोजणीस येतात तेव्हा चित्र पालटते. गठ्ठय़ाने मते सगळेच देतात) लोकशाहीत आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधी असते. एकदा हुकूमशाही स्वीकारली (?) की ती संधी केव्हा मिळेल हे सांगता यायचे नाही.

इतके स्वच्छ आणि स्पष्ट विचार ब्लॉगस्फिअरमध्ये कुठल्याही भाषेत आढळतात, तेव्हा आपण वाचतो आहोत याचं बरं वाटतं. पण प्रत्येकदा तसं होईलच असं नाही. मग वाचक म्हणून आपल्याला वेगळा मार्ग शोधावा लागतो, बरं वाटण्याचा..

(ठळक ठसा माझा)

विस्तृत लेख इथे वाचता येईल - http://www.prahaar.in/collag/blogark/36005.html

मिसळ पाव परिवार आणि थत्तेचाचा यांचे अभिनंदन :)

प्रतिक्रिया

गुंडोपंत's picture

25 Jan 2011 - 9:00 am | गुंडोपंत

निर्भीडपणे मते मांडल्या बद्दल आणि प्रिंटमध्ये आल्याबद्दल थत्तेंचे अभिनंदन!

आमोद शिंदे's picture

25 Jan 2011 - 9:09 am | आमोद शिंदे

थत्तेंचे अभिनंदन!!

मुक्तसुनीत's picture

25 Jan 2011 - 10:04 am | मुक्तसुनीत

अभिनंदन !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2011 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन........!!!

-दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

25 Jan 2011 - 9:35 am | ऋषिकेश

अरे वा! बोला....प्रिंट मिडीया स्टार दी थत्तेचाचांचा.....

मी-सौरभ's picture

26 Jan 2011 - 2:20 am | मी-सौरभ

विजय असो!!

क्लिंटन's picture

25 Jan 2011 - 9:42 am | क्लिंटन

थत्तेकाकांचे हार्दिक अभिनंदन.

सहज's picture

25 Jan 2011 - 9:45 am | सहज

श्री. थत्ते यांचे अभिनंदन! दै. प्रहार व नाना दोघांना धन्यवाद.

वेळोवेळी विविध विषयांवरील चर्चेत स्वच्छ व स्पष्ट विचार मांडणारे श्री धनंजय, श्री पंगा, श्री सुनील, श्री चंद्रशेखर, श्री प्रसन्न केसकर, श्री प्रकाश घाटपांडे, श्री. चिंतातूर जंतू, श्री मिसळभोक्ता, श्री क्लिंटन, श्री प्रदीप, श्री इंद्राज पवार, श्री घासकडवी, श्री मितान, श्री प्रियाली, श्री चित्रा यांचाही उल्लेख आवर्जून करावासा वाटतो.

आजानुकर्ण's picture

25 Jan 2011 - 10:39 am | आजानुकर्ण

?

मुक्तसुनीत's picture

25 Jan 2011 - 10:42 am | मुक्तसुनीत

श्री चित्रा = श्री श्री मां आनंदमयी सारखे असावे.

श्रावण मोडक's picture

25 Jan 2011 - 8:56 pm | श्रावण मोडक

श्री चित्रा = श्री श्री मां आनंदमयी सारखे असावे, हे पटण्याजोगे आहे. पुढे? श्री प्रियाली = ? ;)

चित्रा's picture

26 Jan 2011 - 4:30 am | चित्रा

व्यक्तीगत प्रतिसाद म्हणून मी संपादकांना विनंती करणार होते, की काढून टाका ;)

श्री. मुक्तसुनीत यांचे विधान पटण्यासारखे आहे म्हणायला श्री. श्रामो हे मला भेटले आहेत काय?

कन्फेशनः श्री. श्री. आनंदमयी ह्या कोण बाई, ते आधी जाऊन पाहिले.

बाकी एकाच झटक्यात काहींना वर, काहींना खाली, काहींना आपले नाव या यादीत का नाही म्हणून जलन, काहींना आपले नाव का शेवटचे म्हणून जलन, असे सर्व एकाच झटक्यात करणार्‍या सहजरावांना कुठचा योग जमला आहे? सहजयोग का?

अजून एक विषयाला संबंधित - श्री. थत्ते यांचे अभिनंदन!! श्री. श्री. नारायण राणे यांच्या प्रहारला शुभेच्छा! ;)

श्रावण मोडक's picture

26 Jan 2011 - 11:38 am | श्रावण मोडक

भेट झाली आहे. लेखक वाचकाला त्याच्या लेखनातूनच भेटतो असं म्हणतात. ;)
त्या लेखनावरूनच मुसुंचा प्रतिसाद पटण्याजोगा आहे, असे म्हटले.
'प्रहार'ला दिलेल्या शुभेच्छा मात्र षटकार आहेत. :)

चित्रा's picture

26 Jan 2011 - 6:55 pm | चित्रा

या विधानाचा निषेध.

This body tells of one sovereign remedy for all ills: God. Trust in Him, depend on Him, accept whatever happens as His dispensation, regard what you do as His service, keep satsang, think of God with every breath, and live in His Presence. Leave all your burdens in His hands and He will see to everything; there will be no more problems. असा माझा उपदेश तुम्हाला कधी दिसला आहे?!

असो. षटकार आवडल्याबद्दल धन्यवाद.

श्रावण मोडक's picture

26 Jan 2011 - 7:34 pm | श्रावण मोडक

छे. तसं नाही. मां आनंदमयी... अर्र ते श्री राहिलं... सॉरी, तर मां आनंदमयींच्या या उपदेशामृताला असलेली संयतता तुमच्या लेखनात दिसते म्हणून म्हटलं ते पटण्याजोगं आहे. ;)
स्वगत: हल्ली संयतता या शब्दाला फारच महत्व आलंय बॉ... :)

प्रियाली's picture

25 Jan 2011 - 4:49 pm | प्रियाली

स्त्री-पुरुष समानतेचा 'सहज' प्रयत्न केलेला दिसतो. ;)

बाकी, थत्तेचच्चांचे अभिनंदन!!

ऋषिकेश's picture

25 Jan 2011 - 8:05 pm | ऋषिकेश

बहुदा श्रीमती चित्रा व श्रीमती प्रियाली असं असावं.

काय राव तुमच्या सारख्या झंटलमन लोकान्ला.. असो ;)

श्रीमती ???
जौंद्या राव नकोच तो वाद-विवाद परत.

स्वानन्द's picture

25 Jan 2011 - 8:57 pm | स्वानन्द

विकास साहेब राहिले की!

प्रचेतस's picture

25 Jan 2011 - 9:45 am | प्रचेतस

स्पष्टवक्ते थत्ते काकांचे हार्दिक अभिनंदन.

अजून एक मिपाकर प्रिंटमिडीयात चमकला.

(आता प्रहार विरूध्द सामना असा रंजक सामना बघायला मिळणार वाटते. ;) )

छोटा डॉन's picture

25 Jan 2011 - 10:05 am | छोटा डॉन

थत्तेचाचांचे अभिनंदन !
थत्तेचाचांच्या निर्भिड विचारांचे आणि सडेतोड बोलण्याचे आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. :)

- छोटा डॉन

नंदू's picture

25 Jan 2011 - 10:30 am | नंदू

'समीक्षा नेटके 'उर्फ अवलियांचे अभिनंदन.

पिंगू's picture

25 Jan 2011 - 11:30 am | पिंगू

थत्तेकाकांचे हार्दिक अभिनंदन...

- शुभेच्छुक पिंगू

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jan 2011 - 12:11 pm | परिकथेतील राजकुमार

थत्तेचाचांचे अभिनंदन आणि त्यांना प्रकाशात आणणार्‍या नाना नेटकेचे पण अभिनंदन.

नान्याचे एकेक मुखवटे हळुहळु समोर यायला लागले आहेत ;)

स्वाती दिनेश's picture

25 Jan 2011 - 12:15 pm | स्वाती दिनेश

नितिन थत्ते यांचे अभिनंदन!
स्वाती

गणपा's picture

25 Jan 2011 - 12:42 pm | गणपा

धन्यवाद नाना ही बातमी आमच्या पर्यंत पोहचवलीस.
श्री. नितिन थत्ते यांचे हार्दिक अभिनंदन.
:)

यशोधरा's picture

25 Jan 2011 - 2:54 pm | यशोधरा

श्री. नितिन थत्ते यांचे हार्दिक अभिनंदन. :)

प्राजक्ता पवार's picture

25 Jan 2011 - 4:17 pm | प्राजक्ता पवार

श्री. नितिन थत्ते यांचे हार्दिक अभिनंदन.

इन्द्र्राज पवार's picture

25 Jan 2011 - 4:18 pm | इन्द्र्राज पवार

श्री.नितीन थत्ते यांचे अभिनंदन करत असतानाच त्यांच्याबाबत एक ज्यादाची गोष्ट सांगणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे ज्यावेळी मला त्यांच्या प्रतिसादांना उत्तर द्यावेसे वाटते त्यावेळी मी प्रथम "अभ्यास" करतो आणि मगच टायपिंग सुरू करतो....इतका त्यांचा दरारा वाटतो मला.

इन्द्रा

अप्पा जोगळेकर's picture

25 Jan 2011 - 7:31 pm | अप्पा जोगळेकर

अगदी अगदी. तुमच्यासारख्या मुरब्बी माणसाला जर दरारा वाटतो तर आमच्यासारख्या चिलटांची काय अवस्था होत असेल ? अजून मला तो समान नागरि कायदा वाला वाद आठवतोय. श्री थत्ते यांचे अभिनंदन.

जे बरोबर असेल त्याला सहमती देतांना ते मागेपुढे पहात नाहीत.
काय टारगटपणा आहे.;)

sneharani's picture

25 Jan 2011 - 7:47 pm | sneharani

थत्ते च्चाचा अभिनंदन!

विकास's picture

25 Jan 2011 - 8:29 pm | विकास

मा. ना. थत्तेसाहेबांचे हार्दीक अभिनंदन! आता इस बात पे एक नवीन चर्चा टाका! ;)

The pen is mightier than the sword
The keyboard is mightier than the pen

but

the Kharata is mightier than Keyboard! ;)

नितिन थत्ते's picture

25 Jan 2011 - 9:07 pm | नितिन थत्ते

माझे येथे आणि इतर माध्यमांत अभिनंदन करणार्‍या सर्वांचे आभार.

@इंद्रा
दरारा वाटावा असे माझ्याकडून काही भरीव घडलेले नाही. तेव्हा काळजी नसावी.

@नाना
>>जे बरोबर असेल त्याला सहमती देतांना ते मागेपुढे पहात नाहीत.
पुढेही असेच राहण्याचा प्रयत्न करीन.

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

धनंजय's picture

25 Jan 2011 - 9:31 pm | धनंजय

मुख्य म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षांत चर्चास्थळे ही छापील माध्यमांना दिसण्याइतपत समाजातील मतप्रवाहाच्या मध्यात आलेली आहेत.

श्री. नितिन थत्ते यांच्याबद्दलचा चांगला उल्लेख साजेसाच आहे.

अर्धवटराव's picture

26 Jan 2011 - 3:03 am | अर्धवटराव

प्रहारने थत्त्यांच्या लेखणीची दखल घेतली त्यामुळे प्रहारचे अभीनंदन.

मि.पा. ला थत्त्यांचा अभिमान आहे.
परतंत्र भारतात महात्म्याच्या विचारांना टोकाचा विरोध करणारेही त्यांच्या देशनिष्ठेपुढे नतमस्तक व्हायचे (स्वा. सावरकर सुद्धा), स्वतंत्र भारतात हा मान भूतपूर्व प्रधानमंत्री वाजपेयीजी आणि आपले आदरणीय कृषीमंत्री पवार साहेबांना जातो, आपल्या मिपाच्या मनावर थत्तेचाचा तसच राज्य करतात.

पण या धाग्यात एक सुप्त गोम आहे... सुभाष बाबुंच्या जयंतीनिमीत्त त्यांना आदरांजली म्हणुन कोण्या सशस्त्र क्रांतीप्रेमीने नेताजींची साधी दखलही घेतली नाहि... ही चुक पुन्हा होउ नये याची काळाजी नानांनी घेतली असं वाटतं ;)

(थत्तेजींचा फॅन) अर्धवटराव

राजेश घासकडवी's picture

26 Jan 2011 - 9:07 am | राजेश घासकडवी

मूलभूत विचार करण्याची, सत्य काय आहे हे इझम व साउंडबायटींपलिकडे जाऊन तपासून बघण्याची व त्याच्या समर्थनार्थ लोकमत वा लोकविरोधाची पर्वा न करण्याची थत्त्यांची पद्धत नेहेमीच आवडत आलेली आहे. मिपापलिकडेही अशी दखल घेतली जाते हे स्तुत्यच आहे.

तिमा's picture

26 Jan 2011 - 11:14 am | तिमा

मिपा व थत्तेकाकांची 'प्रहार' ने दखल घेतली याचे मला अजिबात अप्रूप वाटत नाही. प्रहार व त्याच्या मालकांपेक्षा मिपा व थत्तेकाका कितीतरी उच्च दर्जाचे आहेत.

सुनील's picture

26 Jan 2011 - 8:50 pm | सुनील

थत्ते यांचे अभिनंदन!

प्राजु's picture

26 Jan 2011 - 9:09 pm | प्राजु

अभिनंदन!!