महामानव

chipatakhdumdum's picture
chipatakhdumdum in काथ्याकूट
25 Jan 2011 - 2:38 am
गाभा: 

महामानव डॉ. आंबेडकर यांचे भारत स्वतंत्र होण्यामध्ये काय योगदान होते, त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये कोणती कामगिरी बजावली होती, त्यांनी ब्रिटीशांविरुध्द भारत ( अर्थात त्यावेळी हिंन्दुस्थान ) बद्द्ल कोणती निश्चित मते मांडली होती , या संदर्भात काही माहीती मिळेल काय ?


हा पहीला भाग झाला. वाचने आत्तापर्यंत जवळपास साडेनउशे, प्रतिक्रिया ओके ओके.
आता आपण मुद्यावर येउया.
भारताच्या राज्यघटनेत अशी तरतुद आहे की जर एखाद्या राज्यामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाल नाही आणि त्यामुळे कोणत्याही गटाला पक्षी पक्षाला सरकार बनवता आल नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होउ शकते. मला सांगा केंद्रामध्ये अशी स्थिती आली तर पुन्हा पुन्हा निवडणुका घेण्याखेरीज काही पर्याय आहे का? आणि खरोखर किती वेळा तुम्हाला अशा निवडणुका परवडतील ?
आता युपीए सरकार आहे, म्हणून शहामृगासारखं वाळूत तोंड लपवून चालणार नाही.
पण हे सरकार येण्यापूर्वी ही भिती होती की नाही?
महामानवाचा घटनाकार म्हणून कितीही उदो उदो करा, पण वर नमूद मुद्यावर त्यानी घटनेत काहीही तरतूद केलेली नाही.
याला जबाबदार कोण?
दूरदृष्टी नावाची काही गोष्ट असते,
वकील म्हणून नाव कमवलं, म्हणजे व्यवहार ज्ञान आल, अस नसत.
साधा विचार करा... ५७२ भागिले ३.. १९०, १९०, १९२.
कोणीही कोणाशीही युती करून सरकार बनवायला तयार नाही.
काय कराल?
निवडणूक पुन्हा..
पुन्हा तोच निकाल..
पुन्हा निवडणूक..
पुन्हा तोच निकाल..

.हे शक्य आहे काय ?
मला उत्तर माहीती नाही. पण ज्यानी स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवली त्यानी ही hanging parliament ची शक्यता का विचारात घेतली नाही?
आणि तरीही तुम्ही आणि मी त्याना खोट्या आरत्या ओवाळतो.
संपादीत कासेची लंगोटी काय देण्याची गोष्ट करता

प्रतिक्रिया

अडगळ's picture

25 Jan 2011 - 3:13 am | अडगळ

मला उत्तर माहीती नाही. >>

तुम्हाला उत्तर माहीत आहे ... सांगा की. ...प्लीज.

गोगोल's picture

25 Jan 2011 - 4:15 am | गोगोल

करायला प्रवृत्त करणारा आहे.

दोन ठळक विचार माझ्या मनात येत आहेत.

१. तुम्ही जर ट्रोलिंग करत असाल तर हा प्रयत्न १००% यशस्वी होणार. अनेक लोकांच्या अनेक प्रतिक्रिया (दोन्ही बाजूंच्या) येणार. पूर्ण लेख १०० पेक्षा ज्यास्त प्रतिक्रिया मिळवणार. एकंदरीत तुमचा उद्देश सफल होणार.

२. तुम्ही ट्रोलिंग करत नसाल तर तुम्ही आकलेचे खंदक आहात. एका साध्या प्रोग्रॅम ची स्पेसिफिकेशन्स लोक सहा सहा महिने लिहिनसूद्धा त्या मध्ये अनेकदा त्रुटी राहून जातात आणि नंतर ते परत मॉडिफाइ करायला लागते (आणि हे सर्व लॅपटॉप, इंतेरनेत आणि गूगल च्या जमान्यात). अशावेळी १९४७ मध्ये केवळ सहा सदस्यांबरोबर, ३०-४० करोड लोकांच्या एका महाकाय देशाचे स्पेसिफिकेशन्स लिहिताना (जो देश की ज्याला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले आहे आणि कोणाचाच पायपोस कुणाच्यात नाही) अशा मध्ये एक काहीतरी भविष्यात असे त्रिशंकू सरकार आले तर काय करायचे (की ज्यावेळी केवळ कॉंग्रेस हा एकमेव देशव्यापी पक्ष होता) असे कलम टाकणे केवळ ब्रह्मदेवाला जमू शकते. तुम्हाला एवढीच जर खाज असेल तर स्वत: कायदेतज्ञ होऊन हा नियम का नाही बदलत? तुम्हाला हे पण नाही माहिती की राज्यघटना बदलण्यासाठी तरतुदी आहेत (http://en.wikipedia.org/wiki/Amendment_of_the_Constitution_of_India)

ज्या लोकांनी या देशासाठी काहीतरी चांगले काम केले आहे त्यांवर जात पात, त्यांची अक्कल, त्यांचे विचार यांना टार्गेट करून चिखल उडवण्याची एक फॅशन आली आहे. मग स्वत: चे कर्तुत्व शून्य का असेना.

शुचि's picture

25 Jan 2011 - 6:35 am | शुचि

खरं तर आधीच लिहायला हवं होतं - मला हा प्रतिसाद खूप आवडला.

गणेशा's picture

25 Jan 2011 - 9:52 pm | गणेशा

गोगोल जी धन्यवाद..

छान प्रतिसाद दिला आहे.
थोर माणसांबद्दल हेतुपर्स्पर वाद निर्माण करणार्या व्यक्तींना असेच प्रत्युत्तर प्रत्येक व्यक्तीकडुन समाजात आले पाहिजे असेही मनापासुन वाटते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Jan 2011 - 6:47 am | निनाद मुक्काम प...

त्या काळात एकच सत्ताधारी पक्ष होता समर्थ तुल्यबळ विरोधी पक्ष नव्हता व प्रादेशिक पक्ष हि संकल्पना नव्हती .त्यामुळे कड्बोल्यांचे सरकार हि कल्पना नव्हती .सत्तेसाठी घोदेबाजारी जी जगात सर्वत्र आहे सध्या
त्यावेळी पूर्ण जगात कुठेही नव्हती .

मग कसे काय कलम बनणार
त्यावेळी बनलेली घटना आदर्श होती .
मात्र भारतात सर्वार्थाने परिस्थिती बदलली किंबहुना १९८९ नंतर जास्तच
तेव्हा घटनेत बदल नव्या युगानुसार हवे होते .
आपसातील सत्ता स्पर्ध्धेपुढे कोणालाच वेळ नाही आहे ,
३३ % आरक्षण अजून द्यायचे का नाही ह्याब्बदल घटना बनवि का नव्हे हा कात्याकुट चालला आहे .आता मुळात त्यांना योग्य प्रतिनिधित्व भारतीय समाजाने दिले असते तर ह्या आरक्षणाची वेळ आली नसती .

महेश-मया's picture

25 Jan 2011 - 12:22 pm | महेश-मया

महामानव डॉ. आंबेडकर यांनी तुम्हाला घटनेतुन मत देण्याचा अधीकार दिला, जो आधी नव्ह्ता (गरिबांपासुन ते श्रिमंत सार्यांना), तो जर तुम्हि पुरा केला तर अशी परीस्थीती येनार नाहि, सगळ्यात मह्त्वाचे लोकशाहि काय असते ते घटनेतुन त्याच महामानवाने आपल्या सग्ळ्यांना सांगितले आहे.

म्हनुन माझ्या मित्रा प्रथम मतदान १०० ट़क्के करा तरच आपले केद्रातले अथवा राज्यातले सरकार आपन ठरवु शकु, घटनेला दोष देण्यापेषा आपले दोष पहा.

भारत १९४७ स्वातंत्र झाला हे जरी सत्य असले तरी इंग्रजानी भारताला १९३७ सालीच स्वातंत्र्य घोषित केले अन पहिली निवडणुक घेतली. भारतात सगळीकडे काँग्रेस निवडुन येते. महाराष्ट्राचे पहिले मुख्य मंत्री श्री. खेर हे बनतात.
इंग्रजानी फक्त दोन खाती त्यांच्याकडे राखुन ठेवली होती.
१) विदेश खातं
२) संरक्षण खातं
३) आणि राज्यपाल हा इंग्रजांचा असे.

१९४७ रोजी या तिन गोष्टींचे अधिकार आपल्याला सोपविण्यात आले. ज्या संपुर्ण स्वातंत्र्य असे म्हणता येईल.

अन, १९३७ मधल्या ईलेक्शनची रुप रेषा, राज्यकारभाराची धोरणात्मक पायाभरणी गोलमेज परिषदेत ठरते.
अन बाबासाहेब या परिषदेतील एक मुख्य सदस्य होते.
म्हणजे देशाची राजकिय पायाभरणी जीथे झाली त्या धोरनात्मक कार्यात बाबासाहेबांचं योगदान होतं. या पलिकडे जाऊन असे म्हणेन की त्या धोरणांची अमलबजावनी व्हाही या साठी बाबा साहेबानी वेळोवेळी इंग्रजाशी वैचारिक पातळीवर बंड केले. म्हणून ते स्वातंत्र्याच्या चळवळीतील एक खंदे स्वातंत्र्यविर होते. त्यानी धोरनात्मक व विधायक कामात हातभार लावला.

प्रसन्न केसकर's picture

25 Jan 2011 - 7:10 pm | प्रसन्न केसकर

याबाबत नक्की काहीच तरतुद नाही?
पुन्हा राज्यघटनेत तपासुन पहायला हवे.

आम्हाघरीधन's picture

26 Jan 2011 - 2:14 pm | आम्हाघरीधन

बाबासाहेबांच्या ज्ञानाला कुठेही तोड नाही... जे केवळ हेतु पुरस्पर त्यांच्या योगदानावर
बोट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आधी स्वःतची;लायकी तपासावी.

बाबासाहेबांचे कर्तुत्ववाचण्यासाठी क्लिक करा