[संशोधन] अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आयचा घो!

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
17 Jan 2011 - 7:11 pm

प्रतिक्रिया

गणपा's picture

17 Jan 2011 - 7:55 pm | गणपा

का हो पेटलात एकदम..
युयुत्सुंना एक नम्र विनंती आहे. असे एकोळी आणि लिंकाळे धागे काढताना ते कसला त्रागा करतायत ते निदान ४-५ वाक्यात तरी नमुद करावे.

वो.. युयुत्सु काका
आम्हाला विन्ग्लीश दुवे समजत नाही...
मराठीत काय ते डकवा....

हवं तर काळे काकांची मदत घ्या

अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य हे अडल्यानडल्यांच्या परीस्थितीचा गैरगायदा घेवून त्याना लुबाडणार्‍या भोंदू बुवांपासून जनजागृती करून त्याना योग्य दिशा दाखवणे या साठी केले जाते.
सदगुरू गाडगेबानी देखील " जत्रामे फतरा बिठाया तीरथ बनाया सानी" असे म्हणत जनजागृते केली. भोळ्या बायाबापड्याना अंधश्रद्धेच्या चक्रातून सोडवले .
नरबळी ,देवदासी सारख्या प्रथा या अंधश्रद्धेतून निर्माण झाल्या आहेत.
वंशाला दिवा असावा या समजूतीपायी कित्येक अश्राप लहानग्या मुली बळी दिल्या गेल्या आहेत.
मुलीला शिकवू नये या अंधश्रद्धेच्या पायी ज्योतिबा फुले नसते तर अजूनही कित्येक मुली प्राथमिक शिक्षणापासूनही वंचित राहिल्या असत्या.
श्री युयुत्स्य जी आपल्याला मनापासून अंधश्रद्धा शिल्लक असाव्यात असाव्यात असे वाटते का?
आपण ज्या शब्दात अंधश्रद्धा निर्मुलन चळवळी बद्दल लिहीत आहात ( दुसर्‍याच्या लिखाणाचा उदोउदो करीत आहात)
त्यावरून अंधश्रद्धा टिकुन रहाव्या या साठी तुम्ही देव पाण्यात घालून ठेवत असावेत .
एखाद्या गोष्टीसाठी मुद्दे संपले की लोक ज्या प्रमाणी शिव्याशाप देत आकांडतांडव करतात त्या प्रमाणे तुम्ही एका चांगल्या कार्याला शिव्याशाप देत आहात.
तुम्हाला ज्या अंधश्रद्धा तीकून रहाव्यात असे वाटत असेल तर त्या श्रद्धा अंध नाहीत याचा योग्य उहापोह करा.
योग्य व्यासपीठावर तुमची भुमीका मांडा. त्याची शास्त्रीय कसोट्यांवर मिंमासा करा .त्यात तथ्य असेल तर लोक स्वागतच करतील . त्यातुन फिकेउडून जाईल निके सत्व बाहेर येवूद्या. फलज्योतिष वरचा सर्वसामान्य माणसाचा विश्वास दृढ होईल
...
कृपा करून हे असल्या अशोभनीय भाषेत निष्फळ धागे काढु नका.

युयुत्सु's picture

17 Jan 2011 - 8:12 pm | युयुत्सु

ह्यात अशोभनीय काय आहे?

विजुभाऊ's picture

17 Jan 2011 - 8:21 pm | विजुभाऊ

लेखनाचे शीर्षक हे अशोभनीय वाटते.
अर्थात हे ज्याच्यात्याच्यावर आहे.
सुसंस्कृत भाषेत एखाद्या चांगल्या गोष्टीला " आयचा घो" असे म्हंटले जात नाही
( ऊदा: कोणी एखाद्याला आदराने भरसभेत "तुझ्या आयचा घो" असे म्हंटल्याचे , किंवा आदराणीय प्रमुख पाहुण्याम्च्या आयचा घो "असे बोलल्याचे ऐकीवात नाही. ते ऐकणारास आणि बोलणारास दोघानाही अशोभनीय आहे.)
अर्थात मानणार्‍याने ती शिवी आहे असे मानले तर..
असो.
धागा विस्तृत दिला असता त्यावर तुमचे विचार काय ते मांडले असते तर बरे झाले असते.

टारझन's picture

17 Jan 2011 - 8:24 pm | टारझन

काय करायचं म्हणे ह्यात?

शुचि's picture

17 Jan 2011 - 8:36 pm | शुचि

युयुत्सु साहेब या लेखात दिल्याप्रमाणे ताइत, गंडे (ज्याला लेखात चार्म्स म्हटले आहे) यांमुळे परफॉर्मन्स (क्रयशक्ती) वाढलेली दिसून आलेली आहे.
_____
परंतु नाण्याची दुसरी बाजूदेखील असेलच ना? मांजर आडवे जाणे, अन्य तथाकथित अपशकुन यांमुळे या लोकांचीच क्रयशक्ती घटत देखील असेलच की.
_______
शेवटी गोळाबेरीज एकच!!!!

युयुत्सु's picture

18 Jan 2011 - 11:10 am | युयुत्सु

नाण्याच्या दूसर्‍या बाजूवर संशोधन झालेलं वाचनात आले नाही अजून...

यांमुळे या लोकांचीच क्रयशक्ती घटत देखील असेलच की.

घटत नाही हो ती दुसर्‍या कामासाठी वापरली जाते ;)

युयुत्सु's picture

17 Jan 2011 - 10:01 pm | युयुत्सु

श्री. विजुभाउ

शिक्षणाच्या आयचा घो हा सिनेमा आल्यापासून तसेच 'आयचा घो' ही पदे असलेले एक गाणे (अजय -अतुल?) ऐकल्यापासून मी 'आयचा घो' अशोभनीय मानणे सोडून दिले आहे. जर सेंसॉरला हा शब्दप्रयोग आक्षेपार्ह वाटला नाही तर मला तरी का वाटावा? पुण्यातले एक सिद्ध(!) पुरुष तर शिव्या देण्यासाठी प्रसिद्ध होते.

"त्यावरून अंधश्रद्धा टिकुन रहाव्या या साठी तुम्ही देव पाण्यात घालून ठेवत असावेत ."

मी स्वतः देव (आणि धर्म) मानत नाही त्यामुळे ते पाण्यात बुडविण्याचा प्रश्नच येत नाही. पण मी कुणाच्या श्रद्धा निर्मूलन करायच्या फंदात पडत नाही. परस्पर विसंगत श्रद्धा असू नयेत एव्हढेच माझे म्हणणे आहे. आणि विज्ञान हेच सर्व समस्यांचा परिहार म्हणुन जेव्हा पुढे केले जाते फक्त तेव्हा माझे रक्त उकळायला लागते. विज्ञानवाद्यांच्या आयचा घो हे शीर्षक जास्त सम्रर्पक झाले असते कारण दाभोळ्कर आणि नारळीकर यासरख्या व्यक्तींविषयी माझ्या मनात आता कोणताही आदर राहिलेला नाही. नाव मुद्दामुन घेत नाही पण अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अतिशय प्रसिद्ध असलेले एक महाराज मुंबईला माझ्या आजोळी एका कुटुंबाच्या घरी कशासाठी तरी आले होते. त्याना ज्या जागी बसायला आसन दिले होते तेथेच त्यांनी सर्वांच्या देखत मूत्र विसर्जन केले होते (सांगायचा मुद्दा एवढाच लोकाना शहाणे करायला निघालेल्या या महाराजाना स्वत:ला स्वत:चीच बेसिक स्वच्छता ठेवणे माहित नव्ह्ते). असो...

आणखीही बरेच लिहीण्यासारखे आहे पण नंतर कधितरी

स्वानन्द's picture

17 Jan 2011 - 11:42 pm | स्वानन्द

>>मी कुणाच्या श्रद्धा निर्मूलन करायच्या फंदात पडत नाही. परस्पर विसंगत श्रद्धा असू नयेत एव्हढेच माझे म्हणणे आहे. आणि विज्ञान हेच सर्व समस्यांचा परिहार म्हणुन जेव्हा पुढे केले जाते फक्त तेव्हा माझे रक्त उकळायला लागते.

सहमत

चित्रा's picture

18 Jan 2011 - 12:32 am | चित्रा

मुळात केवळ दोन दुवे डकवायचे आणि कोणाच्या तरी सरसकट आयचा घो म्हणायचे हे काही पटत नाही.
लेखकाला काय म्हणायचे आहे, त्या दुव्यांमध्ये काय लिहीले आहे हे दोन ओळीत संक्षिप्त स्वरूपात सांगायचे एवढे तरी श्रम लेखकाने घेतले पाहिजेत असे वाटते. अशा आगाऊपणामुळे मी ते दुवे वाचण्याचे श्रम घेतले नाहीत.

त्याना ज्या जागी बसायला आसन दिले होते तेथेच त्यांनी सर्वांच्या देखत मूत्र विसर्जन केले होते
कदाचित वयाप्रमाणे कंट्रोल राहिला नसेल, अशीही शक्यता असू शकते का?

विज्ञान हेच सर्व समस्यांचा परिहार म्हणुन जेव्हा पुढे केले जाते फक्त तेव्हा माझे रक्त उकळायला लागते.
मधल्या एका लेखात तुम्हीच म्हणालात तसे खरे मानले, तर म्हणजे अपघातदर्शक अमावस्येचे फळ त्रासदायक मिळणारच असले तर त्याची माहिती आधी करून घेऊन ती झाल्यानंतर शक्य तितके अपघात होणार नाही, म्हणून सुरक्षित ठिकाणी राहिले, आणि समजा त्याच दिवशी एखाद्याचा नोकरीसाठी इंटर्व्ह्यू असला आणि त्याला गेलेच नाही, तर नोकरी न मिळण्याचे त्रासदायक फळ मिळत नाही का?

अपघातदर्शक अमावस्या या समस्येचा परिहार कशात आहे?

प्रियाली's picture

18 Jan 2011 - 1:01 am | प्रियाली

कदाचित वयाप्रमाणे कंट्रोल राहिला नसेल, अशीही शक्यता असू शकते का?

हा प्रतिसाद तसा चित्राला नाही परंतु तरीही उपप्रतिसादातच लिहिते. री ओढल्याप्रमाणे.

त्याना ज्या जागी बसायला आसन दिले होते तेथेच त्यांनी सर्वांच्या देखत मूत्र विसर्जन केले होते - हे अंधश्रद्धाविरोधी लोकांचे व्यवच्छेदक लक्षण नाही. तसे असताना या व्यक्तिने हे असे करण्याचे कारण काय? अश्रद्धाळू किंवा अंधश्रद्धाळू आपले डोके आणि शरीर व्यवस्थित असताना असा उद्योग करणार नाही असे वाटते.

जर डोके आणि शरीर व्यवस्थित काम करत असेल तरीही असा उद्योग कोणी केला असेल तर कदाचित त्यांना आपला प्वाइंट मांडायचा असेल. उदा. मी देवघरात असे उद्योग करून दाखवतो आणि बघू देव मला काय करतो. जर का असे झाले असेल तर सदर व्यक्तीची वागणूक अतिरेकी आहे असे म्हणता येईल. तसा खुलासा युयुत्सु यांनी करणे आवश्यक होते परंतु असे झाले नसेल तर या वाक्याचे येथे प्रयोजन कळलेले नाही असे युयुत्सुंना सांगावेसे वाटते.

उगीच एकोळी धागे टाकलेले धागे उडवून देण्याचा अधिकार संपादक मंडळाला आहेच.

चित्रा's picture

18 Jan 2011 - 5:19 am | चित्रा

उगीच एकोळी धागे टाकलेले धागे उडवून देण्याचा अधिकार संपादक मंडळाला आहेच.

हा धागा उडवून टाकला तरी युयुत्सु हे असेच नवनवीन एकोळी धागे टाकत राहणार, हे प्रियाली यांना माहिती आहेच. शिवाय वरील प्रतिसादातील प्रत्येक मुद्दा खोडायला (सध्या) वेळ नाही. तेव्हा सध्या एवढेच. फक्त युयुत्सु हे अपघाती अमावस्येच्या समस्येला काय अवैज्ञानिक परिहार सुचवतात ते वाचण्यास उत्सुक आहे.

यात माझे एक ऑब्जेक्शन आहे: ते नुसतेच सूचक आहे असे वाटले म्हणून त्याबद्दल शंका नको म्हणून एक स्पष्टीकरण देते: माझ्या लक्षात जे आले आहे ते असे आहे की युयुत्सु हे ज्योतिषाचा व्यवसाय करतात.

बरेचदा आपण असे पाहतो की इंटरनेटवर अशा वर्दळीच्या संकेतस्थळांवर व्यवसायविषयक सूचक माहिती असलेले धागे काढले जातात, आणि मग स्वतःच्या expertise ची आयतीच (फुकट) जाहिरात होते. तेच करीत असताना दुसरीकडे आपण कसे विरोधकांच्याही बाजूचे आहोत त्याचीही जाहिरात होत असते. मग एकंदरीतच क्ष व्यक्ती कशी आहे याबद्दल एक धुके तयार होते. या धुक्याचा उपयोग क्ष व्यक्तीस व्यवसाय मिळवण्यास होत असतो.

म्हणून हे धुके दूर होऊन व्यवसायाचे खरे स्वरूप स्पष्ट व्हावे यासाठी आपली ग्रहतार्‍यांमुळे होणारी समस्या कशी सोडवली जाते याबद्दलही एक निरूपण करावे, आणि दोन वाक्यांत नको.

युयुत्सु's picture

18 Jan 2011 - 7:07 pm | युयुत्सु

मी माझ्या ज्योतिषाच्या प्रॅक्टीस मध्ये कोणताहीपरिहार्/उपाय सांगत नाही. फकत सावध करायचे काम करतो.

अवांतरः तुमची माझ्या व्यवसाय वृद्धीची जी थिअरी आहे ती मात्र आवडली

चित्रा's picture

19 Jan 2011 - 2:46 am | चित्रा

>>मी माझ्या ज्योतिषाच्या प्रॅक्टीस मध्ये कोणताहीपरिहार्/उपाय सांगत नाही. फकत सावध करायचे काम करतो.

शक्य वाटत नाही. तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवणारे हे प्रश्न विचारणारच. मला कोणी सांगितले अग तू या रस्त्याने जाऊ नको, त्यावर खाचखळगे आहेत तर मी असा प्रश्न विचारणारच की मग कुठच्या रस्त्याने जाऊ? सावध करणारा हमखास अमूक ठिकाणी जा, अशा रस्त्यावर वळ, म्हणजे मधला खड्ड्यांचा रस्ता लागणार नाही, असे सर्व सांगतो. कोणी या समस्येने त्रास होऊ नये म्हणून काय करावे असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर तुम्ही मी फक्त सावध करतो, बाकी माझ्याकडे काहीच उपाय नाही, एवढेच देत असलात तर आश्चर्य वाटेल. उपाय नक्कीच सांगत असणार असे वाटते.

कसेही असले, तरी या "सावध" करण्याला काहीच अर्थ नाही, असे वाटते.

>>अवांतरः तुमची माझ्या व्यवसाय वृद्धीची जी थिअरी आहे ती मात्र आवडली

धन्यवाद. तशी मी चाणाक्ष आहे.

त्याना ज्या जागी बसायला आसन दिले होते तेथेच त्यांनी सर्वांच्या देखत मूत्र विसर्जन केले होते - हे अंधश्रद्धाविरोधी लोकांचे व्यवच्छेदक लक्षण नाही. तसे असताना या व्यक्तिने हे असे करण्याचे कारण काय? अश्रद्धाळू किंवा अंधश्रद्धाळू आपले डोके आणि शरीर व्यवस्थित असताना असा उद्योग करणार नाही असे वाटते.

जर डोके आणि शरीर व्यवस्थित काम करत असेल तरीही असा उद्योग कोणी केला असेल तर कदाचित त्यांना आपला प्वाइंट मांडायचा असेल. उदा. मी देवघरात असे उद्योग करून दाखवतो आणि बघू देव मला काय करतो. जर का असे झाले असेल तर सदर व्यक्तीची वागणूक अतिरेकी आहे असे म्हणता येईल.

>>>>>>>

Absolutely 200% agreed with this part..

नरेशकुमार's picture

18 Jan 2011 - 6:30 am | नरेशकुमार

पण 'आयचा घो' म्हनजे नक्की काय ?

आजानुकर्ण's picture

18 Jan 2011 - 12:18 pm | आजानुकर्ण

आदरणीय नरेशकुमार यांस,

घो म्हणजे नवरा. आयचा घो म्हणजे आईचा नवरा. (म्हणजे बाप).

गोमू माहेरला जाते रे नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा

मध्येही घो आलेला आहेच.

गवि's picture

18 Jan 2011 - 12:23 pm | गवि

नुसते "बोलाव हो तुज्या घोवाक"
अशा वाक्यात नवरा हा अर्थ..

पण "च्या आयचा घो" या वाक्यात स्पेसिफिक उपयोग हा आदरार्थी नसून काहीसा अल्पगालिप्रदानवाचकच आहे. फार तीव्र शिवी नाहीये ती. पण भाव निगेटिव्हच.

स्वानन्द's picture

18 Jan 2011 - 1:45 pm | स्वानन्द

शिवाय... सचिन ने अजून हे उद्गार कुठल्या जाहिरातीत वापरले नसल्याने... 'आईला' या शब्दाइतके ग्लॅमर ही बिचार्‍या 'आईचा घो' ला मिळालेले नाही!

विकास's picture

18 Jan 2011 - 6:38 am | विकास

अंधश्रद्धा नाहीच असे युयुत्सुंना म्हणायचे आहे का?

आणि

(कशाला म्हणायचे यावर जरी "वैचारीक" मतभेद असु शकले असे गृहीत धरले तरी एकदाका) आहे असे वाटत असेल तर त्याचे निर्मुलन करायचे नाही असे त्यांना म्हणायचे आहे का?

का शिर्षकात सरसकट सगळ्याच प्रकारच्या "अंधश्रद्धा निर्मुलना"स विरोध आहे?

विनायक प्रभू's picture

18 Jan 2011 - 12:41 pm | विनायक प्रभू

चार्म बांधल्यामुले 'चार्म' चा चार्म वाढत असावा काय?

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jan 2011 - 1:20 pm | परिकथेतील राजकुमार

छान धागा, सुंदर चर्चा.

वाचतोय..

पु.ले.शु.

पैसा's picture

18 Jan 2011 - 9:28 pm | पैसा

आणखी येऊ द्या!

नरेशकुमार's picture

19 Jan 2011 - 9:12 am | नरेशकुमार

हार्ड-डिस्क च्या किमती कमी झाल्या आहेत.

विजुभाऊ's picture

21 Jan 2011 - 10:31 am | विजुभाऊ

परस्पर विसंगत श्रद्धा असू नयेत एव्हढेच माझे म्हणणे आहे. आणि विज्ञान हेच सर्व समस्यांचा परिहार म्हणुन जेव्हा पुढे केले जाते फक्त तेव्हा माझे रक्त उकळायला लागते.
मानसशास्त्र हे देखील एक शास्त्र आहे. कोणतेच शास्त्र हे संपूर्ण नसते. नवनवे शोध लागत असतात जुने सिद्धान्त कालबाह्य होत असतात. विज्ञा हेच सर्व समस्याचा परिहार आहे यात चूक काय आहे. कोणतीही गोष्ट कसोटीवर पारखून घ्व्यावी असे मानण्यात गैर काय आहे. विज्ञान हे योगायोगपेक्षा नियम प्रत्येक वेळेस सिद्ध झाला पाहिजे या तत्वावर आधारीत आहे.

विज्ञानवाद्यांच्या आयचा घो हे शीर्षक जास्त सम्रर्पक झाले असते कारण दाभोळ्कर आणि नारळीकर यासरख्या व्यक्तींविषयी माझ्या मनात आता कोणताही आदर राहिलेला नाही.
दाभोलकर ,नारळीकर त्यांच्या अगोदरच्या पिढीत गाडगेबाबा त्याही अगोदर महात्मा गांधी धोन्डो केशव कर्वे , ज्योतीबा फुले , किंवा त्याही अगोदर शिवाजी महाराज (आठवा: पुत्र पालथा जन्मला पातशाही पालथी घालेल ) तुकाराम महाराज किंवा त्यादेखील अगोदर गौतम बुद्ध ,वेळोवेळी झालेले चार्वाक श्री कृष्ण ( उदा: गोवर्धन्पूजा ) यानी लोकाना अंधश्रद्धा टाकून द्यावी म्हणून प्रवृत्त केले. अगदी जुने संदर्भ सोडले तर त्यात्या काळच्या अंधश्रद्धा नष्ट करून लोकाना त्या विळख्यातून बाहेर काडले होते.
दाभोलकरानी बर्‍याच ठीकाणी अनेक भोन्दू बाबांचे बिंग फोडले आणि त्यांच्या विवीध लीला ना वाचा फोडून सामान्य भोळ्या लोकांची नाडणूक होण्यापासून वाचवले यात गैर कय आहे?

नाव मुद्दामुन घेत नाही पण अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अतिशय प्रसिद्ध असलेले एक महाराज मुंबईला माझ्या आजोळी एका कुटुंबाच्या घरी कशासाठी तरी आले होते. त्याना ज्या जागी बसायला आसन दिले होते तेथेच त्यांनी सर्वांच्या देखत मूत्र विसर्जन केले होते (सांगायचा मुद्दा एवढाच लोकाना शहाणे करायला निघालेल्या या महाराजाना स्वत:ला स्वत:चीच बेसिक स्वच्छता ठेवणे माहित नव्ह्ते). असो...

अंधश्रद्धा निर्मुलनासाठी प्रसिद्ध असलेले महाराज......
या शब्दातच विरोधाभास आहे. अंधश्रद्दाविरोध करणारे स्वतःला महाराज कशाला म्हणवून घेतील?
त्या गृहस्थानी सर्वादेखत मूत्रविसर्जन केले हे कोणत्य अपरिस्थीतीत घडले होते? एखादवेळेस सदर गृहस्थ आजारी असतील? पण कोणतीही व्यक्ती ( लहान बालके सोडून ) असे कृत्य सर्वासमोर करणार नाही. अर्थात अंधश्रद्धा निर्मुलकांचे हे व्यवच्छेक लक्षण नाही.
रहाता राहिले ते फलज्योतीषाचे.... तो तुमचा व्यवसाय आहे. तुम्ही लोकाना सावध कराता की सावज करता याचा प्रश्न नाही.
लोकानी अंधश्रद्ध रहावे ही तुमची इच्छा असावी . आणि ती कशी टिकेल यासाठी प्रयत्नशील रहाणे हे तुम्हाला आवडते.
असो. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण त्यासाठी एका चांगल्या उद्देशाने चालवलेल्या चळवळीला " आयचा घो" असल्या गालीवाचक शब्दाने का हिणवता आहात?
तो शब्द जर वाईट नाहे असे तुम्हाला वाटत असेल तर तु तुम्ही स्वतःबद्दल आदराने स्वतःच्या नावासमोर लावून दाखवावा.
हे आव्हान किंवा जे काय समजायचे ते समजा. असे शब्द वापरून आणि त्याचे समर्थन करून तुम्ही स्वतःचेच हसे करून घेत आहात
आणखी काय सूज्ञास सांगणे न लगे. अर्थात सुज्ञासच.......

प्रसन्न केसकर's picture

21 Jan 2011 - 1:58 pm | प्रसन्न केसकर

मानसशास्त्र हे देखील एक शास्त्र आहे

नक्की? कुणाच्या मते? जरा सविस्तर खुलासा केलात तर ज्ञानवृद्धी होण्यास उपयोग होईल. अगदी खव/ व्यनितुन केलात तरी हरकत नाही.
माझ्या समजुतीनुसार मानसशास्त्र हे शास्त्र नाही. अगदीच घासाघीस करुन शेवटी मनोविकारशास्त्राला कदाचित शास्त्र म्हणता येईल इतपत उदारता काहीजणांनी दाखविली आहे आणि तरी अद्यापही त्याबाबत वाद आहेत.

अवांतरः
मानसशास्त्र = शास्त्र = क्रांतीकारक बदल. मानसशास्त्र जर शास्त्र असेलच तर इलेक्ट्रोपथी, नॅचरोपथी, होमिओपथी, मॅग्नेट थेरपी, आयुर्वेद इ. सरळ सरळ वैद्यकशास्त्राच्या शाखाच ठरु शकतील की. आणि हो, अ‍ॅस्ट्रॉलॉजी पण मग त्याच न्यायाने शास्त्र कदाचित म्हणता येईल की.

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jan 2011 - 2:52 pm | llपुण्याचे पेशवेll

बरोबर मग तर त्याच न्यायाने अ‍ॅस्ट्रोलॉजी = अ‍ॅस्ट्रोनॉमी असेही म्हणता येईल. नाही का?

रिपप्रोड्यूसेबल आणि प्रेडिक्टेबल तत्व जी विचारप्रणाली सांगू शकते ती = शास्त्र.

म्हणून जे शास्त्र नाही ते भाकड असे नव्हे. फक्त एक व्याख्या करायचा प्रयत्न केला.

प्रसन्न केसकर's picture

21 Jan 2011 - 2:54 pm | प्रसन्न केसकर

रिपप्रोड्यूसेबल आणि प्रेडिक्टेबल तत्व जी विचारप्रणाली सांगू शकते ती = शास्त्र.
म्हणजे शास्त्र प्रेडिक्शन्स करु शकते असे का? कि प्रेडिक्शन्स करु शकते ते शास्त्र असा याचा अर्थ होतो? मग प्रेडिक्शन्स करणे म्हणजेच शास्त्रीय दृष्टीकोण काय?

गवि's picture

21 Jan 2011 - 3:18 pm | गवि

पण "प्रेडिक्शन" हा शब्द काळजीपूर्वक वापरायला हवा.

प्रेडिक्टेबल म्हणजे प्रेडिक्टेबल रिझल्ट्स असणारे.

रिझल्ट हा व्यक्तीगणिक, स्थानागणिक (गिव्हन कंडिशन्स ऑफ एम्बिअन्स कायम असताना) बदलत असेल तर ते शास्त्र नव्हे.

म्हणजे :

टॉस उडवल्यावर काटा किंवा छाप येतो.. हा अनुभव.

टॉस उडवून छाप किंवा काटा पन्नास पन्नास टक्के येईल.. (विथ किती वेळा नाणे फेकल्यावर किती बायसची शक्यता याच्या रेंजसह (प्रयोगाअंती)) हे शास्त्र.

यंदा उडवा.. छापच येईल.. पण काटा आला तर "तेवढी चूक काही अज्ञात फोर्सेसमुळे काही केसेस्मधे राहून जाऊ शकते".. हे भविष्य..

आणि.. छाप आला तर धनलाभ.. ही भोंदूगिरी.. :) टॅरो बिरो , लक्ष्मी यंत्र वगैरे म्हणजे तरी काय दुसरं?

इव्हन ज्योतिषाचे काही प्रकार हे अशाच लॉजिक्सना अवघड अनाकलनीय बनवून तयार झालेले आहेत.

प्रसन्न केसकर's picture

21 Jan 2011 - 6:41 pm | प्रसन्न केसकर

रिझल्ट हा व्यक्तीगणिक, स्थानागणिक (गिव्हन कंडिशन्स ऑफ एम्बिअन्स कायम असताना) बदलत असेल तर ते शास्त्र नव्हे.
अशी व्याख्या नक्की करता येईल? मला नाही वाटत अशी कोणतीही व्याख्या चालु शकेल. मुळात विज्ञानात रिझल्ट नसतात. असतात ते हायपोथेटीकल डिडक्टीव्ह निष्कर्ष. विज्ञानात प्रोबेबिलिटी फॅक्टर नसतो कारण तिथे श्रद्धांची (अ‍ॅझम्प्शन/ प्रिझम्शन/ प्रिमायसेस/ बिलीफ... काहीही म्हणा ) एक भक्कम चौकट असते व सर्व निष्कर्ष त्या चौकटींच्याच आधीन असतात. त्यामुळे विज्ञानात कधीच सत्यता ही कसोटी नसते, केवळ तार्किकता एव्हढीच कसोटी असते. ही विज्ञानाची मर्यादा आहे.
टॉस उडवून छाप किंवा काटा पन्नास पन्नास टक्के येईल..
चुक. छाप येण्याची शक्यता ३३.३३n टक्के, काटा येण्याची शक्यता ३३.३३n टक्के आणि दोन्ही न येण्याची शक्यता ३३.३३n टक्के कारण नाण्याला तीन मिती असतात. वरील विधान अवैज्ञानिक आहे.
ज्योतिषाचे काही प्रकार हे अशाच लॉजिक्सना अवघड अनाकलनीय बनवून तयार झालेले आहेत.

ज्योतिषच काय बहुतेक सर्वच अ‍ॅप्लाईड युनिव्हर्सलाईझ्ड प्रेडिक्शन्स, अगदी हायपोथेटिकल डिडक्शन्सचे जनरलायझेशन्ससुद्धा अवघड लॉजिकनेच होतात. त्याला इंडक्टीव्ह मेथड वापरावी लागते. अर्थातच या पद्धतीमध्ये इंडक्टीव्ह लीप असल्याने एरर मार्जिन येतेच. हे एरर मार्जिन असणे हा देखील मुलभुत तर्कशास्त्रातलाच सिद्धांत आहे. त्यामुळे सर्व वैज्ञानिक निष्कर्ष सार्वकालिन सत्यच असतील असे गृहित धरता येत नाही. ही अजुन एक मर्यादा.

डिस्क्लेमरः
हे सर्व मुद्दे ज्योतिषाला पाठिंबा देण्यासाठी मी मांडत नाही. विज्ञानवादाची कास धरणे केव्हाही अधिक संयुक्तीक असे माझे व्यक्तीगत मत आहे. परंतु अनेकदा आपण विज्ञानवादाचा पुरस्कार कोणत्याही व्याख्या न करता, विज्ञानाच्या मर्यादा समजुन न घेता करतो. प्रत्यक्षात जेव्हढ्या मर्यादा अन्य गोष्टींना असतात जवळपास तेव्हढ्याच मर्यादा विज्ञानाला देखील असतात, विज्ञान सार्वत्रिकरित्या व सार्वकालिनपणे १०० टक्के सत्य असतेच याकडे अनेकदा कानाडोळा होतो. मी स्वतः ग्रामीण भागात वाढलेला व शहरातील गरीब अशिक्षितांच्या वस्त्यांमधे मिसळलेला असल्याने अश्या निर्बुद्ध विज्ञानवाद्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनाच्या नावाखाली केलेले उत्पात व त्यांचा ऊतमात हा कथित धर्ममार्तंडांच्या उत्पात व ऊतमाताएव्हढाच नव्हे तर काहीवेळा त्यापेक्षाही भयंकर असतो हे अनेक प्रसंगी अनुभवलेले आहे. या दांभीक अंधश्रद्धा निर्मुलकांच्या बिंग फोडण्याच्या उद्योगांमुळे लोकांना प्राण देखील गमवावे लागल्याची काही उदाहरणे मी स्वतः पाहिलेली आहेत. त्यामुळेच हा सारा उठाठेव!

विजुभाऊ's picture

21 Jan 2011 - 5:17 pm | विजुभाऊ

मानसशास्त्र हे शास्त्र या निकषावर बसत नसेल तर आयुर्वेद , होमीओपाथी हे सुद्धा शास्त्र होणार नाही.
कारण तेथे नियम सर्वंकश पणे लागू पडत नाहीत. एक औषध एकाला लागू पडेल ते दुसर्‍याला लागु पडणार नाही.
उदा: इनो घेतल्याने एखाद्याला काहीच होणार नाही..एखाद्याची जलजळ कायमची थांबेल.
अंडे खाल्याने एखाद्याची तब्येत सुधारेल तर एखाद्याला हगवण लागेल

प्रसन्न केसकर's picture

21 Jan 2011 - 6:44 pm | प्रसन्न केसकर

तुम्हीच तर मानसशास्त्र हे शास्त्र आहे म्हणालात म्हणुन मी खुलासा मागीतला. हे पहा:

परस्पर विसंगत श्रद्धा असू नयेत एव्हढेच माझे म्हणणे आहे. आणि विज्ञान हेच सर्व समस्यांचा परिहार म्हणुन जेव्हा पुढे केले जाते फक्त तेव्हा माझे रक्त उकळायला लागते.
मानसशास्त्र हे देखील एक शास्त्र आहे. कोणतेच शास्त्र हे संपूर्ण नसते. नवनवे शोध लागत असतात जुने सिद्धान्त कालबाह्य होत असतात. विज्ञा हेच सर्व समस्याचा परिहार आहे यात चूक काय आहे. कोणतीही गोष्ट कसोटीवर पारखून घ्व्यावी असे मानण्यात गैर काय आहे. विज्ञान हे योगायोगपेक्षा नियम प्रत्येक वेळेस सिद्ध झाला पाहिजे या तत्वावर आधारीत आहे.