स्त्री-मुक्तीची एक दुर्लक्षित बाजू

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
10 Jan 2011 - 11:29 am
गाभा: 

अलिकडेच पुण्याच्या सकाळने एक स्त्री-मुक्तीवर नैमित्तीक-रुदन-पुरवणि काढली होती. त्यात अनेक प्रभृतीनी भुई धोपटली होती. ते वाचून माझ्या डोक्यात एक विचार आला की समजा परमेश्वराने प्रसन्न होऊन समस्त स्त्री जातीस मुक्त होण्याची irrevocable guarantee दिली तर काय काय व्हायला हवे?

मुख्य म्हणजे समता दर्शक कल्पना / रुढी निर्माण व्हायला हव्यात. सध्या स्त्री-मुक्ती प्रामुख्याने चूलीपासून मुक्ती मिळवण्यात घुटमळत आहे. समाजाच्या काही थरात हे काही प्रमाणात शक्य झाले आहे (आम्ही त्या थरात येतो!). आमच्या घरात मी अशाच एका पुरुषप्रधान रुढीचे उच्चाटन करण्यासाठी एका समांतर रुढीची स्थापना करायचा प्रयत्न करत आहे. ती रुढी म्हणजे ओवाळण्याची रुढी. नव-यांनी बायकोला वेगवेगळ्या निमित्ताने ओवाळायला काय हरकत आहे.** पण अजुन यशातला 'य' पण मला दिसला नाही.

दूसरी माझी विफल झालेली कल्पना म्हणजे स्त्री-वंश निर्मितीची - म्हणजे आमच्या कन्यारत्नाने आईचे नाव आणि आडनाव लावायचे. पण याही कल्पनेला दिवसाचा उजेड दिसलेला नाही...

या निमित्ताने कुणाला आणखी काही विचार मांडायचे असल्यास अवश्य मांडावेत.

** 'सप्तपदी निर्मूलन समितीचा एक फ्लॅगशिप कार्यक्रम'

प्रतिक्रिया

टेस्ट ट्युब बेबीचे पुढचे पाउल म्हणजे प्रयोगशाळेतच संपूर्ण मानव निर्मिती लवकरच शक्य होईल / किंवा झाली आहे असे समजते. शास्त्रज्ञांनी पुढाकार घेऊन यापुढे मनुष्यनिर्मिती ही केवळ प्रयोगशाळा/कारखान्यातच होईल असे करुन मनुष्याच्या डिएनए मधे सुधारणा करुन स्त्री पुरुष हा भेद नष्ट करावा. लैंगिकसुखाच्या उन्मादक लहरी मेंदुमधे रासायनिक क्रियांचे नियमन करुन ज्याला हव्या त्याला त्या केव्हाही मिळतील अशी व्यवस्था करुन शारीरीक संबंधाचे मानसिक अवस्थेत परिवर्तन करुन जोडीदाराची गरज रहाणार नाही असे करावे. ज्यामुळे कुटुंबव्यवस्थेची सुद्धा गरज रहाणार नाही. कुटुंब न राहिल्याने त्यासाठी लागणारा वेळ वाचल्याने प्रत्येकजण जीडीपीत भर टाकेल. स्त्रीपुरुष भेदच न राहिल्याने समस्या नष्ट होतील. युयुत्सुंना सुद्धा बाकी विषयांत प्राविण्य मिळवता येईल ;)

मी ऋचा's picture

10 Jan 2011 - 3:34 pm | मी ऋचा

_/\_

स्वाती२'s picture

10 Jan 2011 - 6:04 pm | स्वाती२

हा! हा! हा!

स्वाती२'s picture

10 Jan 2011 - 6:07 pm | स्वाती२

.

स्वाती२'s picture

10 Jan 2011 - 6:06 pm | स्वाती२

प्रकाटाआ

नगरीनिरंजन's picture

10 Jan 2011 - 7:14 pm | नगरीनिरंजन

नानांनी पुन्हा एकदा चौकार मारून योग्य ठिकाणी बॅट (बोटाऐवजी) ठेवलेली आहे. त्याबद्दल त्यांना सोळा मिपावासिनींनी ओवाळावे असा प्रस्ताव मी मांडत आहे.

- आवळिया

वाहीदा's picture

10 Jan 2011 - 7:18 pm | वाहीदा

___/\___

तुला अन युयुत्सुंना भारताच्या Planning Commission मध्ये का नाही बसवलं ??
हे भारताचे दुर्भाग्य की सुदैव या संभ्रमात .. ;-)
भारत आर्थिक प्रगतीला मुकला

सविता's picture

11 Jan 2011 - 4:03 am | सविता

लय भारी!!!

विनायक प्रभू's picture

10 Jan 2011 - 11:48 am | विनायक प्रभू

हॅहॅहॅ

अविनाशकुलकर्णी's picture

10 Jan 2011 - 12:04 pm | अविनाशकुलकर्णी

समजा परमेश्वराने ........समजा परमेश्वराने ........
जर मी पोपट असतो तर उंच आकाशात भरा~या घेतल्या असत्या..पेरु खाल्ले असते....

नव-यांनी बायकोला वेगवेगळ्या निमित्ताने ओवाळायला काय हरकत आहे.**

समजा जरी करणार असले पुरुष स्त्रियांची आरती तरी आरतीच्या ताटाची तयारी स्त्रीलाच करुन द्यावी लागेल.

फक्त काही दिवस. :)

आम्ही लवकरच रेडी टु सर्व या शृंखलेत "आरती" हे उत्पादन आणत आहोत.
पाकिट फोडा ... सील पाहुन खात्री करा आमचाच शुद्ध माल आहे याची
आतली वात पेटवा .... काडेपेटी सुद्धा देणार आहोत पाकिटातच...
ओवाळा ... कसे ओवाळायचे माहित नसल्यास आत शास्त्रशुद्ध सुचना आहेत तज्ज्ञ व्यक्तींच्या
खल्लास !!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jan 2011 - 10:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खल्लास !!!

आपल्या शॉपिंग कार्टात हे प्रॉडक्ट आहे का नाही आणि ऐन वेळी ते घरात उपलब्ध आहे का नाही याची काळजी कोणी घ्यायची, स्त्रीने का पुरूषाने?

आणि तुमचाच शुद्ध माल तुम्हीच विकणार?????????

कान आणि करंगळी चा विनोद आठवला

विजुभाऊ च्या मताशी सहमत.

सध्या एक सुंदर पुस्तक वाचते आहे -लव्ह अँड रिस्पेक्ट. लेखकाचा मूळ मुद्दा हा आहे की - "बायको , नवर्‍याकडून प्रेमाची अपेक्षा करते तर नवरा बायकोकडून आदराची अपेक्षा करतो." आणि या दोन्ही अपेक्षा भिन्न असल्याने एकमेकांना कळणे अवघड जाते आणि त्यांची परिपूर्ती देखील तितकीच अवघड होऊन बसते.
हे पुस्तक मुख्यत्वे ख्रिश्चन लोकांसाठी पुस्तक असल्याने बायबलमधील काही संदर्भ "a wife who brings shame to her husband is like sickness in his bone" अशा प्रकारची वाक्ये या पुस्तकात येतात.
_____________________________
स्त्रीमुक्तीचा वर मिळाला तर मला वाटतं - ही जी स्त्री-पुरुष संवादातील दरी आहे ती मुख्यत्वे सांधली जाईल. जसे वरच्या उदाहरणात - एकाला प्रेम हवे आहे तर दुसर्‍याला आदर. हे एकमेकांना सहज कळून येईल. कोणीही एकमेकांपासून मुक्त होणार नाही तर एकमेकांमधील दरीपासून मुक्त होइल.

वेताळ's picture

10 Jan 2011 - 1:48 pm | वेताळ

a wife who brings shame to her husband is like sickness in his bone"
म्हनजे बायबल देखिल स्त्री विरोधक पुस्तक आहे तर......

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jan 2011 - 10:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ते 'न्यू टेस्टामेंट' उर्फ 'नवा करार' वाचाच, निदान पहिली काही पानंतरी वाचा. लगेच खात्री पटेल हे पुस्तक स्त्रीद्वेष्टं आहे याची ... पण भयानक विनोदीही आहे हे पुस्तक. तेव्हा तशा पद्धतीने वाचलंत तर रक्तदाब नॉर्मल होण्याची १००% खात्री!

अप्पा जोगळेकर's picture

10 Jan 2011 - 1:40 pm | अप्पा जोगळेकर

नव-यांनी बायकोला वेगवेगळ्या निमित्ताने ओवाळायला काय हरकत आहे.**
मुळामधे हा ओवाळाण्याचा खूळचटपणा हवाच कशाला ?

लग्नात कन्यादान आणि जावई , वरमाई यांचे पाय धूणे या प्रथा बंद करायला हव्यात ..

बाकी ओवाळणे /औक्षण करणे (कोणी ? कुणाला ? कधी ? ) हा ज्याचा त्याच प्रश्न आहे .

मी माझ्या मुलाला त्याच्या जन्मदिनी तसेच अश्विनी पौर्णिमेला औक्षण करते ..
परंतु माझ्या पतिला त्याच्या जन्मदिनी किंवा दिवाळी पाडव्याला ओवाळत नाही .

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jan 2011 - 2:28 pm | परिकथेतील राजकुमार

तसेही सर्व पुरुष हे गावावरुन ओवाळुन टाकलेले असल्याने त्यांना वेगळ्याने ओवाळायची गरज काय ?

वाहीदा's picture

10 Jan 2011 - 2:58 pm | वाहीदा

तसेही सर्व पुरुष हे गावावरुन ओवाळुन टाकलेले असल्याने त्यांना वेगळ्याने ओवाळायची गरज काय ?
=)) =)) खल्लास प्रतिसाद !

अरुण मनोहर's picture

10 Jan 2011 - 3:12 pm | अरुण मनोहर

ह्या लेखात देखील मला युयुत्सु तुमचा 'यु' दिसला नाही!!!
(>>पण अजुन यशातला 'य' पण मला दिसला नाही.<<)

आणखी एक आयडियाची कल्पना. पाच सुवासिनींनी ओवाळण्याची पद्धत बंद करून पाच सुहास्यांनी ओवाळावे.

आणखी एक आयडियाची कल्पना. पाच सुवासिनींनी ओवाळण्याची पद्धत बंद करून पाच सुहास्यांनी ओवाळावे.

आम्हाला एकच सुहास.. माहिती आहे.. उरलेले चार कुठे मिळतील??

विकास's picture

10 Jan 2011 - 5:33 pm | विकास

मला वाटते बदल लहान करून पहाता येईल. या पुढे "काकाला मिशा नसल्या तर आत्याबाई" म्हणून पहा कसा प्रतिसाद मिळतोय ते. :-)

प्रियाली's picture

10 Jan 2011 - 6:52 pm | प्रियाली

माझं स्पष्ट मत असं की जे दिवे लावण्याचे काम करतात त्यांनाच ओवाळावे. ते केल्याने आपण नेमके कोण-कोणते आणि कुठे कुठे दिवे लावले किंवा दिवे पाजळले त्याची आठवण त्यांना येईल. तेव्हा बायकांना ओवाळायचे काहीही कारण नाही. फक्त पुरुषांनाच ओवाळावे.

नगरीनिरंजन's picture

10 Jan 2011 - 7:07 pm | नगरीनिरंजन

ओवाळण्याचा आणि मुक्तीचा काय संबंध आहे हे माझ्या अल्पमतीला समजले नाही. इतके दिवस मी समजत होतो की मुक्तीचा संबंध फक्त आवळण्याशीच आहे.
असो. अशा प्रथा आणि रूढी उलट्या करून कोणी मुक्त होत असेल तर मग खूपच सोपे आहे.

चित्रा's picture

10 Jan 2011 - 8:13 pm | चित्रा

समतादर्शक? हम्म. एक कोडे उलगडते आहे की काय असे वाटले. असो.

पुरुषांनी बायकांना ओवाळणे किंवा स्त्री-वंशाची निर्मिती आडनावे बदलून करणे, ही अगदीच वरवरची समता झाली.
त्यापेक्षा ज्यांच्या घरात तान्ही मुले आहेत त्यांच्या घरात त्या लहान बाळांची सू- आणि शी आईऐवजी वडिलांनी काढावी. ही सुरुवात चांगली राहील. नवीन लग्न झालेल्या पुरुषांनी घरी येताना दालतडक्याची पाकिटे आणण्याने सुरुवात करावी. किंवा बायको घरी येण्याआधी घरी येऊन बायकोसाठी गरम गरम चहा करावा.

प्रियाली's picture

10 Jan 2011 - 8:20 pm | प्रियाली

त्यापेक्षा ज्यांच्या घरात तान्ही मुले आहेत त्यांच्या घरात त्या लहान बाळांची सू- आणि शी आईऐवजी वडिलांनी काढावी. ही सुरुवात चांगली राहील. नवीन लग्न झालेल्या पुरुषांनी घरी येताना दालतडक्याची पाकिटे आणण्याने सुरुवात करावी. किंवा बायको घरी येण्याआधी घरी येऊन बायकोसाठी गरम गरम चहा करावा.

हे सर्व तुझ्या आणि माझ्या घरी अलरेडी होते आहे असा माझा अंदाज आहे. (आय मीन, माझ्या घरी होते असा अंदाज नाही. माझ्या घरी हे सर्व होतेच पण तुझ्या घरीही होत असावे आणि आपल्या घरांव्यतिरिक्त बहुतांश घरी होत असावे. ;) )

समतादर्शक -

१. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीशी लग्न करणे. निदान तिचे प्रपोजल आल्यावर ते कंसिडर करणे. ;)
२. आपल्यापेक्षा पगाराने अधिक असणार्‍या मुलीशी लग्न करणे.
३. आठवड्यातील काही वार स्वयंपाकासाठी वाटून घेणे.
४. घरी आलेल्या पाहुण्यांची उठून सरबराई करणे (बरेच पुरुष घरात कुणी नसताना आनंदाने बायकोला मदत करतात पण पाहुणे आले की फक्त ऑर्डरी सोडतात असे वाटते)

वरील सर्व होत नाही तोपर्यंत ओवाळून घेण्याचा मान पुरुषांचाच. ;)

सेरेपी's picture

10 Jan 2011 - 10:16 pm | सेरेपी

समतादर्शक उदाहरणांपैकी १ आणि २ मी बरीच पाहिली आहेत. परंतु त्यातील एकही जोडपं समानता वगैरे प्रकार ३ से. मी. वरुन सुद्धा ओळखणार नाही तेव्हा अशा ठिकाणीही ओवाळून घेण्याचा मान 'कुलदिवट्यांचाच' ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jan 2011 - 10:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

समतादर्शक उदाहरणांपैकी पहिल्याचं प्रसिद्ध उदाहरण आहे सचिन तेंडूलकर आणि २ चं आहे बराक ओबामा.

३ आणि ४ बद्दल मान्यच आणि शिवाय आणखी एकः
४ अ. आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो तर स्त्रिया साधारणपणे स्वयंपाक, आवराआवरीत मदत करताना दिसतात, पुरूष नाहीत. (अलिकडेच झालेल्या मिपाकरांच्या भेटीलाही हे निरीक्षण लागू पडतं.) तर अशी मदत पुरूषांनी करावी.

अगदी!
एकदा आमच्या गृपमध्ये 'पुरुषांनी स्वयंपाक करावा, आवराआवरी करावी' या माझ्या सूचनेकडे पुरुषांपेक्षा बायकांनीच डोळे मोठ्ठे करून पाहिल्याचं आठवतं. त्यावेळी सर्व नवरे कंपनी 'ऐकून न ऐकल्यासारखे' करीत होती.
गेली आठ वर्षे आम्हे मैत्रिणी बाहेर जेवायला जाऊ, सिनेमाला जाऊ असं नुसतं ठरवत आलोय.

प्रियाली's picture

10 Jan 2011 - 11:54 pm | प्रियाली

समतादर्शक उदाहरणांपैकी पहिल्याचं प्रसिद्ध उदाहरण आहे सचिन तेंडूलकर आणि २ चं आहे बराक ओबामा.

बराक ओबामाला अमेरिकेतच ठेवू. सचिन तेंडूलकरचा प्रेमविवाह आहे. मी प्रपोजल येणे- ते मान्य करणे म्हणजे अरेंज्ड मॅरेज आणि स्थळ बघून करण्याच्या प्रथेबद्दल बोलते आहे.

अन्यथा, लहान नवरा करण्याची उदाहरणे माझ्या कुटुंबातच दोन-तीन आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jan 2011 - 1:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुद्दा तसा मान्य आहेच, पण अपवादासाठी उदाहरणं भारतातही धुंडाळावी लागत नाहीत, सहज सापडणारी आतातरी असतात. अरेंज मॅरेजमधे सर्वसाधारणपणे अशी प्रपोजल्स येत नाहीत किंवा अमान्य होतात. पण पस्तिशी-चाळीशीनंतर अरेंज मॅरेज करून बोहोल्यावर चढणारे पगार आणि वय या बाबतीत फार काचकूच करत नाहीत असं ऐकीवात आहे.

रेवतीताई: होय, "मी अमकं काम करते आहे तोवर तू कॉफी करशील का?" असा प्रश्न नवर्‍याला विचारल्यावर लिंगभेद विसरून "काय गं त्याला कामाला लावते आहेस?" असा प्रश्न मला विचारला गेला, जातो.

प्रियाली's picture

11 Jan 2011 - 2:04 am | प्रियाली

पस्तिशी-चाळीशीनंतर अरेंज मॅरेज करून बोहोल्यावर चढणारे पगार आणि वय या बाबतीत फार काचकूच करत नाहीत असं ऐकीवात आहे.

काचकूच करून सांगतील कुणाला? ;) आधी लग्नासाठी मुलगा शोधताना किमान ५० अटी ठेवणारी माझ्या ओळखीतली एक मुलगी ४० नंतर बिजवर/डिवोर्सी आणि एखादे मूल असेल तरी हरकत नाही असे म्हणू लागली.

आजही सहज सापडणारी उदाहरणे प्रेमविवाह/ काही मोजकी सुधारक कुटुंबे किंवा ३५+ वर्गातलीच आढळतात.