गाभा:
१ निरा राडीया ह्या मोठ मोठ्या कंपन्यांसाठी लॉबीइंग करायच्या. अर्थातच पैशाच्या मोबदल्यात. अशा लॉबीइंगला भ्रष्टाचार म्हणता येईल का. सिग्नलला पोलिसाने पकडले तर काही लोक पैसे देऊन सुटतात - हे एक प्रकारचे लॉबीइंगच झाले.
माझे उत्तर - हा भ्रष्टाचारच आहे. -- सोयी करता कोणी ह्याच गोष्टीला लॉबिइंग हे नाव ठेवतात. काहींचे म्हणणे पडते की अमेरीकेत (व प्रगत राष्ट्रात) सुद्धा असेच चालते (म्हणजे ते बरोबर) किंवा हल्ली चे मॅनेजमेंट चे एक तंत्र आहे असे म्हणतात.
२. निरा राडीया केंद्रात कोणते मंत्री पाहिजे हे ठरवू शकते (पंत प्रधान ठरवतात असे मला वाटायचे). हे अराजक नाही का. मग लोकशाही कोठे गेली.
आपल्याला काय वाटते.
प्रतिक्रिया
2 Jan 2011 - 11:32 am | अवलिया
प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.
2 Jan 2011 - 11:40 am | वेताळ
त्या कश्याप्रकारे काम करत ह्याबद्दल माहिती मिळेल काय?
2 Jan 2011 - 7:25 pm | रणजित चितळे
जालावर काही टेप्स आहेत व आऊटलुक ने त्या छापल्या पण आहेत त्यावरुन समजुन येते.
2 Jan 2011 - 11:55 am | सहज
दररोज प्रत्येक निर्णय, प्रत्येक नागरीकाचे मत लक्षात घेउन काम करणे?
2 Jan 2011 - 7:20 pm | रणजित चितळे
ज्यांना निवडून दिले आहे त्यांनी काम करणे. निरा राडीया निवडून आली नाही. तरी मंत्रीमंडळात ढवळाढवळ करत होती असे उघडकीस आले आहे.
3 Jan 2011 - 7:21 am | सहज
निवडून दिलेल्या लोकांनी ती ढवळाढवळ का चालवून घेतली?
3 Jan 2011 - 9:00 am | वाहीदा
निवडून दिलेल्या लोकांनी ती ढवळाढवळ का चालवून घेतली?
अहो त्यालाच तर भ्रष्टाचार म्हणतात . निवडून दिलेले फारच स्वच्छ प्रतिमेचे असते तर भ्रष्टाचार बोकाळला नसता. जनतेचे गीत गाऊन, मिळून मिसळून भ्रष्टाचाराची तूप - पोळी खाणारे निवडून दिलेलेही असतात.
3 Jan 2011 - 9:04 am | सहज
आता 'अराजक.. अराजक..' असा गळा काढण्यात काय अर्थ आहे?
3 Jan 2011 - 9:57 am | वाहीदा
People Vote in an anticipation that There would be someone who is Best Among the Worst !!
लोकांच्या विश्वास / अंधविश्वासाचा फायदा उचलला जातो हे योग्य आहे का ?
अराजकतेविरुध्द आवाज न उठविणे हे तरी योग्य आहे का ??
3 Jan 2011 - 10:03 am | llपुण्याचे पेशवेll
लोकांच्या विश्वास / अंधविश्वासाचा फायदा उचलला जातो हे योग्य आहे का ?
अराजकतेविरुध्द आवाज न उठविणे हे तरी योग्य आहे का ??
अराजक? कुठे आहे अराजक. अहो ती तर लोकशाही आहे. सगळे कर्तृत्ववान लोक 'बाहेर' गेल्यामुळे उरल्यासुरल्या मूर्ख लोकांनी निवडून दिलेली लोकशाही शासनयंत्रणा आहे ही. आता मोठे काढत आहे गळे अराजक अराजक म्हणून. :)
3 Jan 2011 - 10:12 am | वाहीदा
अराजक? कुठे आहे अराजक. अहो ती तर लोकशाही आहे.
हा हा हा ! हे भारी
3 Jan 2011 - 11:43 am | अवलिया
अराजक म्हणजे काय ?
3 Jan 2011 - 12:13 pm | रणजित चितळे
जिसकी लाठी उसकी भैंस।
3 Jan 2011 - 1:16 pm | अवलिया
त्याला सरंजामशाही किंवा हुकुम शाही म्हणता येईल की ते वेगळे असते?
3 Jan 2011 - 1:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>> अराजक म्हणजे काय ?
मिपा वर गेला काही दिवस काही काही जुने सभासद जे माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याला अराजक असे म्हणता येईल.
3 Jan 2011 - 1:15 pm | अवलिया
अच्छा ! म्हणजे मिपावर अराजक आहे असे तुम्ही म्हणता काय?
3 Jan 2011 - 2:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे
घाईघाईत नीट वाचले नाही का नाना? मी माजवण्याचा प्रयत्न म्हटले, माजले आहे असे नाही म्हटले.
3 Jan 2011 - 4:47 pm | अवलिया
कोण आहेत असे सदस्य? तुम्ही त्यांची माहिती संपादक मंडळाला दिली आहे का? त्यांनी काही कारवाई केली नसल्यास मिपाचे सध्याचे मालक नीलकांत यांना कळवले आहे का? की उगाचच आपल्याला फार माहित आहे असे दाखवुन सनसनाटी करण्याचा प्रयत्न करत आहात का?
3 Jan 2011 - 6:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मी एक साधासुधा सभासद आहे. मिसळपाव वरील खूपच कमी लोकांना मी व्यक्तिश: ओळखतो. त्यातलेही आतल्या गोटातील (असे गोट अस्तित्वात असल्यास) कुणीच नाही. त्यामुळे मला काहीही अंतस्थ बातमी कधीही नसते. त्यामुळे मला कसलीही सनसनाटी निर्माण करायची नाही. धागे आणि त्यावरील उच्च प्रतिसाद वाचून कळते तेवढेच. तितके इतरांनाही दिसते.
बाकी काही सनसनाटी कळलेच तर तुम्ही म्हणालात तसे मी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
3 Jan 2011 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार
असे जुने सभासद कोण आहेत ह्याची यादी मिळु शकेल काय ? म्हणजे अशा सभासदांपासून सावध राहता येईल. तसेच मिपावरील निरा राडिया कोण ?
3 Jan 2011 - 4:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे
सत्यं ब्रूयात, प्रियं ब्रूयात, न ब्रूयात सत्यं अप्रियं |
म्हणून No comments ;-)
अवांतर :- अक्षराचा पाय कसा मोडायचा ?
3 Jan 2011 - 4:29 pm | परिकथेतील राजकुमार
संस्कृत आणि इंग्रजी दोन्ही ज्ञान कच्चे. कळेल असे सांगावे.
अक्षराचा कसा मोडतात माहिती नाही.
3 Jan 2011 - 11:49 am | श्रावण मोडक
हाण्ण तिच्या मारी... ;)
3 Jan 2011 - 10:23 am | सहज
>आवाज न उठविणे हे तरी योग्य आहे का ??
नाही पण जोरजोरात आरडाओरडा करुन आवाजी प्रदुषण करणे देखील उपाय नाही.
असो हे सगळे 'आपल्याला काय वाटते' - यावरचे मत आहे.
बाकी दबाव गट / मागण्या / शिष्टमंडळे/ आंदोलन काहीही नावे द्या सगळे आपापल्या परीने आपले काम करुन घेण्याकरता उपाय योजत असतात. यात नवे काही नाही, म्हणूनच अराजक अराजक आक्रोश करण्यात काही दम वाटत नाही. शक्य तितक्या विविध निर्णयप्रक्रिया पारदर्शक व न्याय्य असाव्यात असे वाटते. कोणाला तरी कोणाचे चुकीचे वाटते (अथवा स्कोर सेटल करायचा आहे इ.) म्हणुन तर असे प्रकरण चव्हाट्यावर येतेच. होत आहेत सुधारणा हळुहळू. जिथे तश्या सुधारणा होत आहेत किंवा होउ शकते असे दिसते तिथे लोकांनी मत देउन विजयी केल्याचे गेल्या काही निवडणूक निकालात दिसत आहे पण तिथे देखील १००% निर्णय न्याय्य असतीलच असे नाही. निदान योग्य दिशेने आहेत हेही नसे थोडके.
जनतेच्या प्रश्नांकरता जे लोक कार्यरत आहेत त्या लोकांचे हात बळकट करणे, अश्या संस्थांना मदत करणे असे उपाय जास्त परिणामकारक वाटतात.
3 Jan 2011 - 11:17 am | llपुण्याचे पेशवेll
नाही पण जोरजोरात आरडाओरडा करुन आवाजी प्रदुषण करणे देखील उपाय नाही.
सहज,
मला हे आवाजी प्रदूषण वाटले नाही. मला तर हा आवाज उठवण्याचा योग्य मार्ग वाटला. उलट ज्या बाकी दबाव गट / मागण्या / शिष्टमंडळे/ आंदोलन ह्या सगळ्या गोष्टी करण्याचाच हा ही एक प्रयत्न आहे असे वाटले. प्रबोधनाचे एक माध्यम म्हणून प्रस्तुत लेखक या माध्यमाकडे पाहत आहेत असे वाटते.
शक्य तितक्या विविध निर्णयप्रक्रिया पारदर्शक व न्याय्य असाव्यात असे वाटते
गोपनीयता जर हुकूमशाहीची गुरुकिल्ली असेल तर पारदर्शकता ही लोकशाहीची असायला पाहीजे असे नील बोह्र यानी म्हटले आहे. शक्य तितक्या नव्हे तर जास्तीत जास्त.
म्हणूनच अराजक अराजक आक्रोश करण्यात काही दम वाटत नाही.
मला तर असा आक्रोश यात कुठेही दिसला नाही. खरंतर अराजक आहे हे खरेच आहे. लोकशाही लोकशाही जी म्हटली जाते ती कशी गल्लोगल्ली विक्रिला काढली जाते हे मी पाहीले आहे. शेवटी काळ्याला काळं आहे हे मानल्याशिवाय पांढरं करता येत नाही. असो.
3 Jan 2011 - 11:23 am | रणजित चितळे
आहे
3 Jan 2011 - 5:01 pm | वाहीदा
जे काळं आहे त्याला कमी काळं की जास्त काळं यापेक्षा ते काळं आहे हेच मुळाच मान्य करायला पाहीजे.
शेवटी काळ्याला काळं आहे हे मानल्याशिवाय पांढरं करता येत नाही.
१००% सहमत !!
2 Jan 2011 - 1:26 pm | चिरोटा
हे लॉबीइंग अनेक वर्षांपासून चालु आहे.अगदी नेहरु पंतप्रधान असल्यापासून्. ८०च्या दशकात वार्षिक बजेट धीरुभाई अंबानी ठरवत. टेलि़कॉम क्षेत्रात गुंतवणूक करायला प्रचंड पैसा लागतो आणि त्यावर फायदाही प्रचंड मिळतो.नियमाप्रमाणे काम व्हावे अशी अपेक्षा केलीत तर रतन टाटांच्या टाटा टेलिसर्विसेस सारखी अवस्था होते.!!
मूळातच भारतिय लोकशाहीत असलेला पारदर्शकतेचा अभाव आणि मंत्र्यांकडे/नोकरशहांकडे एकवटलेली अमर्याद सत्ता हे लॉबीइंगचे मूळ कारण आहे.
ह्या असल्या उच्चस्तरीय भानगडी कितीही 'दाबल्या' तरी बाहेर येतात म्हणजे लोकशाही आहेच की!
2 Jan 2011 - 7:31 pm | रणजित चितळे
पण हे भ्रष्टाचारात मोडले जाते असे मानता का. का पुर्वी पासुन होते मग त्यात काही गैर नाही.
उच्चस्तरीय भानगडी बाहेर येतात म्हणजे लोकशाही आहे - सगळ्या भानगडी येतात का बाहेर. कित्येक तुंबडी अशीच भरली असतील व लोकांनी सात पिढ्यांसाठी तरतुद करुन ठेवली असेल. पुर्वी एकच राजा व त्याचा परीवार असायचा तुंबडी भरायला आता ५७२ राजे झाले आहेत.
2 Jan 2011 - 10:34 pm | हरकाम्या
त्या " टाटा " टेलिसर्विसेस " चे नाव घेतलेत ते फार चांगले वाटले. या सर्विसचा मला एवढा भयंकर अनुभव आला आहे की
मी त्यांचा फोन परत केला.व आता त्यांचे नाव घ्यायला ही भीति वाटते.
3 Jan 2011 - 6:54 pm | प्रसन्न केसकर
नियमाप्रमाणे काम व्हावे अशी अपेक्षा केलीत तर रतन टाटांच्या टाटा टेलिसर्विसेस सारखी अवस्था होते.!!
राडीया बाइंचे क्लाएंट्स (क्लाएंटस चे मराठीत सुयोग्य भाषांतर काय होईल बरे?) कोण कोण होते याची माहिती कुठे मिळेल बरे?
3 Jan 2011 - 7:04 pm | रणजित चितळे
डिसेंबर महिन्याचा आऊटलुक वाचा
3 Jan 2011 - 10:57 pm | वाहीदा
By 2008, Nira Radia was running one of the most sought- after corporate communications agency Vaishnavi, and through subsidiaries such as Neucom, Noesis Strategic Consulting Services and Vitcom Consulting, she bagged top- drawer accounts, including the Tatas, Reliance Industries, Unitech Realty, Vedanta, DB Realty, which own Swan Realty, NDTV Imagine and Star TV. To add to the firms starry status, Nira Radia also had retired bureaucrats as consultants — former Telecom Regulatory Authority of India chairman and former special secretary to the Power Ministry, Pradip Baijal, former finance secretary C. M. Vasudev, former Airports Authority of India chairman S. K. Narula and former Foreign Investment Board head Ajay Dua.
Nira Radia's achievements in telecom, power and aviation. If the Tatas bagged the state-owned Videsh Sanchar Nigam Limited ( VSNL) when Baijal was in charge, both Tatas and Reliance were allowed to convert wireless to full mobility when Baijal, again, was TRAI chairman. Nira Radia's clients Unitech Wireless and Swan Telecom bagged the mega-crore 2G spectrum licences under A. Raja. The largest financial and economic crime in the history of independent India.
She has continued to be engaged with prestigious clients such as the Tata Group companies, the likes of TCS, Tata Steel, Tata Motors, VSNL, Tata Teleservices, Indian Hotels, Trent International, Titan, Sun Microsystems, ITC, GMR Frapport, Star Group, Nortel, Siemens, Kotak Mahindra, Invista Inc., HIAL, Channel V, eBay, Raymonds, Areva Power, CII, to name a few.
The 2G spectrum imbroglio has brought Nira Radia out of the shadowy world in which unscrupulous lobbyists operate This financial and economic crime scam is said to have caused a loss of Rs.1.76 lakh crore (Rs.1.76 trillion/approx $40 billion) to the Government of India. Nira Radia made 300 crores in 9 years !!
-- (जालावरुन साभार)
2 Jan 2011 - 1:39 pm | विनायक बेलापुरे
-पोलिसाने पकडले तर काही लोक पैसे देऊन सुटतात - हे एक प्रकारचे लॉबीइंगच झाले.
__________________________________________________________
नाही. ही सरळ आणि शुद्ध मांडवली झाली.
पकडल्यावर मला "ह्या " साहेबांच्याच पोलिस स्टेशनला न्या असा गोड हट्ट करणे म्हणजे लॉबीइंग.
.
.
-हल्ली चे मॅनेजमेंट चे एक तंत्र आहे असे म्हणतात.
___________________________________
सगळी तंत्रे कोणाला ना कोणाला मॅनेज करायलाच वापरतात की.
.
.
-निरा राडीया केंद्रात कोणते मंत्री पाहिजे हे ठरवू शकते (पंत प्रधान ठरवतात असे मला वाटायचे)
________________________________________________________________
बापरे !!! मला वाटायचे सोनियाजी गांधीजी ठरवतात.
2 Jan 2011 - 7:32 pm | रणजित चितळे
गांधी निदान निवडुन तरी आल्या आहेत. पण निरा राडीया.
2 Jan 2011 - 1:52 pm | निनाद मुक्काम प...
@ निरा राडीया केंद्रात कोणते मंत्री पाहिजे हे ठरवू शकते (पंत प्रधान ठरवतात असे मला वाटायचे
पहा इतके दिवस मला वाटायचे पक्ष श्रेष्ठी ठरवतात .
परदेशात लॉबिंग बर्यापैकी कायदेशीर आहे .
बहुराष्ट्रीय कंपन्या व सरकार मधील मध्यस्थ म्हणून ते उघडपणे काम करतात .त्या बदल्यात होणारे व्यवहार बहुतांशी पारदर्शी असतात .
2 Jan 2011 - 7:34 pm | रणजित चितळे
चालते म्हणुन ते बरोबर का. जर सगळेच बरोबर म्हणतात मग कोलाहल कशाला. ज्याच्या कडे पैसा तो काहीही करु शकेल. मग लोकशाही नाही ते अराजक म्हणावे लागेल.
2 Jan 2011 - 10:53 pm | निनाद मुक्काम प...
मुद्दा असा आहे कि परदेशात ते अधिकृत रित्या चालते .त भारतात ते बेकौदेशीर रित्या ,असल्याने त्यामुळे ते होण्याची प्रक्रिया पारदर्शक नसते
त्यामुळे देशाचे मोठे महसूल उत्पन्न बुडाले ह्यासाठी हा गदारोळ .उडतो .
एक उदाहरण देतो युके मध्ये बेटिंग हे कायदेशीर आहे( क्रिकेट /फुट बॉल /किंवा घोडे) त्यामुळे त्यांचा देश मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवतो
.पण गैरप्रकारावर आळा बसतो .पण श्रीलंका /भारत व पाकिस्तानात हे कायदेशीर नाही म्हणून बेटिंग करणारे अंडव वल्ड संबधित असतात .त्यामुळे खेळाडूंना लाच वगैरे प्रकार होतात .
अधिकृत रित्या लॉबी मेकर असतील तर त्यांवर लक्ष ठेवणे सोपे जाते .नाही तर अनेक परदेशातून रादिया सारखे येऊ शकतील .
आता मी जर जर्मन पेक्षा इटालियन मुलीशी लग्न केले असते .तर भारतात येऊन राजकारण /समाज कारण ह्यात किती मोलाची कामगिरी करू शकलो असतो .ह्याची अमळ खंत वाटते .
2 Jan 2011 - 11:48 pm | वाहीदा
आता मी जर जर्मन पेक्षा इटालियन मुलीशी लग्न केले असते .तर भारतात येऊन राजकारण /समाज कारण ह्यात किती मोलाची कामगिरी करू शकलो असतो .ह्याची अमळ खंत वाटते .
अरे याच्या परदेशी जर्मन सासरेबुवांना कोणीतरी कळवा रे .. ;-)
कसली (कप्पाळ )मोलाची कामगिरी केली असतीस हे जाणण्यास उत्सूक :-P
3 Jan 2011 - 12:06 am | चिंतामणी
मी जर जर्मन पेक्षा इटालियन मुलीशी लग्न केले असते .तर भारतात येऊन राजकारण /समाज कारण ह्यात किती मोलाची कामगिरी करू शकलो असतो .ह्याची अमळ खंत वाटते .
=))
3 Jan 2011 - 12:31 am | विनायक बेलापुरे
आता मी जर जर्मन पेक्षा इटालियन मुलीशी लग्न केले असते .तर भारतात येऊन राजकारण /समाज कारण ह्यात किती मोलाची कामगिरी करू शकलो असतो .ह्याची अमळ खंत वाटते .
_________________________________________________
हा हा हा हा हा
आमच्यात इटालियन सुनेला भारतात येउन राजकारण करायची परवानगी आहे, इटलीच्या जावयाला नाही. त्यासाठी सुद्धा स्वमाता राजकारणात असावी लागते.
3 Jan 2011 - 11:28 am | निनाद मुक्काम प...
आदरणीय रादियाजी ह्यांच्यावर आपल्या सरकारने परदेशी हेर असल्याचा आरोप कोर्टात केला आहे .
त्या कोणत्या देशाची हेर असू शकते ?
रशिया /अमेरिका /फ्रांस /पाकिस्तान /युके का इतर ?
3 Jan 2011 - 12:13 pm | चिरोटा
कसली हेर आणि आहेर? मला नाही वाटत असे काही असेल्.आणि ती इतके वर्षे कार्यरत आहे इकडे.सरकारला ह्या हेरगिरीचा थांगपत्ता लागु नये ह्यावर विश्वास नाही बसत्.आता रादिया बाईंनी तोंड जास्त उघडले तर आपल्या बर्याच नेत्यांची धोतरे/लेंगे सुटायची शक्यता आहे म्हणून आता हेरगिरी प्रकरणात गुंतवता आहेत.