येऊरच्या पलिकडे डोंगराच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रिय उद्यानाचे एक प्रवेशद्वार आहे. या द्वारातुन आत शिरले की ३-४ तास मनमुराद भटकता येते. यावेळी काही पाने व फुले टिपायचा प्रयत्न केला आहे.
प्रदुषणाला भेदून अखेर सूर्य वर आला!
सूर्याला टिपून जंगलाच्या दिशेने जाउ लागलो तर वर मावळता चंद्र दिसला
तुर्यांची फुले माळावर डोलत होती
पावसाळा संपून बरेच दिवस झाले तरीही अनेक प्रकारची गवत फुले फुलली होती. ही फुले अगदी लहान म्हणजे ३-५ मिलिमिटर इतकी बारीक होती. एका जागी नाजूक गुलाबी फुलांच्या तृणसदृश रोपांचे बेट दिसले
थोडे पुढे वाळक्या गवतामध्ये विखुरलेली मुळ्याच्या पाल्यासारखी पाने असलेली बारीकशी पिवळी फुले असलेली वनस्पती अधून मधून डोकावत होती. या रोपाच्या पानांवर व फुलाच्या देठावर काटेरी लव होती. फुले इतकी लहान की पाकळ्या केसासारख्या होत्या.
उमलायच्या तयारीत असलेली इवलीशी कळी
उन पडताच किटक - माशा फुलांचा मध चाखायला बाहेर पडले. एका छोट्याशा फुलावर बसलेली ही सोनेरी-तपकिरी रंगाची पाठीवर काळे पट्टे असलेली माशी
जांभळ्या रंगाची अबोलीची फुले कणसातुन बाहेर डोकावत होती. सुकलेले फूल मात्र लाल होते.
हिरवी - तपकिरी उन सावली
गुगल नकाशा? उंचावरून टिपलेल्या भूभागाचा आभास करणारे हे जाळी पडलेले पान
या पानावरची जाळी आणि टपोर्या शिरा एखाद्या झाडाचा आभास देत होते
एका ठिकाणी अनेक पानांवर मधला भाग कोळपला होता पण तो तपकिरीच्या अनेक छटा धारण करुन झाडाच्या बुंध्याचे चित्र साकारत होता
मागुन येणार्या प्रकाशामुळे प्रकाशमान झालेल्या पानवर अशीच करपणी कोळ्याच्या जाळ्यासारखी भासत होती
प्रतिक्रिया
31 Dec 2010 - 6:58 pm | मदनबाण
सुरेख... :)
31 Dec 2010 - 7:04 pm | सहज
.
31 Dec 2010 - 7:04 pm | गणपा
सगळे फोटु मस्त.
पण त्या पहिल्या फोटुतला सुर्यनारायण जरा जास्तच मेकप करुन आलाय अस नाही वाटत. ;)
5 Jan 2011 - 4:17 pm | स्मिता.
सगळे फोटो छानच आहेत. पण पहिला फोटो जरा खटकला. सूर्याच्या वरच्या पिवळ्या भागाला तांबडी बॉर्डर कशी येणार? कदाचित फोटोशॉप मध्ये सुधार करताना काहितरी कमी-जास्त झाले असावे.
पण गणपा भाऊंच्या पण त्या पहिल्या फोटुतला सुर्यनारायण जरा जास्तच मेकप करुन आलाय अस नाही वाटत या वाक्यावर खूपच हसू आलं :))
5 Jan 2011 - 7:20 pm | सर्वसाक्षी
ते रंग फोटोशॉप मध्ये मुद्दाम रंगविलेले नाहीत. असे दुहेरी रंग येण्याची कारणे ही असू शकतातः
एकतर प्रकाशाच्या उगमावर सरळ किरण साधल्याने
किंवा लेन्सवरच्या फिल्टर मुळे
धन्यवाद
6 Jan 2011 - 4:15 pm | स्मिता.
आपण म्हणता ती कारणे असू शकतात. त्या क्षेत्रात माझे ज्ञान नसल्याने आणखी बोलता येणार नाही.
31 Dec 2010 - 7:16 pm | किल्लेदार
व्हेरी गुड ...... चंद्राचा फोटो जास्त आवडला.
31 Dec 2010 - 8:05 pm | प्रभो
चंद्राचा फोटो जास्त आवडला.
31 Dec 2010 - 7:18 pm | स्वैर परी
जिंकलत!
एक तर तुम्ही भारी किंवा तुमचा कॅमेरा भारी!
मस्तच!
31 Dec 2010 - 7:27 pm | श्रावण मोडक
नेत्रसुख!!!
31 Dec 2010 - 7:38 pm | स्पा
पहिला फोटू -- फोटोशॉप मध्ये एडीट केलाय असं वाटतंय
बाकी सर्व फोटो अप्रतिम...
सुरेख
31 Dec 2010 - 7:58 pm | रेवती
शेवटच्या फोटोत अर्धवट वाळलेल्या पानावर गुलाबाचं फूल असल्यासारखं वाटतय.
पहिला फोटो ग्रेट आलाय.
31 Dec 2010 - 8:16 pm | स्वाती दिनेश
सुरेख चित्रे!!!
स्वाती
31 Dec 2010 - 9:03 pm | निनाद मुक्काम प...
अरे वा
ह्या उद्यानात सूर्य त्राटक करायला एकदम योग्य जागा आहे .
बाकी पुढच्या वेळी आपल्या फोटो ग्राफी छंद का व्यवसाय हे सांगून जरा आपल्या कलेविषयी अनुभव सांगावे .
शिकाऊ उमेदवाराला योग्य ते मार्गदर्शन नि हुरूप मिळेल .
येथे युरोप म्हणजे बालकवीची कविता (हिरवे हिरवे गालिचे )
आम्हालाही अधन मधन सुरसुरी येते .पण कुठून सुरवात करावी ?
.
सुरवातीला कोणता केमेरा असावा .?
येथेच घोडे अडखळते
31 Dec 2010 - 9:19 pm | यशोधरा
क्या बात है !!!
मस्तच फोटो !!!
31 Dec 2010 - 9:49 pm | पिंगू
वाह.. सर्व फोटो बघून डोळे सुखावले..
1 Jan 2011 - 10:10 am | sneharani
सुरेख फोटो!
1 Jan 2011 - 10:23 am | विनायक प्रभू
निसर्ग साथ.
1 Jan 2011 - 10:48 am | स्वानन्द
प्रत्येक फोटो केवळ अप्रतीम!! कॅमेरा कोणता वापरला आपण?
बाकी त्या पानांमध्ये लपलेली नक्षी टिपणार्या तुमच्या नजरेला सलाम.
1 Jan 2011 - 3:01 pm | प्राजक्ता पवार
सुरेख फोटो आहेत .
1 Jan 2011 - 3:03 pm | नाखु
या क्षेत्रातिल मुशाफिरीला... मिपाकरांना सहभागी केल्याबद्दल धन्यवाद...
1 Jan 2011 - 3:09 pm | ज्ञानराम
खरच .. स्वानंद याच्यांशी सहमत... सूरेख फोटो काढले तुम्हि , तूमची नजर पारखी आहे.....
1 Jan 2011 - 3:11 pm | अमोल केळकर
नवीन वर्षाची सुर्वात एका सुंदर धाग्याने झाली असे म्हणेन
अमोल केळकर
1 Jan 2011 - 4:51 pm | सर्वसाक्षी
सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.
सगळीच चित्रे फोटोशॉप मध्ये सुधारीत केली आहेत. मात्र फोटोशॉप चा उपयोग चित्र अधिक उठावदार दिसण्याच्या दृष्टीने केवळ तीव्रता/ प्रकाश/ रंग संतृप्तता यात आवश्यक ते फेरफार करण्यापुरता केलेला आहे. मूळ प्रतिमेत बदल/ नसलेले काही चिकटवणे/ अनावश्यक वा खटकणारी विसंगती असलेला भाग काढुन टाकणे वगैरेसाठी फोटोशॉप वापरलेले नाही. तसे वापरल्यास ते चित्रणकौशल्यापेक्षा संगणक कौशल्य ठरावे. आजकाल डिजिटल पद्धतीत फोटोशॉपला ५०% महत्व दिले जाते व प्रत्येक प्रकाशचित्रकाराला फोटोशॉप येणे आवश्यक आहे असे नामांकित मंडळी आवर्जुन सांगतात. मला फोटोशॉप ची माहिती फारच किरकोळ आहे, शिकायची ईच्छा आहे कारण संकलनामुळे प्रतिमेत खूप फरक पडतो व मूळ चित्रापेक्षा सुधारित आवृत्ति अधिक प्रभावी ठरते.
1 Jan 2011 - 11:46 pm | चिंतामणी
अप्रतीम.
छान सुरवात झाली वर्षाची.
2 Jan 2011 - 12:10 pm | बिपिन कार्यकर्ते
सु-रे-ख!
5 Jan 2011 - 12:34 am | आत्मशून्य
वा मस्त फोटो टाकलाय, ऊगीच नाय मारूतीला भूक लागल्यावर ते एक चवदार फळ वाटले.
बाकी फोटो एडीट करून खूलवलेत हे वाचून थोडा हीर्मोड झाला...
5 Jan 2011 - 2:46 pm | प्यारे१
सुंदर प्रकाशचित्रे...
अवांतरः 'एक 'सकाळ ' 'निसर्गाच्या' सान्निध्यात' वाचून उगाचच हसू आले. होल वावर इज आवर...
5 Jan 2011 - 4:41 pm | जागु
सुंदर.
ते जाळी पडलेले पान सागाचे आहे.
5 Jan 2011 - 7:13 pm | वाहीदा
असे फोटो काढायला पण सुंदर पारखी नजर हवी
~ वाहीदा
5 Jan 2011 - 9:06 pm | प्राजु
शब्दच संपले..! :)
6 Jan 2011 - 12:13 am | शिल्पा ब
फोटो आवडले.