हिमवादळ !

मीली's picture
मीली in कलादालन
29 Dec 2010 - 2:11 am

न्यू जर्सी मध्ये यंदा खूप म्हणजे खूप बर्फ पडला.आमच्या घराची बाल्कनी तर बर्फाने पूर्ण भरून गेली होती.त्याचे काही फोटो !


बर्फा मध्ये अडकलेल्या गाड्या काढताना नाकी नऊ आले होते अगदी!

बर्फाने झोडपलेल्या खिडक्या व बाल्कनी.

चोहिकडे बर्फ

मुलांना तर नाताळ ची सुट्टी होतीच त्यामुळे ते उत्साहात बर्फाच्या स्वागता साठी तयार होते. मोठ्यांना गाडी बर्फातून काढायचे टेन्शन, तर मुलांना बर्फात हुंदडायला मिळेल ह्याचा आनंद !



रस्ते पण बंद असल्याने ऑफिस पण घरूनच होते.हा एक फायदा आहे.
अशा वेळी भोलानाथ चे गाणे आवर्जून आठवले.सगळीकडे बर्फ पडून सक्तीची सुट्टी मिळाली होती.घरात खाण्यापिण्याचा स्टॉक होता म्हणून बरे होते नाहीतर सक्तीचा उपास घडला असता.हवामान खात्याला मानायला हवे,आधीच अचूक अंदाज वर्तवल्यामुळे लोक तयार असतात .
आता ४,५ दिवस तरी लागणार सर्व पूर्ववत होण्यासाठी.मग बर्फापासून सुटका होईल खरी !

जीवनमानछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

गेले दोन दिवस न्यु इंग्लंडात बर्फ झालच पण भयानक वेगाचे वारे.
बर्फ अर्थातच तुमच्याकडे झाले तेवढे नाही झाले.
लोक फक्त ग्रोसरीलाच बाहेर पडत असावेत. काल मला मार्केट बास्केटात जावे लागले तर गर्दी कमी होती.
आमची पत्राची पेटी बर्फाने घट्ट बंद झाल्याने टपाल बघता आले नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Dec 2010 - 4:54 am | निनाद मुक्काम प...

अशा बर्फात चालायला हिंडायला खूप मजा येते .स्कीईंग शिकण्याचा हाच तर खरा मौका आहे अर्थात जानेवारीच्या महिन्यात सगळ्यांचि नाताळ व नववर्षाची धुंदी उतरते .आणि मग रुक्ष बर्फाळ एकाकी आयुष्य व काही महिने सर्वत्र पांढरा पट्टा पसरेला असतो.
रस्ते तर झोंबी अटेक होऊन मानवाचा पूर्णपणे निर्वंश झाल्यासारखा सुनसान असतात. .हाच काळ खरे तर भारतातील आपल्या उबदार घरट्यात जायचा . तेथे जाऊन अनिवासी भारतीय ह्या नात्याने हक्काने चार शब्द सुनवायचा .तर . चार ऐकण्याचा असतो ..नि महिन्याभरात सोनेरी पिंजर्यात परत येण्याचा असतो सोबत सुखद आठवणीची सुदाम्याची पुरचुंडी घेऊन .मग वर्षभर एक एक आठवणीचे कण चाखत घालवण्याचा असतो .. .
थंडा मतलब कोकाकोला

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Dec 2010 - 5:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे बर्फ वितळतं का, वितळलं नाही तर आहे तिथून कसं हटवलं जातं? आणि वितळलं तर लगेच पूर येतात का??

नाही, वितळत नाही आत्ताच.
बर्फ बाजूला सरकवणार्‍या गाड्या येऊन फक्त गाडी चालवण्यापुरता रस्ता मोकळा करून जातात (एका चित्रात दाखवल्याप्रमाणे). स्नो रिमुव्हर हे काम करतो तर त्याच ट्रकच्या मागे वाळू आणि मिठाचे मिश्रण टाकत जाणारी यंत्रणा लावलेली असते. सगळे बर्फ रस्त्याच्या कडेला सरकवत, चेपत राहतात. हळूहळू (बरेच महिन्यांनी) त्याचे १० ते १२ फुटांचे ढीग साचत राहतात. सगळ्यात खालच्या बर्फाचे आईस होऊन जाते आणि स्प्रिंग सुरु होता होता पावसाने व थोड्याफार उन्हाने वितळते. त्यावेळेस रस्त्यांवर पाण्याचे ओघळ असतात ते रस्त्याच्या कडेला असलेल्या ड्रेनेजमध्ये जातात. शेवटी फक्त वाळू राहते आणि ती स्वच्छ करणारी यंत्रे येऊन ब्रशने घासून, खरवडून रस्ते स्वच्छ करतात.

प्रियाली's picture

29 Dec 2010 - 5:56 am | प्रियाली

बर्फ कधी लगेच वितळतो का? :) तो वितळेल आता हळूहळू पुढले १५-२० दिवस. पुन्हा नवा बर्फ पडला नाही तर किंवा तापमान वाढले तर. नाहीतर आहे चुनामय जगत पुढले काही महिने.

आमच्याकडे ६ डिसेंबरला बर्फ पडला. नंतर दोन-तीनदा पडला. तेव्हापासून सर्व सफेती मारलेले जग आहे अद्याप.

रेवती यांनी दिलेल्या माहितीत भर:

१) राहण्याच्या जागेनुसार आणि रस्त्याच्या आकारानुसार या सुविधेत फरक पडतो.
हायवे, फ्रीवे, पार्कवे इ. वारंवार बर्फमुक्त केले जातात आणि छोटे रस्ते अधून मधून. त्यातही चांगल्या ठिकाणी हे काम वारंवार केले जाते ( कारण कर जास्त गोळा करतात, साधन्सामुग्री जास्त असते) आणि वाईट ठिकाणी कसेबसे, क्वचित ( कमी कर, वाईट सुविधा)

२) वापरले जाणारे हे मीठ* माणसे आणि खुद्द रस्ता यांच्यासाठी वाईट असते.

३) पूर वगैरे काही येत नाही. हळूहळू बर्फ वितळते आणि पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्थित सोय असते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Dec 2010 - 5:22 am | निनाद मुक्काम प...

फ्रोझन ( जानेवारि २०१०

हा सिनेमा पहा .

मीली's picture

29 Dec 2010 - 5:25 am | मीली

नाही ग बाई पूर नाही येत.तापमान हळू हळू वाढते त्यामुळे १ आठवडा तरी हा बर्फ राहतोच.आणि वितळला तरी हळू हळू वितळतो.सूर्य देव हजेरी लावतात पण किरणे खूप सौम्य असतात त्यामुळे बर्फ वितळत नाही.
रस्त्यावरचा बर्फ साफ करायला गाड्या येतात त्यामुळे रस्ता तरी मोकळा होण्यासाठी मदत होते आणि मग गाड्यांची वाहतूक सुरु झाली कि रस्त्यावरचे बर्फ पण हळू हळू वितळते.

प्रियाली's picture

29 Dec 2010 - 5:55 am | प्रियाली

सही आहे! एंजॉय. सुदैवाने आमच्याकडे गेली काही वर्षे असा प्रकार झालेला नाही.

प्राजु's picture

29 Dec 2010 - 6:43 am | प्राजु

आमच्याकडेही खूप झालंय बर्फ..
मात्र तुमच्या इतकं नाही झालं. साधारण दीड्-दोन फूट झालं असेल..

पण मुलांनी जाम मजा केली बर्फात. प्रचंड वारा होता...

टारझन's picture

29 Dec 2010 - 11:54 am | टारझन

पुण्यातही काल खुप बर्फ पडला .... :) एक ऑटोवाला बर्फ घेउन चालला होता. गरवारे पुलाच्या उताराला त्याच्या गाडीतुन बर्फ पडला. :)

पर्नल नेने मराठे's picture

29 Dec 2010 - 1:14 pm | पर्नल नेने मराठे

=))

रम्या's picture

29 Dec 2010 - 1:23 pm | रम्या

वा छान!,
मुंबईत सुद्धा कितीतरी बर्फ साचलाय आमच्या फ्रिज मध्ये ! :)

सकाळी माझ्या पोराला दाखवले हे फोटो, तेंव्हा पासुन आईच्या मागं आहे फ्रिजमधला बर्फ काढुन दे म्हणुन.

फोटो खुप छान आहेत, सुर्य करो नि यात अडकलेल्या सगळ्यांची लवकर सुटका होवो.

अवांतर -

सगळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात आणि हे तर ग्लोबल कुलिंग चाललंय, हि टायपो आहे की अजुन काही?

हर्षद.

ज्ञानराम's picture

29 Dec 2010 - 12:49 pm | ज्ञानराम

किति छान....

ज्ञानराम's picture

29 Dec 2010 - 12:49 pm | ज्ञानराम

किति छान....

ज्ञानराम's picture

29 Dec 2010 - 12:49 pm | ज्ञानराम

किति छान....

गणपा's picture

29 Dec 2010 - 1:43 pm | गणपा

आईसएज येणार लवकरच म्हणायचं.
थोडा बर्फ आम्च्याकडे एक्स्पोर्ट करता येईल का?

दैत्य's picture

29 Dec 2010 - 9:15 pm | दैत्य

सगळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात आणि हे तर ग्लोबल कुलिंग चाललंय, हि टायपो आहे की अजुन काही?

टायपो नाही.....ग्लोबल वॉर्मिंगच आहे.....त्याचा परिणाम हिमालयात दिसून येईल.....ग्रीनलंड, आईसलंड, अलास्का आणि अमेरिकेत मोन्टाना वगैरे भागात दिसून येतोच आहे...शिवाय ह्या वेळी भारतात नाही का नोव्हेंबर पर्यंत जोरदार पाउस झाला?
http://www.global-greenhouse-warming.com/himalayan-gangotri-glacier.html

शेखर's picture

29 Dec 2010 - 9:30 pm | शेखर

ग्लोबल वार्मिंग ह्याला कारणीभुत आहे होय. मला वाटायचा की काही लोकांना वारा सरल्या मुळे हिमवादळे येतात. ;)

शेखोप राव

टारझन's picture

29 Dec 2010 - 9:44 pm | टारझन

सहमत आहे.

- जिलबीटाक्ता

मदनबाण's picture

30 Dec 2010 - 7:34 am | मदनबाण

च्यामारी इतकं बर्फ पडुन राह्यलय ?

अमोल केळकर's picture

30 Dec 2010 - 10:26 am | अमोल केळकर

बापरे . एवढं बर्फ !!!!

अमोल

मिली शक्य झाल्यास या एक दोन गोष्टी वर काही सांगु शकाल काय ?

१. या बर्फाखाली गेलेल्या गाड्या नंतर कशा काढतात ?
२. त्यांचे जे नुकसान झाले असेल ते तिथले इनस्युरन्स वाले भरुन देतात का?

हर्षद.

आनंद कवठेकर's picture

30 Dec 2010 - 11:58 am | आनंद कवठेकर

१. या गाड्या प्रत्येकाने स्वत: स्वछ करायेचे अस्अतात. जाम दोक्याला ताप असतो. त्यासाठी वेगली उप्करने मिल्तत.
२. मोस्त्ली ह्या गाड्यांचे बर्फाम्य्ले नुकसन होत नहि पन जर झले तर ते भरुन मिल्ते.

बाय द वे, मिलि तु हिलतोप-एदिसोन मधे राहता का?

शिल्पा ब's picture

30 Dec 2010 - 12:10 pm | शिल्पा ब

फोटो छान...
(अय्या!! मिपाचे इतके लोक परदेशात राहतात..माहीतच नव्हतं गडे!!)

मीली's picture

30 Dec 2010 - 8:32 pm | मीली

आपल्या गाड्या बर्फातून आपल्याला काढाव्या लागतात ...मित्र मंडळी मदतीला आली तर उत्तमच!बर्फ काढायचे शोवेल (फावडे) मिळते.सध्या सूर्यनारायणाच्या कृपेने बर्फ थोडा थोडा वितळतो आहे.

हम्म,गाड्यांचे नुकसान होत नाही आणि झालेच तर इन्शुरन्स कंपनी भरून देत असाव्यात ..अनुभव नाही.

नाही एडिसन मध्ये राहत नाही ,एडिसन अर्ध्या पाऊण तासावर आहे आमच्या घरापासून...

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!