णारींच पुण्य

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
28 Dec 2010 - 1:05 pm

कालच एका जुन्या मित्राचा फोन आला.

"काय टार्‍या कसा आहेस? मी सुद्धा तुमच्या फ्लोर वरलाच होतो. पण फक्त वेगळ्या टिमचा होतो.

बर्‍यापैकी ओळखीचा आवाज वाटत होता.

"बरं. बोला साहेब..."

"टार्‍या तुझ्या फ्लोर खरी शोभा काय सांग पाहू?"

"वेळी अवेळी माझ्या क्युब पाशी पडिक किंवा घुटमळत असणारे माझे मित्र" मी.

"छ्छे.. ते झालंच रे. पण खरी शोभा काय ते सांग ना साल्या!"

अचानक हा शिव्यांवर आलेला पासून माझं टाळकंच सटकलं.

"अरे म्हणजे तुझ्या क्युबपाशी लोकं का येतात? असं विचारतोय मी. छ्छे! साल्या तुझाच फ्लोर आणि तुलाच तुझ्या फ्लोराची खरी शोभा काय हे माहीत नाही?" छ्छे छ्छे छ्छे!

"हम्म... प्रोजेक्ट मधुन हाकललेले, बेंच वर असल्यामुळे नाईलाज म्हणून माझ्या क्युबचा वासुनाक्या सारखा वापर करणारे माझे मित्र" पुन्हा मी.

"छ्छे.. ते झालंच रे. अरे पण मी फ्लोअरवरच्या खर्‍या शोभेबद्दल विचारतोय रे! हां, डेस्कपाशी बसवलेले कॉफी , चहा व्हेंडिंग मशीन हीच खरी शोभा!' असं उत्तर नको देऊस बाबा! टपरीवर त्यापेक्षा १० पट छाण मीळतो"

असं म्हणून तो जोरात हसला.

त्याचं ते छ ला छ जोडणं आता मला आवडू लागलं होतं!

"बाय द वे, बि ग्रेड जाहिरातींतल्या कॉफ्यांच्या बाबतीत बाकी तुझी डॉक्टरेट हो! अरे मला तर कित्येक कॉफ्या तुझ्यामुळे माहीत झाल्या. रामदेवबाबा कॉफी काय फक्कड आहे रे! कुठे शोधलीस बाबा?"

दोस्त आता हळूहळू रंगात येऊ लागला होता!

"बरं ते जाऊ दे. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे..!"

मित्र पुन्हा पूर्वपदावर. मला वाटलं होतं च्याकॉफीच्या च्या पुढे आमच्या मजल्यावर संभाषण करण्यासारखं आहेच काय?

"नाय माहीत! भाड्या, आता तूच उत्तर दे!"

आणि एकदम भाड्याचा आवाज सिरीयस झाला..

"टार्‍या, नो डाऊट, तुझा फ्लोअर घर छानच आहे. क्युब मोठा आहे . इथे मित्रांसाठी जागा आहे, फुकट च्या कॉफी प्यायची सोय आहे, वेळी अवेळी पसरायला आडोसा सुद्धा आहे. पण शोभा कशामुळे आहे?"

भाड्या जास्तच गम्भीर!

"नाही माहीत. सांगून टाक भाड्या!"

"छ्छे! छ्छे! छ्छे!"

पुन्हा मला आवडणारा छ ला छ.

"अरे, तुझ्या क्युबसमोर ती जी जोडगोळी आहे ना?

" कोण ? मंजुळा न बकुळा ? "

होय , त्यांच्यामुळेच केवळ आज तुझ्या क्युबमधे इतक्या मित्रांची रेलचेल आहे. अरे ज्या दिमाखात मंजुळा आणि बकुळा आपल्या अदांचं दर्शन देत असतात ना , म्हणुनंच तुझा फ्लोअर इतका लोकप्रीय आहे रे!"

आता मित्र झिंगल्यासारखा बरळत होता, मनापासून बोलत होता.

"तुला खरं सांगू? अरे मी अविवाहीत नसूनही मी जितक्या वेळेला त्या मदना बघतो ना तितक्या वेळा चढल्याचा भास होतो. अरे एका दुपारी मी जेव्हा तुझ्या घरी एकटाच बसलो होतो तेव्हा त्याच दोन ललना मूकपणे मला सोबत करत होत्या!"

"जो पर्यंत त्या दोन आयटमां तुझ्या क्युबसमोर आहेत तोवर तुला मित्रांचा तुटवडा नाही. बरं चल, ठेवतो फोन. पुन्हा बोलू!"

सुरवतीस केवळ डोकं खाणार की काय असं वाटणारा मित्र कुठलंही कुठलंही प्रवचन न देता इतक्या साध्या रितीने, साध्या शब्दात मला खूप मोठी गोष्ट सांगून गेला होता. मी नुसता मंजुळा-बकुळाकडे बघत होतो. इतके दिवस समोर बसलेलं ते डब्बल सौंदर्य मला आजवर कसं दिसलं नाही ह्याचं मला आश्वर्य वाटत होतं .. न काही करता एक नव्हे दोन नारीच्या सौंदर्याचं दर्शन मिळून गेलं होतं.

टिप - हे पूर्णपणे सत्य लेखन आहे. सत्य कल्पनाविलासाच्या नावाखाली खपवण्याचा प्रयत्न आहे.

(लेक समोर बसलेल्या मंजुळा - बकुळास अर्पण )

पाकक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

28 Dec 2010 - 1:09 pm | मृत्युन्जय

"काय टार्‍या कसा आहेस? मी सुद्धा तुमच्या फ्लोर वरलाच होतो. पण फक्त वेगळ्या टिमचा होतो.

"अ‍ॅड्या, नो डाऊट, तुझा फ्लोअर घर छानच आहे. क्युब मोठा आहे . इथे मित्रांसाठी जागा आहे, फुकट च्या कॉफी प्यायची सोय आहे, वेळी अवेळी पसरायला आडोसा सुद्धा आहे. पण शोभा कशामुळे आहे?"

थोडीशी गडबड झाली टारुशेठ विडंबन पाडण्यात. अति घाई संकटात नेई :)

संपादक डॉण यांना व्यनि केला आहे. लवकरंच चुक सुधारल्या जाईल.
डॉन खुप बिझी दिसतात ,असतील त्या संपादकांनी कृपया हे शिवधनुश्य उचलावे.

धन्यवाद.

आदिजोशी's picture

28 Dec 2010 - 1:13 pm | आदिजोशी

अ‍ॅड्या, नो डाऊट, तुझा फ्लोअर घर छानच आहे.

कॉपी पेस्टींग नीट करा टारू भाऊ. न पिता लेख लिहीला की असं होतं :)

आमचं न पिताचं चढल्या सारखं होतंय :) बघा ना ... मंजुळा-बकुळा समोर बसल्या आहेत ... निम्म्यापेक्षा अर्धं लक्ष तिकडेच होतं ... पेस्टिंग नीट केलं होतं .. एडिटींग मधे लोचा झालाय :)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Dec 2010 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार

टार्‍या इडंबन भारीच पण सगळे म्हणत आहेत तशी थोडी घाई नक्कीच झाली आहे.

"टार्‍या तुझ्या फ्लोर खरी शोभा काय सांग पाहू?"

हे 'फ्लोर वर खरी शोभा' असे हवे ना?

शक्यता नाकारता येत नाहि.

विजुभाऊ's picture

28 Dec 2010 - 1:37 pm | विजुभाऊ

मंजुळा आणि बकुळा
ही णावे ल्हिल्यास त्याणावाण्च्या ळळणांस ट्रास होईल. त्यामुळे म किंवा ब अथवा हळक्षज्ञ अशी णाव्हे व्हाप्राव्हीत.

मुलूखावेगळी's picture

28 Dec 2010 - 1:58 pm | मुलूखावेगळी

टारु एक्सप्रेस्स विडम्बन केलेस
भारी. आहे ...........

अवान्तर-
मंजुळा - बकुळानी हे वाचले तर?
आणि वाचुन कम्पनी सोडली तर???
;)

कच्ची कैरी's picture

28 Dec 2010 - 3:06 pm | कच्ची कैरी

मंजुळा - बकुळानी हे वाचले तर?
आणि तुमच्या मित्राच्या कानाखाली लगवली तर?
आणि तुमच्या मित्राच्या बायकोनी हे वाचले तर?
आणि ती घर सोडुन गेली तर?

चिरोटा's picture

28 Dec 2010 - 1:58 pm | चिरोटा

प्रोजेक्टमध्ये सगळेच बापे असतील तर हापिसात जास्त वेळ कोणी बसत नाही असे माझे निरिक्षण आहे. याउलट ज्या प्रोजेक्टमध्ये अशा मंजुळा/बकुळा असतात तेथे बाप्यांमध्ये इंप्रेशन पाडण्यासाठी चांगले काम करण्याची स्पर्धा चालु होते व मॅनेजरचे काम साध्य होते.म्हणून मोठ्या प्रोजेक्टस मध्ये एखादी तरी मंजुळा/बकुळा असली पाहिजे असा माझा मॅनेजर मित्र म्हणायचा.

छोटा डॉन's picture

28 Dec 2010 - 2:16 pm | छोटा डॉन

फोटो कुठे आहे ?
फोटोशिवाय आम्ही पाककृतींना प्रतिसाद देत नाही, सध्या हा प्रतिसाद 'अप्रकाशित' समजावा :)

- ( रसिक ) छोटा डॉन

व्यनितुन उपयुक्त माहिती पुरवली आहे. फोटु पाहिल्यानंतर त्यावरील प्रतिक्रीया उमटवणे.

अवांतर : लगेच बाकीच्या वासुंनी व्यणि करु नयेत. ;)

छोटा डॉन's picture

28 Dec 2010 - 2:31 pm | छोटा डॉन

खपलो !!!
आता मोक्ष मिळाला तरी हरकत नाही.

परमेश्वराचे आणि टारुचे शतशः धन्यवाद :)

- छोटा डॉन

स्पा's picture

28 Dec 2010 - 2:33 pm | स्पा

अवांतर : लगेच बाकीच्या वासुंनी व्यणि करु नयेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Dec 2010 - 2:56 pm | llपुण्याचे पेशवेll

व्यनि केला नाही. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Dec 2010 - 3:17 pm | परिकथेतील राजकुमार

अवांतर : लगेच बाकीच्या वासुंनी व्यणि करु नयेत.

फोटु पाठव रे.

बिकासु

अवलिया's picture

28 Dec 2010 - 3:22 pm | अवलिया

हेच म्हणतो

परात्सु

त्याच्यासाठी फेस्बुकचं अकाउंट लागतं .. :) तु बाद नान्या :)

खुलाशाबद्दल धन्यवाद

टारुत्सु

डावखुरा's picture

28 Dec 2010 - 10:57 pm | डावखुरा

मला पण फोटु पाह्य्चाय :(

>>मी जितक्या वेळेला त्या मदना बघतो ना तितक्या वेळा चढल्याचा भास होतो.

असं असेल तर त्या हापिसात जायलाच हवं, बाकी विडंबन झकास !!

अवलिया's picture

28 Dec 2010 - 2:50 pm | अवलिया

चालू द्या !!

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Dec 2010 - 2:54 pm | llपुण्याचे पेशवेll

तुला खरं सांगू? अरे मी अविवाहीत नसूनही मी जितक्या वेळेला त्या मदना बघतो ना तितक्या वेळा चढल्याचा भास होतो.
वा वा . छान छान. अशा सुखदायी ललना आमच्या फ्लोरवर असत्या तर किती बहार आली असती. बाकी मित्राची कल्पनाशक्ती फारच तीव्र आहे. एखाद्यावेळेला त्याच्या फँटसीतली ऐश्वर्या खरोखरच त्याच्या दिमतीला यायची. हॅट्स ऑफ तुमच्या मित्राला.

टारझन's picture

28 Dec 2010 - 3:09 pm | टारझन

खि खि खि :) तुझं आपलं काहीतरींच हं पुपे :)

खाद्यावेळेला त्याच्या फँटसीतली ऐश्वर्या खरोखरच त्याच्या दिमतीला यायची

सुहास..'s picture

28 Dec 2010 - 4:41 pm | सुहास..

इनक्युबेशन चा पत्ता काय ?

प्रभो's picture

28 Dec 2010 - 7:30 pm | प्रभो

=)) =)) =))

सूर्यपुत्र's picture

28 Dec 2010 - 9:33 pm | सूर्यपुत्र

>>लेक समोर बसलेल्या मंजुळा - बकुळास अर्पण

म्हणजे लेक (लिहून) झाला तरी इतक्या दिवसात डब्बल सौंदर्य दिसलं नाही?? ;)

सूर्यपुत्र's picture

28 Dec 2010 - 9:35 pm | सूर्यपुत्र

>>लेक समोर बसलेल्या मंजुळा - बकुळास अर्पण

म्हणजे लेक (लिहून) झाला तरी इतक्या दिवसात डब्बल सौंदर्य दिसलं नाही?? ;)

सूर्यपुत्र's picture

28 Dec 2010 - 9:38 pm | सूर्यपुत्र

>>लेक समोर बसलेल्या मंजुळा - बकुळास अर्पण

म्हणजे लेक (लिहून) झाला तरी इतक्या दिवसात डब्बल सौंदर्य दिसलं नाही?? ;)