गाभा:
नमस्कार,
मी १६ जनेवारी ते २४ जानेवारी दरम्यान पुण्यात सदाशिव पेठेतील चाणक्य मंडलच्या अभ्यास महोत्सवासाठी येणार आहे. या १० दिवसांसाठी राहण्याची सोय कुठे होऊ शकेल याची माहिती देण्याची नम्र विनंती मिपाकरांना करतो.
माझ्या अपेक्षा:
१. रुम अन्य एक दोन व्यक्तीं सोबत शेअर करण्याची तयारी आहे, मात्र डॉर्मेटरी नसावी.
२. अंघोळीसाठी गरम पाण्याची उपलब्धता असावी.
३. शक्यतो सदाशिव पेठेतच हे ठिकाण असावे, मात्र ऑटोने किफायतशीररित्या जाता येईल इतपत दूर असल्यास चालेल.
आणि सर्वात महत्त्वाचे:
४. तिथले वातावरण फार कडक नसावे, आपल्या मिपावर जसे वातावरण असते तसे असावे.
आपले पुणेकर मिसळपाव बांधव आपुलकीने नक्की मदत करतील याची खात्री आहे.
अश्या जागेच्या (फ्लॅट, लॉज, हॉस्टेल) च्या दूरभाष क्रमांका सहित व्यनि करावा अथवा इथे माहिती द्यावी ही विनंती.
प्रतिक्रिया
24 Dec 2010 - 11:14 am | स्पा
माननीय श्री पराशेठ, आपली मदत करू शकतील