भारत व रशिया इजारेल नेपाल ( महत्वाचे भागीदार )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture
निनाद मुक्काम प... in काथ्याकूट
21 Dec 2010 - 10:50 am
गाभा: 

मी आधी सुधीर काळे ह्यांच्या पुतीन संबंधित लेखात प्रतिक्रियेत म्हटले होते कि रशियाला सध्यस्थितीत भारताशी व्यापारिक संबंध वाढवले पाहिजे .अर्थात आज पासून रशियन राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव भारताचा २ दिवसाचा दौरा करणार आहेत .त्याच्यासोबत व्यापारी मंडळ असून किमान १५ सौदे होणार आहे जे अंतराळ /बिन लष्करी परमाणु सहयोग / व अनेक महत्वाचे प्रामुख्याने व्यापारी सौदे होणार आहेत .पुढील ५ वर्षात २० अब्ज डॉलर च्या व्यापाराचे उदिष्ट दोन्ही देशांनी ठेवले आहे .ह्यात सर्वात महत्वाचा सौदा जेट विमानाच्या ५ व्या पिढीतील विमानाचा असून ते भारत व रशिया सहकार्याने बनवत आहे .(जगात ह्या पिढीचे अत्याधुनिक विमान फक्त अमेरिके कडे होते .पण स्वबळावर बनविले हे विमान अमेरिकेला पांढरा हत्ती वाटले .म्हणून ओबामा ह्यांनी त्यांचे उत्पादन मंदी नंतर बंद केले .२०१७ मध्ये भारत व रशिया निर्मित हे जेट त्यांच्या ब्राह्मोस सारखेच यशस्वी होणार ह्यात शंका नाही . जगात मग केवळ आपल्या व रशियाकडे हे अत्याधुनिक विमान असेल ह्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी रशियन संरक्षण कंपन्या रोसोबोरनएक्सपोर्ट आणि सुखोई भारतात येणार आहेत .
दुसर्या महत्वाच्या सौद्यात काही रशियन अणु भट्टी निर्मितीसंबंधी करार होण्याची शक्यता आहे (एकाही मराठी वृत्त पत्राने अजून रशियन राष्ट्रपती च्या भारतात आगमन व दौर्यासंबंधी अजून काहीही लिहिले नाही आहे .बहुदा प्रत्यक्ष करार झाल्यावर त्याबद्दल लिहिण्याचा मानस असेल .)विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता विष्णु प्रकाश सांगितले आहे कि दोन्ही देश हाइड्रोकार्बन च्या शेत्रात सहयोग वाढविण्याच्या शक्यता वाढवणार आहेत .ह्या दौर्याची हायलाईट म्हणजे रशियाकडून भारताला संरक्षण कराराचा विशेष दर्जा दिला जाण्याची शक्यता आहे ह्याचे प्रमुख .कारण मागील दशकात भारत व रशियाचे सामरिक भागीदारी ची गुणवत्ता व त्याला मिळालेले यश आहे .. सोमवार रात्री नवी दिल्ली पोहचल्यावर मेदवेदेव प्रथम प्रधानमंत्री मनमोहन सिंह बरोबर व्यापक द्विपक्षीय मुद्यावर चर्चा करतील . दोन्ही नेता वैश्विक मुद्दे जसे अफगानिस्तान आणि पाकिस्तान संबंधी चर्चा करतील .

मेदवेदेव मंगलवार वारी राष्ट्रपति प्रतिभा पाटिल आणि विदेशमंत्री एस एम कृष्णा शी भेटतील . मेदवेदेव विरोधी पक्ष नेत्या नेता सुषमा स्वराज, उप राष्ट्रपति हामिद अंसारी आणि यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी शी भेटणार आहेत .

मध्यंतरी भारत वेस्टन जगतातील प्रमुख देशांची तर रशिया चीनशी संबंध वाढविण्यात मग्न होते .त्यामुळे साहजिकच दोन पारंपारिक मित्रांना मैत्रीत दुरावा येऊ नये व ती अधिक घट्ट व्हावी हि इच्छा होती .जी दोघांची हि गरज आहे .विशेतः चीन पाकिस्तानला वाट्टेल ती मदत द्यायला तयार आहे .तर अमेरिका होलाबर्क च्या मृत्यू नंतर आता पुढे काय अशा द्विधा मनस्थितीत आहे .आता पाकिस्तानला हाताळावे कसे ?

भविष्यात भारतात रशियाला १४ ते १६ अणु रिएक्टर बांधायचे आहेत . 2009 मध्ये द्विपक्षीय व्यापार 7.5 अब्ज डॉलर होता. ह्यावर्षी २४ % व्यापार वाढला आहे .भारतासाठी हि भागीदारी खूप महत्वाची आहे .

आपल्या प्रमुख विरोधी पक्षाचे नेतृत्व नुकतेच इजारेल ला जाऊन आले व भाजपप्रणीत राज्यामध्ये तेथील प्रगत कृषी तंत्रांद्यान वापरायच्या दृष्टीने बोलणी केली. तेथील संसदेला संबोधले .तर भारतीय भूदल प्रमुख वी के सिंग सहपत्नी ३ दिवशीय नेपाल दौर्यावर गेले आहेत .ह्या दौर्यात नेपाळी राष्ट्रपती राम बारण यादव त्यांना नेपाली सैन्याचा जनरल हि पदवी देणार आहे तर मागच्या वर्षी आपल्या राष्ट्रपती प्रतिभा ती ह्यांनी नेपाली सेना प्रमुख जनरल छत्रमान सिंह गुरूंग ह्यांना हीच पदवी दिली होती .त्यांच्या आमंत्रणावरून आपले जनरल हा दौरा करत आहे .नेपाली सैन्याला भारताकडून मिळणारी ७० % सबसिडी २००५ ला मओ वाद्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर भारत सरकारने बंद केली होती .त्यावर मात्र चर्चा होणार नाही आहे .
जनरल सिंह मंगलवारी तिब्बती सीमा च्या जवळ जॉमसन चा दौरा करणार आहेत ., जेथे नेपाली senechya माउंनटेन वारफेयर ट्रेनिंग इंस्टीट्यूट चे निरीक्षण करतील ..

येथे भारतीय सेनेचे के जवान पण प्रशिक्षण प्राप्त करत आहेत ..नंतर पोखरा शहरातील गोरखा पेंशन शिबिराचा पण दौरा करतील . चीन शी असलेल्या सीमा प्रश्नामुळे व चीनचे आपल्या सीमेलगत सैन्य हालचाली संशयास्पद असतात त्या निम्मिताने नेपाल मधील लाल सरकार असताना भारताला आपले अस्तित्व व प्रभुत्व नेपाळमध्ये संपादन करणे आवश्यक आहे .

प्रतिक्रिया

गवि's picture

21 Dec 2010 - 10:52 am | गवि

लेख छान आहे.. आवडला.

गांधीवादी's picture

21 Dec 2010 - 10:59 am | गांधीवादी

उत्तम माहिती !
धन्यवाद.

रणजित चितळे's picture

21 Dec 2010 - 11:31 am | रणजित चितळे

छान आहे लेख

चांगली माहीती पुरवलीस रे निनाद. लगे रहो. :)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार

उत्तम आढावा आणि छान माहिती.

धन्यवाद.

आमोद's picture

21 Dec 2010 - 1:33 pm | आमोद

असेच म्हणतो

इजारेल

म्हणजे काय? सांगून उपकृत करावे.

बाकी निनादभाऊंच्या मेगाबायटी प्रतिसादातून त्यांचा गाढा व्यासंग उघड दिसत असला तरी, उगाच राहून राहून हा लेख हिंदीतून मराठीत धर्मांतर झाल्यासारखा वाटतो.

कींवा ऊल्ट जर रशीयन भाषेत ते ऊजवीकडून डावीकडे वाचत अस्तील तर.

गगनविहारी /गांधीवादी /गणपा /रणजीत /परीकथेतील राजकुमार /आमोद /आत्म शून्य /यशवंत ह्यांचे प्रतिक्रिये बद्दल आभार
@यशवंत
हा लेख नुसता राजकारणावर नाही तर अत्यंत महत्वाच्या भारतच्या परराष्ट्र धोरणावर व व्यापारावर आहे त्यामुळे सहाजिकच मी काल्पनिक व मनाचे लिखाण करू शकत नाही .ह्या लेखातील माहिती व आकडे हे साहजिकच माझ्या मनाचे असून चालणार नव्हते .मी जवळजवळ ५ इंग्रजी वृत्तपत्र तेवढ्याच वेब साईट व दोन हिंदी व एक एक इजारेल व एक नेपाली वृत्तपत्र (नेपालीचे इंग्रजीत भाषांतर करून )वाचले व माहितीचे संकलन केले .
ह्यात मी माझे स्वताचे मत मांडण्यापेक्षा आपले देश भले घोटाळे व अंतर्गत कुरबुरी मध्ये फसल्याने आपल्या सर्वाना इस देशाका कूच भी नही हो सकता असा एक निराशावादी विचार येणे साहजिकच आहे .त्यामुळे काही प्रसार माध्यमे जर शेजारील राष्ट्रासंबंधी अतिरंजित बातम्या देत असतील तर आपला गोंधळ उडणे साहजिकच आहे .काही प्रसार माध्यमे किती तरी महत्वाच्या गोष्टी आपल्या वृत्तपत्रात देतच नाही किंवा त्याला महत्व न देता तिसर्या पानातील कोपर्यात कुठेतरी देतात .उदा गडकरी ह्यांचा इजारेल दौरा त्याचे प्रयोजन / सविस्तर माहिती /त्याचे फलित (आपल्या व त्यांच्या दृष्टीने )व जगा kत त्यावर प्रतिक्रिया अश्या गोष्टीवर किंवा नेपाल मध्ये लाल भाई आपले महत्व वाढता असतांना आपले त्यांच्याशी असलेले संबंध हे भारतीय जनतेत अधोरेखित करण्याची गरज आहे .आज भारतात ह्या एकमेव हिंदू राष्ट्रातील नागरिक म्हणजे फक्त चौकीदार व गुरखा असा हेटाळणी व विनोद करण्याच्या हेतून त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीची टिंगल करण्याकडे हेतू असतो (मग गोर्यांनी हेच सगळे आपल्या विरुध्ध केले तर आपण त्याला रेसिसम म्हणतो ) आपल्या सिनेमातून त्यांना नेहमी दुय्यम व विनोदी पत्र दाखवले जाते .उदा सचिनचा नवरा माझा नवसाचा मध्ये नेपाली जॉनी ला सचिन बहादूर असे बोलतो .जेव्हा माझे नाव कसे कळले असे जॉनी विचारतो . तेव्हा सचिन म्हणतो नेपाली मी दुसरा कोई नाम होता है का ?
उद्या एका परप्रांतीय सिनेमात मराठी मानुस को घाटी नहि तो और क्या बुलानेका ? असे कोणी म्हंटले तर ते सहन केले जाईल का ? ओबामा येणार अंगणी म्हणून नाचणारी आपली प्रसारमाध्यमे रशियन राष्ट्रपती अत्यंत महत्वाच्या दौर्यावर येत आहेत तर त्याबद्दल ते येई पर्यत चकार शब्द हि काढू नये ह्याचे नवल व खेद वाटतो .प्रसार माध्यमे हे जन मत ठरविण्याचे मोलाचे काम करतात ,.त्याच्याकडून पारंपारिक मित्र देशाची उपेक्षा पाहून खंत वाटली म्हणून हा लेख प्रपंच )
असो बाकी मला इजारेल ह्या देशाचे आपण मराठीत म्हणतो तसे नाव लिहिण्यात नेहमी गल्लत होते .(आधीच माझ्या शुद्ध लेखनाची बॉंब) त्यामुळे हिंदी पेपरातील हा सरळ साधा शब्द वापरतो ..किंबहुना जगात म्हणजे आलं दुनिया त्यांच्या धर्माला ज्यू म्हणते. तर हिंदीत व सीमेपार त्यांना यहुदी असे बोलले जाते .अबुधाबीत एक पाकिस्तानी वाहन चलन आमच्या प्राथमिक संभाषणातून (मला त्याच्या देशाची सध्या परिस्थितीवर बर्यापैकी माहिती असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे मला चक्क पाकिस्तानी समजला. ) तेव्हा बोलण्यात तो म्हणाला इसाई /यहुदी और हिंदू मिलके इस्लाम को सारी दुनिया से मिटाना चाहते हे. हम दुनियाभर के मुसलमान (म्हणजे तेलासंपान्ने अरब राष्ट्रे )खुल के इनसे जिहाद करना चाहिये. जिसकी कमान हमारे मुल्क के हात मै हो. क्योकी हमारा वजूद का मकसद हि दुनियाको इस्लामी रियासत बनाना है .मी त्याला विचारले ? इतने पाक खयाल तुम्हारे जेहेन मी आये कैसे ? त्याने सांगितले जब भी वतन जातो हु तो मदरसे मैं यही बताया जाता है (बहुदा माझ्या वेस्टन पोशाखाला न्याहाळून ) मला म्हणाला तुम्हेभी मदर्सेमे जाना चाहिये .कौम के लिये मरने मिटणे का जस्बा तुम सिखोगे .मी काहीच बोललो नाही .माझे गंतव्य स्थान आल्यावर मी त्याला पैसे द्यायचे विचारले .कितना हुआ ? त्याने माझ्याकडून फक्त अर्धे पैसे घेतले .(ह्या लोकांच्या मनात विष व धर्मांध पणा इतक्या खोलपणे जिरवला जातो .कि पाकिस्तानी सरकार (अमेरिका प्रेणीत) बरोबर शांती वार्ता करण्यात माझ्या मते काहीच उपयोग नाही ह्यांचे लष्कर /हेर संस्था / व कट्टर पंथीय व त्यांना साथ देणारे सामान्य पाकिस्तानी नागरिक हे एरवी आपापसात भांडतील. शिया विरुध्ध सुनी तर सिधी विरुध्ध .पंजाबी विरुध्ध .पश्तून म्हणून एकमेकांचे गळे चिरतात .पण भारताविरुद्ध एकत्र येतात .माझे तर स्पष्ट मत आहे ह्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे एक मात्र विषय म्हणजे जग भर इस्लामी धर्मांध जिहाद व हिंदुस्थान द्वेष . म्हणून काय वाट्टेल ते झाले तरी ते त्यांच्या भारत भूमिकेत बदल करणार नाही (भले सर्व जगाने अगदी अमेरिकेने त्यांच्यावर दबाब आणला )वेळ आलि आहे ते भारताने त्यांच्या विरुद्ध त्यांच्या हिरव्या दहशत वादाविरूढ आपली भूमिका बदलण्याची ..(शांती वार्ता चे रहाट गाडे जग राहटी साठी जरूर करावे .पण कौन्तर दहशवाद त्यांच्या देशात घुसून करावा.) बाकी ह्या लेखातील मी दिलेलं आकडे हे विविध स्तोतातून पारखून त्याच्या सत्यतेची खात्री केलेली आहे .

ते सगळं ठीक आहे निनाद.. पण इजारेल म्हणजे काय हा प्रश्न शिल्लक उरतोच शेवटी..
तेवढं सांगा..
प्लीज एका वाक्यात उत्तर दिलंत तर शंकानिरसन सहज होईल

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Dec 2010 - 8:08 pm | निनाद मुक्काम प...

इस्त्रायल
मला शेवटी शब्द लिहायला /गुंडोपंत ह्यांनी सांगितलेल्या वेब लिंक चा उपयोग झाला
भाजपा अध्यक्ष नितिन गडकरी यांनी इस्त्रायलच्या संसदेत गुरुवारी आले .. गडकरी आणि त्यांच्या सोबत आलेल्या शिष्टमंडळाचे ( भाजपचे ) त्यांच्या अध्यक्षांनी स्वागत केले. ते सहा दिवसांच्या इस्त्रायल दौऱ्यावर गेले आहेत.

संसदेच्या कामानंतर त्यांनी इस्त्रायलचे उपपंतप्रधान डॅन मेरिडोर यांची भेट घेऊन कृषी क्षेत्रात दोन्ही देशांच्या सहकार्याबाबत चर्चा केली. ( अजून कसली चर्चा केली असेल ह्याबद्दल माहिती नाही .पण माझ्या एका मागच्या प्रतिक्रियेत मी म्हटले होते कि हिंदूं व ज्युं समाज एकत्र येऊन मुस्लीम धर्मांध प्रवूत्तीला आला घालू शकतो .) यावेळी दोन्ही राष्ट्रांनी एकत्र येऊन कशाप्रकारे कृषी क्षेत्रात संशोधन करता येईल यावर देखील चर्चा झाली. एनडीएचे सरकार असताना इस्त्रायलसोबत कृषी तंत्रज्ञान, इरिगेशन आणि जल व्यवस्थानासंदर्भात दोन्ही राष्ट्रांमध्ये सहकार्यासंदर्भात चर्चा झाली होती..सध्या भाजप प्रणीत राज्यामध्ये विकासाचे राजकारण सुरु आहे असे वाचून आहे .उद्या बिहारमधील शेतकरी आधुनिक तेन्कोलोजी मुले प्रगत होईल .आणि महाराष्ट्राचे कृषी धोरण ज्योतिषावर अवलंबून राहीन .असे दिसतेय

आत्मशून्य's picture

22 Dec 2010 - 1:31 am | आत्मशून्य

:D

गांधीवादी's picture

22 Dec 2010 - 7:44 am | गांधीवादी

हम दुनियाभर के मुसलमान (म्हणजे तेलासंपान्ने अरब राष्ट्रे )खुल के इनसे जिहाद करना चाहिये. जिसकी कमान हमारे मुल्क के हात मै हो. क्योकी हमारा वजूद का मकसद हि दुनियाको इस्लामी रियासत बनाना है .मी त्याला विचारले ? इतने पाक खयाल तुम्हारे जेहेन मी आये कैसे ? त्याने सांगितले जब भी वतन जातो हु तो मदरसे मैं यही बताया जाता है (बहुदा माझ्या वेस्टन पोशाखाला न्याहाळून ) मला म्हणाला तुम्हेभी मदर्सेमे जाना चाहिये .कौम के लिये मरने मिटणे का जस्बा तुम सिखोगे .

वाचून स्तब्ध झालो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Dec 2010 - 9:40 am | निनाद मुक्काम प...

हे तर काहीच नाही .मुळात यु ट्यूब वर पहिले तर पाकिस्तानी टीवीवर अनेक स्वयं घोषित विद्वान हे पाकिस्तानातील अराजकतेला यहुदी व हिंदू तंजीमे जबाबदार असल्याची बेजाबदार विधाने करतात . आपल्या विषयी पाकिस्तानी ,जनतेत अत्यंत पराकोटीचा द्वेष भिनवायचे काम आवडीने करतात .त्यात अत्यंत चुकीची माहिती देतात
.उदाहरण देतो .कारगिल युद्ध हे पाकिस्तानने जिंकले असा गैरसमज तेथील जनतेत आहे कारण त्यांच्या प्रसार माध्यमांनी तर असा वाव आणला कि प्रगत देश मध्ये आले नाही तर आपण ........
... सगळ्यात कहर म्हणजे जगासमोर मारे सांगतात कि पाकिस्तानी सैन्य नव्हते कारगिल मध्ये पण पी टीवी आयोजित एका लष्कराच्या कार्यक्रमात ह्यांच्या कारगिल मधील युद्धात जीव वाचलेल्या जवानाचा सत्कार केला .व त्या लोकांनी स्टेज वर येऊन भारतीय सैन्याविरुध्ध आपण मोक्याच्या ठिकाणी वरती बसले असल्याने कसा काय अचून निशाणा साधला व काही क्षणात बर्फ भारतीय रक्ताने लाल कसे झाले ह्याचे अतिरंजित वर्णन केले. .(हि क्लिप आता यु ट्यूब आहे ) मला मनापासून वाटते किमान अजून १० वर्ष तरी अफगाण युद्ध चालावे व ह्यांचे सैन्य जास्तीजास्त ह्यांच्याच एकेकाळच्या चेल्यांकडून मारले जावे .)
हे सांगतात बलुचिस्तान च्या मुक्ती संग्रामाला आपण पैसा व शत्रे पुरवतो . ( मी तर म्हणेन दहशतवाद्यांकडून काश्मीर मध्ये आपल १ जवान शहीद झाला तर त्यांचे किमान १० तरी झालेच पाहिजे .)
आले अंगावर तर घेतले शिंगावर. ह्या म्हणीचा अर्थ ह्यांना कळलाच पाहिजे

गांधीवादी's picture

22 Dec 2010 - 3:36 pm | गांधीवादी

>>मी तर म्हणेन दहशतवाद्यांकडून काश्मीर मध्ये आपल १ जवान शहीद झाला तर त्यांचे किमान १० तरी झालेच पाहिजे
यावर आता काय बोलणार ? इकडे त्यांचे दहशतवादी येऊन आपल्याच कायद्याचे जगासमोर वाभाडे काढतात, तिथे अजून काय अपेक्षा ठेऊ शकतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Dec 2010 - 7:38 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचायचा प्रयत्न करतोय. अवघड जातंय... !!!