या बाईसाहेबांना मूर्तिमंत कागदावर उतरवणं निव्वळ कठीण आहे!
तिचा सर्वात सुंदर क्लोज-अप मिळवण्यासाठी प्रत्येक शॉटला पॉज घेत घेत मुगल-ए-आजम अथ पासून इतिपर्यंत मनसोक्त चाळला.
सर्वात सुंदर माझ्या मते ती 'मोहे पनघट पे' च्या 'नैनोंसे जादू किया' च्या या दृष्यात दिसल्ये. :)
Tools used: Derwent Charcol Medium & Dark, RAFFINE 2B Graphite pencil
-वर्षा
प्रतिक्रिया
26 Apr 2008 - 8:31 am | वरदा
चित्र नाही दिसते. परत अपलोड कर ना प्लीज...
26 Apr 2008 - 9:52 am | ठणठणपाळ
चित्र मधुबालाचं वाटत नाही. नाक चिमट्यात धरून दाबल्यासारखं वाटतं आहे.
बाकी नुसतं एक स्केच म्हणून बघितलं तर चांगलं आहे.
30 Apr 2008 - 9:26 am | विसोबा खेचर
हम्म! प्रयत्न चांगला आहे, चित्रंही बरं आहे, परंतु हुबेहूब मधूचं वाटत नाही..
पुढील चित्रकलेस शुभेच्छा...
तात्या.
30 Apr 2008 - 9:35 pm | वरदा
डोळे सुंदर आलेत. मला वाट्टं हात थोडा वेगळा असता तर अजुन छान वाटला असता...कसा ते नाही सांगता येत...
7 Jun 2008 - 12:15 pm | वर्षा
अंमळ उशीरच झालाय लिहायला पण सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. :)
-वर्षा