मुलांची कोडी

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
15 Dec 2010 - 7:12 am

शब्द कोडी मुलांकरता
माझी धाकटी नात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊ लागली तेंव्हा सर्व आजी-आजोबांच्या मनात असते तशी [निरर्थक] भीती माझ्या मनातही निर्माण झाली " आता हीच्या मराठीचे काय ?" शेजारची मुले-मुली मराठीच होती पण तीही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधलीच! तेंव्हा आता ही जबाबदारी आजी-आजोबांचीच असे ठरवून एक ठरवले की तीच्याशी
बोलतांना आपण इंग्रजी शब्द टाळावयाचे. तीलाही तसेच सांगावयाचे. पण एवढे पुरेसे वाटले नाही. . वर्ष दोन वर्षे गेली. मग आम्ही एक निराळा खेळ सुरु केला. तीला तीन-चार अक्षरांचा मराठी शब्द द्यावयाचा व त्यापासून, त्यातील अक्षरे घेऊन निरनिराळे शब्द बनवावयाचे. उदा.मगर पासून मग, गर, मर, रग,गम वगैरे. सुरवातीला इंग्रजी-हिंदी शब्द करावयासही मुभा दिली. काही दिवस आम्ही शब्द देत असू व तीला शब्द बनवावयास सांगत असू. नंतर थोडा बदल केला.
शब्दकोड्यासारखे पहिल्या दोन अक्षरांपासून बनणाऱ्या शब्दाचे [clue]शोधसूत्र, तिसऱ्या व पहिल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे शोधसूत्र , इत्यादी सांगावयाचे व तीने मुख्य शब्द ओळखावयाचा. उदा. तीन अक्षरी शब्द.पहिले व दुसरे अक्षर = गरम उबदार पांघरुण, दुसरे व तिसरे अक्षर = किल्ला, पहिले व तिसरे अक्षर = भोकाड पसर. उत्तर = रगड. तीचा उत्साह वाढू लागला. व आता तीच आम्हाला कोडी घालते.
परवा तीने आम्हाला घातलेली कोडी देत आहे. तुम्हीही सोडवा.
[१] तीन अक्षरी शब्द. पहिले व दुसरे अक्षर घेतले की एक पेय,पहिले व तिसरे घेतले की अनोळखी माणसाला आपण विचारतो तो प्रश्न, दुसरे व तिसरे घेतले की बारीक तुकडा.
[२] तीन अक्षरी शब्द. पहिले व दुसरे अक्षर घेतले की पक्षाचा आवाज, दुसरे व तिसरे घेतले की खाण्याचा पदार्थ, पहिले व तिसरे घेतले की रागवा, तिसरे व दुसरे घेतले की खेळी.
पोरखेळ कसा वाटतो ?
ता.क. तीचे नाव सांगावयाचे राहिलेच ! माणसाच्या प्राथमिक गरजा घेतल्या की तीचे नाव तयार होते.
आता कोणी पेपर फोडला तरी बिघडत नाही कारण खरी मजा तुमची कोडी येथे येतील तेव्हाच येते. करा तर सुरवात.
शरद

उखाणेविरंगुळा

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

15 Dec 2010 - 7:18 am | बेसनलाडू

१. कोकण
२. चिवडा
नातीचे नाव अ(न्न)व(स्त्र)नि/नी(वारा) काय हो शरदराव? :)
(सूचक)बेसनलाडू

नात खूप हुषार दिसते हो तुमची :). कौतुक वाटलं मला खूप. आजोबांवर गेलीये वाटतं :)

प्राजु's picture

15 Dec 2010 - 8:15 am | प्राजु

मस्त आहे हा खेळ!!! लेकाला लावेन सवय आता मी. :)

गणेशा's picture

15 Dec 2010 - 2:15 pm | गणेशा

छान एकदम ..
उत्तर लगेच रिप्लाय मध्ये दिसल्याने .. बुद्धीला चालना देण्याचे राहुन गेले ..
उत्तरे संदेशा मार्फत जावीत असे वाटते

रेवती's picture

15 Dec 2010 - 6:27 pm | रेवती

नातीचे नाव अवनि?
कोडे सोडवतिये.

गणपा's picture

15 Dec 2010 - 6:37 pm | गणपा

मस्त खेळ आहे हा.
आजच हे लेकीला फोर्वडवतो :)

धनंजय's picture

15 Dec 2010 - 9:45 pm | धनंजय

नातीचे अभिनंदन! "कोकण"ने माझी विकेट उडाली, बरे का... ("कोक"ने उडवली, म्हणा ना. याकरिता - मुलांसाठी नव्हे तर प्रौढ मराठीभाषकांसाठी - "एक शृंगारिक पक्षी" असे शोधसूत्रही चालले असते.)

- - -
तीन अक्षरी शब्द.
(१+२) चांगले संगीत ऐकण्यासाठी हे तयार पाहिजे!
(१+३) रक्तवाहिनी
(२+३) आचळांचा भाग, कंबर, किंवा धोतरा-लुगड्याचा खोचलेला भाग

- - -
तीन अक्षरी शब्द.
(१+२) महिना
(१+३) बाग-बागायत सांभाळणारा
(२+३) धातूची कांडी

गणपा's picture

15 Dec 2010 - 10:02 pm | गणपा

१) कानस
२) मासळी
;)

रेवती's picture

16 Dec 2010 - 5:49 am | रेवती

१) तीन अक्षरी शब्द
पहिले + तिसरे = लहान
दुसरे + तिसरे = पैसा
पहिले + दुसरे = कर (करणे)
२) तीन अक्षरी शब्द
पहिला + दुसरा = कोंबड्याचे ओरडणे
दुसरा + तिसरा = नोकर

नगरीनिरंजन's picture

16 Dec 2010 - 7:31 am | नगरीनिरंजन

१. साधन
२. बांगडी

रेवती's picture

16 Dec 2010 - 7:53 pm | रेवती

बरोबर.

ऋषिकेश's picture

16 Dec 2010 - 12:03 pm | ऋषिकेश

मस्त धागा.. सध्या वेळे अभावी भर घालु शकत नसलो तरी धागा पुन्हा वर यावा म्हणून हा प्रतिसाद :)

नगरीनिरंजन's picture

16 Dec 2010 - 10:29 pm | नगरीनिरंजन

१) तीन अक्षरी शब्द
पहिले + तिसरे = निभाव
दुसरे + तिसरे = हार
पहिले + दुसरे = कुकर्म
२) तीन अक्षरी शब्द
पहिले + तिसरे = हिंदी पाय
दुसरे + तिसरे = प्रियकर
पहिले + दुसरे = शर्यती

सविता's picture

16 Dec 2010 - 11:25 pm | सविता

१. पापड
२. पैयार?

नगरीनिरंजन's picture

17 Dec 2010 - 5:16 am | नगरीनिरंजन

पापड बरोबर.
पैयार नव्हे पैजार. :-)

मेघवेडा's picture

17 Dec 2010 - 12:59 am | मेघवेडा

मस्त धागा!

आता एक माझ्याकडून. मूळ कल्पना तीच पण कोडं जरा वेगळ्या स्वरूपात.

त्रयाक्षरी ही उषा जाहली, चला खेळूया अक्षरगमती
तेज पहा तरि कितुके दिसते, तिसर्‍या सोडून वार्‍यावरती
पहिल्या सोडा, उरेल त्याची भोजनकाले द्या चित्राहुति
द्वितीय त्यागुनि, उरतो दर्जा, वा उरते छापिल आवृत्ती

सांगा कोण?

धनंजय's picture

17 Dec 2010 - 1:29 am | धनंजय

(उत्तर) डेक्कनजवळ पुण्याला रस्तापण आहे...

उखाणेवजा पद्यात्मक कोडे छान जमले आहे.

रेवती's picture

17 Dec 2010 - 7:15 am | रेवती

प्रभात रस्ता काय?

मेघवेडा's picture

22 Dec 2010 - 2:35 pm | मेघवेडा

अरे हो हे उरलेच होते. उत्तर बरोबर हो आजी! :D

उखाणेवजा पद्यात्मक कोडे छान जमले आहे. अभिनंदन मेवे!
(सहमत)बेसनलाडू

नगरीनिरंजन's picture

17 Dec 2010 - 7:20 am | नगरीनिरंजन

व्वा मेवे!

नरेशकुमार's picture

22 Dec 2010 - 9:28 am | नरेशकुमार

घाला ना, घाला ना, अजुन कोडि घाला ना.
मज्जा येते खुप घातलेली कोडि सोडवायला.

गवि's picture

22 Dec 2010 - 11:13 am | गवि

बो ले फा क्या क्या चे तु व ले ट शिं चे

यापासून म्हण बनवा..

नरेशकुमार's picture

23 Dec 2010 - 6:06 am | नरेशकुमार

शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले
एकाचा तोटा त्योच दुसऱ्याचा फायदा

अजुन येउद्यात

शेंडी हा शब्द असलेली सर्वात मोठी (लांब) म्हण कोणती?

सहज's picture

22 Dec 2010 - 2:33 pm | सहज

वर आणत आहे.