मिपा, पुणे कट्टा...अचानक!!!

धमाल मुलगा's picture
धमाल मुलगा in जनातलं, मनातलं
25 Apr 2008 - 2:57 pm


|| ॐ मिसळाय नमः|| ॐ मिसळपावाय नमः|| ॐ वाडेश्वरी मिसळपावाय नमः||

मंडळी,
तुम्हा सर्वांना २२ मार्च रोजी झालेला पुणे कट्ट्याचा कार्यक्रम आठवत असेलच, नाही का?
ज्यांना येणं जमलं त्यांना तर नक्कीच. ज्यांना नाही जमलं त्यांना आपल्या बखरनवीस विजुभाऊ कलमदानेंच्या बखरीनं आपण काय चुकवलं ह्याची चांगलीच माहिती झाली!

इथं, मिपावर लिहिणारे काही तरल, काही वैचारिक, काही कवीमनाचे, काही उत्स्फुर्त, तर काही निव्वळ दंगेखोर नग एकमेकांस प्रत्यक्षात भेटले, चार गप्पा केल्या (आणि काही-काही उतमात घातला..) ह्याचं साग्रसंगीत वर्णन वाचून आणि ते वाचण्यापुर्वीही अशा अफलातून 'नगोत्तमांना' भेटण्याची मनिषा कित्येकांच्या ठायी आहे. त्यातलीच एक आमची प्राजुताई :-)

प्राजुताईच्या भारताभेटीमध्ये आणि कट्ट्याच्या तारखेमध्ये फक्त दोन आठवड्यांचा घोळ झाला होता. तिला बिचारीला इतकी इच्छा असुनही कट्ट्याला येणं जमलं नव्हतं.
मग तिने ठरवलं...हे असले निरुद्योगी धंदे कोण करतं? त्याला गाठायचा आणि जमतील तितक्यांना भेटायचं.

आता, आधिच्या कट्ट्याच्या जाहिरातबाजीमुळे "भडकमकरर्स क्लासेसच्या" "इव्हेंट मॅनेजमेंट" चा ऍडव्हान्स कोर्स करणार्‍या 'धमाल मुलगा' ह्याचं नाव तसं मिपागावात आणि ग्रामपंचायतीमध्ये झालं होतं. अनायसे प्राजुताईला एक इव्हेंट म्यानिजर मिळाला. तीने छानपैकी आधीच धमाल्याला फोन-बीन करुन त्याची 'ऍव्हेलॅबिलिटी' पाहिली. हो! आधीच्या 'भर उन्हाळ्यातल्या सुखद पावसाळी' इव्हेंट असाईनमेंटमुळे धमाल्याला बर्‍यापैकी कामं मिळायला लागली आहेत आता :-)
धमाल्यानेही 'चला, अजुन एक गिर्‍हाइक मिळालं आणि एक इव्हेंट पदरी पडलं' असा विचार करुन होकार भरला.
काही जुजबी फोनाफोनी करुन धमाल्याने मंडळींना गोळा करायला सुरुवातही केली.

ह्याचा घटनाक्रम काहीसा असा:

शुक्रवार तारिख.१८ एप्रिल: आपले गज़लसम्राट चित्तरशेठ, आणि विडंबन बादशहा केशसुमार ह्यांनी आयोजित केलेला गज़लवाचनाचा कार्यक्रम. स्थळ: भरत नाट्य मंदीर, वेळः रात्रौ १५:४५ ते ०१:०० दरम्यान.
केशवसुमारांचे इव्हेंट मॅनेजमेंटचे कौशल्य पाहून धमाल्याने त्यांच्या खांद्यावर दिली बंदूक ठेऊन.म्हणाला, "शेठ तुम्ही कार्यकारिणीचे अध्यक्ष व्हा, आणि मी मुख्य कार्यकारी अधिकारी."

केशवसुमारः अरे, पण आपण भेटणार कुठे? काटा किर्रर्र... ला जाऊया?
धमाल्या: (डोळे उर्ध्वदिशेला लाऊन, झुरका घेत) च्छ्या: तिथं मांजराच्या पिल्लालातरी बसायला जागा असते का?
के.सु.: मग? टिळकरोडचं संजीवनी चालेल? तिथे नसते गर्दी!
धमाल्या: मिसळ चांगली मिळते का?
के.सु.: आयला, असं करु, काटा किर्रर्र मधून पार्सल उचलू आणि पेठकरकाकांच्या घरीच जाऊ!
धमाल्या: हॅ: कोणाच्या घरी कसं जायचं असं? पोरांना लाजल्यागत होइल ना!

असं करता करता, पक्कं काहीच होइना! मग 'देखते है कल, जो होगा सो होगा' असं म्हणून ही मिटिंग मोडली. त्यानंतर रात्री एक-दिडच्या सुमारास धम्याला साक्षात्कार झाला की आज दिवसभरात आपण काहीच खाल्लेलं नाही..मग काय..सगळ्या गाड्या सुसाट 'साईबा' ला. मस्त कोल्हापुरी थाळी चापून घरी पोहोचेस्तोवर ४! धम्या 'घोडे बेचकर' छबो करुन पडला.

शनिवार, तारिख १९ एप्रिल, स्थळः धम्याचं घर.

पहाटे पहाटे ११ वाजता जेव्हा तो जागा झाला तेव्हा मोबाइलचं मुखदर्शन करायच्या सवयीनं त्याने मोबाइल घेतला आणि जाग्यावर उडालाच. टोटलमध्ये ११ मिस्ड कॉल्स...जगदंब...
झोप बीप सगळी गायब. पटकन प्राजुताईला फोन लावला...
धम्या: हॅलो प्राजुताई...
प्राजुताई: अरे...आहेस कुठे? किती फोन करायचे तुला?
धम्या: (ओशाळवाणं) झोपलो होतो.
प्राजुताई: लाज वाटते का? वाजले किती पाहिलंस? काय ठरलं? कधी, कुठे भेटायचं?
धम्या: फक्त १५ मिनिटं दे...सगळं सांगतो.

लगेच धम्यानं केसुशेठला फोन लावला...
धम्या: सायबा, कुठे जमायचं? डेक्कन बिक्कन बघा.. प्राजुताईला फार लांब येणं जमायचं नाही.
केसु: वाडेश्वर फायनल करुन टाका!
धम्या: बेष्ट! पोहोचा तिथे १२-१२:३० पर्यंत...बाकीच्यांना तोपर्यंत गोळा करुन आणतो :-)

मग रिवाजाप्रमाणे फोनाफोनी करुन पेठकर काका, इनोबा,नीलकांत, विवेकवि आणि छत्रपती ह्यांना निमंत्रण धाडली.
कसंबसं आवरुन १२:२५-१२:३० दरम्यान वाडेश्वरी पोचला. तिथे आधीच केसुशेठ, प्राजुताई, विवेकवि आणि छत्रपती हजर होते. थोड्याच वेळात इनोबा आपल्या मिसळपाव डाट काम च्या विश्वकर्मा नीलकांत ह्यांना घेऊन वाडेश्वरी थडकले!
कोरम तर भरला होता, फक्त कमी होती ती बल्लवाचार्य पेठकर काका ह्यांची!

काही मिनिटांत धमाल्याच्या मोबायलावर पेठकरकाकांचा फोन आला...अंदाजानंच धम्यानं गेटाकडे पाहिलं आणि नजर भिरभिरवत शोधणार्‍या भारदस्त पेठकर काकांना बरोब्बर ओळखलं.
काकाही आले....येता येता 'वाहतुक नियमन' नावाखाली हैदोस घालणार्‍या दोन शिपुरड्यांना हग्या दमही भरुन आले. नाही म्हणलं तरी धम्याची चिवचिव काकांना बघून आणि हा किस्सा ऐकून काही वेळ बंद पडली.

आता कट्टा रंगायला लागला होता.हळूहळू एकेक विषय निघत होते...पेठकर काकांनी मधून अधून टाकलेल्या कोट्यांमुळे खसखस पिकत होती..हे बघून धम्याचीही भिती जरा ओसरली..तोही चालू झाला :-)

जिच्यासाठी केला होता हा अट्टाहास, ती प्राजुताई, तीही मस्त गप्पा टप्पा करत होती...काय बडबडी आहे आमची प्राजुताई...मजा येते बॉ! जोडीला तिने अमेरिकेतून आणलेली चाकलिटं हाणणंही चालू होतं.
येणारे डायलॉग्ज शांतपणे ऐकून त्यावर मधूनच एखादा बाऊंसर टाकण्याचं महत्कार्य केसुशेठ नेहमीप्रमाणेच निभावत होते.

असा सगळा सुखसंवाद चालू असताना आत्मानंद आश्रमाचे संस्थापक आपले तात्याबा महाराज कट्टाभेटीसाठी मोबाइलवरुन सुक्ष्मरुपाने अवतिर्ण जाहले. सर्वांची ख्यालीखुशाली विचारुन तात्याबा अचानक अंतर्धान पावले.

ह्या सगळ्यामध्ये हळूहळू सगळ्यांना पोटातल्या कावळ्यांची कावकाव ऐकू येऊ लागली होती. मिसळपाव धर्माला जागून सगळ्यांनी मिसळपावच खाण्याचे ठरवले. पेठकरकाकांना सध्या मसालेदार चालत नसल्याने त्यांनी 'सॉल्टेड लस्सी' मागवली.
"ही सॉल्टेड लस्सी अतिशय आंबटढॅण असुन बहुधा करणारा नुकताच दांडीयात्रेहून आला असावा अशी शंका घेण्याइतकी लस्सी सॉल्टेड आहे" असा काकांचा अभिप्राय ऐकल्यावर मूढ धम्याच्या बथ्थड तोंडाकडे बघून काकांनी स्पष्टीकरण दिले की 'बहुतेक स्वीट लस्सी मार्केट करायची ही वाडेश्वरी युक्ति असावी"

तोपर्यंत मिसळही टेबलावर पोचली होती..आणि थंड अमेरिकेतून गरम भारतात आणलेल्या वितळलेल्या चॉकलेट्सकडे करुण नजरेने पाहणार्‍या धम्याच्या डोक्यात किडा वळवळला..इतका वेळ झाला पण आपण प्राजुताईला छळलेलंच नाहीय्ये !!!!
मग काय,
"प्राजुताईच्या प्लेटमधल्या मिसळीवर हे चॉकलेट आपण पसरवू म्हणजे ते छान लागेल.." असं धमाल्या म्हणाल्याबरोबर प्राजुताईला अगदी म्हणजे अगदीच ईईईईईईई...असं झालं....
पेठकरकाकांनीही धम्याला दुजोरा देत "चॉकलेट मिसळ" असं नाव सुचवलं आणि मिपाच्या पा.कृ.मध्ये रेशिपी टाकायची जबाबदारी घेतली!
ह्यावर तर कसंनुसं झालेला प्राजुताईचा चेहरा अग्गदी फोटोलायक होता....मठ्ठ धम्या...हा फोटो घेतलाच नाही!

छत्रपति नेहमीप्रमाणे खाण्यात दंग, तर विवेकवि आपल्याच विश्वात बुडालेले...
इनोबांना भर कामातून ओढून आणलेलं त्यामुळे ते त्या विचारात आणि विश्वकर्मा नीलकांत सगळ्यांचं पाणी जोखत बसलेले...
शेवटी खाऊन झाल्यावर नाईलाजाने तिथून निघणं क्रमप्राप्त होतं.
पुन्हा लवकरच भेटायचं ठरवून सगळ्यांनी एकमेकांची रजा घेतली.

असा हा कट्टा अचानक ठरुन अचानक पार पडला.


डावीकडूनः विवेकवि,केशवसुमार,प्राजु,प्रभाकर पेठकर,छत्रपति,नीलकांत,इनोबा म्हणे.


धमाल मुलगा,छत्रपति,नीलकांत,इनोबा म्हणे.

हे ठिकाणविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

25 Apr 2008 - 3:19 pm | स्वाती राजेश

जळवा लेको....
आम्हाला नुसते फोटो पाहूनच समाधान मानावे लागते.:)))

पण अचानक मि.पा.चा कट्टा जबरदस्त झाला आहे. छान वाटले, मि.पा.चे सदस्य एवढ्या आपुलकीने आणि अगत्याने करतात.
मस्त.

नंदन's picture

25 Apr 2008 - 4:45 pm | नंदन

पण अचानक मि.पा.चा कट्टा जबरदस्त झाला आहे. छान वाटले, मि.पा.चे सदस्य एवढ्या आपुलकीने आणि अगत्याने करतात.
मस्त.

-- असेच म्हणतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 3:27 pm | मनस्वी

मूढ धमाला.. वर्णन छान संक्षिप्त आटोपशीर आणि मुख्य म्हणजे एकाच भागात केलेस. फोटोही छान आलेत.
वाडेश्वरची मिसळ कशी होती ते सांगितलेच नाहीस की!

मैत्र's picture

25 Apr 2008 - 3:33 pm | मैत्र

माहीत नव्हतं.. कशी होती मिसळ?

सहज's picture

25 Apr 2008 - 3:58 pm | सहज

मिपा झिंदाबाद!!

अचानक कट्टा झिंदाबाद!!!

आनंदयात्री's picture

25 Apr 2008 - 4:00 pm | आनंदयात्री

कट्टावर्णन छान, आम्ही चुकवलेला हा अजुन एक कट्टा :(

स्वाती दिनेश's picture

25 Apr 2008 - 4:09 pm | स्वाती दिनेश

अचानक कट्टा मस्त झालेला दिसतो आहे...
स्वाती

धमाल मुलगा's picture

25 Apr 2008 - 4:09 pm | धमाल मुलगा

वाडेश्वरची मिसळ कशी होती ते सांगितलेच नाहीस की!

ते सांगणं मिसळधर्माशी गद्दारी करणं होईल, असं नाही का वाटत?
अहो आण्णाचं हाटील ते! आण्णानं बनवूनही चांगली होती एव्हढंच सांगेन मी!

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 4:35 pm | मनस्वी

सपष्ट सांग तुला काय म्हणायचंय.

ते सांगणं मिसळधर्माशी गद्दारी करणं होईल, असं नाही का वाटत?

ते का बरं?

विसोबा खेचर's picture

25 Apr 2008 - 4:16 pm | विसोबा खेचर

अचानक भरलेल्या मिपाकरांच्या कट्ट्याची कहाणी मस्त रे धमाल्या!

संत तात्याबा आता सुखाने समाधी घेतील. मिसळपाव धर्म स्थापन व्हावा ह्याच त्यांचा अट्टाहास होता. तो आता पुरा झाला आहे. खेड्यापाड्यात, गावागावात, शहराशहरात असेच वरचेवर मिसळकट्टे भरावेत हीच संत तात्याबांची मनोकामना आहे! आणि आपल्यासारखे मिपाधर्माचे रसिक अनुयायी हे कट्टे भरवण्याचं काम करताहेत, धमाल, मजा करताहेत, हे पाहून संतोष जाहला!

जगातल्या सर्व धर्म, जातीपाती नष्ट व्हाव्यात आणि केवळ प्रेम आणि आपुलकीचा प्रसार करणारी मिसळपाव ही एकच जात राहावी, मिसळधर्म हा एकच धर्म राहावा!

अहो मिसळीच्या नावातच तिचा धर्मादेश सांगितला आहे. माणसामाणसांचं एकमेकात 'मिसळ'णंच सर्वात महत्वाच! :)

मिसळपाव मस्तकी धरावा,
अवघा हलकल्लोळ करावा!

आपला,
संत तात्याबा महाराज,
मिसळपाव धर्म संस्थापक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Apr 2008 - 4:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अचानक कट्टा घडवणारे मि. धमाल यांना मानलंच पाहिजे....!!!
खरे तर कोण कुठ्ले, एकमेकांना भेटतात, गप्पा मारतात बरं वाटतं वाचतांना आणि पाहतांना :)

आनंदयात्री's picture

25 Apr 2008 - 4:26 pm | आनंदयात्री

:))))

परका वाटला हो आम्हाला आमचा धम्या !

मदनबाण's picture

25 Apr 2008 - 8:53 pm | मदनबाण

अचानक कट्टा घडवणारे मि. धमाल यांना मानलंच पाहिजे....!!!
खरे तर कोण कुठ्ले, एकमेकांना भेटतात, गप्पा मारतात बरं वाटतं वाचतांना आणि पाहतांना :)

असेच म्हणतो.....

(प्रत्येक मि.पा.करास भेटण्यास आतुर असलेला.....)
मदनबाण

वरदा's picture

25 Apr 2008 - 5:53 pm | वरदा

मस्त व्रुत्तांत आणि मस्तच कट्टा...तो मिसळीचा फोटो सुद्धा झकासच.........कसलं जळायला होतय्....
प्राजुताईच्या प्लेटमधल्या मिसळीवर हे चॉकलेट आपण पसरवू म्हणजे ते छान लागेल.." असं धमाल्या म्हणाल्याबरोबर प्राजुताईला अगदी म्हणजे अगदीच ईईईईईईई...असं झालं....
पेठकरकाकांनीही धम्याला दुजोरा देत "चॉकलेट मिसळ" असं नाव सुचवलं आणि मिपाच्या पा.कृ.मध्ये रेशिपी टाकायची जबाबदारी घेतली!

खरच ई ई ई ई..कधी देणार पाक्रु?

थंड अमेरिकेतून गरम भारतात
आत्ता नाही काही थंड....८० - ८५ आहे टेम्प....

शितल's picture

25 Apr 2008 - 6:08 pm | शितल

मजा आहे बॉ तुमची, छान वाटले वाचुन, एकमेका॑शी प्रत्यक्ष भेटल्यावर तर आणखी आन्॑द.

इनोबा म्हणे's picture

25 Apr 2008 - 6:20 pm | इनोबा म्हणे

फोटोतून धम्याची बायको नेमकी अदृश्य झालीयं. नाहीतर मिपाची सून पहायला मिळाली असती सगळ्यांना.

काय धम्या.... बरोबर अँगल धरुन फोटो काढलास लेका!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

धमाल मुलगा's picture

25 Apr 2008 - 6:27 pm | धमाल मुलगा

:-))))

नाही! तत्व म्हणजे तत्व!
फोटोमध्ये मिपाकरच आले पाहिजेत. जे सदस्य नाहीत त्यांचा समावेश का करा?

हां, आता आजूबाजूने जाणारे लोक नेमके फोटो काढताना बघून मुद्दाम मधे आले आहेत त्याबद्दल काही करु शकत नाही!

प्रभाकर पेठकर's picture

25 Apr 2008 - 8:40 pm | प्रभाकर पेठकर

पुणे मिपा कट्टा परिपूर्ण झाला नाही. नुसत्या ओळखी आणि थोडीफार गंमत जंमत.
गोडी अपूर्णतेची लावेल वेड तेंव्हा ..... अशी अवस्था झाली.
धमाल मुलाचे मात्र अभिनंदन. (सकाळी उशीरा उठण्याचा गुन्हा माफ करता आला तर...)

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Apr 2008 - 10:03 pm | llपुण्याचे पेशवेll

अवांतरः पण कट्ट्यावर धमुच्या लग्नाविषयी काही चर्चा झाली का नाही?
पुण्याचे पेशवे

पिवळा डांबिस's picture

25 Apr 2008 - 10:45 pm | पिवळा डांबिस

फोटोही झकास आले आहेत.

धमाल्या, आता तू कट्टे भरवायची एजन्सीच घेऊन टाक!! तुझं मेंबरं जमवण्याचं आणि सर्व व्यवस्था बघण्याचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. गुड बॉय!

पण धमाल्या एक सांग गुपचुप! आपली प्राजुताई एका डोळ्याने चकणी आहे का रे? नाही म्हणजे फोटोत एकच डोळा दिसतोय, दुसर्‍या डोळ्यावर केस घेतलेत म्हणून विचारतो!!!:))

संत तात्याबांना हल्ली बरेच कट्टे चुकलेले दिसतात. मेंबरांनाही त्यांच्या अपरोक्ष भेटतांना चुकल्या-चुकल्यासारखं होत असेल! तात्याबा, आता तुमचे लाईफ साईझ फोटो काढून ठेवा आणि तुम्ही जर कट्ट्याला जाऊ शकणार नसलांत तर कमीतकमी फोटो तरी पाठवून द्या!! म्हणजे मंडळी त्या फोटोवर चार थेंब (तर्रीचे हो!!!) उडवून मग खाद्यपेयांचा समाचार घ्यायला मोकळी!! कशी आहे आयडिया!!!:)))

आणि इनोबा, धमाल्या, शिंच्यानो, मिसळीबरोबर स्लाईस पाव? (फोटो क्र. १) ही पुण्याची पद्धत वाटतं!! अरे मिसळीबरोबर फक्त लादी पाव पाहिजे!! हे म्हणजे कोल्हापूरच्या रम बरोबर गोड शिरा खाण्यापैकी आहे, अरे तिथे कांदा-भजीच पाहिजेत!!:))

आणि धमाल्या फोटोत (क्र. ३) काय आम्हाला फिंगर दाखवतोयस का? साल्या, तिकडे येईन तेंव्हा बघून घेईन तुला!!!!

फोटोतून धम्याची बायको नेमकी अदृश्य झालीयं. नाहीतर मिपाची सून पहायला मिळाली असती
नाही! तत्व म्हणजे तत्व! फोटोमध्ये मिपाकरच आले पाहिजेत. जे सदस्य नाहीत त्यांचा समावेश का करा?

असं काय! बरी सोईस्करपणे तत्वं-बित्वं आठवतात रे तुला!! अरे तुझ्या नाकात वेसण घालणारी सूनबाई आम्हाला बघायला मिळाली नसती का!!!:))
आणि इतकंच असेल तर आम्ही तिला मानद सदस्यत्व देऊ की! काय हो तात्या, करायचा का धमाल्याचा गेम?

असो. मित्रांनो, अशीच धमाल करा...
आमची आठवण असू द्या...
-डांबिसकाका

विसोबा खेचर's picture

25 Apr 2008 - 11:02 pm | विसोबा खेचर

आणि इनोबा, धमाल्या, शिंच्यानो, मिसळीबरोबर स्लाईस पाव? (फोटो क्र. १) ही पुण्याची पद्धत वाटतं!! अरे मिसळीबरोबर फक्त लादी पाव पाहिजे!! हे म्हणजे कोल्हापूरच्या रम बरोबर गोड शिरा खाण्यापैकी आहे, अरे तिथे कांदा-भजीच पाहिजेत!!:))

सहमत आहे रे डांबिसा.. मिसळीसोबत लादीपावच पाहिजे. त्याची चव आणि खुमारी न्यारीच!

तात्या.

कोलबेर's picture

25 Apr 2008 - 11:29 pm | कोलबेर

हे म्हणजे कोल्हापूरच्या रम बरोबर गोड शिरा खाण्यापैकी आहे, अरे तिथे कांदा-भजीच पाहिजेत!!:))

कोल्हापूरची रम?? ही काय भानगड आहे? गुळ, चप्पल, मिसळ, तांबडा, पांढरा इ. साठी प्रसिद्ध असणार्‍या कोल्हापूरची 'रम'??
आणि पावणं, कोल्हापूरला पण मिसळीबरोबर स्लाईस पावच खातात.
'पाठी कडला पाव आन कट लावुन मिसळ' अशी पेशल आर्डर असते.

नारदाचार्य's picture

27 Apr 2008 - 8:52 pm | नारदाचार्य

ही रम एकदा घेऊन बघा कधी तिकडं गेलात तर (ताजी करवीरकर मंडळी कोणी असतील तर सांगतील काय की ती रम अजूनही मिळते की नाही ते?). सोबत कांदाभजी तर घ्याच, शिवाय पांढरा रस्सा. एका क्वार्टरचे चार पेग करून एखादा शेंगदाणा तोंडात टाकत फौजी स्टाईलनं (म्हणजेच साधारण पंधरा मिनिटाला एक पेग) घेतलीत तर त्यासोबत घोट-घोट पिता-पिता लिटरभर पांढरा रस्सा कधी संपेल हे कळणार नाही. मग पोटात जी आग उसळलेली असेल ती केवळ सुकं, भाकरी, दहीकांदा, तांबडा रस्सा, मधूनच चवीपुरता पांढरा रस्सा यातूनच शमू शकते. आणि जमवताच आलं तर जवळपासच्या एखाद्या खेड्यात जाऊन खऱ्या कोल्हापुरी माणसाच्या घरी बनणारी मुंडी मिळते का पहा (मुंडी म्हणजे काय हे विचारणे म्हणजे तिचा अवमान आहे, असे आम्ही मानतो). मग सुक्याची गरज नाही.
दोन्ही रस्से, गूळ, चपला, मिसळ याबरोबरच रम आणि मग तमाशा (आणि साजसुद्धा) ही कोल्हापूरची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये एकत्र नांदणारी.

विसोबा खेचर's picture

28 Apr 2008 - 6:40 am | विसोबा खेचर

वा! सुंदर प्रतिसाद रे नारदाचार्या!

तात्या.

पिवळा डांबिस's picture

27 Apr 2008 - 8:28 pm | पिवळा डांबिस

वरचा नारदाचार्यांचा प्रतिसाद वाच, कोलबेरसायबा!!:))
मला रमचं नांव आठवत नव्हतं
अरे, वुई आर क्लासिक 'ओल्ड स्कूल' सायबा!!!:))
आणि,
कोल्हापूरला पण मिसळीबरोबर स्लाईस पावच खातात.
खरंच! तसं असेल तर मी एकच म्हणेन,
"आरांरां रां रां!:))
-जॉन स्टुअर्टकाका

नारदाचार्य's picture

27 Apr 2008 - 9:10 pm | नारदाचार्य

तुमच्या "क्लासिक 'ओल्ड स्कूल'" या शब्दांनी एकदम जिभेवर फोर्ट नॉक्सची चव आली. मिळते की नाही ती अजून तिथं? कोणी सांगेल काय?

इनोबा म्हणे's picture

26 Apr 2008 - 1:09 am | इनोबा म्हणे

आणि इनोबा, धमाल्या, शिंच्यानो, मिसळीबरोबर स्लाईस पाव? (फोटो क्र. १) ही पुण्याची पद्धत वाटतं!! अरे मिसळीबरोबर फक्त लादी पाव पाहिजे!! हे म्हणजे कोल्हापूरच्या रम बरोबर गोड शिरा खाण्यापैकी आहे, अरे तिथे कांदा-भजीच पाहिजेत!!:))
काका,(फोटू क्र.१)तो फोटू प्राजुताईचा आहे.प्राजुताईनी आंग्लदेशातून आणलेली मिठाई सुद्धा आपून चाखली नाही. आपून फकस्त स्प्राईट (क्लिअर है!) ढोसले.
बाकी रमचे म्हणाल तर,आपून ती फकस्त अनंत चतुर्दशीलाच ढोसतो (करंट जास वेळ राहतो,शिवाय त्या दिवशी वासाची फिकीर नसते). त्यामूळे शिराशिरी(मिरवणूकीच्या गर्दीत) आपल्याला माहीत आहे. मात्र खायचा शिरा अजून ट्राय केला नाही.

असं काय! बरी सोईस्करपणे तत्वं-बित्वं आठवतात रे तुला!! अरे तुझ्या नाकात वेसण घालणारी सूनबाई आम्हाला बघायला मिळाली नसती का!!!:))
आणि इतकंच असेल तर आम्ही तिला मानद सदस्यत्व देऊ की! काय हो तात्या, करायचा का धमाल्याचा गेम?

अगदी बरोबर बोललात काका. एक तर मिपाच्या कट्ट्याला बायकोला घेऊन आला आणि आता आम्हाला तत्व शिकवतोय. द्याच त्याच्या बायकोला सदस्यत्व.'धमाल मुलगा'चा 'हमाल मुलगा' होतो की नाही बघा.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

पिवळा डांबिस's picture

26 Apr 2008 - 9:26 am | पिवळा डांबिस

काका,(फोटू क्र.१)तो फोटू प्राजुताईचा आहे.
मग स्वारी हां! आम्हाला तरी कसं कळणार? आम्हाला वाटलं की तुमच्या पार्टीतलाच आहे!!
-डांबिसकाका

इनोबा म्हणे's picture

26 Apr 2008 - 10:44 am | इनोबा म्हणे

मग स्वारी हां! आम्हाला तरी कसं कळणार? आम्हाला वाटलं की तुमच्या पार्टीतलाच आहे!!
फोटू पार्टीतलाच हाये,पन प्राजुताईचा आहे. मला येवढंच सांगायचं ह्वतं, की आपून काय तिथली मिसळ खाल्ली नाय.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

व्यंकट's picture

26 Apr 2008 - 1:21 am | व्यंकट

मजा आहे बुवा !
व्यंकट

बगाराम's picture

26 Apr 2008 - 1:54 am | बगाराम

वा वा वा वा!! तोंडाला काय पाणी सुटलं मित्रांनो. पुन्हा एकदा कडकडून भूक लागली मला. मजा आहे!

वरदा's picture

26 Apr 2008 - 6:06 am | वरदा

काका,(फोटू क्र.१)तो फोटू प्राजुताईचा आहे.
म्हणजे व्रुत्तांत अर्धवट टाकला म्हणायचा. तिथे काय हादडलं आणि जर मिसळच खाल्ली असेल तर ती कशी दिसत होती ते आम्हाला कोण सांगणार?

इनोबा म्हणे's picture

26 Apr 2008 - 10:41 am | इनोबा म्हणे

म्हणजे व्रुत्तांत अर्धवट टाकला म्हणायचा. तिथे काय हादडलं आणि जर मिसळच खाल्ली असेल तर ती कशी दिसत होती ते आम्हाला कोण सांगणार?
बाय माझे,तिथं मिसळच हादडली.आणि त्या फोटूतली मिसळ तिथलीच हाये.पर म्या काय खाल्ली नाय ती मिसळ.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

डॉ.प्रसाद दाढे's picture

26 Apr 2008 - 4:46 pm | डॉ.प्रसाद दाढे

ह्या धमाल्याने मला एकदम ऐनवेळी कळविल्यामुळे माझा चान्स हुकला..असो..त्याच॑च आयत्यावेळी ठरल॑..पुन्हा जमणार असाल तेव्हा थोडे आधी कळव बर॑ का रे..म्हणजे मी व भडकमकरसर नक्की येऊ :) आणि तात्या॑नाही यायला जमेल (त्या॑च्या बरोबर एकदा बसायच॑च आहे..;)
बाकी पार्टी झक्क जमलेली दिसतेय..आता धमाल्याला मिपाचा अधिकृत राजदूत घोषित करायला हरकत नाही. ह्यावेळेला आमचे 'तवारिखनवीस' विजुभाऊ नव्हते तर मग वाडेश्वराची बखर लिहिण्याची जबाबदारी कोणी घेतली आहे की नाही

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 10:27 am | धमाल मुलगा

येत्या रविवारीच पुन्हा एक दुसरा बेत करायचं घाटतं आहे.
सांगतो लवकरच :)


आता धमाल्याला मिपाचा अधिकृत राजदूत घोषित करायला हरकत नाही.

:)) :)) :))
आयला, आमचं इंजिन कसंबसं ४५-५० सी.सी. पर्यंत जातं, त्यातून आमच्या सायलेंन्सरच्या नळीत ठासून कार्बन साठलेला....पिकअपच्या नावानं चांगभलं....हां फार तर फार लुना-फिना म्हणा, अगदी वाटलं तर एम५०-एम८० ठीक आहे हो...पण डायरेक्ट "राजदूत"? वाचूनच छातीची धडधड वाढली...आणि हृदयाच्या ठोक्यांतून राजदूतचं फाररिंग ऐकू यायला लागलं ना राव!!!!!!

विसोबा खेचर's picture

28 Apr 2008 - 11:23 am | विसोबा खेचर

येत्या रविवारीच पुन्हा एक दुसरा बेत करायचं घाटतं आहे.

धमाल्या,

४ मे ला येत्या रविवारी पुण्यात अण्णांना भेटायला यायचा विचार करतो आहे रे. संध्याकाळी पुण्यात मस्तपैकी कुठेतरी बसून कट्टा करू..

तात्या.

प्रशांतकवळे's picture

26 Apr 2008 - 5:42 pm | प्रशांतकवळे

चालू द्या!

प्रशांत

शरद's picture

26 Apr 2008 - 7:08 pm | शरद

पुढील वेळे स लादी पाव मा़झ्याकडून.

देवदत्त's picture

26 Apr 2008 - 9:31 pm | देवदत्त

मज्जा चालू आहे तुमची... :)
तळ्यात मळ्यात चालू आहे तुमचे माझ्यासोबत. मी बंगळुर्/पुण्याला तेव्हा कट्टा मुंबई/ठाण्यात.
आता मी ठाण्यात तर कट्टा/ओसरी पुणे/बंगळुर ला...
हरकत नाही. एक दिवस गाठतोच तुम्हाला.. ;)

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Apr 2008 - 10:28 pm | ब्रिटिश टिंग्या

आमच्या गैरहजेरीत कट्टे भरवताय होय. ~X(
जुन एंडाला येतोय मी....मग बघुन घेतो एकेकाला. :B

असो, फोटो छान आलेत अन् कट्टाही जोरात झालेला दिसतोय.....
सर्व कट्टेकर्‍यांचे अभिनंदन!

-टिंग्या

ऋषिकेश's picture

27 Apr 2008 - 8:14 pm | ऋषिकेश

फोटो छान आलेत अन् कट्टाही जोरात झालेला दिसतोय.....
सर्व कट्टेकर्‍यांचे अभिनंदन!

असेच म्हणतो :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

रामदास's picture

27 Apr 2008 - 10:43 pm | रामदास

मला धमू नी घातलेला शर्ट जाम आवडला.कफ आणि कट टकाटक.

छोटा डॉन's picture

28 Apr 2008 - 8:03 am | छोटा डॉन

आमचं आपलं नेहमीप्रमाणे वरातीमागून घोडं ....

च्यायला ह्या धम्यानं तिकडं कट्ट्यावर कट्टे भरवून हकडं अमच्या डोक्याला काव आणला आहे ...
सालं आमचंच नशिब फुटकं सालं त्याला तो तरी काय करणार ...

मस्त रे लेको, लढा ... छान वाटले, मि.पा.चे सदस्य एवढ्या आपुलकीने आणि अगत्याने भेटीगाठी करतात.
खरे तर कोण कुठ्ले, एकमेकांना भेटतात, गप्पा मारतात बरं वाटतं वाचतांना आणि पाहतांना O:)

आत्तापर्यंत बर्‍याच आंतरजालीय गल्ल्यांमधून हिंडलो पण अशी आपुलकी कुढेच नव्हती आणि नाही ...
"तात्याकाम जाबाली " बघतात ना तुम्ही लावलेला वेलू आता कसा गगनावारी चल्ला आहे ...

* फोटू पण झक्कास ...*
बाकी पेठकर काकांच्या रुपाबद्दल केलीली मनोकल्पना अल्मोस्ट अशीच निघाली.
"निलकांत " सामील होताना पाहून आनंद झाला ...
बाकी "प्राजूताई " तर उत्सवमुर्ती ; धन्या, इनोबा, विवेक , केसु शेठ आपले नेहमीचे धडाडीचे कार्यकर्ते ...

अवांतर : धम्या, मी आता "मे एंन्ड" ला पुन्हा एकदा पुण्याला येणार आहे, तेव्हा बघ जमलं तर ...
तुझ्या लग्नाची गडबड आहे पण तरीही प्रयत्न कर ...
बाकी तसे आपले आंद्या, इनोबा, विजूभाउ, केसु आहेतच ...

अतिअवांतर :
"फोटोतून धम्याची बायको नेमकी अदृश्य झालीयं. नाहीतर मिपाची सून पहायला मिळाली असती सगळ्यांना.
नाही! तत्व म्हणजे तत्व!
फोटोमध्ये मिपाकरच आले पाहिजेत. जे सदस्य नाहीत त्यांचा समावेश का करा?"
अरे ऍडजेस्ट माडी, ऍडजेस्ट माडी ...
द्यायच काहितरी नाव आणि म्हणायच "आगामी आकर्षण", त्यात काय येवढं ? आम्ही नाय का आगामी आकर्षण"काळोख" म्हणून जाहीर केलं आणि ते बेणं गायब, अगदी तसचं, काय ?

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....