चिअर गर्ल्सचा खेळामधे वापर किती योग्य अथवा अयोग्य/ आवश्यक अथवा अनावश्यक?

अनामिका's picture
अनामिका in काथ्याकूट
25 Apr 2008 - 1:15 pm
गाभा: 

सध्या आय पी एल ने भरवलेल्या २० षटकांच्या चेंडुफळीच्या सामन्यांत प्रत्येक षटकार आणि चौकारावर तसेच संघाने मिळावलेल्या खेळाडुंच्या बळींवर अंगप्रदर्शन करत नाचणार्‍या चिअर गर्ल्सची खरच कुठ्ल्याही खेळामधे निदान भारतात तरी गरज आहे का?
नाही !असे निदान माझे तरी मत .
खेळाडुंची खरेदी विक्री देखिल गैरच ,पण निदान त्यामधे अगदी हालाखीच्या परिस्थितितुन आलेल्या गुणी खेळाडुंना आर्थिक दृष्ट्या सबळ होण्यास हातभार लागतो आहे हीच काय ती जमेची बाजु.
पण खेळाडु व प्रेक्षकांचा उत्साह वाढविण्याच्या नावाखाली तो़कड्या कपड्यात नाचुन (थैमान घालुन) पुर्ण क्रिडांगण डोक्यावर घेणार्‍या चिअर गर्ल्सचा खेळामधिल वापर खरच अनावश्यक वाटतो .भारतासारख्या वैविध्यपुर्ण देशात अश्या प्रकारच्या गोष्टींना थारा देणे कितपत आणि कुठल्या नैतिकतेच्या कक्षेत बसते ?
भारतासारख्या बहुभाषिय व बहुप्रांतिय देशात अनेक नृत्य प्रकार अस्तित्वात आहेत्.त्याचा देखिल वापर आयपीएलला त्यांनी दिलेल्या तथाकथित कारणांसाठी करणे शक्य होते.पण आपल्या असलेल्या संस्कृतीचा अभिमान न बाळगता ,विदेशी संस्कृतीचा अवलंब करणे अतिशय निंदनिय नव्हे काय?
अनामिका"

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

25 Apr 2008 - 2:11 pm | भडकमकर मास्तर

एकदम अनावश्यक....आबा मनावर घेताहेत असे आजच्या पेपरात वाचले.... कदाचित मुंबईमध्ये तरी हे हिडीस प्रकार बॅन होतील....
(फक्त क्रिकेटचा चाहता...)
भडकमकर

आनंदयात्री's picture

25 Apr 2008 - 2:17 pm | आनंदयात्री

वैयक्तिक रित्या त्यात काही गैर वाटत नाही बॉ !
त्या अनुषंगाने शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की बार गर्ल्स ना नाचवा, त्यांना रोजी रोटी तरी मिळेल.

हे बघा

चीअरलिडींग बघताना चांगले वाटत असेल, पण त्यात भाग घेणार्‍या मुली अनेकदा जखमी होतात. इतकेच नाही तर मरतात.

अमेरिकेतील बॉस्टनजवळची एक मुलगी नुकतीच चीअरलिडींग करीत असताना मरण पावली.

अजून एक बातमी - एबीसी न्यूज - 16,000 Cheerleaders Get Injured Every Year Doing Stunts and Tumbles

याबाबतीत संशोधनाचे निष्कर्ष असे -
स्त्रियांच्या खेळातील ५०% हून अधिक जखमा चीअरलिडिंग या "खेळा" मुळे

मुली आणि त्यांचे पालकही कधीकधी हा प्रकार अत्यंत स्पर्धात्मक भावनांनी सुरू करतात ( तिला भाग घेता आला, मला नाही वगैरे - किंवा माझ्या मुलीला ह्या टीममध्ये घेतलेच गेले पाहिजे इत्यादी. आपल्याकडे चीअरलिडींग सुरू झाले की असे झाले नाही तरच नवल वाटेल).

हे असले खूळ (थेर??!!) भारतीय लोकांनी एवढी उदाहरणे समोर असताना स्विकारू नये असे वाटते. पण खुद्द मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिल्यावर अजून पुढे काय बोलणार? त्यात होणारे अंगप्रदर्शन हा एक मुद्दा भाजपने समोर आणला, त्याऐवजी ह्या प्रकारातील धोके समोर आणले असते तर बरे झाले असते असे वाटले.

असो.

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 2:27 pm | मनस्वी

तसा या "निपुण" खेळाडूंचा सहभाग तरी आवश्यक आहे का..
ते जसे स्लेजिंग / नाचकाम / हातवारे करून / एका ओव्हरला ३० रन देउन आपले मनोरंजन करतात.. तशाच या सुंदरी म्हणजे आपले मनोरंजन, शिवाय खेळाडूंना चिअरींग आणि स्पॉन्सरर्सची जाहिरात (त्यांच्या नाव आणि लोगो छापलेले कपडे घालून) अशा कामगिरींचा त्रिवेणी संगमच जणू!
विनोद बाजूला, खेळाचा खेळखंडोबा झालाय. एखादी सर्कस बघतोय असे वाटते......... पण मजा येते! अडीच घटका करमणूक!

आनंदयात्री's picture

25 Apr 2008 - 2:35 pm | आनंदयात्री

आमचे मनोरंजन आयपीएल मधला भिकार खेळ पाहुन होण्यापेक्षा सुंदर्‍यांचे नाचकाम पाहुनच होते बॉ !

स्वाती राजेश's picture

25 Apr 2008 - 2:44 pm | स्वाती राजेश

कलकत्ता टीम ने म्हणे, वॉशिंगटन मधून चिअर गर्ल्स आणल्या आहेत.
माझा नवरा म्हणतो,वॉशिंगटन डान्स बार मधून आणल्या असतील? हा झाला जोक.

काही खेळाडूंनी सुद्धा तक्रार केली आहे म्हणे कि आमचे खेळताना लक्ष विचलीत होते.:))))

टी.व्ही.वर मॅच पाहताना रन झाली, आउट झाला तर रीप्ले दाखवायच्या ऐवजी त्या गर्ल्स दाखवतात.
आणि त्यांच्या समोर नाचणारे प्रेक्षक.त्यांचे फोटो घेत असलेले प्रेक्षक. हे पाहिले कि हसू येते आणि किव करावीशी वाटते.

पण युके मधे ज्या फुटबॉल लीग होतात त्यात कुठे चिअर गर्ल्स दिसल्या नाहीत.
तसेच टीमचे फॅनच गाणी म्हणून चिअर अप करतात. तसेच काही खेळाडूंवर गाणी तयार केली आहेत.( ती यु ट्युब वर पाहायला मिळतील). ती म्हणून चिअर अप करतात.

असो हे झाले माझे मत.

अनामिका's picture

25 Apr 2008 - 4:25 pm | अनामिका

आबा मनावर घेतिल पण आबांचे मालक"शरदराव" कारवाई करु देणार की नाही? आणि या सगळ्या प्रकारांना प्रतिबंध होणार की नाही हाच कळीचा मुद्दा.
ज्यांना राजकारण करायचय ते राजकारण करतील बापडे!पण मी मात्र एक सर्वसामान्य खेळ प्रेमी म्हणुन याकडे पाहते आहे.
या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी मधिल नेत्यांमधेच वादविवाद आहेत्.आणि यावर भाष्य करतय कोण ?तर जितेंद्र आव्हाड .काय पण विनोद म्हणायचा हा?
आव्हाडांचे सार्वजनिक जिवन ठाणेकरांना सर्वशृत आहे.संस्कृती रक्षकाच्या आवेशात डांस बार बंद करणार्‍या शासन कर्त्यांची स्पष्ट भुमिका नाही .

भडकमकरकाका! खरच बघावे लागेल की राज्यशासन या बाबतित कोणती पाऊले उचलतेय ते?
निदान महाराष्ट्रापुरता अथवा मुंबई पुरता विचार करायचा झालाच तर चिअर गर्ल्स च्या ऐवजी लेझिम अथवा ढोलताशाचे पथक हा पर्याय कसा वाटतो ?त्या कमनियललनांचे ते आक्षेपार्ह नाचणे बघण्यापेक्षा महाराष्ट्रातील पारंपारीक नृत्य बघणे प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरणार नाही का?
आयपीएलच्या पहिल्या सामन्याच्या वेळेस प्रेक्षकांमधे बरेच फलक झळकत होते ज्यात "येथे आम्ही सामना बघायला आलो नसुन चिअरगर्ल्सचा उच्छाद बघायला आलो आहे"असे नमुद करण्यात आले होते.
पुर्वी चेंडुफ़ळीच्या या खेळात प्रतिस्पर्धि खेळाडुंचे चित्त विचलित करण्यासाठी ललनांचा वापर करण्याचा प्रघात इंग्लंड व तत्सम देशांमधे होता . पण आयपीलने तर त्याही पुढे जाऊन सरळ विदेशातुन या ललनांना नृत्यासाठी आमंत्रित केले ते ही भरगोस पैसे देऊन.जर नृत्य करता येणे हा एकच निकष या निवडीसाठी मानला गेला असेल तर भारतात या कलेत निपुण असणार्‍यांची वानवा खचितच नाही.
मनस्वी !
तुझा मुद्दा अगदी योग्य.
विदेशी खेळाडुंच्या निष्ठा या सामन्यांशी आणि त्या त्या संघांशी कितपत निगडित असतिल हा तर विचार करण्यासारखाच मुद्दा आहे.विदेशी खेळाडुंना फक्त आणि फक्त आयपील कडुन मिळणार्‍या भरमसाठ पैशाशीच मतलब असु शकतो.या सामन्यातुन भारतिय संघातिल खेळाडुंमधे परस्पर वैमनस्य वाढले नाही म्हणजे मिळवले?
स्वाती राजेश!
टी.व्ही.वर मॅच पाहताना रन झाली, आउट झाला तर रीप्ले दाखवायच्या ऐवजी त्या गर्ल्स दाखवतात.
आणि त्यांच्या समोर नाचणारे प्रेक्षक.त्यांचे फोटो घेत असलेले प्रेक्षक. हे पाहिले कि हसू येते आणि किव करावीशी वाटते.
खरच मला तर यावरुन कणेकरांचे माझी फटकेबा़जी यामधे पुर्वी दुरदर्शनच्या प्रक्षेपणावर केलेला विनोद आठवला.एखादा खेळाडु बाद झाल्यावर तो कसा बाद झाला हे कळण्याआधीच त्या ललनांचा धिंगाणा बघावा लागतो.
काही खेळाडूंनी सुद्धा तक्रार केली आहे म्हणे कि आमचे खेळताना लक्ष विचलीत होते.:)))) आता विचलित होते की जाणिवपुर्वक केले जाते ही बाब अलाहिदा!

विनोद बाजूला, खेळाचा खेळखंडोबा झालाय. एखादी सर्कस बघतोय असे वाटते
हे मात्र एकदम पटेश बरं का मनस्वी!
"फक्त वामनमुर्ती सचिनला खेळताना बघायला उत्सुक असलेली "
अनामिका

आनंदयात्री's picture

25 Apr 2008 - 4:32 pm | आनंदयात्री

हे पटणेबल आहे .. ते सुद्धा आवडेल.

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 4:43 pm | मनस्वी

पण चालेल की.

विकास's picture

25 Apr 2008 - 5:09 pm | विकास

चिअर गर्ल्स नसताना पण खेळ चांगले चालायचे अथवा जसे तेंव्हा खेळ म्हणून चालायचे तसेच ते त्यांना ठेवले तरी चालतील.

एकंदरीत असला प्रकार फालतू पणा वाटतो. कोणा राजकारण्याला यात गैर वाटत नसेल तर त्यांना त्यांच्या मुलींना/नातींना पहील्यांदा नाचायला लावा.

कौंतेय's picture

25 Apr 2008 - 8:46 pm | कौंतेय

तुम्हाला गैर वाटत असेल म्हणुन सगळ्यांनाच ते गैर वाटावे ही अपेक्षा का? आणि जर गैर वाटत नसेल तर ते आपल्या पोरि बाळी नाचवुन सिद्ध केले पाहिजे ह्या पेक्षा मोठा विनोद मी वाचला नव्हता. तुम्हाला अनावश्यक वाटत असेल तर अनिरुध महाराजांच्या प्रवचनाला जाउन बसा. तिथे तुमचे मन रमेल.

>>>तुम्हाला गैर वाटत असेल म्हणुन सगळ्यांनाच ते गैर वाटावे ही अपेक्षा का? आणि जर गैर वाटत नसेल तर ते आपल्या पोरि बाळी नाचवुन सिद्ध केले पाहिजे ह्या पेक्षा मोठा विनोद मी वाचला नव्हता. तुम्हाला अनावश्यक वाटत असेल तर अनिरुध महाराजांच्या प्रवचनाला जाउन बसा. तिथे तुमचे मन रमेल.<<<

तुम्ही फारच व्यक्तीगत घेतलेले दिसतयं...पण आता मला म्हणून आपण प्रतिसाद दिलाच आहेत तर त्याला नाईलाजाने हे उत्तर...

चर्चेच्या मथळ्यातल्या प्रश्नाला, "चिअर गर्ल्सचा खेळामधे वापर किती योग्य अथवा अयोग्य/ आवश्यक अथवा अनावश्यक"" मी मला वाटते ते उत्तर दिले. तुम्ही कोण, कुठले, काय करता आणि काय करायला पाहीजे हे काही मी लिहीलेले नव्हते. मी फक्त म्हणालो हा प्रकार फालतू वाटतो. आणि तसा तो मला वाटतो, तुम्हाला वाटत नसेल तर नका वाटून घेऊ मी तुम्ही / इतरांनी काय करायचे ते सांगत नाही आहे आणि तुम्ही तसे मला/इतरांना सांगावे हे अपेक्षा नाही. तेंव्हा प्रवचनाला बसावे का काय करावे ह्याचे उपदेश निदान मला तरी करू नका.

बाकी मी राजकारण्यांच्या बाबतीत "स्वतःच्या पोरी बाळी" नाचवा म्हणले कारण विलासराव देशमुख म्हणाले की "अश्लिलता ही पाहणा-याच्या दृष्टीवर अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही चीअरगर्ल्सकडे खिलाडू वृत्तीनं पाहा... " जर अश्लीलता वाटत नसली तर स्वतःच्या पोरीबाळींनी नाचले तर चालेल का याचे त्यांनी उत्तर द्यावे (नाचायचे का नाही हे त्या पोरी बाळी ठरवतील). आज काय अश्लीलता पहाणार्‍याच्या नजरेत, उद्या भ्रष्टाचार वाटणार्‍याच्या नजरेत... वगैरे वगैरे....

जे मला योग्य वाटले नाही त्याचे उदात्तीकरण मी करण्याचा प्रश्न येत नाही. बाकी महाभारतातील कौंतेय म्हणजे कुंतीचा पहीला पूत्र कर्ण हा द्रौपदी वस्त्रहरणाला प्रोत्साहन देत होता तर कुंतीच्या लग्नानंतरचा पहीला पूत्र (कौंतेय) हा तीला त्या आधी द्युतात लावत होता तितकेच काय ते आम्हाला आजपर्यंत माहीत होते :-)

अनामिका's picture

25 Apr 2008 - 5:40 pm | अनामिका

मनस्वी !
काय पण कल्पकता आहे ग!
मानले तुला .तुतारीचा बाजच काही और आहे.
खरच "तुतारी" मनापासुन आवडेल.
>("सच्चू " आजपण खेळु शकणार नाही म्हणुन अंमळ नाराज झालेली)
"अनामिका"

अनामिका's picture

25 Apr 2008 - 5:55 pm | अनामिका

आताच हाती आलेल्या वृत्तानुसार मुकेश अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स संघाच्या चिअरगर्ल्स नवी मुंबई येथे होणार्‍या सामन्यात पुर्ण कपड्यात मैदानात उच्छाद मांडताना दिसतील.
या कमनिय ललनांचे तथाकथित नृत्याविष्कार पाहुन नेत्रसुख मिळवणार्‍यांची चंगळ यानिमित्ताने निकालात निघाली म्हणायची.
असो "हे ही नसे थोडके"
विकास!
कोणा राजकारण्याला यात गैर वाटत नसेल तर त्यांना त्यांच्या मुलींना/नातींना पहील्यांदा नाचायला लावा.
अहो राजकारणी म्हणजे "आपले ठेवायचे झाकुन आणि दुसर्‍याचे पहायचे वाकुन" या प्रकारात मोडतात्.त्यांना कसे बरे शक्य होणार? कारण यांच्या लेकीसुना त्या घरंदाज आणि बाकी स्त्रिया ***** .पुढे बोलणेच नको.

(सच्चू " आजपण खेळु शकणार नाही म्हणुन अंमळ नाराज झालेली)
"अनामिका"

हेरंब's picture

25 Apr 2008 - 6:29 pm | हेरंब

या मुली नाचवणे हे योग्य की अयोग्य ,हे ठरवण्याचा अधिकार किमान राजकारण्यांना तरी नक्कीच नाही. त्यांची संस्कृती काय आहे हे सगळ्या जनतेला माहित आहे.

धोंडोपंत's picture

25 Apr 2008 - 7:43 pm | धोंडोपंत

त्यात गैर काय आहे? जरा मजा येते. जेवतांना पंचपक्वान्नाबरोबर जसं एखादं बोट वर्‍हाडी ठेच्याचं बरं लागतं तसं आहे.

संस्कृतीच्या नावाने गळे काढण्यासारखे त्यात काही नाही. किती संस्कृती संरक्षक आज नऊवारी साड्या नेसतात आणि धोतर परिधान करतात?

आपल्या सोयीप्रमाणे संस्कृती बदलायची आणि दुसर्‍या कोणी तोकडे कपडे घातले की गळे काढायचे.

चा..ला..य..च...चं

आपला,
(प्रेक्षक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

इनोबा म्हणे's picture

25 Apr 2008 - 7:51 pm | इनोबा म्हणे

संस्कृतीच्या नावाने गळे काढण्यासारखे त्यात काही नाही. किती संस्कृती संरक्षक आज नऊवारी साड्या नेसतात आणि धोतर परिधान करतात?
पंतांच्या या मुद्द्याशी सहमत

पण पंत,जर नाचवायच्याच असतील तर भारतीय पोरी का नको.आपल्याकडे बारबाला काय कमी आहेत का?
आणि बारबालांवर जर बारमधे नाचायची बंदी असेल तर या गोर्‍या चमडीच्या पोरींना मैदानात नाचायची परवानगी का दिली गेली?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

कौंतेय's picture

25 Apr 2008 - 8:42 pm | कौंतेय

इनोबा तू पण इनोदीच आहेस. बारबालांना बार मध्ये नाचायला बंदी आहे मैदानावर नव्हे. आम्हाला तर बारबाला आणि मैदानबाला दोन्ही हव्यात. ह्या सोवळ्यातल्या सन्स्क्रुती रक्शकानी त्यान्च्या घरात सोवळे घालुन बसावे.

कौंतेय's picture

25 Apr 2008 - 8:39 pm | कौंतेय

धोंडोपंत मनातले बोललात.च्यामारी कधीतरी कायतरी चांगले घडतय म्हन्टल कि आलेच लेकाचे सन्स्क्रुती रक्षक.

मदनबाण's picture

25 Apr 2008 - 10:07 pm | मदनबाण

जिथे क्रिकेट या (खेळाचा ?)बाजार मांडला गेलाय तिथे चिअर गर्ल्स काय बिअर गर्ल्स पण पाहावयास मिळतील.....
म्हणजे सचिने षटकार ठोकला की तो चेंडु कुठे कसा गेला हे दिसण्या आधीच या नितंब हालवणार्‍या पोरी अगदी क्लोजअप मधे दिसणार !!!!!
क्रिकेट रसिकांनो हे दिवस सुद्दा पाहावयाचे राहिले होते आपल्या नशिबी अजुन काय.....
च्या मारी ,,,,, काय त्या पोरी आणि काय त्यांची शरीराची घुसळण.....शरीराचा प्रत्येक भाग अगदी हवेशीर ठेवला जाईल याची पुर्ण काळजी घेतलीय त्यांनी. (उन्हाळा जास्त आहे ना !!!!! :)) )

काय म्हणे या पोरी नको तर बार गर्ल्स ना नाचवा ,,,,, अरे व्वा म्हणजे आता बार पेक्षा स्टेडिअम बरा असे म्हणाचे का?
असे काही झाले की बार गर्ल्स च्या पोटांची काळजी बर्‍याच जणांना होते,का बरे पोट फक्त त्यांनाच आहेत का या देशात?

(फक्त आणि फक्त क्रिकेट चा चाहता)
मदनबाण

इनोबा म्हणे's picture

26 Apr 2008 - 1:26 am | इनोबा म्हणे

काय म्हणे या पोरी नको तर बार गर्ल्स ना नाचवा ,,,,, अरे व्वा म्हणजे आता बार पेक्षा स्टेडिअम बरा असे म्हणाचे का?
असे काही झाले की बार गर्ल्स च्या पोटांची काळजी बर्‍याच जणांना होते,का बरे पोट फक्त त्यांनाच आहेत का या देशात?

बारबालांची बाजु घ्यायची माझी अजिबात इच्छा नाही,परंतू जर बारबालांचे नृत्य बेकायदेशीर ठरु शकते तर या पोरींना नाचायची परवानगी कशी दिली गेली एवढेच म्हणायचे होते.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

बगाराम's picture

26 Apr 2008 - 1:57 am | बगाराम

जर बारबालांचे नृत्य बेकायदेशीर ठरु शकते तर या पोरींना नाचायची परवानगी कशी दिली गेली एवढेच म्हणायचे होते.

अरे इनोबा,
ह्या चिअरगर्ल्सवर दारू पिउन कुणीही पैसे उधळत नाही. तसेच ब्लाउजमध्ये १००च्य नोटा खूपसुन त्या नाचताना दिसत नाहित. त्यामुळे बारबाला आणि चिअरगर्ल्स ह्यांची तुलना कशी होऊ शकेल बाळा?

-बगाराम

इनोबा म्हणे's picture

26 Apr 2008 - 2:10 am | इनोबा म्हणे

ह्या चिअरगर्ल्सवर दारू पिउन कुणीही पैसे उधळत नाही.
मान्य.

तसेच ब्लाउजमध्ये १००च्य नोटा खूपसुन त्या नाचताना दिसत नाहित.
अरे पण बारबालांचे कपडेही जितके तोकडे नसतात त्या प्रकारचे कपडे ह्या सार्वजनिक ठिकाणी घालून फिरतात ना बाळा...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

बगाराम's picture

26 Apr 2008 - 3:11 am | बगाराम

अरे प्रश्न इथे कपडे किती तोकडे घालायचे हा नाही आहे. राखी सावंत तिच्या स्टेज शोला किती कपडे घालते? त्यावर आणली का बंदी?

अवांतरः 'करंट जास्त राहावा' म्हणून रम पिउन दारुचा भपका मारत अनंत चतुदर्शीला 'शिराशीरी' करणार्‍या लोकांविषयी मी काय बोलणार?
तू हे मजेत लिहिले असशील आणि खरोखरच असं काही करत नसशील ह्याची मला खात्री आहे पण लिहिताना देखिल थोडे भान ठेवावे. इथे येणार्‍या पाहुण्या मंडळींचा गैरसमज होऊ शकतो. खरंच असं वागत असशील तर प्रश्न मिटला.

इनोबा म्हणे's picture

26 Apr 2008 - 11:58 am | इनोबा म्हणे

अरे प्रश्न इथे कपडे किती तोकडे घालायचे हा नाही आहे. राखी सावंत तिच्या स्टेज शोला किती कपडे घालते? त्यावर आणली का बंदी?
बंदी आणली नाही हा मुद्दा मान्य.मात्र मागे एकदा कोल्हापूरात तिचा स्टेज शो झाला होता.त्यावेळी तिच्यावर याच कारणास्तव खटला भरला गेल्याची बातमी एका वाहिनीवर पाहीली होती. पुढे त्या खटल्याचे काय झाले हा प्रश्न निराळा.

अवांतरः 'करंट जास्त राहावा' म्हणून रम पिउन दारुचा भपका मारत अनंत चतुदर्शीला 'शिराशीरी' करणार्‍या लोकांविषयी मी काय बोलणार?
मी काय बोललो,आणि त्यामुळे तुझे माझ्याविषयी काय मत झाले याचा या चर्चेशी काही संबंध नाही.मी कसा आहे,याविषयीचे तुझे मत मनातच ठेव.जाहिररीत्या व्यक्तीगत टिका करणार असशील तर मलाही नाईलाजाने त्याला प्रत्युत्तर द्यावे लागेल.मग इथली चर्चा 'चर्चा' राहणार नाही.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

सुनील's picture

26 Apr 2008 - 6:19 am | सुनील

अरे पण बारबालांचे कपडेही जितके तोकडे नसतात त्या प्रकारचे कपडे ह्या सार्वजनिक ठिकाणी घालून फिरतात ना बाळा...

आरं इन्या, तोकडे म्हंजी कुठून तोकडे? आता ह्या चियरबाला मांड्या दाखिवतात तशा बारबाला बेंबी दाखवीत नव्ह्त्या का? ते काय तोकडे न्हाय??

असो. ह्या चियरबाला नक्की कोणाला चियर करण्यासाठी आहेत? खेळाडूंना की प्रेक्षकांना?

क्रिकेटच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात प्रेक्षकांना चौकार्-षटकाराची आतषबाजी आणि खेळाडूंना त्यांच्या चाहत्यांचा चित्कार चियर करायला पुरेसा असतो. ह्या बालांची काही गरज नाही असे वाटते.

(शुद्ध क्रिकेटप्रेमी) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण's picture

26 Apr 2008 - 1:43 am | मदनबाण

ओ इनोबाजी

(आनंदयात्री)
त्या अनुषंगाने शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की बार गर्ल्स ना नाचवा, त्यांना रोजी रोटी तरी मिळेल.

हे वाचुन माझ्या डोक्यात आलेले विचार आहेत ते.....
प्लीज गैर समज नको !!!!!

वरदा's picture

26 Apr 2008 - 6:22 am | वरदा

संस्कृतीच्या नावाने गळे काढण्यासारखे त्यात काही नाही. किती संस्कृती संरक्षक आज नऊवारी साड्या नेसतात आणि धोतर परिधान करतात?

नुसती नऊवारी आणि धोतर घातलं म्हणजे संस्क्रुती का? व्यवस्थित अंगभर कपडे मग कुठलेही असोत (पंजाबी असोत किंवा गुजराथी) घातलेले लोक काय संस्क्रुती सोडुन वागतात असं म्हणायचय का? संस्क्रुतीची ही व्याख्या मला तरी नाही पटली.
चीअरलिडींग बघताना चांगले वाटत असेल, पण त्यात भाग घेणार्‍या मुली अनेकदा जखमी होतात. इतकेच नाही तर मरतात.


ह्या बद्दल कुणीच काही बोलत नाही. मुली मग कोणाच्याही असोत जखमी झाल्या तरी चालतील हे संस्क्रुती काय माणुसकीला तरी शोभतं का?

सागर१२३'s picture

28 Apr 2008 - 3:23 pm | सागर१२३

काही खेळाडूंनी सुद्धा तक्रार केली आहे म्हणे कि आमचे खेळताना लक्ष विचलीत होते.

टी.व्ही.वर मॅच पाहताना रन झाली, आउट झाला तर रीप्ले दाखवायच्या ऐवजी त्या गर्ल्स दाखवतात.
आणि त्यांच्या समोर नाचणारे प्रेक्षक.त्यांचे फोटो घेत असलेले प्रेक्षक. हे पाहिले कि हसू येते आणि किव करावीशी वाटते.

मी सहमत आहे.

शेवटि फलषृती काय ?तर "चिअर गर्ल्स कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मुळात चुकीचा आहे".-इती -झुबकेदार विलासराव>.( सुपुत्र बॉलीवुड मधे धिंगाणा घालतायत त्याचाच हा परिपाक असावा) 8}

चला मग तर प्रश्नच मिट्ला.उगिच काथ्याकुट करत बसण्यात काही हशील नाही. :?
तेंव्हा उघड्या डोळ्यांनी बघा ,नाहितर डोळ्याला झापड लावा. :B
याशिवाय दुसरा पर्याय नाही.एकच जमेची बाजु म्हणजे निदान त्या कमनिय युवती आता अंगभर कपड्यात नाचणार.
आमच्या सारख्यांसाठी हिच बाब पुरेशी. नाही तरी "दुधाची तहान ताकावर भागवायची सवय जडलेली"तेंव्हा जे थोडफार चांगल घडतय त्यातच सुख मानावे.
बाकी संस्कृती वगैरे जी काय जपायची ती आपण अपापल्या घरात जपु. ;;)
ढोलताशे ,तुतारी जे काही वाजवायचे ते एकदा मुंबई इंडियन्सचा संघ जिंकला कि भाड्याने आणुन वाजवु ,आता तो कधी जिंकेल हे मात्र विचारु नका.
(सचिनच्या दुखापतीच कोड न उलगडू शकणारी ) :S
"अनामिका"

एक मकरंद अनासपुरेचा डायलॉग आठवला (आठवा... टेनिस)

"आपल्याला ज्यातलं कळतं तेच पहावं माणसानी"

;)