सामाजीक सवयी

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in काथ्याकूट
11 Dec 2010 - 9:07 pm
गाभा: 

मिपावरील नुकत्याच उडालेल्या एका धाग्यावरिल एका प्रतिक्रीयेने एका झटक्यात मी १२-१५ वर्ष मागे गेलो, बुद्धीमत्ता वगैरे सोडा पण वेगवेगळ्या सामाजीक/भौगोलीक परिस्थीतील लोक किमान मागील पीढीपर्यंत तरी काही सवयी, गुण/अवगुन बाळगुन होते हे मान्य करायला हवे.

बी एस्सीला असताना, कोकणात शैक्षणीक सहलीनिमीत्त आमचा सगळा वर्ग गेला होता. दापोली कृषी विद्यापीठ बघुन झाल्यावर केशवराजला गेलो. परत येता येता सपाटुन भुक लागलेली. खाली वाडीत मस्त जेवण झाले आणी आमच्या एका मित्राने ताटातच हात धुतले. यजमानांच्या चेहर्‍यावरची नाराजी सहज वाचता येत होती. मला फारसे काही वाटले नाही कारण सिन्नर/ संगमनेर भागातले आमचे सारे नातेवाइक हेच करायचे. आज तो प्रसंग आठवला तसा मी त्याचा परत विचार करायला लागलो. नगर जिल्हातील अतिशय श्रीमंत व घरंदाज घरातील तो मुलगा अशी सवय का बाळगुन होता? तसा मला कमलेश आठवला, त्यापेक्षाही त्याची आजी... कमलेश शेखावतच्या घरी एकदा गेलो होतो, खानदानी राजपुत.. दणदणीत जेवण झाल्यावर त्याच्या आजीने सरळ ताटात हात धुतले, इतकेच नाही ते पाणी पीवुन टाकले. त्यावेळी मी त्यावर काही प्रतिक्रीया देण्याचा प्रश्नच नव्हता. परतही तो विषय कधी आला नाही.

आज विचार करता मी त्याचे मुळ शोधु लागलो. राजस्थानच्या रखरखीत अभाव्ग्रस्त वाळवंटातुन आलेल्या त्या आजी ताटात हात धुवुन ते पाणी पिवुन घेतात, यात अन्न वाया घालवु नये या विचाराइतकेच पाणी वाया जाउ न देणे हाही उद्देश आहे अस मला वाटल. नगरच्या एके काळच्या दुष्काळी प्रदेशात राहणारे माझे नातेवाईक आजही ताटात हात धुतात, व घरच महीला मंडळ त्याच पाण्याने लगेच ताट वाटी धुवुन टाकते. नळाखाली ताट धुण्याची चैन करणे तिथे आजही गरजेचे वाटत नाही. चार फुट खोद्ल की पाणी सापडणार्‍या कोकणात ही पध्दत चुकीची समजणे सहाजिकच आहे.

मागिल पीढीपर्यंत तरी असे प्रत्येक समाज/ भौगोलीक गट स्वताचे वैशीष्ट - गुण-अवगुण(?) बाळगुन होते. कोकणातील/मारवाडातील अभावग्रस्त परिस्थीतीत वाढलेले कोकणस्थ/मारवाडी इतरांकडुन कंजुसपणाबद्दल टोमणे खात (कुठलाही मारवाडी थोडी कुवत आली की आधी पाणपोयी बांधतो,) . अती सुजलाम व संपन्न धरतीतुन आलेले फाळणीग्रस्त पंजाबी/ सिंधी, त्या परीस्थीतीतही खाण्या पिण्यात कसर करत नाही. शेतकरी कुटुंबातुन आलेला सातारा/ कोल्हापुरचा किंवा उत्तर प्रदेशचा माणुस मुंबैत आला की आधी आपला गावचा कोण आहे ते शोधतो.

प्रत्येक पेशाला लागणारे विशीष्ट गुण तो व्यवसाय करणार्‍या ज्ञाती/ समाजांनी आपलेसे केले. जगातील सर्वोत्तम योध्दे समाज हे एकतर शेतकरी आहेत किंवा शिकारी. कारण या दोन्ही व्यवसायासाठी प्रचंड ताळमेळ व सामुहीक भान लागते, जे युध्दासाठीही लागते. जाट, मराठे, गुरखे, रामोशी ही काही उदाहरणे.

माझा गॅरेजवाला जातीने सोनार आहे, लोखंडाचे काम करत असला तरी तो सोनाराच्याच काटेकोरपणे करतो. संपुर्णपणे शहरात वाढलेल्या त्याच्या मुलांमधे मात्र हा गुण नाही. शिंपी/ सोनार हे समाज त्यांच्या काटेकोरपणाबद्दल ज्ञात होते. हे गुण बहुदा व्यवसायातुनच आले असावे. जेंव्हा समाज जातींच्या, व अनुषांगीक व्यवसायांच्या कप्प्यात बंदीस्त होता तेंव्हा हे गुण जोपासले जायचे, एका पिढीतुन दुसर्‍या पिढीत पाझरत जायचे. या प्रकारे हजारो वर्ष न बदललेल्या ग्रामीण भारतीय समाजाने एक साचेबध्द रुप घेतले.

याला पहीला धक्का बसला तो यांत्रीकीकरणाने व शहरीकरणाने..

जेंव्हा आपण एखादा गुणविषेश एखाद्या समजाला/जातीला चिकटवतो तेंव्हा तो वांशिक नसुन परिस्थीतीजण्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. हल्लि शहरातील बर्‍याचशा एकजीनशी वातावरणात वाढताना, आपले हे गुण विरघळत चाललेत, आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी व्यवसायसाठी योग्य गुण आपण आत्मसात करतोय. त्यामुळे हळुहळु पण निच्छितपणे ज्या गुणांचा आपल्याला अभिमान आहे वा इतरांच्या ज्या सवयींबद्दल आपण नाके मुरडतो, त्या नाहीशा होवुन एक नवा काहीसा एकजीनसी समाज उदयास येणार आहे हे नक्कि.

प्रतिक्रिया

>>नगर जिल्हातील अतिशय श्रीमंत व घरंदाज घरातील तो मुलगा अशी सवय का बाळगुन होता? तसा मला कमलेश आठवला, त्यापेक्षाही त्याची आजी... कमलेश शेखावतच्या घरी एकदा गेलो होतो, खानदानी राजपुत.. दणदणीत जेवण झाल्यावर त्याच्या आजीने सरळ ताटात हात धुतले, इतकेच नाही ते पाणी पीवुन टाकले.

मीही नगरचाच. मी आजही घरी जेवण झाल्यावर सरळ ताटात हात धुतो. पण ते पानी वगैरे प्यायची काही भानगड नाही बुवा.
मीच काय आमच्याकडे ही पध्द्तच आहे आजही.

>>नगरच्या एके काळच्या दुष्काळी प्रदेशात राहणारे माझे नातेवाईक आजही ताटात हात धुतात, व घरच महीला मंडळ त्याच पाण्याने लगेच ताट वाटी धुवुन टाकते. नळाखाली ताट धुण्याची चैन करणे तिथे आजही गरजेचे वाटत नाही.

हात ताटात धुतात ते मान्य. पण त्याच पाण्याने ताट वाटी धुतात हे मला नाही पटत. तस ते नाहीपण. अहो तेल़कट ताट असं एवढ्याशा पाण्यात धुवुन होईल का? याचा जरा प्रयत्न करुन पहा.
ताटात हात धुण्याची पध्द्त कशी सुरु झाली हे मला नाही सांगता येणार. परंतु जेवायला बसण्याअगोदरही हात धुवायला भांडं दिलं जातं बर्याच ठिकाणी.

शैलेन्द्र's picture

11 Dec 2010 - 9:53 pm | शैलेन्द्र

त्याच पाण्याने याचा अर्थ तेवढ्याच पाण्याने नाही, पण खरकटे ताट वाळले की जास्त पाणी लागते, ओले असेल तर पटकन स्वच्छ होते. , यस, हात धुवायला पाणी द्यायची पद्धत आजही आहे.

आणी पानी प्यायचा प्रकार मारवाडात आहे, आपल्याकडे नाही, मी तसच लिहीलय.

एक णाही अणेक उदाहरणे देता येतील :) माणसाणे जसजसा विकास केला तस तसे त्याच्या बुद्धीचे आणि सामाजिक भाणाचे तिनतेरा झालेत हे णक्की. पाठीमागुन कुटाळक्या करण्याच्या खुजलीप्रवृत्तीचे विषेश कौतुक वाटते ते ह्या साठीच . :)

चला माझी शेळीचं दुध काढायची आणि जी-मेल लॉगिन करायची वेळ झाली .

- (चेन)मेलेंद्र

शैलेन्द्र's picture

12 Dec 2010 - 2:03 pm | शैलेन्द्र

शेळी दुध देतीय, म्हणजे बकरु असलच कवळं, कधी येवु?

टारझन's picture

12 Dec 2010 - 2:45 pm | टारझन

अरे बापरे बकरीला करडु झालं पण ? अभ्यास कमी पडतोय माझा! पण तेच बरं आहे. अन्यथा आता ओकारीही येत नाही एवढं मन उडलंय. व्याआआआअक्क्

- ( बकरीचा फक्त दुधदुभत्यासाठी उपयोग करणारा) मेंढपाळ

शैलेन्द्र's picture

12 Dec 2010 - 3:49 pm | शैलेन्द्र

अरे राजा, दुभत्या जनावराला बारक पिल्लु असत रे बरेचदा, आता तुझी शेळी इतर काही प्रकाराने दुध देत असेल तर माहीत नाही.

(बकरीचा व बकर्‍याचा फक्त कापुन खाण्यासाठी उपयोग करणारा) धनगर..

आता कसं सांगायचं ह्याला ? तुम्ही ट्रॅक क्लियर चुकलेले आहात एवढंच म्हणिन :)

- क्रिप्टिक मास्तर

शैलेन्द्र's picture

13 Dec 2010 - 2:42 pm | शैलेन्द्र

जरा खरडी-व्यनीतुन ट्रॅकवर आन ना..

-क्रिप्टीक डिसास्टर.

राजेश घासकडवी's picture

12 Dec 2010 - 4:57 am | राजेश घासकडवी

जेंव्हा आपण एखादा गुणविषेश एखाद्या समजाला/जातीला चिकटवतो तेंव्हा तो वांशिक नसुन परिस्थीतीजण्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. हल्लि शहरातील बर्‍याचशा एकजीनशी वातावरणात वाढताना, आपले हे गुण विरघळत चाललेत, आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी व्यवसायसाठी योग्य गुण आपण आत्मसात करतोय.

१०० टक्के सहमत. दुर्दैवाने 'देअर, बट फॉर द ग्रेस ऑफ गॉड, गो आय' हे तत्व पुरेशा प्रमाणात वापरलं जात नाही. इतरांच्या चालीरीतींना आपण आपल्याच चष्म्यांतून बघतो.

सन्जोप राव's picture

12 Dec 2010 - 6:18 am | सन्जोप राव

ताटात हात धुणे ही सामाजिक सवय पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जन्माला आली असावी हे एकवेळ मान्य, पण रस्त्यावर पान-गुटखा-तंबाखू खाऊन थुंकणे, रस्त्याच्या कडेला प्रातर्विधी करणे, कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या कुठेही भिरकावणे, खाजगी मालमत्तेचा सार्वजनिक वापर करणे, कुणाच्याही बागेतली फुले, फळे बिनदिक्कतपणे तोडणे, ऐतिहासिक स्थळांवर आपली नावे कोरुन ती विद्रूप करणे, बाहतुकीचे नियम न पाळणे अशा सवयी कशातून जन्माला आल्या असाव्यात?

अरुण मनोहर's picture

12 Dec 2010 - 6:35 am | अरुण मनोहर

........> अशा सवयी कशातून जन्माला आल्या असाव्यात?

मला वाटते, टोकाच्या स्वार्थी आणि आत्मकेंद्री भुमिकेतून ह्या सगळ्या सवयी जन्माला आल्या आहेत.

गांधीवादी's picture

12 Dec 2010 - 8:51 am | गांधीवादी

>>खाजगी मालमत्तेचा सार्वजनिक वापर करणे,
नक्की काय म्हणायचे आहे, ते समजले नाही. कृपया स्पष्ट करून सांगाल काय ?

बाकी सर्व सवयी ह्या 'बेशिस्तपणा' यातून जन्माला आलेल्या आहेते. यांना शिस्त कोण लावणार ?
दुर्दैवाने शिस्त लावण्याची जबाबदारी असणारेच आज बेशिस्तीने वागतात. मग बेशिस्तपणा हा वरून खाली, कि खालून वर ह्या चर्चा झाडत राहतात.

कारणे :
पण रस्त्यावर पान-गुटखा-तंबाखू खाऊन थुंकणे,
मानसिक रोग, गुंड प्रवृत्ती, थुंकण्यासाठी जागाच नसणे.

रस्त्याच्या कडेला प्रातर्विधी करणे,
प्रातविधी करण्याची पुरेशी सोय नसणे

कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या कुठेही भिरकावणे,
कचरापेटीची पुरेशी सोय नसणे.

खाजगी मालमत्तेचा सार्वजनिक वापर करणे,

समजले नाही.

कुणाच्याही बागेतली फुले, फळे बिनदिक्कतपणे तोडणे,

धर्मांधपणा, आणि मुलांना फळे तोडण्यासाठी शहरात फळझाडेच अस्तित्वात नसणे.

ऐतिहासिक स्थळांवर आपली नावे कोरुन ती विद्रूप करणे,
ऐतिहासिक संवर्धन खात्याची वरून वाहवत आलेली उदासीनता.

बाहतुकीचे नियम न पाळणे.
या बद्दल काय बोलणार ? नियम पाळणारे कुचेष्टेचा विषय ठरतात. वाहतूक व्यवस्थेच्या बोजावार्यानंतर याचे महत्वच उरले नाही. चुकून पकडले गेलोच तर काय ३०-५० रुपये देऊन सुटता येतेच कि, अशी मनोधारणा निर्माण होणे.

बाकी सर्व सवयी ह्या 'बेशिस्तपणा' यातून जन्माला आलेल्या आहेते. यांना शिस्त कोण लावणार ?
दुर्दैवाने शिस्त लावण्याची जबाबदारी असणारेच आज बेशिस्तीने वागतात. मग बेशिस्तपणा हा वरून खाली, कि खालून वर ह्या चर्चा झाडत राहतात.

प्रत्येकाने स्वतःपासुन सुरवात करावी. आपण शिस्त पाळतो की नाही एव्ह्ढे प्रथम पहावे.

कारणे :
पण रस्त्यावर पान-गुटखा-तंबाखू खाऊन थुंकणे,
मानसिक रोग, गुंड प्रवृत्ती, थुंकण्यासाठी जागाच नसणे.
मानसिक रोग, गुंड प्रवृत्ती आणि कायद्याची भिती न वाट्णे हे महत्वाचे घटक आहेत. परदेशात गेल्यावर व्यवस्थीत वागतात. येथे परत आल्यावर का असे वागतात? कित्येकदा रस्त्यात बघतो की A/C कारमधुन जाणारे चालु गाडीचे दार उधडतात आणि पचकन थुंकुन दार बंद करतात. ह्याला काय म्हणायचे.

रस्त्याच्या कडेला प्रातर्विधी करणे,
प्रातविधी करण्याची पुरेशी सोय नसणे
फक्त एव्हढेच कारण नाही. बेफीरीकी हेसुध्दा कारण आहे. पोरबाळे सार्वजनीक स्वच्छतालयात गेल्यास तेथे सफाई करायला लागेल म्हणून त्यांना रस्त्यावर बसवणारे कितीतरी महाभाग असतात.

कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या कुठेही भिरकावणे,
कचरापेटीची पुरेशी सोय नसणे.
पुन्हा तेच. ९० %चे वर बेफीकीरी हे कारण आहे

खाजगी मालमत्तेचा सार्वजनिक वापर करणे,
समजले नाही.
उदा. "वाहनतळाच्या जागेचा वापर व्यावसाईक कारणासाठी करणे"

कुणाच्याही बागेतली फुले, फळे बिनदिक्कतपणे तोडणे,
धर्मांधपणा, आणि मुलांना फळे तोडण्यासाठी शहरात फळझाडेच अस्तित्वात नसणे.
हॅ हॅ हॅ. विनोदी आहात भौ तुम्ही.शहरात फळझाडेच अस्तित्वात नसतील पण मार्केटमधे मिळतात फुले आणि फळे. फुकटेगिरी हे कारण आहे.

ऐतिहासिक स्थळांवर आपली नावे कोरुन ती विद्रूप करणे,
ऐतिहासिक संवर्धन खात्याची वरून वाहवत आलेली उदासीनता.

बाहतुकीचे नियम न पाळणे.
या बद्दल काय बोलणार ? नियम पाळणारे कुचेष्टेचा विषय ठरतात. वाहतूक व्यवस्थेच्या बोजावार्यानंतर याचे महत्वच उरले नाही. चुकून पकडले गेलोच तर काय ३०-५० रुपये देऊन सुटता येतेच कि, अशी मनोधारणा निर्माण होणे.
पहील्यांदा लिहीले आहे तेच पुन्हा लिहीतो. प्रत्येकाने स्वतःपासुन सुरवात करावी. आपण शिस्त पाळतो की नाही एव्ह्ढे प्रथम पहावे.

डोक्यात तिडीक जाणारी, गलीच्छ सवय म्हणजे गर्दीत महीलांच्या अंगचटीस जाणे, गैरफायदा घेणे. याबद्दल ज्या भावना आणि जो राग आहे तो केवळ शब्दातीत आहे.
मान्य ही विकृती , कर्करोगाप्रमाणे वाढलेल्या बेसुमार लोक्संख्येचे अपत्य आहे. पण न्यू यॉर्क मध्येदेखील अशीच गर्दी असूनही , अशी गलीच्छ सवय आढळली नाही.
भारतातच का हा विद्रूपपणा आहे ते कळत नाही. आणि मग आपल्या संस्क्रुतीचे गोडवे गाण्यास वर आपण मोकळे.

ए.चंद्रशेखर's picture

12 Dec 2010 - 9:12 am | ए.चंद्रशेखर

शुचि ज्या विकृती बद्दल बोलत आहेत ती साधारण अशा समाजांच्यात जास्त प्रमाणात आढळून येते जेथे सार्वजनिक ठिकाणी स्त्री व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेल्या असतात. स्त्री व पुरुष यांचे जितके Segregation केले जाते त्या प्रमाणात या विकृती जास्त दिसतात. घरात बहिण भाऊ किंवा इतर नातेवाईक यांच्यातले स्त्री पुरुष कितीतरी मोकळेपणाने वावरत असतात. त्याच प्रकारचा मोकळेपणा जर स्त्री पुरुषांमधे सार्वजनिक ठिकाणी दिला गेला तर अशा विकृती कमी दिसतात. अर्थात काही मनोरुग्ण अशा विकृतीने पछाडलेले सगळीकडेच दिसतात. त्यांच्यावर उपचार किंवा कडक शासन हे होणेही आवश्यक असते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Dec 2010 - 3:35 pm | निनाद मुक्काम प...

@मान्य ही विकृती , कर्करोगाप्रमाणे वाढलेल्या बेसुमार लोक्संख्येचे अपत्य आहे.
अमान्य .तुमच्या पुढच्या वाक्यातून स्पष्ट झाले आहे कि परदेशात हे अनुभव येत नाहीत .
हे खरे आहे .ह्याचे कारण भारतातील बहुसंख्य जनता हि आपल्या तारुण्यातून वार्धक्याचा प्रवासात आपल्या नैसर्गिक भावनांचे शमन कसे करावे मुळात ते करावे का ?
ह्या संबंधी साशंक आसते .त्यातून हि विकृती जन्माला येते (येथे शतकांपासून चालत असलेली पुरुषप्रधान संस्कृती व महिलेस दुर्गा वगैरे लेखनात ठीक आहे ( पण प्रत्यक्ष जीवनात मादी ह्यापुढे सहसा कोणी पाहत नाही . )
रेल्वे किंवा बस मध्ये चिमटे काढणे वैगेरे प्रकार पण सरार्स होतात .तेव्हा योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टींबद्दल मोकळी चर्चा हि समाजात घडली पाहिजे .नाही तर छोटा व मोठा पडदा माणसाची भूक चाळवून माणसातील श्वापद व वखवख नेमकीच जागृत राहील ह्याची कटाक्षाने दक्षता घेतो .
(लंडनला आमचे एक कलीग (भारतीय ) चक्षु मोदन मध्ये तरबेज पण मेट्रोतून परत घरी येतांना एकदा भर गर्दीत (संध्याकाळी काही तास गाड्यांना तुडूंब गर्दी असते ) इधून धक्का व तिथून धक्का असे प्रकार करत असतात .
एक कोपर्यात सावज टप्यात आले म्हणून दबा धरून बसला .शेवटी काही वेळा नंतर ती गौरागना त्याला म्हणाली
झाले तुझे ? माझा स्टोप येतोय .मी उतरू का ?
साहेब मग गोरे मोरे झाले

शैलेन्द्र's picture

12 Dec 2010 - 3:44 pm | शैलेन्द्र

"डोक्यात तिडीक जाणारी, गलीच्छ सवय म्हणजे गर्दीत महीलांच्या अंगचटीस जाणे, गैरफायदा घेणे. याबद्दल ज्या भावना आणि जो राग आहे तो केवळ शब्दातीत आहे."

अगदी मान्य.. पण यावर एकच उपाय आहे.. त्या महीलेने सरळ दणदणीत आवाजात त्या माणसाला शिव्या घालायच्या.. उरलेला काम गर्दी आपोआप करते.

पण हल्लि दुसरा प्रकारही पाहिलाय, बर्‍याच महीला गर्दीत सरळ धक्काबुक्कि करत पुढे घुसतात, पुरुषांचा जो उद्देश असतो तोच त्यांचा असतो अस अजिबात नाही पण आपण धक्के मारले तरी समोरुन उत्तर येणार नाही याची खात्री असते आणी त्याचा गैरफायदा घेतला जातो.

प्रसन्न केसकर's picture

13 Dec 2010 - 6:44 pm | प्रसन्न केसकर

डोक्यात तिडीक जाणारी, गलीच्छ सवय म्हणजे गर्दीत महीलांच्या अंगचटीस जाणे, गैरफायदा घेणे. याबद्दल ज्या भावना आणि जो राग आहे तो केवळ शब्दातीत आहे.
संपुर्ण सहमत!
न्यू यॉर्क मध्येदेखील अशीच गर्दी असूनही , अशी गलीच्छ सवय आढळली नाही.

हा! हा! हा!
एन वाय पी डी चे (गेला बाजार कुठल्याही एल पी डी चे, एफ बी आय चे किंवा कौंटी पोलिसचे) क्राईम रजिस्ट्रेशन ‍रेकॉर्ड तपासा एकदा.
हा किळसवाणा प्रकार जगभर सगळीकडेच चालतो. तुम्ही कुठल्या समाजघटकांमधे वावरता त्यावर प्रमाण अवलंबुन असते व हा वावर अनेकदा भौगोलिक परिस्थितीवर अवलंबुन असतो.
अमेरिकेतला एकुणच क्राईम रेट, क्राईम डिस्पोजल रेशियो हा अमेरिकेत देखील चिंतेचा विषय आहे. तिथल्यापेक्षा इंग्लंडमधे पोलिस खाते अधिक सजग आहे असे समजले जाते. पण अमेरिकेत गेल्या १५-२० वर्षात स्कुल लेव्हलला याबाबत बरेच काम सुरु आहे असे तिथले स्थानिक लोक सांगतात. तिथे मुला-मुलींना गुड टच/ बॅड टच यातील फरक ओळखायला शिकविण्याचे आणि स्वसुरक्षिततेसाठी काय करता येईल याचे प्रशिक्षण देण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते कौतुकास्पद आहेत. तसे प्रयत्न इथेही व्हायला हवेत.

नीलकांत's picture

12 Dec 2010 - 11:19 am | नीलकांत

शैलेंद्र तुमचे निरिक्षण आवडले. नगर जिल्ह्याप्रमाणे विदर्भातसुध्दा ताटात हात धुण्याचा प्रकार आहे. लग्नाच्या पंगतीत किंवा भंडारा (म्हणजे एखाद्या प्रसंगी सर्वांनी एकत्र पंगतीत जेवणे) असल्यावर मात्र हात धूण्यासाठी वेगळी जागा असते तेथे जाऊन हात धुवायचे असतात.

मानाच्या जेवणाततर खास भांड्यात हात धुण्याचा प्रकार होतो. मात्र विदर्भात तरी या प्रथेमागे पाण्याची उणीव असावी असे मला वाटत नाही.

तुमच्या लेखाचा दूरसा भाग मला जास्त महत्वाचा वाटला. विशेषत:
जेंव्हा आपण एखादा गुणविषेश एखाद्या समजाला/जातीला चिकटवतो तेंव्हा तो वांशिक नसुन परिस्थीतीजण्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. हल्लि शहरातील बर्‍याचशा एकजीनशी वातावरणात वाढताना, आपले हे गुण विरघळत चाललेत, आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी व्यवसायसाठी योग्य गुण आपण आत्मसात करतोय. त्यामुळे हळुहळु पण निच्छितपणे ज्या गुणांचा आपल्याला अभिमान आहे वा इतरांच्या ज्या सवयींबद्दल आपण नाके मुरडतो, त्या नाहीशा होवुन एक नवा काहीसा एकजीनसी समाज उदयास येणार आहे हे नक्कि.

हा भाग विशेष आवडला.

- नीलकांत

तिमा's picture

12 Dec 2010 - 11:28 am | तिमा

ताटात हात धुणे ही परिस्थितीनुसार चालत आलेली संवय असली तरी परिस्थिती बदलल्यावरही त्यात बदल न करणे हे योग्य नाही. आजुबाजुच्या लोकांना घाण वाटू शकते याची तरी जाण ठेवावी. आजही मी ताटात हात धुतो असे म्हणणारे पंचतारांकित हॉटेलात जेवायला गेल्यावरेही तसेच करतात का ? की त्यावेळेपुरते आजुबाजुच्या परिस्थितीचे भान येते ?

शैलेन्द्र's picture

12 Dec 2010 - 3:14 pm | शैलेन्द्र

परत आपण आपल्या चष्म्यातुन पाहतोय, असं वाटत. कुठे गेल्यावर शक्यतो यजमानांना वावगं वाटेल अस वागु नये हे मान्य, परंतु, बर्‍याचदा चुक आणी बरोबर काय हेच माहीत नसतं.

एक गम्मत सांगतो..

काही महिण्यांपुर्वी चीनमधला पण आता अमेरीकेत असलेला एक शास्त्रज्ञ माझ्या कंपनीच्या वतीने आमच्या काही क्लायंट्ना भेटायला आला होता. त्याला घेवुन मी पुण्यातील एन आय व्ही या प्रसिध्द संस्थेत गेलो. तेथील संचालक व ईतर शास्त्रज्ञांशी आमची खुप छान चर्चा झाली. स्वाईन फ्लु बद्दल काय नाविन संशोधन जगभर होत आहे याबाबत फार छान देवान्घेवाण झाली. संचालकांच्या एका " थॉट प्रोव्हॉकिंग" प्रश्नावर विचार करताना, आमच्या हीरोने नाकात बोट घातले.. डोक्यातील विचारचक्राबरोबरच बोटही फीरु लागले. या मंथनातुन निघालेले अमृत बाहेर काढले गेले. आम्हांला मेल्याहुन मेल्यासारखे झाले, पण आपण काही वावगे करतोय हे त्याच्या गावीही नव्हते. त्याचे मंथन व शास्त्रीय चर्चा एकाच वेळी चालु होती. खरी गम्म्त पुढे झाली, चर्चा संपुन आम्ही जायला निघालो, शेक हॅन्डसाठी हात पुढे केले गेले. निम्मे शास्त्रज्ञ मागच्या मागे गायब झाले. संचालक बिच्चारे, त्याच्या हातात सापडले. शेक हॅन्ड झाल्यावर ते तातडीने बाथरुमकडे का पळाले ते त्याला बहुदा कळलच नसाव.

अस्साच प्रकार मी बर्‍याच युरोपियन पाहुण्यांबद्द्ल पाहिलाय. बंद एसी गाडीत, काही गहन चर्चा चालु असताना ही मंडळी अधो-जठरवायुची सुरेल सुरावट छेडुन जातात. आपण कानकोंडले होवुन गप्प राहतो पण जर त्यांचा एखादा तिकडुन आलेला साथीदार असेल, तर तो सदर सुरावट कशी कणसुर होती व योग्य तान कशी असावी हे स्वता: दाखवतो.

मोराल ऑफ स्टोरी, वेगवेगळ्या समाजात याबाबत वेगवेगळ्या समज-कल्पना आहेत, शक्यतो समोरील व्यक्तीच्या भावनांचा आदर करावा. पण एखादी व्यक्ती जर आपल्या कल्पनांच्या/समजाच्या पलीकडे वागत तर त्यावरुन त्या व्यक्तीबाबत वा संपुर्ण समाजाबाबत काही मत बनवणे चुकीचे आहे.

नितिन थत्ते's picture

12 Dec 2010 - 9:48 pm | नितिन थत्ते

>>पंचतारांकित हॉटेलात जेवायला गेल्यावरेही तसेच करतात का ?

आँ?

पंचतारांकित हाटेलात तर आम्ही ताटातच (आपलं.... वाटीतच) हात धुतो.... लिंबू पिळून !!!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 Dec 2010 - 11:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे

या प्रतिसादाला माझ्यातर्फे "प्रतिसाद ऑफ द मंथ" हे बक्षीस देण्यात येत आहे.

पंगा's picture

13 Dec 2010 - 3:56 am | पंगा

पंचतारांकित हाटेलात तर आम्ही ताटातच (आपलं.... वाटीतच) हात धुतो.... लिंबू पिळून !!!!

ही वाटीत (फिंगरबोलात) लिंबू पिळून हात धुण्याची पद्धत बहुधा खास ब्रिटिश असावी (म्हणजे ब्रिटनबाहेर - युरोपातसुद्धा - फारशी माहीत किंवा प्रचलित नसावी), असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

यावरून एक जुनी ष्टोरी आठवली. ष्टोरी ऐकीव आहे, आणि (अशा आख्यायिकांच्या प्रथेस अनुसरून) तिच्या अनेक आवृत्त्या आहेत. मात्र आवृत्तीप्रमाणे / सांगणार्‍याप्रमाणे फक्त ब्रिटिश राणी आणि तिचे पाहुणे बदलतात (ही ष्टोरी कधी व्हिक्टोरियाच्या तर कधी दुसर्‍या एलिझाबेथच्या नावावर खपवली जाते, आणि तिचा पाहुणा हा कधी जर्मनीचा राजा, कधी इराणचा शहा तर कधी इतर कोणी - एखादा आशियाई नाहीतर आफ्रिकी राष्ट्रप्रमुख - असतो; नेमकी घटना कोणाच्या बाबतीत घडली याबद्दल खात्रीलायक माहिती मिळू शकली नाही.), पण ष्टोरीचा गाभा अबाधित राहतो, तेव्हा कोणाच्याही नावे गोड मानून घ्यावी, ही विनंती. (नेमके तपशील कोणी पुरवू शकल्यास ऋणी राहीन.)

तर त्याचे असे झाले, की इंग्लंडला भेट देणार्‍या कोण्या परकीय राजप्रमुखांकरिता बकिंगहॅम पॅलेसमध्ये शाही खाना होता. खान्याशेवटी प्रथेनुसार फिंगरबोल आले. प्रमुख पाहुण्यांना हा काय प्रकार आहे याची (अर्थातच) कल्पना नव्हती. तरीसुद्धा बहुधा 'मुखशुद्धी अथवा पाचकासारखा काहीतरी प्रकार असावा' अशा समजुतीने प्रमुख पाहुणेमजकुरांनी ते लिंबू त्या गरम पाण्यात पिळले, आणि शांतपणे त्याचे घुटके घेऊ लागले.

झाले. उपस्थित ब्रिटिश पाहुणेमंडळी / दरबारीजन वगैरे जे उपस्थित होते, ते झाला प्रकार पाहून हतबुद्ध! (म्हणजे, एकीकडे 'कसला येडा माणूस आहे हा!' हा अशा प्रसंगी इंग्रजसुलभ भाव, पण दुसरीकडे परकीय राजप्रमुख आहे, त्यात सरकारी पाहुणा आहे, त्यामुळे व्यक्तसुद्धा करता येत नाही!) पण राणीने प्रसंगावधान राखले, आणि स्वतःच्या फिंगरबोलात आपले लिंबू पिळून त्याचे शांतपणे प्राशन करू लागली. मग इतरेजनांनीही ते पाहून राणीचे अनुकरण केले, आणि प्रमुख पाहुणेमजकुरांस आपली चूक लक्षातही न येऊन त्यांची गोची (embarrassment) टळली.

चिंतामणी's picture

13 Dec 2010 - 10:11 am | चिंतामणी

पंचतारांकित हाटेलात तर आम्ही ताटातच (आपलं.... वाटीतच) हात धुतो.... लिंबू पिळून !!!!

ही वाटीत (फिंगरबोलात) लिंबू पिळून हात धुण्याची पद्धत बहुधा खास ब्रिटिश असावी (म्हणजे ब्रिटनबाहेर - युरोपातसुद्धा - फारशी माहीत किंवा प्रचलित नसावी), असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

निनाद यात तज्ञ आहे. त्याच्या उत्तराची अपेक्षा करतो.strong>

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Dec 2010 - 7:34 pm | निनाद मुक्काम प...

अर्थात ह्या प्रथेचे प्रयोजन म्हणजे पूर्वी भयंकर थंडी असायची युरोपात व हिटर वैगैरे नसायचे त्यामुळे दिवाणखाना व शाय्यागृह येथे लाकडे कोपर्यातील चिमणीत पेटवून खोली उबदार करत. त्यामुळे जेवण झाल्यावर थंडीत बाहेर जाऊन हात धुण्यापेक्षा अमीर उमराव ह्यांनी हि शक्कल लढवली .बाकी दंतकथा माझ्या परिचयाची नाही .सध्यातरी युरोपात अमेरिकन प्री प्लेटेड सर्विस चा जमाना आहे त्यामुळे अश्या अनेक गोष्टीना फाटा दिला आहे .पण खूप ठिकाणी सुगंधित पाण्यात भिजलेला कापडाचा बोळा खुपदा दिला जातो .
एखाद्या देशाची संस्कृती हि त्यांचे राहणीमान व खानपान व सार्वजनिक शिष्टाचार ह्यांनी ओळखली जाते . व अर्थात भाषा. पण हे सर्व घडण्यात कारणीभूत ठरते. ते तिथले हवामान ऋतू व त्याचा वर्षातील मुक्काम उदा भारतात ३ ऋतू तर युरोपात २ पाऊस १२ महिन्यात कधीही पडतो ( फ्रांक फुट मध्ये हिवाळ्याच्या आधी दिवसभर पडायचा . ह्यामुळेच सुती कपडे व उबदार कपडे असा फरक दिसून येतो .सुजलाम सुफलाम भारतात १२ महिने शाकाहार करायची चैन भारतीय करू शकतात युरोपात पूर्वी वर्षाचा फार मोठा काळ बर्फात असायचा .झाडे स्ट्रिप करायची आपली पाने .त्यामुळे अभक्ष भक्षण करण्याशिवाय पर्याय नाही. बर मसाले नसल्याने बेचव अन्न पोटात ढकलण्यासाठी वारुणी हवी .(थंड हवेत तर अत्यावश्यक म्हणजे हिमवर्षावात काही काळ फिरल्यावर आपली हाताची बोटे आपण हलवू शकत नाहीत इतक्या गोठणाऱ्या थंडीबद्दल बोलतोय )
थंडीत एकूणच शरीराची हालचाल कमी त्यामुळे ओठांची सुध्धा (म्हणजे बोली भाषा बोलताना शकयतो ओठ कमी हलवून तोंडातल्या तोंडता बोलायचे. .उगाच नाही भारतीय इंग्लिश उच्चार सर्वात स्पष्ट मानले जातात जगात )
त्यामुळे जागतीकारणात सर्व जग जवळ येत असल्याने ज्या देशाने प्रगती केली असे वेस्टन वल्ड आपल्यावर त्यांची संस्कृती जाणते अजाणते पणी लादणार. (लंडन ला बिर्याणी भारतीय उपहार गृहात खातांना काटे चमचे देतात .) तुम्ही हाताने खाता व धुता? असा कुत्सित प्रश्न विचारल्यावर जेव्हा कागद नव्हता तेव्हा तुम्ही कशाने खायचा व धुवायचा? असा मीच त्यांना प्रतिप्रश्न करतो.आम्ही उलट फालतू गोष्टींसाठी कागद वापरत नाहीत .उगाच नाही आमची संस्कृती इको फ्रेडली म्हणतात . .( बाकी जेव्हा कागद नसेल तेव्हा म्हणजे ट्रेकिंग किंवा आडरानात तेव्हा तुम्ही काय करतात .(एक साधा बाळबोध प्रश्न ) व उजव्या व डाव्या हाताचा उपयोग समजून सांगतो. भारतात उजव्या हाताने जेवतात हे त्यांना माहित नसते .अर्थात त्यांचे गैरसमज त्यांच्याशी संवाद साधल्या शिवाय दूर करता येणे शक्य नाही .(जपान आपल्याला पूर्वी वॉशिंग मशीन विकायचे तेव्हा त्यावर सूचना जपानी भाषेत असतात .कोकाकोला जेव्हा आखतात विकतात तेव्हा त्यावर अरबी भाषेत लिहिले असते .आपण हिंदीत लिहायचा आग्रह धरत नाही (मुळात हिंदीच का असा वाद नको म्हणून सर्वाना परकी अशी इंग्लिश भाषा आपण सोयीची मानतो .) मतितार्थ आपल्या येथे आपले रीतभात पाळावे त्याचा प्रचार करावा .पण जेव्हा आपण परक्या ठिकाणी जातो तेथे त्यांचे रीतीभात पाळले म्हणून काही धर्म बुडत नाही .थोडक्यात काय गंगा जाये तो गंगादास /जमुना गये तो जमुना दास .टोपीकर भारतात आले तेव्हा व्यापरी होते सैदैव मना झुकून व्यापरी सवलती मागत .(डोळ्यासमोर आणा शिवरायांच्या राज्याभिषेकाचे चित्र जे घरोघरी असते व मन झुकाव्लेला टोपीकर .मात्र ते राज्येकर्ते झाल्यावर राव बहाद्दूर व अश्या अनेक पद्वांसाठी त्यांचे उंबरठे झिजवणारे आपले देशी साहेब ) आजही मलबार हिल वाळकेश्वर येथील लोक अशुध्द फ्रेच भाषेचा वारेमाप उपयोग रोजो बोलीभाषेत करतात .गालाला गाल घासतात .पण जपानी आजही अभिनंदन करताना पुरपणे झुकतो (अर्थात पैसा फायनान्स करणे हे त्यांचे मुख्य काम असल्याने जग त्यांच्यापुढे झुकते )नाही म्हणायला हिरेव्यापारी मात्र जय श्री कृष्ण म्हणतात .

चिंतामणी's picture

15 Dec 2010 - 12:30 am | चिंतामणी

सॉलीड सॉरी शॉल्लीड.

तुम्ही हाताने खाता व धुता? असा कुत्सित प्रश्न विचारल्यावर जेव्हा कागद नव्हता तेव्हा तुम्ही कशाने खायचा व धुवायचा? असा मीच त्यांना प्रतिप्रश्न करतो.आम्ही उलट फालतू गोष्टींसाठी कागद वापरत नाहीत .उगाच नाही आमची संस्कृती इको फ्रेडली म्हणतात . .


हे म्हणजे विजयी षटकार म्हण किंवा (तुझ्या भाषेत) "चेरी ऑन क्रीम" म्हण
.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Dec 2010 - 1:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> तुम्ही हाताने खाता व धुता? <<
मला वाटलं होतं की पाण्याने धुवायची पद्धत आहे. असो. चालायचंच!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Dec 2010 - 3:19 am | निनाद मुक्काम प...

हो पण हातचा त्वचेची अजिबात संपर्क होत नाही का ? पाण्यासाठी डावा हात वापरतो ना ?
बाकी आपली कडे उजवा हात खाण्याचा व डावा धुण्याचा म्हणायची पद्धत आहे .गावात धुण्या अंगाला वळा असा विनोद बिचुकले गावचे रहिवाशी मकरंद अनासपुरे ह्यांनी केला नव्हता का ?(गावात तसे बोलायची पध्धत असते .आपल्या सारख्या शहरी भागातील लोक विनीद समजून हसतात .) बाकी त्या मधील सकाळ दुपार सकाळ दुपार हि त्यांची आरती मस्तच होती .

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Dec 2010 - 3:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> पाण्यासाठी डावा हात वापरतो ना ? <<
कागदात आर्टीफिशियल इंटेलिजन्स अजूनतरी या लोकांनी भरलेला नाही, कागदसुद्धा हातातच घ्यावा लागतो. आणि अजूनतरी वॉलमार्ट, टेस्को, ऑल्डीमधे कागदांसाठीचा लांब दांड्याचा ब्रश पाहिलेला नाही.

हातावर पाण्याचे रेणू असतात ... प्रत्यक्ष संपर्क होत नाही! :-)

पाणी आणि कागद वापरणार्‍यांमधे "डावं-उजवं" करायचं आहे म्हणून असं नाही पण निनाद, तुम्ही दिलेल्या लॉजिकमधे चूक काढणं सहज शक्य आहे. कागदाआधी सगळेच पाणी वापरायचे, मग प्रगतीच्या एका टप्प्यावर कागद वापरायला सुरूवात झाली, अशा प्रकारचं आर्ग्युमेंट करणं अगदीच सोपं आहे.

मुळात मला प्रश्न असा आहे की प्रातर्विधीनंतरची स्वच्छता कशी करतात यावरून माणसांमधला उच्च-नीचपणा ठरवणार्‍यांची बुद्धीची क्षमता किती? युरोपात राहून गोर्‍यांना टाळणं शक्य नाही आणि अशा प्रकारचे वादही होत रहाणार! "आमचीच संस्कृती श्रेष्ठ आणि गोरे सगळे असंस्कृत" म्हणणारे भारतीय आणि कागद-पाण्यावरून श्रेष्ठ-कनिष्ठता ठरवणारे, माझ्या लेखी एकाच पातळीवर आहेत.

गमतीजमतीत यावरून मलाही बरंच पिडायचा प्रयत्न झाला आणि मी तो हसण्यावारी सोडूनही दिला. (मी ही काही कमी नाही, गोर्‍यांच्या पिण्यावरून, तीन बोटांनी पोळीचे तुकडे न करता येण्यावरून, बाटली, ग्लासातून पाणी 'वरून' पिता न येण्यावरून मी बरीच टिंगल करायचे.) उगाच कोणी पिडायला लागल्यावर सरळ बौद्धीक क्षमतेवरच टिप्पणी केली, त्यापुढे माझ्यावर अशा प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ परतपरत आली नाही.

अवांतरः भारतीयांचे इंग्लिशचे उच्चार सर्वात स्पष्ट हे (भारतीय सोडून) कोण मानतं? अनेक तेलुगु लोकांशी बोलताना मला हे लोकं नक्की कोणती भाषा बोलताहेत हा प्रश्न पडतो. अनेक मराठी लोकांचं इंग्लिश ऐकून हाच प्रश्न पडतो, पण मराठीही येतं त्यामुळे बोलणं समजतं, तेलुगु, तमिळ भाषिक लोकांचं समजत नाही हाच काय तो फरक!* कितीतरी इंग्लिश मातृभाषा/पितृभाषा असणार्‍या लोकांना अनेक भारतीयांचे उच्चार समजत नाहीत. कॉल सेंटरमधे नोकरी करणार्‍यांना फक्त इंग्लिश भाषेतल्या औपचारिकतेचेच नाही तर उच्चारांचेही धडे गिरवावे लागतात. "स्पष्ट" बोलत असते तर हे धडे नक्कीच गिरवावे लागले नसते.

*बंगाली लोकांच्या इंग्लिशवर आमच्या हापिसात भरपूर जोक्स होतात. आमच्याइथे एकदा SERC (उच्चारी: सर्क) स्कूल होतं. तर एक बंगाली माणूस दुसर्‍या बंगाल्याला सांगेल, "आमच्याकडे शार्क स्कूल आहे." आणि त्यावर सगळे बंगाली आपल्याला शार्क खायला मिळेल या आशेवर रहातील.

अतिअवांतरः मी इंग्लंडात शिकते आहे (तेव्हा शिकत होते**) हे ऐकून एकदा एक आजोबांनी माझा फारच पिच्छा पुरवला होता; का, तर म्हणे, आख्ख्या 'हिंदुस्थानात' (म्हणजे नक्की काय कोण जाणे?) मराठी लोकांचंच इंग्लिशच सगळ्यात चांगलं असतं, हे माझ्या तोंडून वदवून घेण्यासाठी!

अतिअतिअवांतरः ज्या भारतीय व्यक्तीचं इंग्लिश ऐकून तिची मातृभाषा कोणती हे पटकन कळत नाही त्यांचं इंग्लिश (व्याकरण आणि शब्दसंपदा) साधारणतः चांगलं असतं.

**क्षीण प्रयत्न! ;-)

प्रदीप's picture

15 Dec 2010 - 9:18 am | प्रदीप

अगदी नेमके लिहीले आहेस.

शैलेन्द्र's picture

15 Dec 2010 - 4:39 pm | शैलेन्द्र

मुळात जैवीक दृष्ट्या शरीरातील वरचे व खालचे द्वार यांच्या बॅक्टेरीअल व इतर काऊंटमधे फारसा फरक नसतो. आपली मानसीकता बाजुला ठेवली तर थुंकी ही शरीरातील इतर दोन स्त्रावांपेक्षा (मल व मुत्र) जास्त उपद्रवकारक आहे. आपल्या तोंडात जितके जिवाणु सापडतात तितके गुदद्वार व मुत्रद्वारात सापडत नाही. परंतु मल व मुत्र यांच्या उत्सर्जनाचे प्रमाण जास्त असल्याने, आधिक खबरदारी घ्यावी लागते.

कोण कुठल्या हाताने धुतो/पुसतो व त्यासाठी काय वापरतो यावरुन संस्कृती ठरवायची झाल्यास मामला कठीण होइल.

मोरारजींना कुठे बसवाल?

शिल्पा ब's picture

16 Dec 2010 - 2:27 am | शिल्पा ब

<<<मोरारजींना कुठे बसवाल?

आमच्यापासुन बरंच लांब ..

शैलेन्द्र's picture

16 Dec 2010 - 11:29 pm | शैलेन्द्र

अय्या, तुमच्याकडे फार्मविलेमधे ती पण सोय आहे?

शिल्पा ब's picture

16 Dec 2010 - 11:38 pm | शिल्पा ब

अर्थातच...ती काय पंगत ए का, सगळ्यांनी बाजूबाजूला बसून हसत खेळत एन्जोय करायची?

शैलेन्द्र's picture

16 Dec 2010 - 11:46 pm | शैलेन्द्र

हॅ, अगदीच नवख्या आहात तुम्ही,

यार आपणे इसका मजा शायद लियाही नही..

सर्वो सुपरच्या १ लिटरच्या डब्याने सांधलेले नाते फार गहीरे असतात..

प्रदीप's picture

15 Dec 2010 - 9:06 am | प्रदीप

प्रश्न होता फिंगरबाऊलची प्रथा इंग्लंडात(च) का आहे ?

सध्यातरी युरोपात अमेरिकन प्री प्लेटेड सर्विस चा जमाना आहे त्यामुळे अश्या अनेक गोष्टीना फाटा दिला आहे

हे थोडक्यात उत्तर आहे. आणी मी जे वर लिहीले आहे की मी कुठल्यही ब्रिट रेस्टॉरंटात असे काहीही पाहिलेले नाही, त्याच्याशी जुळते आहे. अशी प्रथा तिथे मुळात होती व ती तशी का होती ह्याविषयी तुम्ही जे लिहीले आहे ते नुसते तुमचे अंदाज की माहिती? असे विचारतोय ह्याला दोन कारणे आहेत-- (१) हे हिवाळ्ञात बाहेर जाणे कठीण वगैरे नुसते ब्रिटनपुरतेच मर्यादित नसावे, कारण तितकीच, किंबहुना त्याहीपेक्षा कडक थंडी युरोपात, कॅनडा वगैरे देशात पडत होती व आहे. (२) ब्रिटस हे अगदी काँजर्व्हेटिव्ह म्हणून सुप्रसिद्ध आहेत, आपल्या प्रथांची ते खूपच प्राणपणाने जपणूक करतात. त्याची अनेक उदाहरणे देता येतील. तर मग ही एकच प्रथा त्यांना का घालवावीशी वाटावी?

तुम्ही सुगंधी पाण्यात भिजवलेल कापडाचा 'बोळा' दिला जातो (हल्ली!) असा उल्लेख केला आहे. तो खरे तर 'बोळा' नसून रोल असतो. आणि त्याचे प्रयोजन चेहरा पुसून फ्रेश व्हावे हा असतो, (खरकटे) हात पुसण्यासाठी नव्हे.

इंग्लंडच्या राणीच्या दंतकथा मी वाचल्या आहेत, त्याअर्थी तिच्याकडील मेजवानीत हे करत असावेत. माझा अंदाज असा की वेस्टर्न स्टाईलने नीट खाता न येणारे अनेक देशोदेशींचे पाहुणे त्यांच्याकडे आल्यावर कधीकधी त्या पाहुण्यांची पंचाईत होत असावी, हात खरकटे होत असावेत व ते कुठेतरी (बहुधा टेबलक्लॉथलाच हळ्ळूच) पुसले जात असावेत. हे अनुभवल्यावर केव्हातरी राजवाड्याच्या मेजवानीसंबंधित कुणाच्यातरी डोक्यातून ही शक्कल निघाली असावी.

बाकी तुमच्या वरील व इतरही अनेक प्रतिसादांतून तुम्ही ज्या लोकांत, देशांत रहात आहात त्यांच्या संस्कृतिवीषयी, तेथील चालीरितींविषयी जी काही टिप्पणी तुम्ही करीत आहात, त्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करतो. स्तवःच्या चालीरितींवीषयी व संस्कृतीबद्दल रास्त अभिमान असावा, दुराभिमान नव्हे.

प्रदीप's picture

13 Dec 2010 - 12:39 pm | प्रदीप

ही स्टोरी मीही वाचली होती, त्यात सध्याची राणी व गडाफी अशी पात्रे होती.

मी कुठल्याही ब्रिट रेस्टॉरंटमधे फिंगरबाउल दिलेले अनुभवले/पाहिलेले नाही. भारतीय रेस्टॉरंटात मात्र ही प्रथा आहे.

चिगो's picture

12 Dec 2010 - 12:15 pm | चिगो

<em>जेंव्हा आपण एखादा गुणविषेश एखाद्या समजाला/जातीला चिकटवतो तेंव्हा तो वांशिक नसुन परिस्थीतीजण्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे.

पटलं..

बाकी श्री. सन्जोप राव म्हणतात त्यातील...

<em>पण रस्त्यावर पान-गुटखा-तंबाखू खाऊन थुंकणे>
मलाही ह्याची प्रचंड चीड आहे मात्र ह्यातही परिस्थितीचा भाग आहे असं मला वाटतं. आपल्याकडे पान-सुपारी द्यायची पध्दत आहे. आसाममधे "तामुल भक्षण" हा समाज-संस्कृतीचा भागच आहे. मग खाऊन झाल्यावर थुंकणार कुठे? तर जिथे मिळेल तिथे.. सार्वजनिक स्वच्छतेबद्दलची उदासिनता हेही महत्त्वाचे कारण..

रस्त्याच्या कडेला प्रातर्विधी करणे
सोय-सुविधांचा अभाव आणि सार्वजनिक स्वच्छतेबद्दलची उदासिनता

<em>कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या कुठेही भिरकावणे

वरील प्रमाणेच

खाजगी मालमत्तेचा सार्वजनिक वापर करणे, कुणाच्याही बागेतली फुले, फळे बिनदिक्कतपणे तोडणे,
आपलाच माल असल्याची उद्दाम, बेमुर्वत वृत्ती... कित्येकदा संबंधीत मालकाला बंध घालण्यात आलेलं अपयश

ऐतिहासिक स्थळांवर आपली नावे कोरुन ती विद्रूप करणे
संस्कृती आणि आपल्या इतिहासाबद्दल असलेली प्रचंड उदासिनता.. अत्यंत आत्मकेंद्री वृत्ती, आणि असे काही केल्यास आपल्याला कुणीही पकडणार नाही ह्याची असलेली खात्री.. (एकदा चारमिनारला भेट देऊन बघा)
अवांतर : माझ्या मते ह्या वृत्तीचा प्रसार करण्याचे कार्य "एक दुजे के लिये" ह्या चित्रपटाने पण केलेय..

वाहतुकीचे नियम न पाळणे
गांधीवादी म्हणतात तसेच..

शिल्पा ब's picture

12 Dec 2010 - 12:23 pm | शिल्पा ब

आपल्याकडे घरात स्वच्छता अन बाहेर घाण असा प्रकार आहे अन त्याला फारसं कोणी आक्षेपही घेत नाही किंवा तसे होऊ नये म्हणून काळजीही घेत नाही....व्यक्ती असो वा शासन.
बाकी शुचिच्या मुद्द्याशी सहमत. असे अतिशय घाणेरडे प्रकार लहान मुलींच्या बाबतीत तर होतातच....बघणारेही काही बोलत नाहीत अन करणारा करत सुटतो...

कृपया ह्याचे कारण काय कोणी सांगु शकेल काय?

शिल्पा ब's picture

12 Dec 2010 - 12:40 pm | शिल्पा ब

वरचे प्रतिसाद वाचा की जरा..

स्पष्टीकरण दिलेले नाही. तरी देखिल त्या मागची कारणे जाणुन घेण्यास मी इच्छुक आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

12 Dec 2010 - 1:14 pm | अविनाशकुलकर्णी

काहि लोकांना मोबाईल कसा वापरावा हे सुद्धा समजत नाहि..
एकदा डोक्तर च्या वेटिंग रुम मधे आम्ही बरेच पेशंट नंबरची वाट पहात बसलो होतो..
तेव्हढ्यात एकाचा मोबाईल वाजला..सामाजिक रित्भात म्हणून चट्कन उठुन बाहेर जावुन संभाषण करणे अपेक्षित होते..पण हे सद गृहस्थ स्वतःच्या घरी असल्या सारखे मोठ मोठ्याने मोबाईल वर गप्पा मारु लागले.....सांगितले तर राग आला......
सार्वजनिक ठिकाणी..शिंका आल्या तर तोंडावर रुमाल धरणे..जांभई आल्यास तोंडावर हाताचा पंजा धरणे..आळस आला तर.विचित्र पद्धतिने आळोखेपिळोखे न देणे..पाद आल्यास बाहेर जावुन त्याचा निचरा करणे..किंवा पाद येणार नाहि असा आहार घेणे..नाकात बोटे न घालणे..खानावळीत तोंड धुताना खाकरे न काढणे..एस टी वा बस मधे मोठ्यानी गप्पा मारत सह प्रवाश्यांच्या झोपेत व विचार शृंखलेत व्यत्यय न आणणे ..बागेत सिनेमा सारखे प्रेम प्रसंग न रंगवणे..ह्या साध्या गोष्टींचे पालन हि लोक करत नाहित व समोर व बाजुस बसलेल्या लोकांचे जिवन कष्ट प्रद करतात..

पर्नल नेने मराठे's picture

12 Dec 2010 - 1:49 pm | पर्नल नेने मराठे

ह्म्म =))

पर्नल नेने मराठे's picture

12 Dec 2010 - 1:15 pm | पर्नल नेने मराठे

माझ्या सवयींमुळे कोणाला त्रास होउ नये हा माझा कटाक्श असतो .
होट्लमधे मी जेवायला गेले तरी टेबल आवरुन ठेवते, वापरलेले टिश्यु उडु नयेत म्हणुन एका ग्लासात भरुन ठेवते.
लोकांकडे जेवायला गेले कि खाली काही सांडणार नाही हि काळजी घेते.
ऑफिसच्या गाडीत / लोकल/ बसेस मध्येही ज्युसच्या बाटल्या, चॉकोलेट रॅपर्स वाटेल तसे टाकत नाही... खाली उतरले की वेस्टबिन मधेच टाकते.

शिल्पा ब's picture

12 Dec 2010 - 1:20 pm | शिल्पा ब

शहाणी माझी बाय गं ती!!
(हा प्रतिसाद खडुस नाही..माझ्याकडुन तरी)

बरीच सुधारणा झालिये की.
पुर्वी यासाठीच तुला कुठ्ठे म्हणुन न्यायची सोय नव्हती.

पर्नल नेने मराठे's picture

12 Dec 2010 - 1:47 pm | पर्नल नेने मराठे

अच्र्त

खरच?
आधी वाचता येईल असा लिहा. तुमच्या टाइपिंग ने डोळ्यांना फार म्हणजे फार त्रास होतो.

विजुभाऊ's picture

13 Dec 2010 - 12:27 pm | विजुभाऊ

खरच?
आधी वाचता येईल असा लिहा. तुमच्या टाइपिंग ने डोळ्यांना फार म्हणजे फार त्रास होतो.

गोगोलमामा
तुमचा जालावरचा अब्य्स क्मी प्ड्तोय. ही चुचु ल्पी आहे.
ती म्राठी भाषेस एक देण्गी आहे

तुम्हच्या बद्दल काकु आम्हाला अभिमान आहे.

पर्नल नेने मराठे's picture

12 Dec 2010 - 1:27 pm | पर्नल नेने मराठे

अय काकु किस्को बोल्ता बे तु :ओ

वेताळ's picture

12 Dec 2010 - 1:30 pm | वेताळ

बर चुचु, तुझ्याबद्दल आम्हाला अभिमान आहे.

पर्नल नेने मराठे's picture

12 Dec 2010 - 1:31 pm | पर्नल नेने मराठे

आता कस ;)

शुचि's picture

12 Dec 2010 - 7:53 pm | शुचि

लहानपणपासूनच बालकांना बाळकडू पाजणे जरूरी असते - की आपाला शक्यतो समोरच्याला त्रास होऊ नये, सन्जोप रावांनी उल्लेख केलेल्या प्रमाणे सार्वजनिक्/खाजगी मालमत्तेची निगा, समोरच्याचा विचार करून वागणे वगैरे वगैरे.

या औपचारीकतांचे भान हे लहान वयातच मुला/मुलींना द्यावयास हवे असे मला वाटते.

>>जेंव्हा आपण एखादा गुणविषेश एखाद्या समजाला/जातीला चिकटवतो तेंव्हा तो वांशिक नसुन परिस्थीतीजण्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे.

ह्या वाक्यान थोडा गोंधळून गेलो. त्याला कारण अशी
१. एखादा गुणविषेश एखादा समाज/ जात स्वतःहून मिरवतो ( इतर कुणी तो चिटकवलेला नसतो) पण तो नेहमीच त्याला शोभेल अस वर्तन करेल असे मात्र नाही.
२. काही गुण/सवयी परिस्थिती जण्य नसून फायद्याच्या व सोयीच्या असतात.
३. परिस्थितीमुळं गुण निर्माण होतात ही अपूर्ण माहीती. गुणांमुळे परीस्थिती बदलते त्याच काय?
ह्यातील प्रत्येकाची ऐतिहासिक तसच तात्कालीक उदाहरणं देता येतील. आणि तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती उदाहरणं देवू शकता. त्यामुळ तुम्ही म्हट्ल्याप्रमाणे कदाचित फक्त वांशिकता नसेल कारन. पण फक्त परिस्थितीन सगळ बनतं हा युक्तीवाद तितकासा ठीक नाही वाटत.

शैलेन्द्र's picture

13 Dec 2010 - 11:26 am | शैलेन्द्र

"ह्यातील प्रत्येकाची ऐतिहासिक तसच तात्कालीक उदाहरणं देता येतील. आणि तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती उदाहरणं देवू शकता."

मनाला लागलं का? हलंक घेत जा हो...

"एखादा गुणविषेश एखादा समाज/ जात स्वतःहून मिरवतो ( इतर कुणी तो चिटकवलेला नसतो) पण तो नेहमीच त्याला शोभेल अस वर्तन करेल असे मात्र नाही."
अख्खा समाज जर तसे वर्तन करत नसेल तर तो दांभीक ठरतो, जर एखादी व्यक्ती तसे करत असेल तर ती अपवाद ठरते. जसे आपण भारतिय आपल्या कौटुंबीक संस्थेबद्दल अभिमान बाळगतो, याचा अर्थ असा नाही की भारतातला प्रत्येक मुलगा श्रावण्बाळ आहे व प्रत्येक स्त्री/ पुरुष एकनिष्ट असतो. पण एक समाज म्हणुन आपण नक्किच इतरांच्यापेक्षा वेगळे आहोत, म्हणुन या मुल्यांचा आपण अभिमान बाळगतो.

"२. काही गुण/सवयी परिस्थिती जण्य नसून फायद्याच्या व सोयीच्या असतात."
काही नाही, सगळ्याच परिस्थीतीजण्य सवयी फायद्याच्या व सोयीच्या असतात.. फायदा व सोय हेच परिस्थीतीजण्य सवयींचे कारण आहे.

"३. परिस्थितीमुळं गुण निर्माण होतात ही अपूर्ण माहीती. गुणांमुळे परीस्थिती बदलते त्याच काय?"
पुर्ण- अपुर्णच्या वादात मला जायचं नाही, पण गुणांमुळे परिस्थीती कि परिस्थीतीमुळे गुण हे कोंबडी-अंडेसारख आहे. म्हणजे बघा.. मारवाडात राहणारा मारवाडी अभाव्ग्रस्त परिस्थीतीमुळे दरीद्री असतो, त्यामुळे तो काटकसरी होतो. म्हणजे बघा, परिस्थीतिमुळे गुण बदलला... मग हा काटकसरी गरिब मारवाडी देशांतर करतो व्यापार करतो व श्रीमंत होतो. म्हणजे गुणामुळे परिस्थीती बदलली, आता श्रीमंत झालेल्या या मारवाड्याची मुले तितकी कंजुष- काटकसरी नसतात, म्हणजे परिस्थीतीमुळे परत गुण... अति उधळी झालेली मारवाड्याची मुले जुगार-सट्टा खेळत सगळ वैभव गमावतात.. परत गुणामुळे परिस्थीती...

जाउद्या... कापुस कोंड्याची गोष्ट आहे...

पण तेवढ उदाहरणांच हलक घेत जा राव...

रन्गराव's picture

13 Dec 2010 - 2:22 pm | रन्गराव

>>मनाला लागलं का? हलंक घेत जा हो...

ह्यावरून तुम्हीच हलक घेतलेल दिसत नाही ;)

>>गुणांमुळे परिस्थीती कि परिस्थीतीमुळे गुण हे कोंबडी-अंडेसारख आहे

एकदम बरोबर! म्हणूनच परिस्थितीजण्य असा निष्कर्श बरोबर ठरत नाही!

>>पण तेवढ उदाहरणांच हलक घेत जा राव...
तुम्हीपण बंधु :)

शैलेन्द्र's picture

13 Dec 2010 - 2:36 pm | शैलेन्द्र

"एकदम बरोबर! म्हणूनच परिस्थितीजण्य असा निष्कर्श बरोबर ठरत नाही!"
मी लेखात ज्याला परीस्थिती म्हणालोय ते मुख्यता: भौगोलीक संदर्भात आहे.. कौटुंबिक नाही.. आणि भौगोलीक परीस्थिती गुणांमुळे सहसा नाही बदलत..

या सर्व प्रतिसादकांमधे केवळ चुचुआज्जीच तेवढी शहाणी आहे.

लेखातल्या परिस्थितिजन्य सवयींवरून आचार्य विनोबा भाव्यांनी दिलेले एक उदाहरण आठवले. हिंदू-मुसलमान सलोखा वाढावा म्हणून आयोजित केल्या गेलेल्या एका कार्यक्रमात दोन्ही धर्मीयांनी एकाच ताटात जेवावे (अरबस्तानातल्या प्रथेप्रमाणे) अशी टूम निघाली. प्रामुख्यानं कोरडं जेवण असणार्‍या मध्यपूर्वेतल्या भोजनाच्या दृष्टीने ते ठीक आहे; मात्र रसभाजी, आमटी असणार्‍या भारतीय जेवणाला त्याच पंगतीत (!) बसवणे हे चुकीचे आहे, हे विनोबांनी त्यांना समजावून दिले.

बाकी परिस्थितिजन्य सवयींचा भाग लक्षात घेतला तरी बर्‍याचदा 'व्हेन इन रोम...'चे तत्त्व पाळणे हे अधिक सयुक्तिक ठरावे.

शैलेन्द्र's picture

13 Dec 2010 - 11:31 am | शैलेन्द्र

छान उदाहरण...

"बाकी परिस्थितिजन्य सवयींचा भाग लक्षात घेतला तरी बर्‍याचदा 'व्हेन इन रोम...'चे तत्त्व पाळणे हे अधिक सयुक्तिक ठरावे."

खरय, फक्त रोमन होण्यासाठी काय काय कराव लागेल व काय कराव लागणार नाही हे माहीत पाहीजे.

एका आफ्रिकी देशाचे अध्यक्ष इंग्लंड्च्या अधिकृत भेटीवर गेले होते. राणीने राजवाड्यात मेजवानी दिली होती, त्यावेळचा प्रसंग होता. संपूर्ण जेवण झाल्यावर खास 'ब्रिटिश शिष्टाचारा'ला अनुसरून 'फिंगर बाऊल' देण्यात आले. मेजवानीला दोन्ही देशांतील मिळून बरीच मान्यवर मंडळी उपस्थित होती. फिंगर बाऊल मधे लिंबाची फोड पाहून त्या आफ्रिकी देशाच्या अध्यक्षांनी ती फोड त्याच बाऊलमधे पिळली आणि ते कोमट 'सरबत' घटाघटा पिऊन टाकले.

हे पाहून 'स्टिफ अप्पर लिप' ब्रिटिश मंडळी अवाकच झाली. पण राणीने पण प्रसंगावधान राखून आपल्या फिंगर बाऊलमधे लिंबू पिळून ते गरम पाणी सहजपणे पिऊन टाकले. मग सर्वांनाच तसेच करावे लागले, आणि 'आफ्रिकन देशाच्या अध्यक्षाच्या औचित्यभंगपूर्ण वर्तनाचा' वगैरे मुद्दाच उपस्थित झाला नाही. ...

अवांतरः माझ्या मते तो एखाद्या 'तेलसंपन्न' राष्ट्राचा अध्यक्ष असावा, नाहितर त्याच्या 'मागासलेपणाची' अतिरेकी चर्चा 'टॅब्लॉईडस' ना वर्षभर पुरली असती, असे माझे प्रांजळ मत.

पर्नल नेने मराठे's picture

13 Dec 2010 - 1:47 pm | पर्नल नेने मराठे

त्या काळात ग्रॅ़ज्युएट झाल्या झाल्या मला एक छोटिशी नोकरी लागली होती.
मी व माझा सहकारी ऑफिसात खुप काम करायचो. एकदा खुप उशिर झाला होता.
तो म्हणाला जेवुनच घरी जाउयात सो मी त्याला एक रस्तरां सुचविले.
आम्ही जेवलो व 'फिंगर बाऊल' देण्यात आले.
त्याने मला विचारले कि तु हे ऑर्द्र केलेस का, हे काय आहे? मी त्याला गमतित म्हटले लिम्बु पिळ न पी ;).
तो खरच तसे करणार हे लक्शात आल्यावर मी त्याला थाम्बवुन त्याला काय ते समजावले.
अजुनही आमची मैत्री कायम आहे. साहेब, हल्ली मंत्रालयात बसुन मुख्यमंत्र्यांचे प्रवास शेड्युल करतात.

आपली मुख्यमंत्र्यापर्यंत वट आहे दाखवण्याची क्षीण प्रयत्न

आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत वट असलेल्याशी ओळख असणार्याशी सलगी ठेवून आहोत हे दाखवायचा क्षीण प्रयत्न..

मुख्य प्रवाहात सामील होण्याचा क्षीण प्रयत्न

शिल्पा ब's picture

13 Dec 2010 - 1:58 pm | शिल्पा ब

आम्ही जिथे असतो तो प्रवाह मुख्य....बाकी सगळे फाट्यावर..

अवलिया's picture

13 Dec 2010 - 2:00 pm | अवलिया

ओके.

नरेशकुमार's picture

13 Dec 2010 - 3:13 pm | नरेशकुमार

आप्ल्याला ईन्ग्लिश येते हे दाखविन्याचा क्शिन प्रयत्न.

पर्नल नेने मराठे's picture

13 Dec 2010 - 2:03 pm | पर्नल नेने मराठे

क्षीण प्रयत्न कशाला म्हणताय .... ठ्सठशीत देखावा म्हणालात तरी हम डरता नाय किस्को ;) अपुनकी हैइच वट =))

हांग आशी !

आजकाल चुचु आज्जी लैच फार्मात आहे. पौष्टिक लाडूंचे सेवन केल्याचा परिणाम म्हणावा काय?

शिल्पा ब's picture

13 Dec 2010 - 2:05 pm | शिल्पा ब

हांग अश्शी!!! =))

शैलेन्द्र's picture

13 Dec 2010 - 2:14 pm | शैलेन्द्र

वा वा..

शैलेन्द्र's picture

13 Dec 2010 - 2:53 pm | शैलेन्द्र

आपण ग्रॅज्युएट झालोय, हे दाखवायचा यशस्वी प्रयत्न.

तसेच आपण ज्याला शिकवलं ते कुठल्या कुठ्ठ पोचले हे दाखवणारी यशस्वी जाहीरात.

नरेशकुमार's picture

13 Dec 2010 - 3:07 pm | नरेशकुमार

भायेर हाटेलात जाउन खाउ शकतो हे दाखविन्याचा क्शिन प्रयत्न.

लतिका धुमाळे's picture

13 Dec 2010 - 2:06 pm | लतिका धुमाळे

आपण हाताने जेवतो म्हणून देतात फिंगर बाउल. पण जे सुरी, काटे , चमच्याने जेवतात त्यांना हात धुतले काय आणि नाही काय सारखेच.

शिल्पा ब's picture

13 Dec 2010 - 2:10 pm | शिल्पा ब

मग ही प्रथा कुठल्ली? कारण गोरे लोक हातात चमच्या, काटे अन सुऱ्या घेऊन जेवतात...मग त्या लिंबाच्या पाण्याचं काय?

शैलेन्द्र's picture

13 Dec 2010 - 2:20 pm | शैलेन्द्र

जेवल्यावर बोट थंड पडतात, म्हणुन देत असावे.. ;-)

शिल्पा ब's picture

13 Dec 2010 - 2:23 pm | शिल्पा ब

हॅ हॅ हॅ ...किंवा हातात एवढे शस्त्र धरू धरू बोटं दुखून येत असतील म्हणून जरा जीवाला बरं वाटावं म्हणून गरम लिंबाच्या पाण्यात बोटं बुचकळून काढायची...

शैलेन्द्र's picture

13 Dec 2010 - 3:09 pm | शैलेन्द्र

बाकी काही असो, थंडीत, त्या बाउलमधे बोट बुचकळायला मस्त वाटत.

नरेशकुमार's picture

13 Dec 2010 - 3:12 pm | नरेशकुमार

बाउलमधे बुचकळायला बोट वळवळ करायला लागली आहेत.

नरेशकुमार's picture

13 Dec 2010 - 3:06 pm | नरेशकुमार

एकदा का झा लं प्रत्येक बोट थंड पडतया बघा.

ताटात किंवा बाऊलमध्ये हात धुणे ही सवय नक्की कशी (गरजेतून की विलासातून) आली असावी, हा गोंधळाचाच मुद्दा आहे. वाळवंटी किंवा दुष्काळी प्रदेशातील पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे लोकांनी हा पर्याय निवडला असावा, असे मानल्यास राजे-रजवाडे आणि श्रीमंतांकडच्या मेजवान्यांतही ही पद्धत दिसून येते. राजस्थानी जेवणात आजही शेवटी असे गरम पाण्याचे बाऊल येतात तर हैदराबादकडे शाही मेजवान्यांत किंवा बड्या हॉटेलांत हेच पाणी गुलाबाचा अगर वाळ्याचा सुगंध असलेले असते. महाराष्ट्रात मात्र फार पूर्वी सर्वसामान्य घरांत वेगळी पद्धत असे. लोकांची जेवणे झाल्यावर मोरीवर हात धुऊन आंचवल्यावर यजमान स्वतः ते हात पुसून कोरडे करत असत आणि पाहुण्यांच्या हातात तांबूल देत असत. पेशव्यांच्या आणि सरदारांच्या जेवणावळीत बड्या असामींच्या हातावर चांदीच्या झारीतून उन उन सुगंधी पाणी घातले जाई. ते गोळा करण्यासाठीही चांदीचे घंगाळे असे.

यानिमित्त मला माझ्या घरातील शिस्त आठवली. आजारी व्यक्ती व बाळंतीण यांनाच केवळ ताटात हात धुण्याची परवानगी होती. लहान मुलांनी तसे केल्यास 'ताटात हात धुवायला काय बाळंत झालायस का?' असे वडीलधारे फटकारत असत. कोकणात, तसेच घाटावरील खेड्यांत अजुनही एक चांगली प्रथा आहे. घरात येण्यापूर्वी हातापायावर घेतलेले पाणी किंवा जेवणानंतर हात धुतलेले पाणी फुलझाडांत किंवा आळू-कर्दळीच्या वाफ्यांत सोडलेले असते. त्यामुळे छोटेखानी बाग कायम फुललेली राहते.

पर्नल नेने मराठे's picture

13 Dec 2010 - 3:29 pm | पर्नल नेने मराठे

हातावर चांदीच्या झारीतून उन उन सुगंधी पाणी घातले जाई. ते गोळा करण्यासाठीही चांदीचे घंगाळे असे.

आम्च्या गावात "राजधानी" नावाच्या रेस्तरामध्येही अशीच पध्दत आहे. जेवण झाले कि त्यांचा माणुस येउन हातावर वॉर्म पाणी घलतो.

उपास's picture

13 Dec 2010 - 8:48 pm | उपास

मला हा प्रश्न पडतो की फिंगरबोल मधल्या कोमट पाण्यात बोटे धुता येतील पण जेवण झाल्यावर खळखळून चूळ भरण्याची सवय जी लहानपणापासून लावलेय ती योग्य नव्हे काय.. त्या काड्या घेउन दात कोरत कॅव्हीटी वाढवणे कधीही अयोग्यच.. तुम्ही रोमात असा नाहीतर कुठे, तुमच्या आरोग्याला जे योग्य वाटतं ते तुम्ही करायलाच हव, कुठलाही न्यूनगंड न ठेवता.. मी तर समोरच्यालाच शिकवतो अशावेळी चूळ भरणं कसं योग्य ते, तो अमेरिकन असू दे वा जर्मन वा भारतीय.. ;)

प्रकाश घाटपांडे's picture

14 Dec 2010 - 2:33 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्याकडे प्रातर्विधी साठी वढ्याव गेल्याव बोचा साफ करायाला दगड ( नर्मदेतल्या गोटा असतो तसा त्यातल्या त्यात गुळगुळीत) व झाडीत गेल्याव झुडपाचे पान वापरीत. किंबहुना प्रातर्विधी करणे याला 'झाड्याला' जाणे असच म्हंत्यात. त्याची थोडी संस्कारित आवृत्ती म्हणजे 'परसाकडे' जाणे असेच म्हटले जाते. पण त्यासाठी टमरेल वापरले जाते. बर्‍याचदा ते गळके असते. म्हणजे शेवटी त्यातले पाणी फक्त शास्त्रापुरतेच रहाते.
पाटी पुसायला त्याच्यावर थुकुन हातानी मंग सारवायचे; नंतर त्या हाताचा सोताबी वास घ्यायचा व दुसर्‍याला बी द्यायचा. कधी पाटी गांधीटोपीनी बी पुसायची. तीच डोक्याव परत घालायची. हे सर्रास असे त्यात कुणालाच वावगे वाटत नसे.
आमचे देव गुरुजी या सवयींवर बोलत असत पण ते स्वतः तंबाखु खाउन वर्गात कोपर्‍यातच थुंकत. वर्ग शेणाने सारवलेले असायचे. त्यात थुंकी मिसळून जात असे. सर्व॑ पोर मिळुन नंत॑र वर्ग सारवत असत. पोर जमीनीवरच बसत व गुरुजी खुर्चीत.
जेवणात कशावर काय ही भानगड नसे बाजरीची भाकरी व कांदा चटणी लसुण वा कोड्यास फडक्यात गुंडाळलेले असे. शिष्टाचारा बाबत आमच्या गुरुजींचे ठरलेले उदाहरण म्हणजे धनगर बसले जेवाया आन ताका संग शेवया || वर्गातल्या धनगर मुलांनाही त्याचे काही वाटत नसे. खंडीच्या वरनात मुतायची सवंच आस्ती काही लोकान्ला तव्हा मंग गुरुजी बोलनारचा ना?
असो गेले ते दिन गेले पण प्रवासात वा संकट प्रसंगी पुर्वाश्रमीचे अनुभव उपयोगाला येतात.
अवांतर- विधीमहाविद्यालय म्हन्ल्याव नेमक कंचा विधी करत्यात हा प्रश्न आमाला पडत असे

पर्नल नेने मराठे's picture

14 Dec 2010 - 5:41 pm | पर्नल नेने मराठे

वाचुन मळमळतेय :(

मितभाषी's picture

14 Dec 2010 - 11:24 pm | मितभाषी

वाटीत गरम पाणि घेवुन त्यात लिंबू पिळुन प्या. मळमळ बंद होईल.

योगप्रभू's picture

14 Dec 2010 - 7:34 pm | योगप्रभू

वेडात मराठे वीर दौडले सात या गाण्यातली एक ओळ सहज आठवली

दगडांवर इथल्या अजुन रंग रक्ताचा... :)

शैलेन्द्र's picture

14 Dec 2010 - 8:06 pm | शैलेन्द्र

सॉरी.. पण नाही आवडली प्रतिक्रीया..

प्रदीप's picture

14 Dec 2010 - 8:28 pm | प्रदीप

वेलकम ब्यॅक, प्रकाश!

एका छोट्या शहरात सकाळी भरणारे / चालणारे 'लॉ कॉलेज' सुरू होणार होते. पण त्याची बातमी वर्तमानपत्रांत आली ती अशी:

प्रातर्विधी महाविद्यालय उद्यापासून सुरू .... :)

शैलेन्द्र's picture

14 Dec 2010 - 6:53 pm | शैलेन्द्र

भन्नाट...

ठाण्यात एक प्रसिध्द "आय व्ही एफ" (कृत्रीम गर्भ्धारणा) तज्ञ आहेत. खुप वर्ष मुलं न झालेल्या एका स्त्रीला त्यांच्या प्रदीर्घ उपचारांनंतर जुळे झाले, त्याची पेपरात आलेली बातमी...

"डॉ. ****** यांच्या अथक प्रयत्नाने महीलेस जुळे"