देशातली लोकसंख्या

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in काथ्याकूट
10 Dec 2010 - 3:29 pm
गाभा: 

आपल्या देशातली लोकसंख्या काहीच वर्षात चायनाच्या पेक्षा जास्त होणार. आपल्या देशात एवढी लोकसंख्या का ह्या वर कोणी प्रकाश टाकू शकेल का.

१. फॅमिली प्लॅनिंग उशीरा सुरु करणे किंवा नसणे - हे कारण वाढत्या लोकसंख्येला देता येणार नाही. कारण अमेरीकेत सुद्धा ३० मुले होती पुर्वीच्या काळी एका कुटुंबात अशा नोंदी आहेत.

२. आपला देश मागासलेला असला कारणाने प्राथमिक वैद्यकीय उपचार न मिळाल्या मुळे होणारे मृत्युचे प्रमाण जास्त असुन देखील लोकसंख्या वाढत आहे.

३. मोठ्या लोकसंख्येचे कारण हे आहे का - आपला भुतल जवळ जवळ नेहमीच पाण्या वरती राहीला व बाकीचे भूतल पृथ्वीच्या हजारोवर्षांच्या उलाढाली मुळे कधी पाण्यावर तर कधी पाण्या खाली राहीले असल्या मुळे तिथली लोकं व संस्कृती पुसली जायची, व आपली आबाधीत राहीली व वाढत जाऊन एका वेळेला ती 'क्रिटीकल मास' सारखी एवढी झाली व लोकसंख्येची वाढ सुरु झाली. कुमारी कंदन (१०००० वर्षा पुर्वीचे तामीळनाडु) संबंधी गुगल शोध करुन कल्पना येईल मला काय म्हणायचे आहे त्याचे. ह्या संकेत स्थळावर जाऊन बघा त्या साठी.

तुमचे विचार व चर्चे साठी धागा दिला आहे.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

10 Dec 2010 - 3:43 pm | विनायक प्रभू

३ रा पॅरा कळला नाही.
असो.
सर्वोत्तम क्षण -आत्ता
सर्वोत्तम दिवस- आज
सर्वोत्तम मित्र- हाथ

सर्वांत महत्वाचं कारण आहे की मिसळपाव वर लोकं चाईल्ड आणि फ्युचर प्लानिंचे धागे काढण्यात आणि चर्चा रटाळवण्यात मग्न आहेत. त्यामुळे कोणी हजारवेळा सांगुनही फ्यामिली प्ल्यानिंग वर चर्चा करत नाही. म्हणुनंच भारताची लोकसंख्या वाढत्ये !!

बाकी मास्तर वर वाईट दिवस आलेले दिसतात अलिकडे. परवाच विजुभाऊ म्हणत होते .. मास्तरांचं भविष्यंच अंधारात दिसतंय .. हातावरच्या रेषा पार पुसट झाल्यात !! ;)

लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी खूप कठोर उपाय योजना करावी लागेल. आणि त्यातून निर्माण होतील अनेक प्रश्ने.
उदा : जर सरकारने 'एक कुटुंब, एक मुल' जर हा कायदा केला तर लगेचच अल्पसंख्यांक लोक यातून सुट मागतील. मग ती द्यायची का नाही, यावरून पुन्हा राजकाराण, मते विकली जातील, त्यावर आरक्षण चालू होईल. सरकारला आता जे काही आहे तेच सांभाळता सांभाळता जड जाते आहे, हे नवीन उपद्व्याप मागे कोण लावून घेईल. लोकसंख्या आटोक्यात आनायला पाहिजे हे सर्वांना कळते हो, पण आज त्यासाठी खंबीर निर्णय घेण्यासाठी सरकार (अन्य कोणताही पक्ष) सक्षम नाही.

मागे मी ऐकले होते कि, महाकाय चीन मध्ये काही राज्यांत 'एक कुटुंब, एक मुल' हा कायदा आहे. आपल्या इथे असे होणे शक्य नाही. नानाविविध जाती जमातींनी नटलेला हा देश, कोण आपली जमात कमी करण्यासाठी पुढे येईल. ज्याला त्याला, ज्याचा त्याचा अभिमान.

एक तरी मराठी/मुसलमान/कन्नड/कि अजून कोणी म्हणेल का, भले आमची जमात नष्ट झाली तरी चालेल, पण मी मला एकापेक्षा जास्त मुल होऊ देणार नाही.

बाकी लोकसंख्या का वाढते आहे त्याचे
इथे विस्तृत वर्णन दिलेले आहे.


सर्वांत महत्वाचे कारण : लोकसंख्या म्हणजे मते, मते म्हणजे सत्ता.

प्रत्येक आकड्यावर फुकटचे शुन्य देण्याची भारतियाना सवय लागल्यामुळे लोक संख्या वाढ होत आहे.

तिसर्‍या मुद्द्यावरुन विचारावेसे वाटते कि २०१२ची आपल्याला भिती नाही काय?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Dec 2010 - 5:38 pm | निनाद मुक्काम प...

र धो कर्वे ह्यांचे विचार त्याकाळी कोनोही सिरीयसली मनावर घेतले नाही .एकेकाळी संजय गांधी नसबंदी हा स्त्युत्य उपक्रम चुकीच्या मार्गाने अतिरेकी दबावाने राबवला .त्याची परिणिती निवडूक हरण्यात झाली .व तमाम राजकीय पक्षाने कानाला खडा लावला कि ह्या मुद्यावर चर्चा नको .गांधीजी म्हणायचे ह्या विषयावर संयम हवा (त्यांचे नि कर्व्यांचे ह्या विषयी मतभेद होते ).लालू पासून अनेक महान राजकारण्यांनी असा विलक्षण संयम
दाखवला कि त्यांच्या जनतेने त्याच्यापासून आदर्श घेतला (आणि मुंबा पुरीवर धडाका मारायला यादव वीर सज्ज झाले ) आज भारताची प्रमुख समस्या दहशतवाद नसून बेरोजगारी व अशिक्षितपणा व बेसुमार लोकसंख्या
अर्थात बेसुमार लोकसंख्या नियंत्रणात आली तर बाकीचे दोन मुद्दे आपोआप सुटतील .
(माझे आजोबा व काका आजोबा हे कर्व्यांचे खांदे समर्थक .म्हणून आज मुंबईतील जागा विकून उपनगरात जागा घ्याची नौबत आमच्यावर आली नाही .)उपनगरात जागा घेतांना मुंबईची जागा शाबूत होती .सध्या आईवडील राहतात ( मराठी टक्का मुंबईतून कमी होण्यामागे हे प्रमुख कारण आहे .)

५० फक्त's picture

10 Dec 2010 - 5:55 pm | ५० फक्त

निसर्गाई, म्हणजे मदर नेचर हो, अतिशय समर्थ आहे ही आणि अशी अनेक आक्रमणे आणि लफडी सोडवायला,

आणि आपण चिनच्या पुढं चाललो असलो ना तर ते ठिकच आहे, उद्या आपण महासत्ता झालो म्हणजे आपल्याकडे फक्त भारताची सत्ता नसणार ना, असणार ती सगळ्या जगाची, मग या सगळ्या जगावर नियंत्रण ठेवायला आपलीच माणसं नको का ? का तेंव्हा आपण अमेरिका करते आहे तसे ऑफ शोअरिंग करणार.

या वरुन एक जोक आठवला.

एका खेड्यातली लोकसंख्या फार इतरांपेक्षा जास्त वाढ्त होती, झालं एक वांझोटी समिती बसवली चॉकशी करायला आणि उपाय सुचवायला. पण समितीनं खरंच काम केलं आणि उपाय सुचवला, तर काय की गावाच्या बाजुने जाणारी रेल्वे लाईन लांब हलवावी. सरकार एकदम सुं$$$$$$$ मध्ये गेलं, विचारलं अरे प्रश्ण काय उपाय काय, काही संबंध ?, समितिने सांगित्लं.- या लाईनवरुन एक गाडी रोज रात्री २ वाजता जोरात शिट्टी वाजवत जाते, मग काय लोकांच्या झोपा उडतात आणि वाढतीय लोकसंख्या.

हर्षद.

सर्वसाक्षी's picture

10 Dec 2010 - 9:20 pm | सर्वसाक्षी

ही असू शकतात..

- लोकसंख्या आटोक्यात ठेवण्याचे महत्व जनतेला समजले नाही, राज्यकर्त्यांनी समजावले नाही. जर पल्स पोलिओ उपक्रम सरकार उत्तम राबवु शकते तर कुटुंब नियोजन प्रचारात अपयश का? मार्केटिंग च्या दृष्टीने पाहता सगळा प्रचार प्रत्यक्ष उद्दिष्टीत वर्गाला परिणामकारक नसतो वा त्यांच्या पर्यंत पोचतच नाही. सगळा प्रचार सुशिक्षित वर्गाल उद्देशून ज्यांनी 'एक' वा 'फारतर दुसरे' हा निर्णय घेतलेलाच असतो. शिवाय अमुक समाजाचे/ धर्माचे घटक नाराज होतील, मते जातील म्हणुन बोटचेपे धोरण
- 'मुले अधिक होण्यामुळे काही प्रलय होतो का? आमची मुले आम्ही पोसु, आम्ही सहा जण होतो आमच्या आई बापानी आम्हाला वाढवले ना? मुलांना पोसायची काळजी वाटते तर लगाच्या फंदात पडावे का? ' अशी मानसिकता.
- समजले तरी नियोजन कसे करायचे? समाजातील अनेक घटकांना 'हक्काची करमणुक' उपभोगताना पुढचा विचार येत नाही
- संकोच/संततीनियमनाच्या साधनांची अनुपलब्धता. अजुनही औषधाच्या दुकानात चार लोकांच्या देखत कंडोम मागताना लोक बिचकतात.
- मुलगा हवा हा अट्टाहास???? अनेकदा सामान्य कामगार कुटुंब - नवरा, बायको, दोन तीन मुली व एक मुलगा (सर्वात लहान) असे दृश्य दिसते. यांना विचारावेसे वाटते की सुस्थितील माणसे सुद्धा एकावर थांबतात तर यांची कुठली मालमत्ता वा घराण्याची शान सांभाळण्यासाठी हे मुलगा होई पर्यंत प्रजा वाढवतात? होणार्‍या मुलांना आपण काय देऊ शकतो याचा विचार त्यांना कधीच पडत नाही?

चिरोटा's picture

10 Dec 2010 - 11:55 pm | चिरोटा

समितिने सांगित्लं.- या लाईनवरुन एक गाडी रोज रात्री २ वाजता जोरात शिट्टी वाजवत जाते, मग काय लोकांच्या झोपा उडतात आणि वाढतीय लोकसंख्या.

हा हा हा.
उत्तर प्रदेशात रेल्वेचे मोठे जाळे आहे.पण 'सदा अग्रेसर्'राज्यात रेल्वेचे जाळे तेवढे नसूनही लोकसंख्या खूप आहे.

प्रियाली's picture

11 Dec 2010 - 12:02 am | प्रियाली

एक उपाय आहे. मिपासारखी १०० एक संकेतस्थळे निर्माण करा आणि लोकांना त्याची गोडी लावा. ;) रात्रंदिवस लोक इथे पडिक राहू लागले की लोकसंख्येला आळा बसण्यास थोडी मदत होईल, कदाचित.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Dec 2010 - 12:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

(मिपावरची लेखसंख्या) हे (प्रकटन) तयार आहे! :p

प्रियाली's picture

11 Dec 2010 - 12:30 am | प्रियाली

मिपावरची लेखसंख्या वाढली की लोकसंख्या कमी होईल असा शिरिअस अंदाज आहे. जी मंडळी रोजच्या रोज लेखांचा रतीब लावतात किंवा लांबलचक प्रतिसाद, रोज तिरपे तिरपे प्रतिसाद देतात ते काही डेटा सादर करतील का? ;)

किंबहुना, एक अवांतर कल्पना आली.

मिपावर पडिक राहून एकमेकांच्या ख.व. भरणारे, लेख लिहिणारे, प्रतिसाद टाकणारे वगैरे वगैरेंचे चारित्र्य धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असेल असा अंदाज आहे. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Dec 2010 - 12:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

... ते काही डेटा सादर करतील का?

ती मी नव्हेच, त्यामुळे या बाबतीत माझा काही उपयोग नाही.

मिपावर पडिक राहून एकमेकांच्या ख.व. भरणारे, लेख लिहिणारे, प्रतिसाद टाकणारे वगैरे वगैरेंचे चारित्र्य धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असेल काय?

पडीक राहून ख.व. भरणारे, लेख लिहिणारे, प्रतिसाद टाकणारे हे लोकं म्युचुअली एक्सक्लुझिव असतात का कसं याचा आधी शास्त्रशुद्ध उहापोह झाला की मगच त्यांच्या चारित्र्याच्या धुतलेपणाबद्दल बोलता येईल.

योगप्रभू's picture

11 Dec 2010 - 12:47 am | योगप्रभू

<<एक उपाय आहे. मिपासारखी १०० एक संकेतस्थळे निर्माण करा आणि लोकांना त्याची गोडी लावा. रात्रंदिवस लोक इथे पडिक राहू लागले की लोकसंख्येला आळा बसण्यास थोडी मदत होईल, कदाचित.>>
..
..
काय उपयोग?

भारतात अजुनही नेट फेल्युअरची मोठी समस्या जाणवते म्हटलं :)

नेट फेल्युअर ने उपलब्ध झालेला फावला वेळ आणि घराजवळून शिट्या वाजवत आगगाडी जाऊन झोपमोड झाल्याने उपलब्ध झालेला फावला वेळ यांत फारशी तफावत नाही. त्यामुळे मिपासारखी अनेक स्थळे काढून, लेखसंख्या वाढवून लोकसंख्या कमी व्हायची नाही, हा मुद्दा पटण्याजोगा!
(कार्यव्यग्र)बेसनलाडू

विप्रंच्या मागे एकदा आलेल्या लेखानुसार जायफळाचा उपयोग होवू शकेल.;)

रेवती's picture

11 Dec 2010 - 1:30 am | रेवती

अच्छा! म्हणजे लेखसंख्या वाढवून लेकसंख्या कमी करता येऊ शकेल म्हणा कि!;)