मिपावर कोणी कॉकटेलप्रेमी आहे का?

सोत्रि's picture
सोत्रि in काथ्याकूट
10 Dec 2010 - 1:05 am
गाभा: 

मिपावर कोणी कॉकटेलप्रेमी आहे का?

दोन-तीन महिन्यांपुर्वी मी नविन घरी शिफ्ट झालो आणी घरी छोटेखानी बार असण्याचे स्वप्न सकार केले.
बार मधे बर्याच प्रकारच्या Liquors (रम, व्हिस्की, स्कॉच इत्यादी) ठेवणे एक्दम सोपे आहे. पण Liqueurs मिळवणे थोडे कठीण आहे असे मला वाटते. त्याअनुषंगाने कोणी कॉकटेलप्रेमी असल्यास चर्चा होउन मदत मिळावी ही इच्छा आहे.

सध्या संग्रही असलेल्या Liqueurs:
Martini(Vermouth) - Dry
Kahlua - Coffee Liqueur
Fashion - Passion Fruit Liqueur
Baileys Irish Cream
Blue Curacao

माझे आवडते कॉकटेल - व्हाइट रशिअन

रेसिपी:
ओल्ड फॅशन ग्लास मधे 5-6 आइस क्युब टाकुन

वोड्का - 45 मिली (1 + 1/2 oz)
Kahlua - 30 मिली ( 1 oz)
Irish Cream - 30 मिली ( 1 oz) मिक्स करून........... चीयर्स :) :-P

प्रतिक्रिया

धागा चूकून दोनदा सबमीट झाला (कसा काय कळले नाही)
@संपादक : कृपया धागा उडवावा.

प्राजु's picture

10 Dec 2010 - 1:10 am | प्राजु

हो केले आहे ते. वरी नॉट!! :)

धनंजय's picture

10 Dec 2010 - 1:23 am | धनंजय

येथील सदस्य श्री. नाटक्या यांनी वेगवेगळ्या कॉकटेलबद्दल "साकिया" नावाची लेखमाला लिहिली होती. त्याची आठवण झाली.

(लेखमाला संपली नसून अजून पुष्पे ओवलीच जात आहेत, अशी आशा आहे.)

नाटक्या's picture

10 Dec 2010 - 1:58 am | नाटक्या

भाईकाकांच्या भाषेत सांगायचे झाले तर 'अजून जीव आहे!!!' ... पण सध्या कामात प्रचंड बुडालो आहे. त्यामुळे लिहीता येत नाही. त्यामुळे सध्या वावर फक्त वाचना पुरता.. पण नाताळात थोडी उसंत मिळेल तेव्हा काहीतरी टंकीन म्हणतो...

- नाटक्या

सोत्रि's picture

10 Dec 2010 - 8:04 am | सोत्रि

नाटक्या जी,

तुमची साकिया मालिका (पूर्वतयारी पासुन सर्व) अखंड एका बैठकीत वाचून काढ्ली.
नतमस्तक झालो. व्यनितून सल्ले घेइन कॉकटेल्स च्या सामग्री बद्दल.

इतकी सुंदर लेखमाला लिहिल्या बद्दल धन्यु !

सोत्रि's picture

10 Dec 2010 - 8:07 am | सोत्रि

धनंजय,

साकिया ह्या खंग्री लेखमालेचा दुवा देण्याबद्दल लाख लाख "दुऑ".

सुनील's picture

10 Dec 2010 - 1:25 am | सुनील

मिपावर एक सदगृहस्थ आहेत. त्यांच्याकडेही एक भले थोरले कपाट आहे, ज्यात अनेक जहाल आणि मादक द्रव्ये भरलेली असतात! त्यांची मदत होऊ शकेल!!

१. पुस्तके संग्रही असावीत तशा दारवा ही संग्रही का ?

२. आपण नविन घर घेतलंत

३. आणि त्यात बार ही आहे

सुनील's picture

10 Dec 2010 - 1:40 am | सुनील

१. पुस्तके संग्रही असावीत तशा दारवा ही संग्रही का ?
पुस्तकांचा संग्रह कराणार्‍याला विचारवंत म्हणतात. दारवांचा संग्रह कराणार्‍याला काय म्हणतात?
२. आपण नविन घर घेतलंत
आनंद आहे!

३. आणि त्यात बार ही आहे
बाहेरख्यालीपणा करण्याचा चान्स गेला!

टारझन's picture

10 Dec 2010 - 2:05 am | टारझन

ह्या मंगलप्रसंगी सोकाजीयात्रींनी "दारवाविश्व.कॉम" सुरु करावे असे सुचवु इच्छितो.

सोत्रि's picture

10 Dec 2010 - 10:53 am | सोत्रि

@टारझन,

खूप दिवसांनंतर तु मिपावर आल्यामुळे एक चैतन्य आल्यासारखे वाटले.
तुझ्या अश्याच इरसाल..की खवचट म्हणू (ह. घे.) प्रतिक्रियेची अपेक्षा होती. मझा आला!

तुझ्या जेनचा भाउ,
सोकेन

आभारी आहे सोकाजी , खवचट म्हणा की अवचट .. माणुस बदलतो थोडी ? ह.घे ची गरज नै ;)
बाकी मॉकटेल बणवत असाल तर सांगा , एका ढांगेत हडपसर :)

बाकी आपली कमेंट वाचुन अतिगहिवरुन आल्याने डोळे पाणावले आहेत , कुठाय माझा टॉवेल !

-(अंमळ सेंटि) सुखाचीपारवाटलागेकर

सोत्रि's picture

10 Dec 2010 - 10:56 am | सोत्रि

@सुनील:

"बार म्हणजे बाहेरख्यालीपणा" ही मज पामराच्या ज्ञानात मौलिक भर घालाण्याबद्दल धन्यू!

दादा,
आमी गरीब मान्सं हावोत. मार्गारिटा, स्क्रूड्रायव्हर ह्यापलिकडं आमची काय मजल ग्येली न्हाय. कंदीमंदी शहाळ्याच्या पाण्यात बकार्डी व्हाईट रम टाकून आपलं गावरान कॉकटेल करतु. तुमी नवी नवी कॉकटेल सांगा. जीवाला कसं गार वाटतं बगा. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Dec 2010 - 2:06 am | निनाद मुक्काम प...

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलातील एकेकाळचा असाच एक साधारण असा बार सेवक तुमच्या दिमतीला आहे .
बाकी माझ्या बाबतीत थोडे सांगायचे म्हणजे हॉटेल मानेज मेंट करताना टोम्याचा कॉकटेल हा सिनेमा पाहून टकुरे फिरले .व आपण पण जग्लर कम बार टेंडर बनायचे असे ठरविले .मुंबईत त्यावेळी हे प्रशिक्षण देणारी एकच संस्था होती .ती म्हणजे भारतातील पहिल्या लेडी बार टेंडर शाद्बी बासू ह्यांची स्तर अकेडमी (त्या जगातील पहिल्या २५ बात टेंडर मध्ये येतात .पूर्ण भारतात कॉकटेल कल्चर आंतराष्ट्रीय पातळीवरचे आणल्या बद्दल त्यांचे सी एन एन ने दीर्ध मुलाखत घेतली होती .(आम्ही लंडनला आलो .काही हॉलीवूड सेलीब्रेतिना पाहण्याचा योग आला पण कॉकटेल करण्याचा नाही मी कॉकटेल बार टेंडर ह्या मूळ पेशाची अंगावर कोट लवकर चढावा ह्या विशुध्द हेतूने प्रतारणा केली व मानेज मेंट ट्रेनी हा प्रोग्राम स्वीकारला (तेथे हुजरेगिरी चमचेगिरी व काबाडकष्ट हा मुंबईच्या हॉटेल लायानिचा अनुभव पणाला लावून वर्क परमीत घेऊन ,मोकळा जाहलो.) आता उरल्या त्या आठवणी

Liqueurs साठी जुहू येथील Juben Wines
Juhu Tara Road,(Shernaz Navbahar)
Shop # 1,Juhu,
Mumbai-400049
Tel:+ (91-22) 26152222, 26151144
आम्ही पण तिथलीच .........
नाही तर सरळ कोणी कस्टम वाला किंवा हवाई सुंदरी कि सुंदरा गाठा.
केसरी वा राजाराणी आदी कंपन्याचे टूर लीडर पण उत्तम स्त्रोत
आयुष्य हे कॉकटेल सारखे असते .सुख दुख /राग /लोभ हे विकारी घटक आयुष्याच्या शेकर मध्ये घालून व त्यात नशीब चवीनुसार टाकून जगन्नियंता ते हलवतो .व आपण कॉकटेल सारखे ह्या धरतीवर येतो .गार्निश म्हणून जात धर्म ह्या गोष्टी ठेवतो .अर्थात कॉकटेल सुंदर सजवणे हेच गार्निश चे मुख्य काम .बाकी सर्व कॉकटेल च्या चवीवर अवलंबून असते .तेही जर सगळे घटक योग्य त्या प्रमाणात असतील तर .
(अंमल वाईनचा ४थ चषक असल्याने चूक भूल द्यावी ध्यावी .
जाता जाता एक टिप्स
फक्त गरम दुधात हॉट चोकालेत ची पावडर टाकून झकास गरमागरम हॉट चोकलेत मध्ये बेलीज टाकायचे . (प्रमाण तुमच्या चवीवर ) बेलीज कितीही प्यायली तरी कमीच .
आम्ही एक खंबा नुसता संपवला होता .राजीव कपूर (राम तेरी गंगा मैली फेम ) दुसर्यांना मुंडावळ्या घालून आधुनिक काळातील जरठ विवाहाच्या निम्मिताने सार्या बॉलीवूड च्या साक्षीने चेंबूरच्या त्याच्या बंगल्यात किमान २० तास काम केल्यावर पाहते ५ वाजता त्यांचे थोरले बंधूच्या कृपेमुळे हवे ते प्या असा खुली सूट मिळाल्यामुळे माझ्या मनातील खूप दिवसांची बेलीज मनोसोक्त प्यायची विच्छा पुरी झाली .

शिल्पा ब's picture

10 Dec 2010 - 7:39 am | शिल्पा ब

खरंच? अजून सांगा ना तुमच्याबद्दल गडे!!

शिल्पाताई,

खरंच? अजून सांगा ना तुमच्याबद्दल गडे!!

( खरंच? अजून सांगा तुमच्याबद्दल ना गडे!! )

जरा वाक्यातल्या शब्दांची जरा आलटपालट झाली असती तर जरा अ(न)र्थ निघण्याची शक्यता होती.

बाकी लवकरच एखादे कॉकटेल टाकीन म्हणतो...

- नाटक्या

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 3:03 am | निनाद मुक्काम प...

एकदम नको हो
बेता बेताने
आयुष्य जगलो मनमुराद (अजून हि तर सुरवात आहे .)
स्वताला असामी असामी मधील नायक न समजणारा
निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
(बाकी माझी स्वाक्षरी पाहून शितावरून भाताची परीक्षा करावी हि विनंती )

अप्पा जोगळेकर's picture

10 Dec 2010 - 8:37 am | अप्पा जोगळेकर

कॉलेजात असताना कॉकटेल बद्दल बरंच ऐकलं होतं. म्हणून एकदा व्हिस्की, रम, व्होडका तिन्ही एकत्र करुन प्यायलो होतो अधासासारखा. मग काय? लागली वाट. दोस्ताचं घर रिकामं होतं म्हणून वाचलो. तेंव्हापासून शपथ घेतली की असा अधर्म करणे नाही. तेंव्हापासून फक्त शुद्ध दारु पितो. एका वेळेला एक म्हणजे एकच ब्रँड.

सोत्रि's picture

10 Dec 2010 - 10:13 am | सोत्रि

@प्रभाकर,

कॉकटेल म्हणजे वेग-वेगळ्या मदिरा एकत्र करून पिणे नाही.

मदिरा + लीक्युर्स + फळांचे रस + (बीटर्स) असे करून मदिरेतला कडूपणा घालवून बनवलेले एक उत्साह्वर्धक पेय म्हणजे कॉकटेल (माझी व्याख्या) :) (माझ्या ह्या व्याख्येपेक्षा नाट्क्या ह्यांची साकिया लेखमाला खुप काही सांगते.)

पण मीही माझ्या दारू पिण्याच्या उमेदिच्या काळात तुमच्याप्रमणेच उपदव्याप करून झालेलो आहे त्यामुळे तुमची त्यावेळेची अवस्था समजू शकतो :-P

नन्दादीप's picture

10 Dec 2010 - 10:06 am | नन्दादीप

मला आधी सान्गा हा प्रश्न्न आहे की आमन्त्रण??

मग सान्गतो...

सोत्रि's picture

10 Dec 2010 - 10:22 am | सोत्रि

@नन्दादीप

पुणेकर असाल तर आमंत्रण.... नसाल तर प्रश्न. :)

थांबा...थांबा...काहीही मतितार्थ काढू नका. मी पुण्यात रहात असल्यामुळे "पुणेकर" म्हट्ले, म्हणजे आमंत्रण समजून घरी येणे सोपे जावे. आणि हो, हे आमंत्रण नागपूरकरांसारखे नाही वा मी हडपसरला रहात असल्यामुळे सदाशिवपेठी आमंत्रण ही नाही :-;

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Dec 2010 - 11:10 am | विश्वनाथ मेहेंदळे

एकाच वाक्यात नागपूरकर आणि पुणेकर यांची टोपी उडवलीत की हो. याला म्हणतात एक के उपर एक फ्री !!!!

एक शंका :- कधीमधी पुण्याला येणाऱ्या मुंबैकरांबद्दल तुमच्या खाजगी बारची पॉलिसी काय आहे? म्हणजे उपरोक्त आमंत्रण त्यांना(पक्षी आम्हाला) पण लागू आहे काय?