शाळेत लॅगीक शिक्शण असावे का ...?

पान्डू हवालदार's picture
पान्डू हवालदार in काथ्याकूट
24 Apr 2008 - 9:44 pm
गाभा: 

लोकसत्ता मधील बातमी
http://www.loksatta.com/daily/20080424/mp03.htm

माझ्या मते शाळेत लेगीक शिक्शण असावे ... आपल्याला काय वाटत ...

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2008 - 9:51 pm | प्रभाकर पेठकर

लॅगीक आणि लेगीक हे दोन्ही शब्द चुकिचे आहेत. शुद्ध शब्द 'लैंगिक' असा आहे.

माझ्या मते शाळेत लेगीक (लैंगिक) शिक्शण असावे
असे आपल्याला का वाटते, ह्यावर काही विवेचनात्मक लिखाण आपल्याकडून अपेक्षित आहे.

व्यंकट's picture

24 Apr 2008 - 10:23 pm | व्यंकट

पूर्ण विचार केलेला नाही, तरी प्राथमीक स्वगत व्यक्त करतो. लैंगीक शिक्षण हा विज्ञानाधिष्ठीत विषय आहे. साधारणपणे विज्ञानाच्या विषयांस प्रयोगशाळा आणि प्रयोग आवश्यक असतात. प्राणी-पक्षी-वृक्षवल्लींशी निगडीत प्रजोत्पत्ती आत्ताही शिकवली जाते, झाडांसंदर्भातील पुंकेसर, स्त्रीकेसर, फुलपाखरांकरवी त्यांचे मिलन वैगेरे, प्राण्यांच्या ( बेडूक, फुलपाखरे वैगेरे) लैंगीक सवयी, नरांमधली स्पर्धा, बळ, विणीचा काळ, संभोग-पद्धती सुद्धा शिकवल्या जातात. ह्या कामक्रिडा आणि प्रजनना पर्यंतची पूर्ण सायकल परिसरांत पहावयास मिळते.

आता प्रस्तुत लैंगीक शिक्षण ज्यावर गदारोळ सुरु आहे तो मानवी लैंगीक शिक्षणासंदर्भात आहे का की सामान्य लैंगीक शिक्षण आहे ते बघावं लागेल. त्यात काय काय शिकवणं अपेक्षित आहे? प्रयोगांचे काय? की विद्यार्थ्यांनी आजुबाजूच्या शयनगृहांत डोकावून पहावं?

असे विविध प्रश्न डोक्यात येत आहेत, तर, अजून काहिही मत नाही.

व्यंकट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Apr 2008 - 8:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैगिक शिक्षण शाळेत असावे असे वाटते. या शिक्षणाला विरोध करतांना विरोधी पक्षाचे नेते म्हणाले की महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे असले शिक्षण बसत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात असे नेते निपजल्यावर यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा करणे म्हणजे वेडेपणाच आहे. शाळेत विद्यार्थी,विद्यार्थींना या शिक्षणाची गरज का आहे, तर विशिष्ट वयात स्वतः त होणारे शारिरीक बदल हे नैसर्गीक बदल आहेत. ज्याची चर्चा विद्यार्थी,विद्यार्थीनी आपल्या पालकांसोबत करु शकत नाही त्यामुळे कदाचित त्यांच्या स्वभावात एकलकोंड्यापणामुळे निराशेची भावना निर्माण होते. त्यामुळे अशा शिक्षणाची गरज आहे. मुळात अशा शिक्षणाचे प्रशिक्षण देणा-या शिक्षकांनी सरळ वर्गावर जाऊन शिकवायचे नसुन अगोदर त्यांच्या पालकांची एक बैठ्क घेऊन सदरील अभ्यासक्रम आणि त्याची आवश्यकता का आहे समजावून सांगून त्यानंतर वर्गात तो विषय शिकवायचा आहे. अशा शिक्षणाला विधार्थी,विद्यार्थींनीं सुरुवातीला संकोचतात असा अनुभव एका शिक्षक मित्राने सांगितला आहे. पण नंतर मात्र त्या विषयाच्या बाबतीत विधार्थी धीट बनतात आणि मनमोकळपणाने चर्चाही करतात वेगवेगळ्या प्रश्नांचे समाधान करुन घेतात तेव्हा असे शिक्षण दिले पाहिजे असे आम्हाला वाटते.

शाळेत शिक्षकच विद्यार्थ्यांचे शोषण करतात असा एक आक्षेप आहे तसे अपवादात प्रकरणे असतीलही म्हणुन त्या विषयीचे शिक्षणच देऊ नये हा त्याच्यावर उपाय होऊ शकत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पिवळा डांबिस's picture

26 Apr 2008 - 9:32 am | पिवळा डांबिस

दिलीपरावांच्या मताशी मी ही सहमत!
-पि.डा.

लिखाळ's picture

25 Apr 2008 - 1:46 pm | लिखाळ

नमस्कार,
१. नववीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात अकृत्यांसहित स्त्री-पुरुष पुनरुत्पादन संस्थेची माहिती होती असे अंधूकसे स्मरते. याचा अर्थ पाठ्यपुस्तकाला माध्यमिक शाळेत या शिक्षणाचा विटाळ नाही.
तो धडा स्वाभ्यासासाठी आहे आणि त्यावर प्रश्न विचारले जाणार नाहित असे सांगुन त्याची वासलात लावली गेलेली सुद्धा आठवते आहे.
पण आमच्या शिकवणीचे गुरुजी कॉलेजवयीन असल्याने त्यांनी पुढाकाराने आम्हाला ते सर्व सभ्यपणे सांगितले होते. ते आमच्या शाळेतल्या शिक्षकांपेक्षा जास्त जमजूतदार होते असा त्याचा अर्थ :)
२. मराठीच्या पुस्तकात एका कवितेत 'माती न्हाती धुती होते' असा उल्लेख आल्यावर शिकवणार्‍या शिक्षिकेने 'वयात येणे' या प्रकाराची स्वतःच तोंडओळख करुन दिली होती (साल साधारण १९९३).
३. मी माध्यमिक शाळेत असताना एका समुपदेशकांच्या संचाला पाचारण करुन आमच्या शाळेत ९वी-१०वी च्या मुलांना लैंगिक शिक्षण दिले होते हे सुद्धा स्मरते.

याचा अर्थ असा की हा विषय पाठ्यपुस्तकात आधीपासूनच आहे. तो शिक्षकांनी शिकवावा अशी अपेक्षा सुद्धा आहे. काही शिक्षक संकोच न बाळगता ते काम करत असतात. असे सर्व असताना म्हणजेच पठडीमध्ये हे शिक्षण देणे घातलेले असताना केवळ शिक्षकांना उद्युक्त करणे इतकेच काम आहे असे मला वाटते. त्या साठी हा विषय नव्याने पुढे मांडायचा घाट घालत आहोत हा सरकारी अभिनिवेष का हे समजले नाही.
--लिखाळ.

डॉ. श्लोक _भातखंडे's picture

26 Apr 2008 - 2:14 am | डॉ. श्लोक _भातखंडे

पाठ्यपुस्तकात आधीपासूनच आहे. तो शिक्षकांनी शिकवावा अशी अपेक्षा सुद्धा आहे. काही शिक्षक संकोच न बाळगता ते काम करत असतात. असे सर्व असताना म्हणजेच पठडीमध्ये हे शिक्षण देणे घातलेले असताना केवळ शिक्षकांना उद्युक्त करणे इतकेच काम आहे असे मला वाटते. त्या साठी हा विषय नव्याने पुढे मांडायचा घाट घालत आहोत हा सरकारी अभिनिवेष का हे समजले नाही.

+१ ... ज्या शिक्षकाला हे शिकवायचे आहे ते तो शिकवतोच... जास्तीतजास्त शिक्षकांना उद्युक्त करणे महत्त्वाचे... जास्त बडबड करून नुसता विधानसभेत दंगा होतो, आणि सगळाच प्रोजेक्ट निकालात निघतो......

धोंडोपंत's picture

25 Apr 2008 - 8:11 pm | धोंडोपंत

शाळेच्या पातळीवर लैंगिक शिक्षण देण्याची काहीही गरज नाही. माजावर आलेल्या कुठल्याही जनावराला योग्य वयात ते निसर्ग देतच असतो.

लैंगिक शिक्षण दिले म्हणजे मुले सुधारतील असे नाही. लैंगिक शिक्षणापेक्षा संस्कारांची गरज आहे. सुसंस्कृतपणा शिकवला गेला पाहिजे.

शिवाजी महाराजांचा आदर्श मुलांना दिला गेला पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जी वागणूक महाराजांनी दिली, ती महाराजांची भूमिका शिकवली गेली पाहिजे. तर सुसंस्कृत पिढी तयार होईल.

संस्कारांशिवाय दिलेले लैंगिक शिक्षण मुलांना वाईट कृत्ये करण्यापासून परावृत्त करणार नाही तर ती कृत्ये करतांना निरोध वापरला पाहिजे एवढेच शिकवेल.

आपला,
(आदर्शवादी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर's picture

26 Apr 2008 - 8:11 am | विसोबा खेचर

माजावर आलेल्या कुठल्याही जनावराला योग्य वयात ते निसर्ग देतच असतो.

हा हा हा! अगदी सहमत आहे. माझ्या मते लैंगिक शिक्षण वगैरे सगळी नसती फ्यॅडं आहेत. जळ्ळं, आमच्यावेळेला कोण आलं होतं लैंगिक शिक्षण द्यायला? तरीही आम्ही शिकलोच ना? छ्या! लैंगिक शिक्षण वगैरे सगळ्या गफ्फा आहेत गफ्फा!

लैंगिक शिक्षण दिले म्हणजे मुले सुधारतील असे नाही. लैंगिक शिक्षणापेक्षा संस्कारांची गरज आहे. सुसंस्कृतपणा शिकवला गेला पाहिजे.

सहमत आहे..

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जी वागणूक महाराजांनी दिली, ती महाराजांची भूमिका शिकवली गेली पाहिजे. तर सुसंस्कृत पिढी तयार होईल.

लाख रुपये की बात!

संस्कारांशिवाय दिलेले लैंगिक शिक्षण मुलांना वाईट कृत्ये करण्यापासून परावृत्त करणार नाही तर ती कृत्ये करतांना निरोध वापरला पाहिजे एवढेच शिकवेल.

हा हा हा! हेही खरंच रे धोंड्या! :)

तात्या.

विकि's picture

26 Apr 2008 - 12:18 am | विकि

सरकारचा निर्णय योग्यच. आजच्या संगणक युगात मुलांना असले शिक्षण देणे गरजेचे आहे. कारण हल्ली अश्लील सिनेमे बघणे सोपी गोष्ट झाली आहे. आणि पौंगडावस्थेतल्या मुलांना याबाबत जास्त आकर्षण असते. या फिल्म पहाण्याने मनावर परीणाम होऊ शकतो.
चांगले समुपदेशक नेमल्यास मुलांना या विषयाबाबत चांगले ज्ञान मिळेल.
आपला
कॉ.विकि

'अनैतिक गोष्टी' किंवा 'अश्लील गोष्टी' चा संदर्भ यायलाच हवा अशी काहीशी आपली दृढ समजूत झालेली दिसते.
"पूर्वीच्या लोकांना कुठे होते ह्याचे शिक्षण? मग त्यांना काय मुले झाली नाहीत?"
किंवा "वेळ आली की निसर्ग देतोच ह्याचे शिक्षण त्यासाठी आपणच फार काही करावे लागत नाही."
अशा प्रकारच्या समजुती हे सोयिस्करपणे डोळ्यावर कातडे पांघरुन घेण्याचा प्रकार आहे असे मला वाटते.
पूर्वीच्या काळीही (म्हणजे दोन - तीन पिढ्या आधी म्हणूयात) हे शिक्षण महत्त्वाचे झाले होतेच - त्यातूनच संततीनियमनाचे महत्त्व समाजमनावर बिंबवण्याचे प्रयत्न कै.र.धों.कर्व्यांसार्खांनी केले पण तो वेगळा विषय आहे.
सद्यस्थितीत एकूणच जीवनाच्या रेट्यामधे लहान मुलांचे (मुले-मुली दोन्ही) बाल्य हे वेगवेगळ्या कारणांनी कोमेजून जात असते. त्यांचे बाल्य संपून, कुमार वय आणि तारुण्य ह्या अवस्था फारच झपाट्याने बदलताना दिसतात. (अमेरिकेत वयाच्या ८-९ वर्षात मुली वयात येऊ लागल्याची उदाहरणे आहेत आणि ही एक सामाजिक समस्या बनून राहिली आहे. स्त्री-पुरुष संबंधातील नको तेवढा उघड्यावरचा मोकळेपणा त्याचा मनावर आणि पर्यायाने हार्मोन्सवर होणारा परिणाम, अतिरिक्त मेदयुक्त खाणे आणि खेळाचा अभाव अशीही कारणे ह्यामागे आहेत).
भारतातही ह्यापेक्षा फार वेगळी परिस्थिती नसावी. ह्याला कारणे अनेक आहेत आणि बरीचशी आपल्या आवाक्याबाहेरची आहेत, अशा अर्थाने की त्यांच्या पासून आपण मुलांना झाकून ठेवू शकत नाही. टी.व्ही. वरील जाहिराती, सिनेमे आणि त्यातले आयटम डान्स, इतरत्रही उजळ माथ्याने दिसणारी बटबटीत लैंगिकता अशांपासून मुलांना नको त्या वयात नको त्या गोष्टी दिसतात त्याचे अर्थ, संदर्भ काहीच कळण्याचे त्यांचे वय नसते. अशावेळी अयोग्य मार्गावर जाण्यापासून त्यांचे त्यांनीच स्वत:ला योग्य प्रकारे कसे दूर ठेवावे ह्याचे शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण; वयात येतानाचे शरीरातले बदल त्यातून येणारी अस्वस्थता, भीती, घृणा ह्या भावनांना योग्य प्रकाराने कसे हाताळावे ह्याचे शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण; मुले आणि मुली ह्यांनी त्यांच्या विशिष्ठ शरीरावयवांची स्वच्छता कशी ठेवावी, त्याचे महत्त्व काय ह्याचे शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण; शरीरसंबंध कोणत्या वयात, का, कसा ठेवावा ह्याची योग्य, शास्त्रीय जाण देणे म्हणजे लैंगिक शिक्षण.
हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मी शाळेत असताना साधारण सातवीत असतानाची गोष्ट. मधल्या सुटीत खेळताना एका मुलीच्या स्कर्टवर अचानक रक्ताचे डाग दिसू लागले. ती तर घाबरलीच, इतरही मुली घाबरल्या, बाईंनी तिच्या पालकांना बोलावून तिला घरी पाठवले. तिची पाळी अचानक सुरु झाल्याने हा चमत्कारिक प्रसंग उद्भवला होता. आम्ही मुलेही हा प्रसंग समजल्यावर भांबावून गेलो. त्या नंतर ती मुलगी ८ दिवस शाळेत आली नाही. अशा प्रसंगांचे मुलांच्या मनावर फार खोल ओरखडे उठतात. अनेक वर्ष अशा घटना न्यूनगंड करुन ठेवू शकतात. हेच जर त्यावेळी योग्य शिक्षणाव्दारे तिला तिच्या आईने किंवा डॉक्टरांनी आधीच कल्पना देऊन ठेवून सावध केले असते तर असा प्रसंग टळू शकला असता.
तसेच असुरक्षित संभोग, वेश्यागमन अशांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी त्यांना योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे. पिवळी पुस्तके वाचून, नील्-चित्रफिती पाहून असे 'ज्ञान' संपादन करण्यापेक्षा डॉक्टरांकडून/ योग्य मार्गदर्शकाकडून घेणे कधीही योग्यच.

पुरोगामी म्हणविणार्‍या महाराष्ट्राने नवीन पिढीला योग्य संस्कार देण्याची ही संधी गमावली ह्याचे वाईट वाटते.

चतुरंग

व्यंकट's picture

26 Apr 2008 - 2:09 am | व्यंकट

विचार करायला लावणारा प्रतिसाद

व्यंकट

डॉ. श्लोक _भातखंडे's picture

26 Apr 2008 - 2:11 am | डॉ. श्लोक _भातखंडे

'अनैतिक गोष्टी' किंवा 'अश्लील गोष्टी' चा संदर्भ यायलाच हवा अशी काहीशी आपली दृढ समजूत झालेली दिसते.
"पूर्वीच्या लोकांना कुठे होते ह्याचे शिक्षण? मग त्यांना काय मुले झाली नाहीत?"
किंवा "वेळ आली की निसर्ग देतोच ह्याचे शिक्षण त्यासाठी आपणच फार काही करावे लागत नाही."
अशा प्रकारच्या समजुती हे सोयिस्करपणे डोळ्यावर कातडे पांघरुन घेण्याचा प्रकार आहे असे मला वाटते.

उत्तम बोललात हो... पटले... परिस्थिती वेगाने बदलते आहे...आणि या शिक्षणाची गरज आहे असे मला वाटते...

तसेच असुरक्षित संभोग, वेश्यागमन अशांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी त्यांना योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे. पिवळी पुस्तके वाचून, नील्-चित्रफिती पाहून असे 'ज्ञान' संपादन करण्यापेक्षा डॉक्टरांकडून/ योग्य मार्गदर्शकाकडून घेणे कधीही योग्यच.

पुरोगामी म्हणविणार्‍या महाराष्ट्राने नवीन पिढीला योग्य संस्कार देण्याची ही संधी गमावली ह्याचे वाईट वाटते.

हेच म्हणतो.....

(योग्य माहिती हा सर्वांचा अधिकार आहे ) असे म्हणणारा.....
मदनबाण

वरदा's picture

26 Apr 2008 - 8:39 am | वरदा

१०१% सहमत्...

प्रभाकर पेठकर's picture

26 Apr 2008 - 9:20 am | प्रभाकर पेठकर

लैंगिक शिक्षणाची आवश्यकता काही अंशी पटते.
पण ते किती प्रमाणात असावे, त्याचा आवाका काय असावा ह्यावर सरकार-दरबारातून योग्य ती माहिती प्रसारीत व्हावी. म्हणजे त्याने सुशिक्षित समाजाचे प्रबोधन होऊन लैंगिक शिक्षणाला समाजाचे समर्थन लाभेल.
चुकिच्या पद्धतीने 'माहिती' पुरविली तर सुरक्षित संबंधांचा संदेश बाजूला राहून 'उत्सुकता' वाढण्याचा धोका संभवतो. लैंगिक शिक्षणासोबत असुरक्षित संबंधांमुळे पसरणारे विविध त्वचा रोग आणि HIV, AIDS बद्दलही विद्यार्थीदशेतच लोकजागृती व्हावी.

आमच्या काळी हे काही नव्हतं (अरे वा! हे वाक्य फेकण्याच्या वयाला पोहोचलो तर...) सुरुवाती सुरुवातीस हिन्दी चित्रपटांतून हेलन आणि बिंदूला कमरेला आणि वक्षस्थळी दोन चिंध्या बांधून नाचताना पाहून तसेच इंग्रजी चित्रपटातील चुंबनदृष्ये पाहून घशाला कोरड पडायची. पण त्याने आमचे 'कॅरेक्टर' बिघडले नाही. तसेच वारंवार तशी दृष्ये पाहून मनही निर्ढावले. हे सांगण्याचा उद्देश हा की हल्ली टिव्ही वरील दृष्ये पाहून तरूणांचे मनही असेच निवले असेल. (एक अंदाज).
लैंगिक शिक्षणाचा रोख स्त्री-पुरूष संबंध कसा ठेवतात ह्याची रंजक माहिती नसून तो कसा सुरक्षित असावा त्यातून निर्माण होणारी वैयक्तिक, भावनिक, सामाजिक बांधीलकी ह्यावर भर देणारा असावा असे वाटते

मन's picture

26 Apr 2008 - 4:32 pm | मन

सगळे प्रतिसाद वाचले.
पण सगळे "मोठ्या" माणसांनी दिलेलेच आहेत.
ज्या मुलांना हे शिक्षण द्यायचं आहे त्यांच्याशी बोला की राव.
ते काय म्हणतात्,त्यांना काय हवयं हे समजुन घ्या की जरा.

किंवा अगदि लहान मुलांशी नाही आलं बोलता तर निदान नुकतेच बालपण सोडलेल्या कुमारांशी बोलुन पहा.
(म्हणजे शुद्ध भाषेत ज्याला "टीन एज" किंवा "पौगंड" म्हणतात तो वयोगट.)

जर वर म्हटल्याप्रमाणे
>>माजावर आलेल्या कुठल्याही जनावराला योग्य वयात ते निसर्ग देतच असतो.
हे खरे असेल तर ते आपसुकच सिद्ध होइल.(म्हणजे ह्या गोष्टी त्यांना व्यवस्थित कळतात हे दिसुन येइल.)
मी पाहिलेल्या घटनांवरुन असं दिसतं की माणसाला हे जे ज्ञान होतं ते यायला जरा वेळ लागतो.
म्हणजे त्याच्या मनाला,बुद्धिला या गोष्टी समजणारच असतात, त्या समज्तातही!
पण शरीराने मात्र ते काम आधिच सुरु केलेले असते.
म्हणजे शरीर(त्यानुसार होणारी "या"बाबतीतील तीव्र उत्सुकता) यौवनाकडे आणि बुद्धी मात्र शालेय
अशीही स्थिती बर्‍याचदा होते.
आणि हीच वेळ सर्वादिक चुका करण्याची /धोकदायक असते.
हिच ती अवस्था आहे, जिथे लैंगिक शि़क्षणाचि आवश्यकता असते.

हां मात्र एकदा ह्या वयातुन ती व्यक्ती पार झाल्यावर ते ज्ञान त्याला होतेच पण हळु हळु आणि संथ गतीने.
(जसे आमच्या पुर्विच्या कैक पिढ्यांना झाले होते.)

"म्हणुनच आपल्याकडे सोळावं वरिस धोक्याचं " म्हणत असावेत ते ह्यासाठीच.

आणि शेवटी हेहि खरेच कि "निसर्ग जी उपजत बुद्धी देतो त्यातही भेद भाव असतोच.
इतर प्राण्यांना ती ज्या प्रमाणत असते तेवढी
मानवाला कधिच मिळत नाही.(काही अप्वाद सोडुन)"

आपलेच साठ्यांचे कार्टे.

विकि's picture

28 Apr 2008 - 5:09 pm | विकि

इथे तर बहूतेक जण लैंगिक शिक्षणाच्या विरोधात दिसत आहेत.
आपला
कॉ.विकि

प्रभाकर पेठकर's picture

28 Apr 2008 - 6:28 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या मते शाळेत लेगीक (लैंगिक) शिक्शण असावे
असे आपल्याला का वाटते, ह्यावर काही विवेचनात्मक लिखाण आपल्याकडून अपेक्षित आहे.

श्री. पान्डु हवालदार,

आपण उपस्थित केलेल्या मुद्यावर जवळ जवळ डझनभर सदस्यांनी प्रतिसाद दिला आहे. पण आपल्या कडून माझ्या वरील प्रतिसादाला अनुसरुन काहीही लिखाण आलेले नाही. त्यामुळे ह्या मुद्याबद्दल आपण स्वतःच विशेष गंभीर दिसत नाहीत. एक मुद्दा मांडून त्यावर आपले सविस्तर मत नोंदविणे तसेच चर्चेत मधे-मधे सहभाग घेणे, कुठली मते पटली, कुठली पटली नाहीत आदी गोष्टींवर विस्तृत लिखाण करणे अपेक्षित आहे. तसे होणार नसेल तर पुढच्या वेळी आपल्या मुद्यांवर मतप्रदर्शन करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा की नाही ह्यावर विचार करावा लागेल. हे सहज कळावे.

चतुरंग's picture

28 Apr 2008 - 7:54 pm | चतुरंग

पान्डू हवालदार साहेब,

मूळ धागा सुरु करणार्‍याने त्याचा यथायोग्य वापर केला नाही तर सगळे लिखाण संदर्भहीन होते.
ह्यापुढे असे होणार नाही ह्याची एका जबाबदार मि.पा.कराच्या नात्याने काळजी घ्यावी.

चतुरंग

पान्डू हवालदार's picture

1 May 2008 - 2:48 am | पान्डू हवालदार

प्रभाकर राव
सध्या मराठी टंकलेखन शिकतो आहे.
बाकी, "पुढच्या वेळी आपल्या मुद्यांवर मतप्रदर्शन करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा की नाही ह्यावर विचार करावा लागे" जशी आपली मर्जी ..

प्रभाकर पेठकर's picture

1 May 2008 - 9:04 am | प्रभाकर पेठकर

प्रभाकर राव
सध्या मराठी टंकलेखन शिकतो आहे.

मुळमुद्दा आणि वरील प्रतिसाद शुद्ध लिहीण्याएवढे टंकलेखन आपल्याला नक्कीच येत आहे. त्यामुळे माझ्या प्रतिक्रियेवर (पहिल्या) 'मी मराठी टंकलेखन शिकतो आहे. विस्तृत लेखन लवकरच करेन' असा प्रतिसाद दिला असता तरी वाट पाहिली असती.

बाकी, "पुढच्या वेळी आपल्या मुद्यांवर मतप्रदर्शन करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा की नाही ह्यावर विचार करावा लागेल" जशी आपली मर्जी ..

ते तर माझ्याच काय, कुणाही बाबतीत सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. शब्दार्थापेक्षा भावार्थ लक्षात घेतला असतात तर एवढा राग आला नसता.

मुळ प्रस्ताव मांडल्यावर किंवा एखादा चर्चेचा मुद्दा मांडल्यावर त्या सदस्याचा त्या चर्चेत 'काहीच' सहभाग नसेल तर ते अपमानकारक वाटते. संस्थळावर आपण एकमेकांना पाहू शकत नाही. त्यामुळे इतर सदस्यांनी केलेल्या प्रतिवादावरील आपली प्रतिक्रिया आम्हाला कशी दिसणार? समोरा समोर बोलताना जरी तुम्ही काही बोलला नाहीत तरी नुसती मान हलवून तुमची सहमती-असहमती समोरच्या पर्यंत पोहोचत असते. त्या योगे तुमचा चर्चेतील वैचारिक सहभाग अधोरिखित होत असतो. पण, संस्थळावर तसे नसते. तुम्हाला 'काहीतरी' लेखी प्रतिसाद द्यावा लागतो. नाहीतर वरील समोरासमोर बोलण्याच्या उदाहरणात तुम्ही चर्चेचा मुद्दा मांडल्यावर इतरांच्या मतांवर लक्ष न देता भलतीकडेच बघत बसलात किंवा चहा प्यायला निघून गेलात तर तुमच्या मुद्यावर प्रतिवाद करणार्‍या इतरांचा अपमान केल्या सारखेच होत नाही का?
ह्यावर विचार करावा, ही विनंती.

विकि's picture

28 Apr 2008 - 10:46 pm | विकि

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2988993.cms येथे टिचकी मारा